मागील भागावरुन पुढे चालू:
सुहास, दुर्दैवाने डॉलर मधल्या किंमती बद्दल फारसे काही करु शकणार नाही. पण तरीही मी आमच्या ऑपरेशंस हेड शी बोलून बघते, बघु काही मार्ग निघतो का”
“चालेल”
“सुहास , काय ठरवलेस? आम्ही दिलेली संधी पुन्हा येणार नाही, तेव्हा आता जास्त वेळ न घालवता , करार करुन टाक आणि पैसे कधी जमा करतोस ते सांग”
“हो,पण मला काही शंका आहेत?”
“आता कसल्या शंका, या आधी आपण बरेच सविस्तर पणे बोललो आहोतच ना?”
हे बोलताना, त्या व्हाईस प्रेसिंडेंट्च्या आवाजाची पट्टी बदलली, पुर्वीचा तो मधाळ आवाज जाऊन तिथे आता काहीसा त्रासीक स्वर जाणवू लागला.
“तरी ही काही शंका राहील्या आहेत , मला वाटते त्यांचा पूर्ण खुलासा झाल्या शिवाय मी काही करार करू शकणार नाही”
“आम्ही इतके सारे व्यवस्थित सांगून ही तुला शंका आहेतच का?”
“आपण सुरवाती पासुन ‘XXXXX’ या पब्लिशींग कंपनीचे आहात असे भासवत आहात पण करार आणि पैशाचा व्यवहार मात्र कोणा दुसर्या YYYYY’ कंपनी बरोबर करायला सांगत आहात , हे कसे काय?”
“ती आमची सिस्टर कन्सर्न आहे”
“मग पुस्तक नक्की कोण प्रकाशीत करणार ? तुमची ‘XXXXX’ कंपनी का ती ‘YYYYY’ कंपनी?”
“अर्थातच ‘YYYYY’ “
“म्हणजे पुस्तकावर कोठेही ‘XXXXX’ चा उल्लेख असणार नाही बरोबर ना?”
“हो, ‘YYYYY’ तर्फे छापून प्रकाशीत केले जाणार असल्याने त्यांचेच नाव प्रकाशक म्हणून असणे स्वाभाविकच आहे”
“मग अगदी सुरवाती पासुन तुम्ही सतत ‘XXXXX’ चा जप का लावला होता?”
“सांगीतले ना , ती ‘YYYYY’ आणि ‘XXXXX’ एकच आहे”
“ते बरोबर असेल पण मला माझ्या पुस्तकावर ‘XXXXX’ हे नाव हवे होते, तुमच्या त्या ‘YYYYY’ नको! ‘XXXXX’ जे वजन आहे, वलय आहे ते या ‘YYYYY’ नाही”
“तुम्ही असे म्हणू शकत नाही. जरा इंटरनेट वर सर्च केला तरी तुला कळेल की ‘YYYYY’ सुद्धा तितकीच तोलामोलाची , प्रसिद्ध कंपनी आहे”
“इंटरनेट सर्च केला म्हणून तर मला सगळे कळाले आणि तुमचा डाव पण लक्षात आला!”
“कसला ‘डाव’ , काय म्हणतो आहेस तू”
“आपल्याला ती ‘zzzzzzz’ वेबसाईट माहीती आहे का?”
“त्या साईट वर लिहलेले सगळे झूठ आहे”
“अच्छा , म्हणजे ती ‘zzzzzzz’ वेबासाईट आपल्याला माहीती आहे तर! एखादी नास्टी कॉमेंट, एखादा प्रतिकूल रिव्हू मी समजू शकतो. पण एक नाही दोन नाही, दोनशे पेक्षा जास्त नवोदित लेखक तिथे तुमच्या नावाने शंख करत आहेत, त्यातल्या काहीजणांनी तुमच्या विरुद्ध ‘फसवणुकीचा’ गुन्हा दाखल केला आहे . इतके सारे झूठ कसे असू शकेल? त्यांनी जे लिहले आहे त्याचाच मी अनुभव घेत आहे , म्हणजे पुढचेही तसेच घडणार , ही तर सरळ सरळ धोक्याची घंटा वाजते आहे माझ्या साठी”
“कसली धोक्याची घंटा ? काय बोलतो आहेस तु. आमच्या प्रतिस्पर्धी कंपनीने रचलेला डाव आहे हा , आम्हाला बदनाम करण्या साठी, त्याला फसू नकोस तू “
“पण त्या लोकांनी जे लिहले आहे तेच अनुभव मला पण येत आहेत ना , अगदी तंतोतंत, काडीचाही फरक न होता. हे कसे काय?”
