घता बघता ब्लॉग ला चार वर्षे पूर्ण झाली !

या चार वर्षात दोन लाख पेज व्हूज (जुना वर्ड प्रेस ब्लॉग  + वेबसाईट वर स्थलांतरीत केलेला ब्लॉग) मिळाले. ३५० पोष्टस हातून लिहल्या गेल्या. पण सुरवातीचा उत्साह आता राहीला नाही हे मात्र खरे आणि  याला कारण म्हणजे कामाचा वाढता व्याप आणि एकंदरच वाचकांचा थंडा प्रतिसाद!!

‘वाचकांचा इतका थंडा प्रतिसाद ‘ का? यावर पूर्वी मी फार विचार करत असे , कधी कधी मनाला लावून पण घेतले पण नंतर लक्षात आले की आपण चुकीच्या अपेक्षा धरतोय!

मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तीच मुळी फार उशीरा, त्यावेळे पर्यंत बहुतांश वाचक वर्ग फेसबुक, व्टीटर , व्हॉट्स अ‍ॅप , यु ट्युब सारख्या नव्या , आकर्षक, चटपट्या आणि सोप्या माध्यमांकडे वळला होता. इतकी चांगली माध्यमें सहजगत्या उपलब्ध असताना वेबसाईट्स ला भेट देऊन ब्लॉग वाचण्यात कोण वेळ घालवणार ? हा बदल मी लक्षातच घेतला नाही,. वाचक येतील , लेखन वाचतील अशा वेड्या आशे पायी लिहीत राहीलो,  विविध प्रकाराचे लेखन केले, स्वत:ची एक लेखन शैली निर्माण केली, ब्लॉग च्या मांडणीत सतत बदल केले, ब्लॉग अधिक अधिक मनोवेधक व्हावा या साठी आटोकाट प्रयत्न केले, वर्ड प्रेस च्या मर्यादा जशा उघडकीस आल्या तसे अथक परिश्रम करुन , वेळ आणि पैसा खर्च करुन अत्यंत देखणी वेब साईट उभी केली … पण….पण… वाचकांचा म्हणावा तितका प्रतिसाद काही लाभला नाही. अर्थात चार वर्षात दोन लाख वाचन संख्या अगदीच आलतु फालतु नसली तरी माझ्या ब्लॉग वरचे चांगले लेखन, सभ्यता, निट नेटके पणा, सातत्य, वाचकांशी संवाद साधण्यातली तत्परता , या सगळ्या मागची माझी मेहेनत आणि तळमळ विचारात घेता , हा दोन लाखाचा आकडा फार लहान वाटतो, एव्हाना ही संख्या किमान दहा लाख तरी हवी होती.

अर्थात वाचक संख्या वाढावी म्हणून मी कोणत्याही सवंग (चीप) उपायांचा वापर केला नाही, राशी भविष्य, उपाय – तोडगे, साडेसाती अशा विषयांवर लिहणे कटाक्षाने टाळले, लोकप्रियता वाढवण्यासाठी असभ्य, अश्लिल , शिवराळ भाषेत एक अक्षरही लिहले नाही. एक वेळ ब्लॉग लिहणे बंद करेन पण असला घाणेरडा प्रकार माझ्या हातुन कदापीही होणार नाही.

या सगळ्या कारणां मुळेच मी ब्लॉग लिहणे आताशा फारच कमी केलेय, लिहलेले फारसे कोणी वाचत नाही अशी कुरकुर करत न बसता आता मी काळाची पावलें ओळखून  ‘यु ट्युब’ सारख्या सशक्त , दृकश्राव्य माध्यमाचा आधार घेतला आहे, इथे चंचु प्रवेश का होईना झाला आहे , कि बोर्ड वर बोटे नाचवत चार ओळी लिहणे आणि यु ट्युब साठी दोन – चार मिनिटांचा एखादा व्हीडीओ तयार करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे, बरीच यातायात करावी लागत आहे पण असे नविन काही करण्यात काही वेगळाच आनंद आहे हे नक्की.

