चंद्र १५ तुळ ते १५ वृश्चिक या विभागात असल्याने, ‘विया कंब्युस्टा’ आहे पण या आपण याची फिकीर करायची गरज नाही , कारण चंद्र जातकाचा प्रतिनिधी म्हणुन विचारात घेतला तरच ‘विया कंबुस्टा’ ची काळजी , पण आपण चंद्र थर्ड पार्टी / चोर यांना बहाल केला आहे म्हणजे चोर ‘विया कंबुष्टा’   असणे हे चोरासाठी घातक आहे , आपल्याला तर ते लाभदायकच आहे! त्याहुन ही महत्वाचे म्हणजे चंद्राला कोणतीच डिग्निटी नसल्याने तो चक्क ‘पेरेग्राईन’ आहे , काही करायची ताकदच नाही त्याच्याकडे त्यामुळे ही वस्तु चोरीस गेली नसल्याचा एक  संकेतच आहे!!

या मालिकतले पहीले दोन भाग इथे वाचा:

भंडारी बेकसूर है । (भाग २)

भंडारी बेकसुर है । (भाग १)
आता आपण मूळ प्रश्न आणि उपप्रश्न यांची उकल करायला घेऊ….

या प्रश्नासाठी मांडलेली प्रश्न कुंडली अशी आहे:

 

bhandari-bekasoor-hain-horary-chart

 

चार्टचा तपशील:

दिनांक: ३१ जानेवारी २०१६ , वेळ: १०:४०:४६

स्थळ: देवळाली कँप (नाशिक) ७३ पूर्व ५०; १९ उत्तर ५७

Geocentric, Tropical, Placidus, Mean Node

आता आपण मूळ प्रश्न आणि उपप्रश्न यांची उकल करायला घेऊ.

भंडारी बद्दल जे ऐकले ते खरे आहे का?

केवळ एकटा ‘रामशरण’ म्हणतो या वरुन भंडारी चोरटा आहे किंवा भंडारीनेच चोरी केली असे कसे म्हणता येईल ? भंडारीचा पुर्वैतिहास , त्याने पूर्वी अशा प्रकारच्या चोर्‍या केल्या आहेत का वगैरे बाबींचा शहानिशा करणे पोलिसांचे काम आपण त्या बाबतीत जास्त काय करु शकणार? आपण आपल्या स्कोप मध्ये भंडारी बद्दल जे बोलले जात आहे ते खरे आहे का की नुसती एक  ‘अफवा’  आहे का या अंगाने तपास  करु शकतो, ही बातमी ज्या ‘रामशरण’ ने जातकाला सांगीतली त्यात आपल्याला कोणताच रस नाही, बातमी खरी का खोटी हे ठरवणे महत्वाचे.

‘बातमी / माहीती’ हे त्रितियस्थानाच्या (३) अखत्यारीत येते, त्रितिय स्थान १५ मिथुन ३२ वर चालू होते म्हणजे त्रितियेश बुध असल्याने बातमीचे प्रतिनिधित्व करेल. बुध हा ग्रह बातमी / माहीती / अफवा’ यांचा नैसर्गिक कारक आहेच शिवाय त्याचे इतर कारकत्व म्हणजे अस्थिरता / चंचलता, द्विस्वभावी व्यक्तीमत्व या सार्‍याचा विचार करता बातमी खोटी म्हणजे अफवा असण्या ची शक्यता जास्त आहे.हा त्रितियेश जर गुरु असता तर बातमी खरी ठरण्याची शक्यता जास्त असती.

आता या ‘बुधा’ कडे पाहा..

आपण आधी पाहिले आहे , बुध मंगळाच्या ‘एक्सालटेशन’ आणि ‘फेस’ मध्ये आहे. महत्वाचे म्हणजे बुधाला कोणतीच डिग्निटी नसल्याने तो चक्क ‘पेरेग्राईन’ आहे , काही करायची ताकदच नाही त्याच्याकडे, त्यामुळे ‘वस्तु भंडारीने चोरली’ ही एक अफवा असल्याचा हा एक संकेतच आहे!!

