“भाऊ, लोक लै खवळल्यात … ”  हे  आमचा सद्या नेहमीच सांगत असतो …

मचा प्रेमसंवाद असा होत असतो..

“भाऊ…”
“काय रं सद्या?”
“लोक्स तुमच्यावर लै खवळल्यात !”
“का रं बाबा? आता तेस्नी खवळायला काय रे कारन?”
“तेच त्ये  आपलं ते ह्ये न्हवं का, नाय म्हंजे मला सोताला तसं काय म्हनायचं नाय पर माज्या काणावर आलय म्हनून सांगतो”
“नीट काय ते सांग की रे मर्दा, का आपला उगाच वडा कूटायला लागलायस”
“नाही म्हंजे भाऊ, पब्लिक आसं म्हंतय की, सगळे लेख अर्धवट सोड्ता तुमी, लई छळतासा.  धाडधाड लिवायचं आन मोक्ळे व्हायाचे ते नाई ,सग्ळे खूंटीवर टांगूनशान ठिवतायसा जनू”
“हा.. हा… हा, तेच्या पायी लोक्स खवळल्यात व्हयं , आरं सद्या लेका, तेचातच लई मज्जा हाये आणि तुला येक सांगू..”
“काय म्हंतासा भाऊसो”
“आत्ता नाय नंतर सांगतू”
“भाऊ, बगा पुन्यांदा त्येच, टांग़ले खुट्टीवर! लोक उगाच नै खवळत्यात ते ..”

यावर काही बोलणार इतक्यात आमचा गन्या (वहीनी सायबांच्या माहेरचा माणूस!)  ‘चा’ आणतो,  आता  ‘चा’  झाला की ‘पुडी’ आलीच… आणि  येकदा का बार भरला की  मग काही बोलायचे ?….ठेवा टांगून पुन्हा  खुंटीवर…

चार-सहा रोज जातात ना जातात तोच पुन्हा सद्या म्हणायाला हजर: 

 

” भाऊ…लोक्स तुमच्यावर लै खवळल्यात !”

 

मला माहीती आहे की माझे काही लेख अपूर्ण आहेत आणि बर्‍याच वाचकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  लेख अपूर्ण राहीले याची काही कारणें:

