मधु मागसी माझ्या सख्या परी…मधुघट्ची रिकामे पडती घरी…

असे काही कविवर्य भा.रा.तांबे म्हणून गेलेत पण मधुघट रिकामे कशाला पडतील भरपूर सप्लाय आहे पण…हा  ‘पण‘ लई डेंजर बाप्पू!
मधु याने की मध बाजारात बरेच आहेत पण ‘अस्सल’ मध मिळणे मुश्किल ,बर्‍याच वेळा मधाच्या नावाखाली गुळाचा पाकच पदरात पडतो!!
पण आता नै कै … मला एक भारी मध वाला भेटला हय !
डायबीटीश असला तरी मध मी रोज खातो , आवडतो मला , त्याला काय करणार ?  बाजारात मिळणारे सगळे मध ट्राई करुन झाले … सुरवात ‘डाबर ‘आणि ‘झंडू’ पासुन झाली … गुळचा पाक ! जाऊ द्या झालं.. २४ मंत्रा ब्रँड झाला,  ऑरगॅनिक ब्रँड्स झाले अगदी पतंजली सुद्धा ! (रामदेव बाबा तू सुद्धा?)  सगळ्यांचे एकच.. गुळाचा पाक , उकळून , फिल्टर केलेला या पलीकडे काहीही पदरात पडत नाही.

त्यातल्या त्यात ‘फोंडाघाट’ आणि ‘लायन’ हे दोन ब्रँड मला बरे वाटले.

गेले काही वर्ष मी फोंडाघाट अणि लायन मध आलटून पालटून वापरत आहे…पण एके दिवशी ‘कोरा’ वरच्या एका मित्राने ‘हनी अँड स्पाईस’ चा मध सुचवला (https://honeyandspice.in/) , तपासले , तिप्पट / चौपट महाग मध! 

धाडस करुन एक बाटली मागवली… काय आश्चर्य …हाच तो मध ज्याची मला कित्येक वर्षां पासुन तलाश होती !

 

honey-and-spiece-3

कुबूल … हा महागडा मध आहे …. पण आहे अस्सल मध … अस्सल मध … अस्सल मध …. बाकी कुच्च नै .

honey-and-spiece5


दोन व्हरायटी आहेत …

honey-and-spiece6

 

मध संपला !  आता नविन बाटली आणायला पाहीजे (अ‍ॅमेझॉन वाल्यांची चंगळ आहे! )

 

 

sh4a

Nikon D5200, Nikkor 50 mm 1f1.8 Prime, ISO 100, F2.8

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Suresh vanapalli

  Mastch!!
  Agadi upyogachi post taklit..Mihi yachyach shodhaat hoto!!!!
  Maage ek dolyanna aaram denarya Magnetic chashmyachi post hoti tihi ashich upyogi…ase kahi real, authentic, ani useful stuff adhunmadhun nakki post karat raha..!!

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद सुरेशजी,

   मी अशा पोष्ट करायचा जरुर प्रयत्न करेन. ब्लॉग वर मी जे काही पोष्ट करतो तो सगळा माझा अनुभव असतो.. उगाच इकडचे तिकडचे , ऐकीव माहीतीवर असे काही नसते.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.