असो, आगामी काळात या यु ट्युब च्या माध्यमातुन काही नविन, सकस , दर्जेदार असे देण्याचा मानस आहे. या माध्यमाचा आवाका , संभाव्य वाचक / श्रोता वर्ग लक्षात घेता बहुतांश व्हीडीओ ‘इंग्रजी’ भाषेत तयार करणे ही काळाची  गरज आहे. मराठीत ब्लॉग लिहण्याचा अट्टाहास धरल्याने मी केलेल्या अपार मेहनतीचे म्हणावे तसे चीज झाले नाही, आता इंग्रजी माध्यमाची कास धरल्या मुळे माझे लेखन , माझे विचार राज्याच्या , देशाच्या सीमा ओलांडून जगभरातल्या लाखों नव्या नव्या वाचकांच्या पर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. माझ्या ब्लॉग च्या काही वाचकांना हा ‘मराठी  ते इंग्रजी ‘ हा बदल रुचणार नाही , पेलणार नाही याची मला जाणीव आहे पण माझा ही नाईलाज आहे. अर्थात माय मराठी ला झिडकारले असे मात्र अजिबात नाही, अधून मधून मराठीत आवर्जुन लिहणार आहे , बोलणार आहे.

असो. या चार वर्षाच्या प्रवासात अनेक बरे – वाईट अनुभव आले, मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे लक्षात आले, अनेक मित्र – हितचिंतक लाभले. माझे लेख वाचणारे , त्यावर आवर्जुन प्रतिक्रिया देणारे , नवीन काहीतरी लिहा असा आग्रह करणारे , मुठभर का होईना पण रसिक, चोखंदळ वाचक मला लाभले यातच मला समाधान आहे.

आपले प्रेम असेच रहावे ही नम्र विनंती करतो आणि आपणा सर्वांना कृतज्ञता पूर्वक अभिवादन करतो.

मी आपला ऋणी आहे.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

20 प्रतिक्रिया

///////////////
 1. Dipti

  सुहास सर,

  आपल्या ब्लॉगला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!

  आपल्या ब्लॉगची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!

  -दिप्ती

  0
  1. सुहास गोखले

   सुश्री दिप्तीजी,

   धन्यवाद ! आपल्या सारख्या वाचकांच्या शुभेच्छांच्या जोरावर इतकी मजल मला गाठता आली. आपला स्नेह असाचा चालू ठेवावा ही विनंती.

   सुहास गोखले

   +1
 2. Deepak

  आपल्या ब्लॉगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  0
  1. सुहास गोखले

   श्री हिमांशुजी,

   धन्यवाद . अहो ‘प्रकट दीन’ काय म्हणताय ! मला उगाचच ‘बुवा- बापू – महाराज – स्वामी ‘ झाल्या सारखे वाटू लागते !

   सुहास गोखले

   0
 3. Anand Kodgire

  Congratulations on your blog anniversary, sir.
  I read your articles time to time, and I find them very informative and entertaining.
  Keep it up sir.

  0
 4. Niranjan Joshi

  Dear Shri. Suhas Gokhale ,

  At the outset , Hearty Congratulations to you and your Associates for creating different and interesting Blog . As we all know reading
  of various sections of Society ] has been diverted from books / blogs to other electronic sources [ e.g. WatsApp ] substantially .

  Articles / experience shared by you are really good , worthy and knowledgeable . You have a firm mindset and do not deviate form Principals .

  Pls. do keep sharing good write ups , am sure number of readers will keep increasing . You are in a Profession which , unfortunately , is flooded by people giving incorrect advises . I think mouth publicity of your Articles will help to have improved readers . Trust you and others will agree .

  Wish you all the very best for future Assignments.

  Niranjan Joshi , Pune .

  0
 5. प्रदिप कुलकर्णी

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  0
 6. Prashant

  Dear Suhasji,
  Congratulations on the fourth anniversary of your blog and wish to have many more. Also looking forward to your youtube vidoes.
  Best Wishes,
  Prashant

  0
 7. Rahul

  सुहासजी,
  आपले लेखन कौशल्य दर्जेदार आहेच शिवाय अभिरुची पुर्ण सुद्धा आहे…आणि ते दिवसागणिक बहरत जाईल यात शंका नाही. आपल्या यापुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा..युट्यूब वरील व्हीडिओ ऐकण्यासाठी उत्सुक आहोत..

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.