 1. मी मोठ्या अपेक्षेने लेखमाला सुरु केली पण त्याला अपेक्षे इतका प्रतिसाद लाभला नाही. मला माझा एखादा लेख आता पर्यंत किती वेळा वाचला गेला ते ‘डॅशबोर्ड’ च्या माध्यमातून कळत असते , त्यावरुन माझे लेखन लोकांना आवडत आहे का नाही ते कळते. माझ्या काही लेखांना अत्यल्प वाचक वर्ग लाभला तेव्हा त्या विषयावरचे लेखन चालू ठेवणे मला योग्य वाटले नाही. ब्लॉग लिहणे ही खूप वेळकाढू प्रक्रिया आहे तेव्हा जे लोकांना फारसे आवडले नाही त्यावर लिहीत बसणे काळ-काम-वेगाच्या गणितात न बसणारे असल्याने असे लेखन आवरते घ्यावे लागले.
 2. ‘बटेश पद्धती’ सारखा लेख मी उत्साहाच्या भरात लिहला खरा (त्याचे पुढचे तीन भाग माझ्याकडे तयारही आहेत!) पण असे लेख लिहून मी कळत – नकळत जुगाराला प्रोत्साहन देतो आहे हे लक्षात आले. ब्लॉग वरचे लेखन कोणीही अगदी कोणीही वाचू शकते यामुळे त्या लेखात सांगीतलेले तंत्र-मंत्र चुकीच्या लोकांच्या हातात पडण्याची शक्यता होती. त्यामुळे जरी ‘उत्साहाच्या भरात’ लेखन चालू केले असले  तरी ती एक चूक होती आणि ती  वेळीच थांबवणे आवश्यक होते. क्षमस्व.
 3. ‘ग्रहयोग’ या विषयांवर मी एक लेखमाला सुरु केली होती, काही भाग प्रसिद्ध केले आहेत. पण पुढे त्या विषया पुस्तक प्रसिद्ध करायचे असे ठरले. आता पुस्तक प्रसिद्ध करायच्या आधीच त्यातला मजकूर ब्लॉग सारख्या माध्यामातून प्रकाशित झाला तर पुस्तक कोण विकत घेणार? बरोबर ना? त्यामुळे नाईलाजाने ती लेखमाला आवरती घ्यावी लागली. काही वाचकांची यामुळे निराशा झाली हे मी समजू शकतो पण माझाही नाईलाज आहे. ह्या विषयावरचे पुस्तक (जेव्हा) प्रसिद्ध होईल तेव्हा खूपच जादाची / सखोल माहीती (जे ब्लॉग च्या माध्यमातून शक्य होणार नाही) त्यांना वाचायला मिळेल.
 4. ‘बाबजींचे अनुभव’ ही माझी एक लोकप्रिय मालिका. खूप लोकांनी वाचली, पुढचे भाग कधी ? अशी विचारणां झाली नाही असा आठवडा जात नाही. बाबजींशी तेव्हा झालेले ते संभाषण मी (बाबाजींच्या नकळत) टेप रेकॉर्ड केले होते आणि त्याच्या भरोशावर लेखमालेचा घाट घातला पण रेकॉर्डिंग चा काही भाग मधल्या काळात खूपच खराब झाल्यामुळे नीट ऐकता येत नाही. त्यामुळे पुढ्च्या काही भागांची कच्ची टीपणे तयार केलेली असली तरी काही संदर्भ नीट न जुळवता आल्यामुळे लेखमाला अर्धवट राहीली . पण माझ्या अमेरिकेतील मित्राच्या मदतीने मी ‘डायमंड कट हे फोरेंसीक सॉफ़्टवेअर मिळवले , जे अशी खराब रेकोर्डिंग्ज साफ करायला मदत करते. या  सॉफ्टवेअरच्या मदतीने बहुतेक सर्व  रेकोर्डीग़्ज बरीच स्पष्ट करता आली आहेत तेव्हा ही लेखमाला पुन्हा सुरु करतो आहे.
 5. ‘ती गेली तेव्हा’ ही कथा सुद्धा अर्धवट राहीली. मुळात ही कथा एका ब्रिटीश लेखकाच्या कथेवर आधारित आहे , मी ते कथाबीज जरा वाढवून , खुलवुन त्याचे भारतीय करण केले, या कथेचा एकच भाग लिहायचा राहीला (शेवट!) तो कालच लिहून पूर्ण केला आहे . आता थोडे संस्करण करुन तो लौकरच प्रकाशीत करणार आहे.
 6. ‘कोणा एकाची चित्तर कथा’ हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प होता, मी त्याची बरीच जाहीरातजी केली होती. त्याचे सुमारे आठ भाग लिहून पण तयार होते …माझे सर्व महत्वाचे लेखन मी ‘ड्रॉप बॉक्स’ या क्लाऊड बेस्ड डाटा सर्व्हीस मध्ये साठवून ठेवत असतो, ते तिथे सुरक्षीत तर राहतेच आणि मला जेव्हा हवे तेव्हा , कोठेही उपलब्द्ध होऊ शकते , पण का कोणास ठाऊक ‘कोणा एकाची..” हे सर्व लेखन मी ड्रॉप बॉक्स वर सेव्ह करायला विसरलो आणि घात झाला ! सगळी काळजी घेतलेली असताना सुद्धा माझ्या ‘लेनेव्हो डेस्कटॉप’ च्या हार्ड डिस्क ने अचानक मान टाकली, खूप प्रयत्ना नंतर त्यातला काही डेटा परत मिळवण्यात यश आले तरी , बरेच काही गमवावे लागले, दुर्दैव म्हणायचे ! त्यात  ‘कोणा एकाचे..’ ते सर्व भाग गेले.  लेखन पुन्हा करता येईल ,  हे सगळे पुन्हा ऊभे करता येणार नाही असे नाही पण त्यात फार म्हणजे फारच वेळ जाईल , शिवाय त्या लेखमाले साठी मी (आणि  माझ्या मुलाने ) ग्राफिक्स आणि स्पेशल फॉन्ट्स तयार केले होते , ते पण सगळे गेले आता ते पुन्हा करणे म्हणजे मोठी जगद्व्याळ मेहेनत होईल. तेव्हा विचार केला इतके सारे करत बसण्यापेक्षा मालिका बंद करणे जास्त सोयिस्कर . मला माहीती आहे , हे असे करणे म्हणजे मायबाप वाचकांशी प्रतारणा आहे , पण वेळ इतका कमी पडत आहे की कितीही मनात असले तरी आता ही तुटलेली कडी जोडणे व्यवहार्य ठरणार नाही, तेव्हा क्षमस्व.
 7. ‘पुन्हा ज्योतिषाची तर्‍हा’ चे आठ भाग झाले आहेत पुढचे दोन –तीन भाग लिहायला घेतले आहे त्यामुळे ही लेखमाला निश्चित पूर्ण होणार यात शंकाच नाही.
 8. ‘काही बोलायाचे आहे’ मालीकेचे पहिले तीन भाग प्रकाशीत झाले आहेत, पुढचे भाग  लिहुन तयार आहेत , त्याचे पत्रिकेचे ग्राफिक्सचे काम अपूर्ण आहे , सध्या माझ्या मुलाची वार्षीक परिक्षा चालू आहे , त्यातून तो मोकळा झाला की त्याच्या मागे लागून हे ग्राफिक्स पूर्ण करुन घेतो . (मी फोटॉशॉप वाला माणूस , हे ग्राफिक्स माझा मुलगा ‘गिंप’ मध्ये करतो , कसे करतो ते त्याचे त्यालाच माहीती!) लेख मालीकेचे उरलेले भाग एका पाठोपाठ प्रकाशीत करत आहे (मे महीन्याचा पासुन सुरवात होईल )

