जातकाने भविष्याबाबतीतचा पडताळा एसेमेस द्वारा कळवला आहे.

या जातकाला मी   5 जुलै 2014 रोजी  भविष्य विषयक सल्ला दिला होता, तो असा:

या रिपोर्ट मधले दुसर्‍या क्रमांकावरचे  भाकित या पूर्वीच बरोबर ठरले आहे , तसा फिडब्यॅक या पूर्वीच मला मिळाला आहे , तो या ब्लॉग  वर  5 ऑगष्ट 2014 ला एक पोष्ट मघ्ये लिहला आहे.

तिसर्‍या क्रमांकातले भाकित ही खरे ठरण्याचा मार्गावर आहे कारण जातकाला नोकरी व्यवसायाच्या अनेक नव्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत,  त्यासंदर्भात जातक (फायनल) इंटरव्हू  साठी नुकताच आखाती देशात गेला होता.

वरील रिपोर्ट मधला पहिला मुद्दा  पहा , मला जातकाच्या आई बद्दल काही अशुभ म्हणजेच त्यांचे  ‘निधन’ होणार हे दिसले होते, आता अशा गोष्टी स्पष्ट पणे लिहायच्या नसतात असा सर्वमान्य संकेत असल्याने मी ” घरातील वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत मोठी काळजी निर्माण करेल ..” अशी शब्द योजना केली होती. व जातकाला ‘संपर्क साधा’ असे सुचवले होते. त्याप्रमाणे जातकाने संपर्क साधला, तेव्हा मी जातकाला काहीशी कल्पना देऊन ठेवली होती.

गोष्ट दुर्दैवी पण माझे हे भाकित खरे ठरले, डिसेंबर 2014 मध्ये , म्हणजे गेल्याच महिन्यात जातकाच्या मातोश्रींचे निधन झाले ही दु:खद बातमी जातकाने कळवली आहे. परमेश्वर मृताच्या आत्म्याला शांती  व सदगती देवो ही प्रार्थना.

अशुभ भविष्य बरोबर आले असे अगदी जाहीर करुन सांगण्यात यात काय मोठेपणा, पण शुभ असो वा अशुभ भविष्य हे भविष्य असते आणि जन्मपत्रिकेच्या माध्यमातून भविष्यातल्या घटनांचा कानोसा जरुर घेता येतो, हेच यातून सिद्ध होते.

हे शास्त्र, मग कोणी याला शास्त्र मानो ना मानो , असे कमालीच्या ताकदीचे आहे, मात्र हे सर्व करायला अभ्यासू व काही प्रमाणात दैवी शक्तींची मदत प्राप्त असलेला तज्ञ ज्योतिर्विद असणे मात्र जरुरचे असते, गेल्या वर्षभरात मृत्यू ची चार भाकीते बरोबर आल्याने मी आता ह्ळूहळू  ‘डेथ प्रिडिक्शन ‘ स्पेशंलिस्ट व्हायला लागलोय का असे वाटायला लागलेय ! अरे नाय रे नाय , हे शास्त्र बर्‍याच चांगल्या गोष्टींसाठी निर्माण झाले आहे !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. jidnyasak

  Suhasji,
  Jyotishacha upayog keval bhavishyatil gosti janun ghenyasathich hoto ki kahi pramanaat bhavishyatil sankate sodavinyasathi dekhi hoto? Ekhadi ghatana shubh aso va ashubh, jar ghadayachich asel tar ti adhich janun ghenyacha kay upyog? Sadhya paristhitimadhye kahi samasya astil ani jyotishachya sahayanne tyache nirakaran karun dile ashya cases astil tar tya jaast vachayala avadtil.
  Baaki blog ekdum chaan 🙂

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद.

   आपण स्वत:च्या नावाने प्रतिसाद (तोही मराठीत) दिला असता तर जास्त बरे वाटले असते.
   वेळे अभावी आपल्याला व्यक्तीश: उत्तरें देता येणार नाही. आपल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या पूर्वीच्या काही लेखात अंशत: सापड्तील , काही नवे लेख प्रसिद्ध करत आहे त्यातही या मुद्द्यांचा उल्लेख आहे, तेव्हा ब्लॉगला अधूनमधून भेट द्या, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.