चंद्र हा हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी धरला तर काय होते?   मंगळ १४ वृश्चिक ३४ वर आहे तर चंद्र ०० वृश्चिक ३९ असा आहे म्हणजे चंद्र  जेव्हा  १४ वृश्चिक ३४ वर  येईल तेव्हा दोघांत युती योग होईल. हे घ्या तिसरे कंफर्मेशन , आता काय बिशाद नाही म्हणायची ! त्यामुळे   हरवलेली वस्तु बिपीनभाईंना मिळणारच !

या लेखमालेतले आधीचे लेख इथे वाचा:

भंडारी बेकसूर है । (भाग ३)

भंडारी बेकसुर है । (भाग २)

भंडारी बेकसूर है । (भाग १)

या प्रश्नासाठी मांडलेली प्रश्न कुंडली अशी आहे:bhandari-bekasoor-hain-horary-chart

 

चार्टचा तपशील:

दिनांक: ३१ जानेवारी २०१६ , वेळ: १०:४०:४६

स्थळ: देवळाली कँप (नाशिक) ७३ पूर्व ५०; १९ उत्तर ५७

Geocentric, Tropical, Placidus, Mean Node

आता बघायचे की ही वस्तु आहे कोठे आणि सध्या कशा अवस्थेत आहे. यासाठी हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी शुक्र तपासायला हवा. शुक्र मकरेत ९ अंशात असून नवम स्थानात आहे. पण तो दशम भावाच्या आरंभाच्या अगदी सव्वा अंशच मागे आहे त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या शुक्र नवमात असला तरी तो दशमात आहे असे मानता येईल.

शुक्राचा राशीस्वामी (डिस्पोझीटर) शनी अष्टमात आहे असे दिसले तरी तो नवम भावाच्या आरंभाच्या अगदी दीड अंशच मागे आहे त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या शनी अष्टमात असला तरी तो नवमात आहे असे मानता येईल.

शुक्र मकरेत आहे , मकर ही पृथ्वी तत्वाची राशी , हरवलेली वस्तु जेव्हा पृथ्वी तत्वाच्या राशीत असते तेव्हा ती ” जमीन, जमीन लगत, चिखल, दलदल, पायवाटा (पदपथ) , पार्किंग लॉट्स, मोकळी जागा, दुर्लक्षित जागा, विहीर किंवा पाणी साठवण्याची जागा , पाणथळ जमीन ” अशा ठिकाणी असण्याची शक्यता जास्त असते.

Earth signs (Taurus, Virgo, Capricorn)-, floor level in the room, or on the ground floor of a house or building. On the pavement, in the cellar, or on the ground, the gravel path or tiled path round the house. The south side of a room, a wall, etc.

मकर ही ‘चर / कार्डीनल’ राशी आहे , हरवलेली वस्तु जेव्हा ‘चर / कार्डिनल’ राशी मध्ये असते तेव्हा ती वस्तु घरात असेल तर उंच जागी, माळ्यावर (लॉफ्ट) मध्ये असते , घराबाहेर असल्यास ही वस्तू नवी बांधकामें, नवीन तयार केलेली जागा/ पटांगणें, बागां अशा ठिकाणी असण्याची शक्यता असते.

मकर रास ‘दक्षिण’ दिशा दाखवते. मकर रास “कमी उंची, अंधार, Near threshold म्हणजेच एकादी बाऊंडरी / हद्द / कुंपण , जनावरांचे गोठे, लाकूड फाटा साठवायची जागा , ओसाड, माळरान'” अशा जागा ही दाखवते.

हरवलेल्या वस्तु चा प्रतिनिधी व फॉरचुनाचा डिस्पोझिटर शनी दोघे ही अगदी ‘कस्प’ वर आहेत एखादा अंश पलीकडे आणि ते दोघेही आपापली घरें ओलांडून पुढच्या घरात जाण्याच्या तयारीत आहेत. ही स्थिती मला जरा वेगळीच वाटली. त्यातच मकर म्हणजे Near threshold म्हणजेच एकादी बाऊंडरी / हद्द / कुंपण , म्हणजे वस्तु एखाद्या सरहद्दीवर पडली आहे. ही सरहद्द कोणती असू शकते?

शुक्र नवम स्थानातून दशमात प्रवेश करत आहे , नवम स्थान म्हणजे ‘देवस्थान’ आणि दशम स्थान म्हणजे ‘कामाची जागा/ ऑफिस’ ! मला एकदम बिपीन भाईंचे ‘ओफ्फीस’ आठवले!