  लेखनाला एक शिस्त लागावी , नियमितपणा यावा या साठी आता एक वेळापत्रक तयार केले आहे (आई शप्पथ , खरे खरे सांगतोय!), आठवड्याला दोन लेख (सध्या इतकेच बास !) शक्यतो दर सोमवार – गुरुवार प्रकाशीत होतील असे बघेन (असे आज तरी म्हणतोय !) , सच्ची !

 

मी लिहले आहे तसे ‘ब्लॉग ’ वर लिहणे मोठे कष्टाचे आणि वेळ काढू काम आहे. दिवसेंदिवस माझ्या मागचे व्याप वाढत आहेत , ब्लॉग वरच्या लेखना साठी म्हणून पूर्वी जितका वेळ हाताशी असायचा त्याचा एक चतुर्थांश सुद्धा वेळ देणे सध्या दुरापस्त बनले आहे.

विविध विषयांवर , इतके भरभरुन लिहून सुद्धा वाचन वर्ग काही वाढत नाही ही शोकांतिका आहे. काही मूठभर वाचक नियमित वाचतात, प्रतिसाद देतात (त्यातल्या काहींनी सध्या या ब्लॉग कडे पाठ फिरवली आहे असे दिसते !) त्यांच्या साठी हा ब्लॉग (आता वेबसाईट) चालू आहे असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. ब्लॉग वाचला जात नाही हे शल्य सतत टोचत राहते , त्याने नवे लिहायची उमेद नष्ट होते,  कशाला करायचे हे सगळे हा प्रश्न प्रत्येक नविन लेखनाच्या सुरवातीला मनात आल्या शिवाय राहत नाही. ब्लॉग वर लेखन करुन माझ्या व्यवसाय वाढत नाही हे सत्य फार पूर्वीच समोर आले आहे त्यामुळे तेही आमिष (इनसेन्टीव्ह) आता राहीले नाही.

हा असा ‘ थंडा प्रतिसाद ‘ बघून मला वाटत राहते  ‘नेमके काय चुकते आहे’?

 

भाऊ, लोक लै खवळल्यात … ही सद्याची भुणभुण थांबवायचीच असा चंग बांधून सगळ्या तुटलेल्या कड्या जोडणार आहे  (काही वगळाव्या लागतील , का ते वरती लिहले आहेच)…

(त्या सद्या कडे नंतर बघुन घेतो!)

असो, काहीसा निराशेचा सुर काढला असला तरी लेखन थांबवणार नाही, जो पर्यंत हे लेखन आवडणारा मुठभर का होईना वाचक वर्ग आहे तो पर्यंत मी लिहीत राहीन…

पुढचे पुढे हरी!!

शुभं भवतु

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. अन्नासाहेब गलांडे

  नमस्कार,अनेक लटकलेले भाग लिहिनार आहात हे वाचून सुखावलो.
  लिहा हि विनंती

  0
 2. Anand Kodgire

  Suhas ji lekhan asech chalu thevave
  Mee tumchya blog cha niyamit vachak aani prashansak aahe.
  Tumchi website form jhalya pasun mala lekh vachun yasathi mhanava tasa vel deta aala nahi.
  Mala vaatate tumchya lekhan ushira ka hoina jarur vachale jail yaat shanka nahi.
  Babaji chya anubhav lekhachi vaat pahat aahe.

