मराठीत फार कमी पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये आहेत . तेव्हा विचार आला, आपणच एखादे पुस्तक का तयार करु नये?
माझ्या ब्लॉग वरच्या् काही निवडक लेखांचे पुस्तक तयार करायचे ठरवले. काही जुगाड करायला लागला पण रिझल्ट अत्यंत उत्साहवर्धक आहेत !
हा पहा एक नमुना (शँपल) !
(मुळ कल्पना , जुगाड इ माझ्या डोक्यातुन, प्रत्यक्ष मेहेनत माझा मुलगा चि. यश (यज्ञेश) ची , त्याला क्रेडिट दिलेच पायजे नायतर बेणं पुढच्या टायमाला काम करणार नाय !)
पुस्तक तयार झाल्यावर ते माझ्या ‘किंडल’ डिव्हाईस वर असे दाखल झाले …
पुस्तकाचे पहीले पान असे दिसते…
पुस्तक यथावकाश पूर्ण होईल (हॅ हॅ हॅ) तेव्हा सर्वांना मोफत मिळेल , अॅमेझॉन वरुन फुकटात डाऊन लोड करता येईल. किंडल डिव्हाईस वर वाचता येईल किंवा किंडल अॅप वापरुन पी.शी. , टॅबलेट, विंडोज / अॅन्ड्राईड फोन वर पण वाचता येईल .
जय हो….
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
उत्तम कल्पना ! Looking forward for complete book.
धन्यवाद श्री शार्दुलजी,
माझी दोन पुस्तकें लिहून तयार असून सुद्धा प्रकाशकांच्या वाईट अनुभवांमुळे प्रकाशीत करता येत नाहीत. सगळेच प्रकाशक वाईट्ट असतात असे मला म्हणयचे नाही पण जे जे प्रकाशक मला भेटले ते सगळे असेच निघाले हे माझे दुर्दैव म्हणायचे. शेवटी मी स्वत:च पुस्तक स्वखर्चाने प्रकाशीत करायचा घाट घालतो आहे. आजकाल छापील पुस्तके वाचते कोण? सगळे सेल फोन / ट्बलेट च्या माध्यमातूनच तर होते आहे , त्यामुळे काळाची पावले ओळखून , छापील पुस्तका पेक्षा डीजीटल माध्यमातून पुस्तक प्रकाशीत करणे सयुक्तिक ठरेल, शिवाय असे डीजीट्ल पुस्तक खूपच कमी वेळात आणि कमी खर्चात प्रकाशीत होऊ शकते. सध्या मी अॅमेझॉन च्या संपर्कात आहे , त्यांच्या टर्मस आणि कंडीशन्स बर्याच सोप्या आहेत. मी बार्न्स अँड नोबेल यांच्याशी बोलत आहे, सुरवातीचे प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. बघुया कसे काय जमते ते.
ह्या सगळ्यापुर्वी चाचणी म्हणून एखादे छोटेखानी पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे , हे पुस्तक माझ्या ब्लॉग वर प्रसिद्ध झालेल्या मजकुराचीच सुधारीत आवृत्ती असल्याने सगळ्यांना ते मोफत उपलब्ध करुन देत आहे. त्या निमित्ताने किंडल फॉरमॅट मधली पुस्तके वाचायची लोकांना सवय लागेल, किंडल अॅप तरी डाऊन लोड होईल.
आपल्या काही सुचना असल्यास किंवा आपल्याकडे याचा काही अनुभव असल्यास कळवा, मला त्याची फार जरुरी आहे.
सुहास गोखले
Great Job by Chi. Yash.
This is very good alternative than going through a publisher.
Looking forward to it.
Best Wishes,
Anant
श्री. अनंतजी ,
धन्यवाद. यश (माझा मुलगा) सगळे चांगले करतो पण फार ‘हल्या हल्या ‘ करावे लागते , दहा वेळा सांगावे तेव्हा कुठे जरा बुड हालवतो. मी नोकरीत असताना ५०+ लोकांची टीम हाताळली आहे पण त्या सगळ्या अनुभवाला हे एकटे कार्टे पुरुन उरलेय. परत त्याला काही बोलायची सोय नाही, बेणं लगेच सुप्रिम कोर्टात म्हणजे आमच्या सौ. कडे जातयंं , कायबाय कागाळ्या करतयं , मग पुढचे काय वेगळे सांगायला पाहीजे काय?
माझे प्रकाशकांचे अनुभव ब्लॉग वर पोष्ट करतो आहेच. भयानक प्रकार आहे हा! या प्रकाशकांनी पु.ल. देशपांडे, व.पु.काळे सारख्या मातब्बर लेखकांना हिसका दाखवायला कमी केले नाही तिथे माझ्या सारख्या नवशिक्या लेखकाचा काय निभाव लागणार म्हणा?
अर्थात मी सावध असल्याने किंबहुना काही करुन पुस्तक प्रकाशीत झालेच पाहीजे या साठी डेस्परेट नसल्यानेच मी त्यांच्या तावडीतून सटकलो.
अर्थात दुसरे चांगले पर्याय आहेत , त्याची चाचपणी चालू आहे, इ-बुक्स हा चांगला पर्याय आहे पण किंडल फॉरमॅट ची एक मोठी समस्या ही आहे की ग्राफिक्स चांगले दिसत नाहीत. माझ्या लिखाणात पत्रिका व इतर डायग्रॅम्स बरेच असल्याने ते किंडल मध्ये कसे व्यवस्थित आणता येतील याचा शोध चालू आहे. बाकी मराठी (हिंदी, बंगाली इ) भारतीय भाषांच्या बाबतीत ‘फॉन्ट्स’ ही मोठी समस्या आहेच. मराठी दिसत नाही असे नाही पण किंडल चा डिफॉल्ट फॉन्ट भिक्कारडा आहे. त्यातून मार्ग निघतो का बघायचे , मी त्या संदर्भात ‘अॅमेझॉण’ शी चर्चा करत आहे, बघूया काहीतरी उत्तर सापडेल. आणखी काही मार्ग आहेत त्यांंची ही पडताळणी करत आहे.
सुहास गोखले