( हे एक  संकलन आहे ,ह्यात माझे स्वत:चे  असे काही नाही, हे सर्व  निखळ विनोदाच्या अंगाने घ्यायचे ,  इथे उल्लेखलेल्या लेखाचा ,त्या लेखाच्या लेखिकेचा ,  हा लेख  प्रसिद्ध झालेल्या दैनिकाचा, त्या दैनिकाच्या व्यवस्थापनाचा व संपादक मंडळाचा , तसेच या लेखावर प्रतिक्रिया  देणार्‍या  वाचकांचा  कोणत्याही प्रकारे अनादर करण्याचा माझा हेतू नाही.  या इथे त्या लेखावर आलेल्या  प्रतिक्रियां मधिल काही निवडक प्रतिक्रिया पूर्णत: वा संक्षिप्त स्वरुपात प्रसिद्ध केल्या असल्यातरी त्या सर्व  मजकुराचा प्रताधिकार उल्लेख केलेल्या दैनिकाकडेच आहेत, हे संकलन करण्यामागचा हेतू, माझ्या ब्लॉगच्या वाचकांना काहीतरी नविन नर्मविनोदी वाचायला मिळावे व पर्यायाने वाचकांना त्या दैनिकाची, त्यातल्या  सदरांची व सकस लेखांची ओळख करुन देणे हाच आहे, ह्याच कारणासाठी तो मूळ लेख इथे उधृत न करता त्याची ‘लिंक’ दिलेली आहे)

पुण्यातले एक अत्यंत प्रतिष्ठीत दैनिक, त्यातले एक अत्यंत लोकप्रिय सदर आणि त्यातला हा एक अति लोकप्रिय लेख़. याला आदराने ‘मांजराचा लेख’  असे संबोधले जाते.  हा लेख प्रसिद्ध होऊन तब्बल चार महिने झाले तरी त्याची लोकप्रियता कणभरही ओसरली नाही ह्यातच त्या लेखाचे यश सामावले आहे….

नाही नाही नाही मी चूक करतोय….लोकप्रियतेचे श्रेय मी चुकून त्या लेखाला देऊन बसलो, प्रत्यक्षात याचे श्रेय त्या लेखावरील प्रतिक्रियांना आणि त्या लेखाला मिळालेल्या रेकॉर्ड्ब्रेक ‘Dislikes’ ना आहे.

लोकांना आता ह्या लेखाला ‘Dislike’  करायची इतकी सवय झाली आहे की बस्स.. आणि या लेखाची किर्तीही इतकी पसरली आहे की लोक आता लेख न वाचताच प्रथम त्याला ‘Dislike’ करतात मग लेख वाचायला घेतात, लेख वाचून झाला की पुन्हा एक ‘Dislike’  द्यायची परकोटीची उबळ येतेच (नाही आली तर तुम्ही माणूस नसुन यंत्रमानव आहात असे समजा) पण लगेचच दुसरे ‘Dislike’ देता येत नाही म्हणून मग लक्षात ठेवून अगदी बुकमार्क करुन ठेवून दुसर्‍या दिवशी आवर्जून व्हिजीट मारुन लेखाला  ‘Dislike’ देतात आणि मग रोज नित्यनेमाने या लेखाला ‘Dislike’ देणे हा आता काहींच्या डेली रुटीनचा भाग बनला आहे अगदी दात घासणे , अंघोळ करणे तसे ‘मांजराच्या लेखाला ‘Dislike’  देणे !!

आता हेच बघाना…

“मांजराची आठवण आली म्हणून आवर्जून dislike करायला आलो होतो…माझा dislike no 15251″

‘काही नाही.. मांजराची आठवण आली म्हणून डिसलाइक करायला आलो.. म्याव म्याव.”

“आज सकाळी office ला येताना मांजर आडवे गेले… म्हणून आवर्जून dislike मारायला आलो.”

“काही नाही असच,. म्याव म्याव!!! दिस लाईक क्रमांक 12633”

“हा लेख आमच्या लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या गाव गावापर्यंत पोचला आहे.धन्य ते मांजर धन्य ती प्राची १३३५० वां म्याव.”

” रोज क्षक्षक्षक्ष उघडून तुमच्या लेखाला dislike दिल्याशिवाय माझे पेपर वाचन सुरु होतच नाही…वाईट सवयी लागली आहे तुमच्या लेखामुळे…आज १२२९९ नंबर चा मी dislike दिला.”

“फक्त dislike द्यायला आलो होतो… दिल एकदाच !!!!”