  Aankhi tumcha vilakshan anubhavavaril lekhachi sudda vaat baghat aahe

  Dhanyavaad

  0
 3. संतोष

  नमस्कार सुहासजी,

  हुश्श आता बरेच लेख वाचायला मिळणार तर 🙂

  बरेच वेळा मला प्रतिसाद द्यायचा असतो (मराठी मध्ये ) पण माझा फोन त्यावेळेला प्रतिसाद देत नाही (काहीतरी तांत्रिक अडचण आहे wordpress ला प्रतिसाद देताना), कदाचित मलाच येत असेल.

  आणि मला हट्टाने प्रतिसाद मराठीतच द्यायचा असतो असो.

  पण ज्यावेळेला संगणकावर वाचन चालू असते त्यावेळी प्रतिसाद हमखास असतोच.

  केस स्टडी वाचून बरेच दिवस झाले एखादी छानपैकी केस स्टडी आली तर दिलखूष होईल. 🙂

  बाकी पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. संतोषजी,

   केस स्ट्डीज पण प्रकाशीत करतोय , बाकीचे अपूर्ण लेख पण क्रमाक्रमाने प्रकाशीत होतील.

   टीवीएस चा अफलातून मेकॅनिकल किबोर्ड आल्याने टायपिंग इतके जलद आणि सुखदायक झाले की बस्स, जोडीला आता हॅवीट चा व्हर्टीकल माऊस पण आल्यामुळे माझी ‘कारपेल टनेल समस्या’ पण आटोक्यात राहील असा अंदाज आहे.

   कळावे

   आपला

   सुहास गोखले

   0
 4. प्राणेश

  सर, Online class केव्हा चालू होणार?

  @संतोषजी, एकदम मनातलं बोललात!

  0
  1. सुहास गोखले

   श्री.प्राणेशजी,

   अ‍ॅऑन लाइन कोर्स्च्या २००+ लेक्चर्स पैकी निम्म्याच्या वर लेक्चर्स तयार आहेत . आम्ही ठतवलेल्या इन्क्रिप्टेड क्लाऊड बेस्ड सर्व्हर मध्ये अचानक तांत्रिक समस्या आल्यामुळे आम्ही अटकलो आहोत. आम्हाला दुसर्‍या सर्व्हर वर जाता येईल पण त्यांचे बँड विड्थ चे दर जास्त आहेत त्यामुळे कोर्सची फी मध्ये दीड्पटीने वाढ करावी लागेल तसे केले तर अनेकांना हा कोर्स परवडणार नाही.
   मला आशा आहे की या समस्या दूर होतील आणि हा कोर्स लौकरच आपल्या सर्वासाठी उपलब्ध होईल.

   कळावे

   सुहास गोखले

   0
 5. Rakesh Kulkarni

  Namaskar Suhas JI,
  Glad to hear that you will be completing some of your incomplete series.It seems tumchyawar pan shanicha prabhav ahe :), kahi na kahi problems chalu ahet about classes and blogs.
  I would suggest that you should keep writing for us, I always wait for your blogs, they are really very interesting especially related to astrology and suspense thrillers like “Malyawarcha khel” . “Lungi kharedi” was hillarious.I am also trying to increase your wachak sankhya :), I sent links to 10 people about “Malyawarcha khel” and “Lungi kharedi”. Hope I get to read more on astrology in coming days.
  Thanks!

  0
  1. सुहास गोखले

   श्री.राकेशजी,

   अभिप्राया बद्दल तसेच माझे लेखन इतर लोकां पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नां बद्दल अनेक अनेक धन्यवाद.

   क्लासेस बाबत म्हणाल तर व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्वर मध्ये समस्या आल्या आहेत. ज्या ‘सर्व्हर वाल्याच्या’ भरवशावर होतो त्याने अचानक हात वर केले , दुसरे लोक होस्टींग़ ला तयार आहेत पण त्याने खर्च वाढेल व क्लास ची फी दीडपटीने वाढवावी लागेल , आता आम्ही स्वत:चाच सर्व्हर चालू करण्याच्या विचारत आहोत पण त्याला खर्च हा आला त्याची जुळणी होत नाही अस तिढा निर्माण झाला आहे !

   बाकी जो पर्यंत आपल्या सारखे वाचक आहेत त्प पर्यंत माझे लिखाण चालू राहील, त्यात खंड पडणार नाही.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.