“तु काय बोलतो आहे हे माझ्या लक्षात येत नाही”
“सांगतो ना”
“काय?”
मी त्यांचा फसवणूकीचा प्लॅन स्टेप बाय स्टेप सांगायला सुरवात केली..
बोलणे असेच चालू राहीले..
….
मासा जाळ्यातून निसटला याची कल्पना येताच, त्या व्हाईस प्रेसिडेंट (?) चा तोल सुटला.
मुळात ती व्हाईस प्रेसिडेंट नव्हतीच कॉल सेटर मधली एक चलाख मुलगी होती. आर्ट डायरेक्टर , चीफ एडिटर , सगळे एकजात ट्रेन केलेले कॉल सेंटर वाले होते.
“म्हणजे तुला पुस्तक करायचे नाही, तु उगाच आमचा वेळ घेतलास”
“हेच मी तुम्हाला म्हणू शकतो ना? मी थोडाच तुमच्या कडे आलो होतो, त्तुम्हीच मला फोन करत आहात”
“हो, पण म्हणुन तू आमच्यावर काहीही खोटे नाटे आरोप करु शकत नाहीस”
“मी आरोप केलेलेच नाहीत , मी फक्त माझ्या कानावर जे काही आले त्याबद्दल खुलासा मागतोय आणि तो तुम्ही देत नाही “
“आम्ही सगळी माहीती दिली आहे”
“नाही, तुम्ही महत्वाचा भाग लपवून ठेवलाय”
“कोणता?”
“तुमचा त्या ‘XXXX’ नेमका काय संबंध आहे हे सांगीतले नाही, उलट त्या नावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहात”
“आता, हा खरोखरीचा आरोप नाही का?”
“आहेच”
“तू असे म्हणू शकत नाहीस”
“शकतो, कारण मी मधल्या काळात त्या ‘XXXX’ शी संपर्क करुन माहीती घेतली आहे..आणि त्यांच्याकडून आलेली ईमेल माझ्याकडे आहे”
“काय?”
“हो, मला त्या ‘XXXX’ नी स्पष्ट सांगीतले आहे, ती मेल वाचून दाखवू का?”
“….”
“तुम्ही मला फसवयाला निघाला होता , पण माझे नशिब चांगले म्हणून मी वेळीच सावध झालो”
पलीकडे फोन आदळल्याचा आवाज!
त्या ‘XXXX’ कंपनीला मी मेल करुन ‘YYYY’ बद्दल विचारले होते त्यांचे एव्हाना उत्तर ही आले होते, त्यानुसार ‘YYYY’ ही ‘XXXX’ ची ग्रुप कंपनी असली तरी स्वतंत्र पणे काम करते तीचा व्यवहार पूर्ण पणे स्वतंत्र आहे, ‘XXXX” कडून पुस्तक प्रकाशीत करायचे असेल एखाद्या ‘लिटररी एजंट’ मार्फत आलेल्या प्रस्तावांचाच विचार होतो. ‘XXXX’ जोतिष या विषयावर पुस्तके प्रकाशीत करत नाही , ‘XXXX’ लेखकाकडून कसलेही पैसे घेत नाही, पुस्तकाचे सर्व संस्करण (एडिटींग, प्रुफ रिडिंग, कव्हर डिझाईन इ.) स्वत:च्या खर्चाने करते. मोठी वेटींग़ लिस्ट असल्याने सध्या तरी ‘XXXX’ कोणतेही नविन पुस्तक प्रकाशनासाठी स्विकारु शकत नाही. , ‘YYYY’ शी केलेल्या कोणत्याही व्यवहारास ‘XXXX’ जबबादार नाही. ‘YYYY’ कंपनीला ‘XXXX’ हे नाव कोणत्याही स्वरुपात वापरता येणार नाही.
आता ही ‘YYYY’ नेमकी काय करत होती?
‘XXXX’ कंपनीच्या नावाचा फायदा घेऊन , नवोदित लेखकांना भुरळ घालायची.
विविध मार्गांनी म्हणजे एडीटींग , प्रुफरिडिंग, कव्हर डिझाईन , बुक प्रमोशन इ. लाखाच्या घरात पैसे उकळायचे. प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाची सर्हिस पुरवायची.
ते पुस्तक छापणार तरी होते का? याचा एक मोठा किस्सा आहे.