“आजची dislike ची हजेरी लावली  हो”

“ठरवलं होता कि बस कालचा dislike शेवटचा , पण कंटाळा आला म्हणून आलो आज पुन्हा dislike करायला, हा नक्की शेवटचा माझा डिसलाइक नंबर 11801”

“माझा डिसलाइक नंबर ११७२२…………..आता वाटचाल १२००० च्या दिशेने. लवकरच सेन्सेक्स सारखा ” मांजर इंडेक्स” सुरु करावा लागेल आता.”

“मै निकला गड्डी लेके .ओ गड्डी पर डीक्कीमे एक चोर आया ……….. और उसके कारण – ११६१५ स्कोर आया”

“मी भाग्यवान आहे कि मला १११११ dislike करण्याचा मान मिळाला !!!”

“तुम्हाला १०७६२ वा डीसलाईक दिला आहे. मला खात्री आहे कि तुम्ही परत लेख लिहिणार नाही.”

“मी हि लिंक खास मागवून हा लेख वाचला. धन्य झालो आणि लागलीच डिसलाईक केले. खारीचा वाट माझापण…”

“एकच लक्ष – ३० जून २०००० dislikes ……….”

हा लेख वाचल्यावर मग कोणाच्या अंगाचा तिळपापड होतो, तर कोणाच्या डोळ्यात पाणि येते, कोण गडबडा लोळते तर कोणी (स्वत:चेच) केस उपटून घेते, कोणाच्या अंगावर काटा येतो तर कोणाच्या डोळ्यात खून चढतो .. मग लोक या अत्याचाराला अशी  वाचा फोडतात..

“मांजरावर इतका लेख लिह्ण्यापेक्षा अभ्यास केला असता तर आत्ता नासा मध्ये असता……..वाचकांचा वेळ घालवता….असले फालतू लेखांची निवड तरी कोण करतो राव…डोक्यात घाला ते मांजर बाईच्या…”

“देवा समोर दिवा लावते, पणतीत तेल टाकून………….!! आणि प्राची बायींचे नाव घेते, मांजराचा मान राखून………!!! म्याव, म्याव आणि फक्त म्यावच…..”

.”नाही, …. म्हणजे मी काय म्हणतो प्राची ताई……. होवून जावूद्या कि अजून एक लेख च्यामायला……”

“अबब, काय भन्नाट! हा लेख आकाश्याताल्या सप्तर्षी प्रमाणे चमकणार – सतत. जेवत होतो तेंव्हा वाचला – आणि तसाच खरकट्या हाताने comments लिहायला बसलो. आयला त्या मांजराच्या … सगळा keyboard खराब झाला.”

“…… लेख वाचून रजनीकांत admit झाला”

“सिम्पली स्पिचलेस!,ईतका अप्रतीम लेख मी मागच्या चार जन्मात वाचला नव्हता (पाचव्या जन्मात मांजर होते).”

“डोक्याचा बोका झाला ….”

“माझे विमान परवा उडत नव्हते म्हणून सुझुकी च्या शोरुम मध्ये नेले आणि त्यावेळी असे दिसून आले की विमानाचे पंखे आणि चाकं यामध्ये  घोडा बसल्यामुळे ते उडत नव्हते”

“काय आश्चर्य, काल मी माझ्या बजाज स्कूटर मधून घुर घुर असा आवाज एकला, डिकी उघडली तर काय एका डायनोसोरसचे पिल्लू … प्राची ताई काय करू ते सांगा..”

“जितक्या उत्कंठतेने मी हा लेख वाचतो आहे ( कदाचित ५० व्यांदा) खास करून प्रतिक्रिया आणि dislikes मोजतोय त्या उत्कंठतेने मी ज्ञानेश्वरी किवा गीता वाचली असती दासबोधाचे पारायण केले असते तर संत पदाला पोहोचलो असतो. असो प्रत्येकाची आपआपली आवड. सहज वाटले आपले. काकू,  त्या कुलकर्णी आजोबांना ( उघडेबंब) माझा hi सांगा.”

“हा लेख म्हणजे या जगात सुप्रसिद्ध होण्यापेक्षा कुप्रसिद्ध होणे किती सोपे याचे उत्तम उदाहरण. असो!!! २५०० च्या टप्प्यासाठी (अ)शुभेच्छा… या लेखाचा Shortcut बनवून ठेवलाय, आता उंदराची एक कळ दाबली कि मांजर समोर… :-)”

“लेख वाचून काजव्यांसमोर डोळे चमकले.”