बुध १६ मकर ३३ वर आहे, बुध नुकताच प्लुटो ( १६ मकर ०४) च्या युतीतून बाहेर पडत आहे , त्या आधी तो मंगळ, नेपच्युन शी झालेल्या योगांतून बाहेर पडला आहे आणि लौकरच तो युरेनस शी केंद्र योग करणार आहे. बुध जो ‘बातमी’ चा कारक आहे तो इतका जबरदस्त मार खाऊन राहीला असताना , बातमी खरी कशी काय असू शकेल?  ‘रामशरण ने सांगीतले सगळे खोटे आहे, ती केवळ एक अफवा आहे!’कदाचित ह्या रामशरण चे आणि भंडारीचे काही तरी वाजले असेल म्हणुन रामशरण ने भंडारी बद्दल खोटी चुगली केली असावी.

‘वस्तू भंडारीने चोरली’ ही अफवा आहे असा निकाल लावल्या नंतर आपण पुढच्या मुद्द्या कडे वळू.

वस्तु भंडारीने चोरली आहे का?

भंडारी बद्दल रामशरण जे सांगतो आहे ती एक अफवा असली तरी भंडारीने चोरी केली नाही हे अजून सिद्ध झाले नाही ! जर भंडारी ने चोरी केली असेल तर भंडारीचा प्रतिनिधी आणि हरवलेली वस्तू यांच्यात सेपरेटींग अस्पेक्ट असावयास हवा.

आता भंडारीचे प्रतिनिधी कोण ? षष्ठमेश बुध आणि षष्ठातला गुरु यां दोघां पैकी एकाचा तरी हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी जो शुक्र त्याच्याबरोबर सेपेरेटींग अस्पेक्ट झालेला असायला हवा.
बुध १६ मकर ३३ वर आहे तर शुक्र ९ मकर ०३ वर आहे ! दोघेही एकाच राशीत म्हणजे मकरेत आहेत , म्हणजे वरकरणी असे दिसते की बुध मकरेत ९:०३ वर असताना त्यांच्यात युती झाली होती !  असे वाटले तरी दोघा ग्रहांच्या गती जवळपास समानच असल्याने ही युती झालीच असेल असे नाही, आता हे कसे ठरवायचे ? एफेमेरीज ची साक्ष काढायची.

 

bhandari-ephe-01

 

वर दिलेली ग्रहस्थिती पहा, शुक्र मकरेत आला तो  जानेवारी २४ जानेवारी २०१६ या दिवशी. त्या वेळेस बुध वक्री स्थितीत १५ मकरेत होता,  बुध वक्री स्थितीत १४ मकर पर्यंत येतो आणि २६ जानेवारीला मार्गी झाला, तेव्हा शुक्र मकरेतच पण २:३८ वर होता. बुध पुढे जात आहे, शुक्र पण मार्गी असल्याने पुढे जात आहे पण दोघेही युती करणार नाहीत. बुध १४ फेब्रुवारीला मकर रास ओलांडेल तेव्हा शुक्र मकरेतच २६ अंशावर असेल.  म्हणजे भंडारी व हरवलेली वस्तु यात सेपरेटींग अस्पेक्ट झालेला नाही.

आता गुरु जो भंडारीचा दुसरा प्रतिनिधी आहे तो आणि शुक्र हे कॉम्बीनेशन तपासू , गुरु हा २२ कन्या २३ तर शुक्र ९ मकर ०३ म्हणजे या दोघांतही कोणता सेपरेटींग अस्पेक्ट नाही.
आपण चंद्राचे हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधीत्व काढून घेतले असले तरी वादा साठी त्याचा पुन्हा विचार केला तर चंद्र जो ०० वृश्चिक ३९ वर आहे, म्हणजे तोही भंडारीच्या प्रतिनिधींशी म्हणजे बुध व गुरु यांच्याशी सेपरेटींग अस्पेक्ट करत नाही. सर्व कॉम्बीनेशन्स तपासल्या नंतर आपल्याला खणखणीत कौल मिळाला आहे की भंडारीने चोरी केली नाही किंवा हरवलेली वस्तु भंडारी पाशी नाही.