ते मी भरलेले १,५०,००० अक्षरश: खिशात घालणार होते. २००० प्रिंट्स तर सोडाच १०० सुद्धा प्रतीं छापणार नव्हते, जशा लागेल तशा प्रतीं ते ‘प्रिंट ऑन डीमांड’ नावाचे तंत्रज्ञान वापरुन छापणार होते या प्रकाराने त्यांना अगदी एक कॉपी सुद्धा छापता येणार होती.
एडिटींग आणि कव्हर डिझाईन असेच स्टॅन्डर्ड टेमप्लेट वापरुन करणार होते ते फुकटच असते
ते एकही प्रत अॅडव्हांस छापणार नव्हते कोणी पुस्तक ऑर्डर केले तर त्याच्या पुरतीच एक प्रत छापून पाठवणार होते. म्हणजे ते ऑफसेट प्रिंटींग करणार नाहीत, छ्पाईचा दर्जा सामान्यच राहणार होता !
ते अॅमेझॉन आणि बार्नेस नोबल वर पुस्तल लिस्ट करणे ह्या व्यतिरिक्त आणखी काहीही करणार नव्हते, त्यांची शोरुम नाही की इतर रिसेलर्स नाहीत.
आता अॅमेझॉन वर मी सेलर म्हणून काहीही विकू शकतो त्यासाठी अॅमेझॉन चे कमीशन अगदी अत्यल्प असते आणि अॅमेझॉन मला भारतीय चलतान पेमेंट करु शकते..
हा असला तोट्यातला किंबहुना फसवणूकिचा व्यवहार कोण करेल? पण बरेच जण या ‘YYYY’ कंपनी कडून फसले आहेत आणि आता रडत आहेत.
पुस्तक प्रकाशनातला हा आधुनिक फसवाफसवीचा धंदा!
माझे नशीब चांगले मी वेळीच सावध झालो. ही एकटी ‘YYYY’ कंपनी नाही, अशा अनेक आहेत , या ‘YYYY’ नंतर आणखी एक भेटली होती !
लेखक होण्याचेही ‘योग’ असावे लागतात म्हणे !!
(लेखमाला समाप्त)
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
मग तुमचे पुस्तक तयार झाले आहे की नाही?? उत्सुकता आहे कधी एकदा वाचायला मिळेल!!??
श्री. भालचंद्र जी
पुस्तक अजून तयार नाही, आता मी ते ई-बुक माध्यमात प्रसिद्ध करायचा विचार करत आहे म्हणजे प्रकाशक इ भानगड नाही , मीच लेखक आणि मीच प्रकाशक, आयडिया चांगली आहे , बघू कसे काय जमते ते!
सुहास गोखले
सुहासजी बरेच दिवस आपण मायबोलीवर संपर्कात नव्हता म्हणून इथे चक्कर टाकली.आपण प्रायव्हसी बाबत अत्यंत जागरुक आहात याची जाणीव आहे. तुमचा ब्लॊग सुंदर आहेच. आपली लेखनशैलीही उत्तम आहे. मायबोलीवर ही टाका की हे लेख.
श्री. प्रकाशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपल्या सारख्या जाणकार व्यक्ती कडून कौतुकाचे चार शब्द आले हा मी माझा मोठा बहुमान समजतो. आपण तसे पाहीले तर ज्योतिषाच्या विरोधातले (निदान आपले लिखाण तरी तसे सुचित करते) पण आपला विरोध हा वैचारीक पातळीवर असतो आणि त्यातूनही आपला या विष्याचा अभ्यास जाणवतो. आपण टीका करता ती काही अगदीच बिनबुडाची नसते. अत्यंत संयमित भाषा आणि संतुलित विचार ही आपली खासियत, इतकी की मी चक्क त्याचा हेवा करतो!
‘मायबोली’ वर मी पूर्वी लिहित होतो पण होते काय काही तरी अभ्यासपूर्वक लिहायचे आणि कुणीही येऊन . आय. डी. च्या बुरख्या आड दडून पिंक टाकावी हे मला रुचत नाही. तुमच्या सारख्या अभ्यासुंनी केलेली टीका , वाद -प्रतिवाद मी समजू शकतो पण ज्योतिषशास्त्राचा ‘ज’ सुद्धा माहीती नसलेल्याच्या पिंका सहन होत नाही. मी या शास्त्राचा गेले पंधरा वर्षे अभ्यास केला आहे, वाद विवाद करायचाच तर माझ्या कडे भरपूर दारुगोळा आहे पण कोणाशी लल्लु पंजु शी वाद घालत बसायाला मला वेळ नाही.
असो. आपण असेच अभिप्राय , सुचना , पसंती – नापसंती कळवत राहा, मला त्याची गरज आहे.
सुहास गोखले