“खोक्यात खोका TV चा खोका…! खोक्यात खोका TV चा खोका…! तु माझी मांजर मी तुझा बोका…..!!!”

“दैव काय काय वाचायला लावतो . वाचनाने रक्तबंबाळ झालो”

“बघा उंच माझा बोका…””

“या लेखाला like करणारे ६० लोक कोण आहेत ..त्यांना माझा कोपरापासून नमस्कार ..हे लोक रेल्वेचे time table हि आवडून घेऊ शकतील …”

“हा हा हा आयला काय टायमिंग हाय माजा बी सायकल च्या shit खाली येक मोठा मुंगळा होता जसा चावला तसा…….बाबाव…. नग नग आठवाय बी नग…..!”

“रावण : माझ्या दहा डोक्यानी विचार करूनही मी असला लेख लिहू शकलो नसतो. आणि आता तो वाचून माझ्या डोक्यांना मुंग्या नाही डायनासोर आलेत….”

“मी पेशाने अंतराळवीर आहे. एकदा मी मांजरीवर बसून पृथ्वीपासून सप्तर्षी तारका-समूहाकडे वेगाने जात होतो. तेव्हा काहीतरी फट-फट आवाज मांजरातून येउ लागला. वाटलं, की काहीतरी असावं म्हणून मी लक्ष दिलं नाही. नंतर मांजराच्या शोरूममध्ये गेलो. तिथल्या मेकॅनिकला सांगितलं, की मांजराला आवाज येत आहे. स्कूटर आतमध्ये असेल, त्याला प्रथम विश्‍वासच बसला नाही. शेवटी मांजर खोलल्यावर आत स्कूटर मिळाली…अशी करमणूक झाली.”

“मला पण एकदा असाच अनुभव आला , मी पण स्कूटर चालू केली आणि ७ किलोमीटर चालवली , रस्त्यात लोक म्हणू लागले कि डिकीतून कसली तरी हालचाल जाणवते आहे , मी डिकी उघडली , बघतो तर काय ..आत .म्हैस …”

“बापरे! लेख वाचून मेंदूला घाम फुटला… हृदयाला मुंग्या आल्या… कदाचित मांजर आले असावे… मांजर मुंग्या खाते… मजाच आहे… कुलकर्णी काकांना आवाज येतो का ते विचारायला पाहिजे…कुलकर्णी काकांना मांजरी लहानपणापासूनच आवडतात… गेल्या जन्मी ते बोका असावेत… बाईंचे घर नगर ला आहे हि मांजराची मजा का आहे ते कळले नाही… त्या मांजरीला जर ह्या ताई आपल्यावर असा लेख लिहिणार आहे हे कळले असते तर तिने नाचून पण दाखवले असते.. मांजरींचे काही सांगता येत नाही… काल माझ्या tractor च्या चाकावर घोडा बसला होता… ६ किलो मीटर नांगरणी केली… जादा हॉर्स पॉवर मिळाली .. असो !”

“प्रथम लेखिकेचे या अप्रतिम लेखाबद्दल आभार. लेखिकेने लेखा मधे अशी जादू ओतली कि ज्यामुळे वाचकांची मस्तकेच गरम झाली आहेत. वाचकांना नुसते बोलते नाही तर लिहिते करण्याची किमया या माउली ने करून दाखवली आहे.”

“माझ ऐका ताई.. तुम्ही एखाद्या मांत्रिकाला दाखवून घ्या.. अस वेळी अवेळी भलत्या ठिकाणी मांजर दिसण काही साध लक्षण नव्हे… आणि डॉक्टरला पण दाखवा… हो पण आधी तुमची लक्षण सांगा आणि मग तुम्ही लिहिलेला लेख दाखवा हा… काय आहे .. आधी लेख दाखवलात तर नंतर उगाच जास्त फी घ्यायचा तुमच्याकडून…”

“अतिशय सुरेख लेख . भावनाना शब्दात उतरवण्याचे लिखिकेचे कौशल्य प्रत्येक शब्दात दिसते आहे . मराठी वाङ्ग्मयात हा लेख एक मैलाचा दगड ठरणार हे नक्की . कृपया किचन मधल्या झुरळावर पण एखादा लेख लिहावा …”

हे अती जबरदस्त–

”आई शपथ ! खतरनाक लेख! हा लेख राहुल गांधी ने लिहिल्या सारखा वाटतो …”