ठीक आहे, भंडारी बाबतचा जो संशय होता तो  दूर झाला आता त्या वस्तू बाबत विचार करु.

वस्तु खरेच चोरीस गेली का हरवली?

ही वस्तु एकतर चोरीस गेली असेल किंवा हरवली असेल. तेव्हा प्रथम ‘वस्तु चोरीस गेली का हरवली’ याचाच फैसला करुन टाकू!

आपण चंद्राला चोराचा / परक्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून निश्चित केला आहे तर हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधी आहे शुक्र.  चंद्र नुकताच तर वृश्चिकेत (०० वृश्चिक ३९) आलेला असल्याने त्याचा शुक्राशी सेपरेटींग अस्पेक्ट होत नाही ……
याचा अर्थ वस्तू चोरीस गेलेली नाही तर हरवली आहे असा होतो.

चला, आत्ता पर्यंत आपण तीन प्रश्नांचा निकाल लावला…

  1. भंडारी बद्दल रामशरणने जे सांगीतले ती केवळ एक अफवा आहे.
  2. भंडारीने वस्तू चोरलेली नाही, ती वस्तु भंडारी कडे नाही.
  3. वस्तु चोरीस गेली नाही तर ती हरवली आहे

आता शेवटचा मोलाचा प्रश्न ,हरवलेली / चोरीस गेलेली वस्तू परत मिळेल का? ती वस्तु कोठे आहे , कशी आहे आणि बिपिन भाईंना ती परत मिळेल का?

हरवलेली वस्तु बिपीन भाईंना परत मिळायची असेल तर या दोघांच्या प्रतिनिधीं मध्ये एखादा अ‍ॅप्लायींग अस्पेक्ट व्हायला हवा, तसा तो आहे का ते आता तपासू.

मंगळ बिपीनभाईंचे प्रतिनिधीत्व करतो तर हरवलेल्या वस्तु चे प्रतिनिधीत्व शुक्र करत आहे. मंगळ १४ वृश्चिक ३४ वर आहे तर शुक्र ९ मकर ०३ असा आहे , म्हणजे शुक्र मंगळा पेक्षा जलद असल्याने तो लौकरच मंगळाशी लाभ योग करु शकेल असे दिसते. पण जेव्हा असे दोन ग्रह जलद गती चे असतात नुसत्या आकड्यां वर जाऊ नये, काही वेळा असे योग (ते ग्रह आपापली रास ओलांडे पर्यंत होत नाहीत, मध्येच एखादा ग्रह वक्रि होतो आणि योग होत नाही इ.)

bhandari-ephe-01c

 

वर दिलेली ग्रहस्थिती पाहीली तर लक्षात येते की ७ फेब्रुवारीला हा लाभ योग विनाअडथळा होणार आहे!

युरेनस हा बिपिनभाईंचा आणखी एक प्रतिनिधी (युरेनस लग्नात आहे) , शुक्र (हरवलेली वस्तू) १७ मेष १९ वर आला की त्याचा आणि युरेनस (बिपीनभाई) यांच्यात केंद्र योग होत आहे! हा योग ६ फेब्रुवारीला होणार आहे , म्हणजे दोन कंफर्मेशन्स मिळाली आहेत आणि दोन्ही योगांचा कालवधी जवळपास एकच आहे ( ६ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी) .

चंद्र हा हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी धरला तर काय होते?   मंगळ १४ वृश्चिक ३४ वर आहे तर चंद्र ०० वृश्चिक ३९ असा आहे म्हणजे चंद्र  जेव्हा  १४ वृश्चिक ३४ वर  येईल तेव्हा दोघांत युती योग होईल.
हे घ्या तिसरे कंफर्मेशन , आता काय बिशाद नाही म्हणायची ! त्यामुळे   हरवलेली वस्तु बिपीनभाईंना मिळणारच !

आता बघायचे की ही वस्तु आहे कोठे , कशा अवस्थेत आहे आणि बिपीनभाईंना ती केव्हा मिळणार? …….

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.