मी बिपीनभाईंना विचारले ….
“आपल्या सोसायटीत एखादे मंदिर आहे का?’

“हा , है ना .. महालक्ष्मी का मंदिर हाये”

“आणि आपले ऑफिस कोठे आहे , या मंदिराच्या जवळच आहे का?’

“हा ओफ्फिस तो मंदिर के बाजू मा ”

“म्हणजे अगदी जवळ?”

“वैसा करीब ही है, बीच मा लोन (लॉन), फ्लोवर बेड्स छे, मंदीर से होके सौ कदम लोन (लॉन) से गुजर के ही ओफ्फिस आना पड्ता है ”

हे ऐकताच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! ही चांदीची डब्बी बिपिन भाईंना ऑफिस मध्ये बरीच शोधाशोध करुन सुद्धा सापडली नाही, म्हणजे ती डब्बी ऑफिसच्या बाहेर आहे. मंदीर आणि ऑफिस जवळजवळ आहे म्हणजे त्यांची सरहद्द एकच आहे! दोन्हीं मध्ये लॉन , फुलांचा छोटासा बगीचा आहे! म्हणजे डब्बी या ठिकाणीच पडली आहे! बहुदा खिशातली एखादी वस्तू ( सेल फोन?) बाहेर काढताना ही डब्बी बाहेर पडली असावी, हिरवळीवर पडल्याने आवाज आला नसेल म्हणूनच बिपिनभाईंच्या लक्षात आले नसावे.

ऑफिस आणि मंदीर या मधल्या जागेत हुडकले तर डब्बी मिळणार ! सिंपल !!

मी आणखी काही कंफर्मेशन्स मिळतात का या दृष्टीने पुन्हा एकदा पत्रिका तपासायला सुरवात केली.

चंद्र – मंगळ युती होण्यापूर्वी , चंद्र रवी शी केंद्र योग करत आहे, चंद्र – शुक्र योग होत असतानाचा हा चंद्र – रवी केंद्र होत आहे हे विषेष. जेव्हा शुक्र – युरेनस योग होतो आहे त्याच वेळी रवी – युरेनस योग होत आहे! एव्हढेच नाही तर खुद्द मंगळ त्याच वेळी १७ अंशात असल्याने या सार्‍यांशी योग करत आहे !!!

म्हणजे वस्तु सापडण्या संदर्भातल्या सर्व योगात / टेस्टीमोनीज मध्ये रवी ची उपस्थिती आहे , नुसतीच उपस्थिती नाही तर अधोरेखीत आहे. म्हणजेच या रवी चा हरवलेल्या वस्तुशी काहीतरी संबंध आहे. रवी लाभात आहे तर पंचमेश आहे! रवि लाभात असल्याने तो बिपीन भाईंच्या मोठा भाऊ दर्शवतो तसेच पंचमेश म्हणुन तो बिपीन भाईचे अपत्य (मुलगा / मुलगी) दर्शवतो.

घटने संदर्भात कोणताही सिग्निफिकेटर वक्री नाही त्यामुळे वस्तू सुस्थितीत आहे, आणि वर उल्लेख केलेल्या ठिकाणी असण्याची मोठी शक्यता आहे पण ती बिपीन भाईंना सापडणार नाही तर ‘रवी’ चा सहभाग असल्याने रवी लाभात असल्याने कदाचीत बिपीन भाईंचा मोठा भाऊ किंवा रवी पंचमेश असल्याने बिपिनभाईंचा मुलगा/ मुलगी यांना सापडण्याची शक्यता आहे. बिपीन भाईंना मोठा भाऊ नाही, एकच मुलगा आहे (जिग्नेस) , (हे बिपीन भाईंना विचारुन घेतले) त्यामुळे बिपीन भाईंची मुलाला (जिग्नेस) ही डब्बी सापडेल आणि त्याच्या मार्फत ती बिपीन भाईंना परत मिळेल! पण असे इतके सुक्ष्म भाकीत करायचा कितीही मोह झाला तरी तो टाळावा!!

आता शेवटचा प्रश्न , या सार्‍याला साधारण किती दिवस लागतील?