“काकू, आपली क्षमा मागून… मांजरीला एसेमेस आला. माझा आवाज कोठून येत आहे ते मांजरीला कळत नव्हते बॉनेट मध्ये कार होती आणि मी त्यात लपले होते. पेग पिउन मी ह्या टायर वरून त्या टायर वर आणि ह्या इंजिन मधून त्या इंजिन मध्ये लपत होते. पण ह्या मांजरीला आणि नगरच्या बोक्याला पत्ता लागू दिला नाही. मांजरी ने वरद चा फोटो काढला. वरदाचा स्वयपाक चालूच होता फोटोतून मी पोट धरून हसत होते. कुलकर्णी आजोबा दूध पीत बसले होते. पत्रा वरद ला हलवत होता. पण माझा पत्ता मी मांजरीला लागू दिला नाही.”

लेख वाचून झाल्यावर काहींना मोठे गहन प्रश्न पडतात त्यातले काही प्रश्न असे..

“१. कुलकर्णींचा मेसेज आला आणि तुम्ही लगेच पार्किंग मध्ये का गेलात? मेसेज मध्ये काय होते ते सांगा ना? २. पिल्लू दुसर्‍या – तिसर्‍या कार च्या टायर वर बसले पिल्लू तर इंजिन मध्ये केव्हा बसले? ३. तुम्ही मग घरी गेलात तर कुलकर्णी आजोबा तुमच्याशी केव्हा बोलले? ४. वरद्च्य स्कूटर मध्ये पिल्लू नेमके कुठे बसले होते? ५. डॉक्‍टरकडं जाऊ पत्रा हलवला – म्हणजे काय केले?”

“ती मांजर सगळ्या गाड्यांच्या इंजिन आणि टायर वर बसत होती? टायर वर बसत होती समजू शकतो हो. पण इंजिन ??? बरे मग सगळ्या गाड्यांची इंजिन उघडायची का ती शेपटीने? उघड्बंब उन खात असलेल्या कुलकर्णी आजोबांच्या पोटावर नाही बसली का मांजर टायर समजून?”

“गंमत म्हणजे त्या दिवशी सायंकाळी पाचला वरद अभ्यासानिमित्त स्कूटरवरून मित्राकडं गेला.’ – या एकदा कधी तरी संध्याकाळी कमला नेहरू पार्क मध्ये वरद च्या ‘अभ्यासा’ ला भेटायला.”

“कुलकर्णी आजोबा पार्किंगच्या बाहेर उन्हात बसले होते. ते म्हणाले, की गेल्या दोन तासांपासून मांजराच्या आवाज येत होता”; प्राचीकाकू तुम्हास मराठी व्याकरण कोणत्या गुरुजींनी शिकवले ते कृपा करून सांगा ….डोक भनभन करत आहे ..देवा कृपा कर आणि असा लेख वाचण्याच आमच्या नशिबी आणू नकोस …काय ते मांजर…काय ती स्कूटर …कशाचा कशाला पायपुस नाही..बाप रे !! पाणी आणता का कुणीतरी !!!”

“काही प्रश्न – १. कुलकर्णी आजोबा पार्किंगच्या बाहेर उन्हातच का बसले होते? २. वरदला काहीतरी असावं म्हणून त्यानं लक्ष दिलं नाही, अहो पण काहीतरी असतं म्हणून तर लक्ष द्यायला पाहिजे ना, तुमच्यात काही नसताना लक्ष देतात का? ३. स्कूटरला आवाज येत होता तर पद्मश्री वरद सुझुकी शोरूममध्ये का गेला? ४. पिल्लू एकाचवेळी कार आणि स्कूटर मध्ये कसं होतं? ५. वरदच वय काय? ६. नगरच्या मोठ्या घराच्या मोठ्या टेरेसमध्ये छोटी मांजरी का होती, मोठी का नव्हती? ७. खोचक प्रतिक्रिया वाचायची तुमची मानसिक तयारी आहे का? आणि ८. तुम्ही हा लेख का लिहिलात आणि आमचा छळ का मांडलात?

मंडळी  आता फार उत्सुकता ताणत नाही , हा लेख

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4612028515630603865

वाचा आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ही वाचा , आणि हो जाताना एक प्रथेप्रमाणे (आपलं शास्त्रात लिहलेय म्हणून हं) तेव्हढे ‘Dislike’ चे मात्र विसरु नका …एक  ‘Dislike’ तो बनती ही है , मांजर के नाम

…… म्यॉव!!!


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.