ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते, प्रयत्नांना पर्याय नाही, मात्र या प्रयत्नांना योग्य दिशा देण्या साठी ज्योतिषशास्त्राचा वापर चांगल्या तर्हेने करता येतो.
- आपली बलस्थानें कोणती याचा अंदाज आल्याने त्यांचा कौशल्याने वापर करुन प्रगती करणे शकय होते.
- कमकुवतपणा वा कमतरता भरुन काढण्यासाठी प्रयत्न करता येतात, कमकुवतपणा वा कमतरता उघड होतील अशी क्षेत्रें व परिस्थितीं पासुन लांब राहून नुकसान टाळता येते, त्यांची तिव्रता काही प्रमाणात कमी करता येते.
- बलस्थानें व कमकुवतपणा यांचा अंदाज आल्यामुळे आपण काय करु शकतो आणि काय करू शकत नाही याचा खुलासा होतो, योग्य दिशेनेच प्रयत्न करुन, उपलब्ध वेळ, पैसा, मानसिक, शारिरीक साधनसामग्रीचा अचूक व सुनियोजित वापर करता येतो.
- आगामी काळात येणार्या चांगल्या संधींची कल्पना आधीच असल्याने अशा संधी हातातून निसटून जाणार नाहीत शिवाय योग्य ती पूर्व तयारी करुन अशा संधींचा जास्तीतजास्त लाभ मिळवता येतो.
- भविष्यातल्या आव्हानांचा वा अवघड परिस्थीतीचा आधीच अंदाज आल्याने, आवश्यक मानसिक, शारिरीक आणि आर्थिक तयारी करुन त्यांचा यशस्वी सामना करता येतो व होणारे शकणारे नुकसान कमी करता येते.
- स्वत:च्या कुवतीचा यथार्थ अंदाज आल्याने विनाकारण अवास्तव अपेक्षां चे ओझे पाठीवर बागळून मृगजळा मागे धावताना होणारी फरपट टाळता येते , वारंवार होणारे अपेक्षाभंग कमी होतात. जे नाही त्याच्या साठी कुढत न बसता जे समोर आहे त्याचा जास्तीत जास्त योग्य उपयोग करुन घेउुन , आयुष्य आनंदात , सुखा समाधानात व्यतित करता येते
अजुनही बरेच फायदे आहेत , त्या बददल वेळ मिळेल तसे लिहणार आहे…….
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020