साधारण होरारी चंद्र हा कालनिर्णय करण्यासाठी वापरतात. चंद्र जेव्हा प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करत असतो तेव्हा हे छान जमून जाते. पण या केस मध्ये चंद्र चोराचे प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे मी जरा वेगळा विचार केला, आपण इफेमेरीज बघितल्या साधराण ६-७ फेब्रुवारीला रवी, शुक्र , युरेनस, मंगळ वेगवेगळ्या राशीत पण एकाच म्हणजे १७ अंशावर येऊन आपसात बरेच आश्वासक योग करत असल्याने हाच रियल टाइम दाखला मला योग्य वाटला . म्हणून मी ६-७ फेब्रुवारी म्हणजे प्रश्न विचारल्या पासुन आठवडाभरात डब्बी सापडेल असा कयास करुन बिपीन भाईंना सांगीतले:

“बिपीन भाई काळजी करु नका आपली मौल्यवान डब्बी आपल्याला परत मिळेल. जरा वेळ लागेल पण नक्की परत मिळेल. ही डब्बी कोणी ही चोरली नाही तर हरवली आहे. पण आपण समजता तसे ही डब्बी सोसायटीच्या ऑफिस मध्ये नाही तर ऑफिस आणि महालक्ष्मी मंदीर या मधल्या मोकळ्या जागेत , फुलांचे ताटवे आहेत त्या भागात जमिनी लगत पडली आहे आणि आजपासुन आठवड्याभरात डब्बी सापडेल, डब्बी अगदी सुखरुप परत मिळेल, थोडी माती – चिखल लागला असेल इतकेच. आपण निर्धास्त राहावे.”

“सचमुच?”

“सोळा आना सच!”

“थेंकू आता तिकडेच ज्याते आनी तलाश करते”

“बिपिनभाई डब्बी सापडणार अगदी खात्रीने पण वस्तु सापडायला वेळ आहे, एक आठवडा पूर्ण ! आत्ता कितीही हुडकले तरी मिळणार नाही, अगदी समोर असली तरी नजरेस पडणार नाही, पण निर्धास्त राहा, वस्तु हरवली आहे , चोरीला गेली नाही त्यामुळे नक्की सापडणार आणि मी सांगीतलेल्या जागीच सापडणार”

“तुमी बोलते ते सच माना तो साला भंडारी ने डब्बी चोरला नाय असा होनार ..”

“बिल्कुल सहीं ! …

तमाम गवाहें और सबुतोंके मद्दे नजर , अदालत इस नतिजे पे पहुँची है के

मुल्जिम शकंरसिंह वल्द हरीसिंह भंडारी बेकसूर है ।”

…..

…..

पुढे काय झाले हे सांगायाला बिपीन भाई आले नाहीत, तो धीरज भाई पण कोठे गायबला होता कोण जाणे, त्यानंतर साधारण पंधरा दिवसा नंतर एका संध्याकाळी बिपिन भाई सत्संगा ला जाताना दिसले. मी त्यांना थांबवून चौकशी केली तेव्हा समजले…

मी इतक्यात शोधू नका म्हणून सांगीतले असले तरी बिपीनभाईंनी मंदिर आणि सोसायटीचे ऑफिस या मधली जागा चाळून काढली पण डब्बी सापडली नाही. ‘सुहास भाई’ का केहना इस बार गलत निकला’ असे शिक्का मोर्तब करुन त्यांनी डब्बीचा नाद सोडून सुद्धा दिला होता! पण असे व्हायचे नव्हते (माझे पण ग्रह जोरदार असतील त्यावेळी!)

बरोबर ७ फेब्रुवारीला , बिपीन भाईंचा मुलगा जिग्नेस सकाळी मंदीरा जवळच्या बागेत (ही बाग मंदीर आणि सोसायटीचे ऑफिस याच्या मधोमध आहे) असताना सकाळच्या उन्हात काहीतरी चमकले , त्याने जवळ जाऊन पाहीले तर काय एका झाडाच्या वाफ्यात ती चांदीची डब्बी निवांत पहुडली होती! ती डब्बी या आधी त्या जागी शोध शोध शोधून सापडली नव्हती कारण त्यावर बराच पालापाचोळा जमा झाला होता, पण आदल्या दिवशीच झाडांना पाणी घातले गेले असल्याने तो पाला पाचोळा आता बाजूला झाला आणि डब्बी प्रकाशात आली , जिग्नेस ला दिसली ! हे ऐकून बिपीनभाईं पेक्षा मीच थक्क झालो! ग्रहांनी (खासकरुन रवी चे होणारे योग , रवी पंचमेश ) किती खणखणीत कौल दिला होता !!

असो….

भंडारी बेकसूर आहे हे आपल्या प्रश्नकुंडलीने आधीच सांगीतले होते, नंतरच्या घटनाक्रमा नुसार तो निर्दोष असल्याचे ही सिद्ध झाले…

वस्तु सापडली, माझे भाकित बरोबर आले याचा मला जेव्हढा आनंद झाला त्या पेक्षा भंडारी बेकसूर आहे हे सिद्ध झाले त्याचा झाला. म्हणुन मला पुन्हा एकदा म्हणावेसे वाटले …

“भंडारी बेकसूर है ।”

लेखमाला समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

11 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद प्राणेशजी ,

   पण माझ्या कौशल्यां पेक्षा प्रश्न विचारला गेला ती वेळच महत्वाची ठरली. प्रश्न जेन्युईन असेल आणी खर्‍या तळमळीने विचारला गेला तर प्रश्नवेळेच्या क्षणात (ग्रहस्थिती मध्ये) प्रश्नाचे उत्तर असतेच असते. ते हुडकून बाहेर काढयाचेच काम उरते! जेन्युईन प्रश्न, प्रश्ना मागची तळमळ हे सारे रिलेटीव्ह आहे याचे मोजमाप नाही पण खरोखरीच असे असते तेव्हा दैवी मदत मिळतेच मिळतेच. मी यावर विश्वास ठेवतो (याला अंध श्रद्धा म्हणा वाटल्यास , मला चालेल !‌ ), अगदी साधे सरळ नियम वापरायचे , उगाच ओढून ताणून कसले तरी एक्क्सोटीक नियम / पद्धती वापरायची काही ही गरज नाही. तर्काच्या आणि अनुभवाच्या कसोटीला उतरलेल्या सर्वमान्य नियमांचाच वापर करायचा.

   दरवेळेला अगदी असे अचूक उत्तर मिळवता येणार नाही याची जाणीव ठेऊन प्रयत्न करत राहायचे .

   सुहास गोखले

   0
 1. Anant

  Shri Suhasji,

  Mast lekhamala. You have great analytic mind and you are even better word smith. Such complicated matter you have explained in simple yet interesting way.
  Thank you for sharing with us.
  Best wishes for next series.

  Thanks,
  Anant

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद अनंतजी,

   मी जास्तीत जास्त सोपे करुन सांगायचा प्रयत्न करत आहे, ज्योतिषा वर पुस्तके खंडीने आहेत पण ती सगळी नियम – आडाख्यांनी भरलेली थिओरॅटीकल पद्धतीची. हे सर्व नियम – आडाखे प्रत्यक्षात वापरायचे कसे हे कोणीच सोदाहरण सांगत नाही म्हणून मी ठरवले ज्या काही थोड्या फार केसेस मी हाताळल्या आहेत निदान त्या तरी सविस्तर पणे लोकां पुढे मांडाव्यात , त्यातून कोणाला शिकायला मिळाले तर उत्तमच !

   माझ्या पेक्षा मोठा अनुभव असलेले आणि दिवसाला २० पेक्षा जास्त क्लायंट हातळणारे ज्योतिषी आहेत त्यातल्या काहींना मी विनंती केली होती की तुम्हीही लिहा, तुमच्या अनुभवातून आम्ही शिकू शकतो पण कोणी तयार झाले नाही, मी त्यांना इतकेही सुचवले लिहायाला वेळ होत नसेल किंवा लिहण्याची कला नसेल तर निदान अशा काही निवड्क केसेसची कच्ची टीपणे (डेटा, कंसीडरेशन्स, रिझल्ट्स) मला द्या मी ते शब्दबद्ध करतो आणि त्यांच्या नावानिशी प्रकाशित करतो (मी स्वत:ला कोणतेही श्रेय घेणार नाही) पण त्याला देखील कोणी तयार झाले नाही. हे खरेच दुदैव म्हणायचे !

   मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे. जितके दिवस जमते तितके दिवस एके दिवशी मला सुद्धा कंटाळा येईल हे मात्र खरे!

   सुहास गोखले

   0
 2. Santosh

  सुहासजी,

  नेहमी प्रमाणे उत्कृष्ट केस स्टडी, कृपया आपण वेस्टर्न कुंडली प्रमाणे बाजूला वेदिक किंवा नॉर्थ इंडिअन कुंडली (सायन) दिलीत तर वाचायला सोप होईल.

  वेस्टर्न कुंडली वाचायची सवय नसल्यामुळे कुंडली वाचन होत नाही त्यामुळे केस स्टडी पूर्ण वाचल्याची मजा येत नाही.

  तुमच्या आगामी लेखनाला शुभेच्छा.

  आपला नियमित वाचक, 🙂
  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   धन्यवाद. वेस्टर्न होरारी मध्ये मुख्यत: अस्पेक्ट वर जास्त भर असतो आणि तेही अंशात्मक असे पाहवे लागतात. वर्तुळाकार मांडणी मध्ये असे अंशात्मक ग्रहयोग बघणे कमालीचे सोपे जाते , तसेच मोडॅलिटी व इलेमेंट्स चा विचार पण चटकन करता येतो. ग्राफिक्स च्या दृष्टीने ही वर्तुळाकार मांडणी नि:संशय उजवी आहे. होरारीत वापर नसला तरी दोन वेगळ्या व्यक्तींचा पत्रिका एकाच वेळी अभ्यासायच्या असतात (विवाहा भागीदारी ) तेव्हा या दोन कुंडल्या सुपर इंपोज्ड कराव्या लागतात तेव्हा फक्त वर्तुळाकार रचनेतच हे चांगले करता येते. तसेच ट्रनिस्ट्स पण असेच मूळ कुंडली वर सुपर इंपोज करता येतात. मी तर एकाच वेळी तीन प्रकारच्या कुंडल्या सुपर इंपोज्ड करुन अभ्यासतो ! असे अनेक फायदे आहेत.

   आता राहीला प्रश्न सवयीचा ! एकदा सवय झाली की सोपे जाईल. प्रयत्न तर करुन पाहा !

   आणि एका साध्या कागदा वर मी दिलेली पत्रिका आपल्याला सवयीच्या पद्धतीने (नॉर्थ डायमंड, साऊथ स्क्वेअर इ.) काढून अभ्यासता येईलच ना? मी तर म्हणतो तसेच करा , मी स्वत: आज ही तसे करतो. म्हणजे संगणकाच्या स्क्रिन वर आलेली पत्रिका मी कागदावर उतरवून घेतो आणि मगच माझा अभ्यास सुरु करतो. असे केल्याने त्या कुंडलीची आणि आपली जवळीक निर्माण होते !

   सुहास गोखले

   0
 3. अभिजित माने

  Apli Lekhmala Khup Avdali Nehmipramane. Khup Chhan. Tumhi Jyotish shastratale Sherlock Holms ch Ahat. Sir krupaya aple prashna kundaliche chart Vaidik paddhatine suddha dya mhanje amchya sarkya navshikyana samjayala ankhi sop jail. Apla Ekalavya- Abhijit Mane

  0
  1. सुहास गोखले

   श्री अभिजितजी,

   धन्यवाद. वेस्टर्न होरारी मध्ये मुख्यत: अस्पेक्ट वर जास्त भर असतो आणि तेही अंशात्मक असे पाहवे लागतात. वर्तुळाकार मांडणी मध्ये असे अंशात्मक ग्रहयोग बघणे कमालीचे सोपे जाते , तसेच मोडॅलिटी व इलेमेंट्स चा विचार पण चटकन करता येतो. ग्राफिक्स च्या दृष्टीने ही वर्तुळाकार मांडणी नि:संशय उजवी आहे. होरारीत वापर नसला तरी दोन वेगळ्या व्यक्तींचा पत्रिका एकाच वेळी अभ्यासायच्या असतात (विवाहा भागीदारी ) तेव्हा या दोन कुंडल्या सुपर इंपोज्ड कराव्या लागतात तेव्हा फक्त वर्तुळाकार रचनेतच हे चांगले करता येते. तसेच ट्रनिस्ट्स पण असेच मूळ कुंडली वर सुपर इंपोज करता येतात. मी तर एकाच वेळी तीन प्रकारच्या कुंडल्या सुपर इंपोज्ड करुन अभ्यासतो ! असे अनेक फायदे आहेत.

   आता राहीला प्रश्न सवयीचा ! एकदा सवय झाली की सोपे जाईल. प्रयत्न तर करुन पाहा !

   आणि एका साध्या कागदा वर मी दिलेली पत्रिका आपल्याला सवयीच्या पद्धतीने (नॉर्थ डायमंड, साऊथ स्क्वेअर इ.) काढून अभ्यासता येईलच ना? मी तर म्हणतो तसेच करा , मी स्वत: आज ही तसे करतो. म्हणजे संगणकाच्या स्क्रिन वर आलेली पत्रिका मी कागदावर उतरवून घेतो आणि मगच माझा अभ्यास सुरु करतो. असे केल्याने त्या कुंडलीची आणि आपली जवळीक निर्माण होते !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.