मित्रांनो,

माझ्या लेखनातून काहीसा निराशेचा स्वर दिसत आहे त्याला कारण माझ्या लेखनाला मिळत असलेला अत्यल्प वाचकवर्ग.

आपल्याला कल्पना असेल नसेल पण ब्लॉग लिहणे हे कमालीचे मेहेनतीचे आणि वेळ घेणारे काम असते. जो लेख आपण पाच मिनिटांत वाचून संपवता तो लिहण्यासाठी माझा दिवसभर मोडलेला असतो.

शेवटी प्रश्न पडतो हे मी लिहतो कशासाठी , कोणासाठी?

सुमारे चार वर्षांपूर्वी ब्लॉग सुरु करताना माझे दोन उद्देश होते, माझी आणि माझ्या व्यवसायाची ओळख करुन देणे आणि माझी लिखाणाची हौस पूर्ण करुन घेणे. ब्लॉग सुरु करण्यापूर्वी मी माझे लिखाण काही मासीकांत / वृत्तपत्रात प्रसिद्धीस पाठवले होते पण कोणीही छापले नाही. तेव्हा ठरवले आपण स्वत:च ब्लॉग च्या माध्यमातून वाचकां पर्यंत पोहोचू.

चार वर्षात माझे मूळ उद्देश काही प्रमाणात साध्य झाले पण नंतर फारशी प्रगती मात्र होऊ शकली नाही. लेखन करायची हौस फिटली. मी काहीतरी पांढर्‍यावर काळे करत लिहू शकलो आणि मूठभर का वाचकांनी ते वाचले हेच माझ्यासाठी पुरेसे होते. व्यवसाया बद्दल बोलायचे तर ब्लॉग वाचून माझ्याकडे येणार्‍यां पेक्षा , माऊथ टू माऊथ पब्लिसिटी ने माझ्या कडे येणार्‍यांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे.

‘गिर्‍हाईकें’ गोळा करणे हा ब्लॉग सुरु करण्या मागचा उद्देश नव्हता, तसा काही असता तर मी इतर ज्योतिषांनी केले तसे फेसबुक / व्हॉट्स ग्रुप चालू करुन उपाय-तोडग्यांचे दुकान थाटले असते आणि फुकट ज्योतिषाच्या खानावळीं चालवल्या असत्या. आणि…

‘स्वप्नात गाढव दिसले, याचा अर्थ काय?’ , असल्या प्रश्नांवर चर्चा करत बसलो असतो….

सुर्याला अर्ध्य देऊन / गायत्री मंत्र म्हणून सरकारी नोकरी मिळते किंवा ….दशमात राहु म्हणून ‘बगला मुखी’ चा व्यवसाय करा ….

असले  खुळचट सल्ले ज्योतिषाच्या नावा खाली देत बसलो असतो.

ब्लॉग बंद केला तरी माझ्या व्यवसायाचे फारसे नुकसान होणार नाही.

काहीतरी लिहायचे म्हणून लिहण्यात काहीही अर्थ नाही. माझा मुख्य विषय ज्योतिष हा असल्याने मी काय लिहू शकतो / किती लिहू शकतो याला ‘स्वाभाविक बंधने पडली आहेत. ज्योतिष मुळातच कमालीचा तांत्रीक आणि किचकट असल्याने हा विषय कितीही ठरवले तरी सोप्पा करुन लिहता येत नाही. ‘काप्पे अ‍ॅस्टॉलॉजी’ लिहताना मला हे पावला पावला जाणवत राहीले, अफाट मेहेनत घेऊन ,जीव तोडून लिहलेली ही लेखमाला काही मोजके वाचक वगळता अनेकांच्या डोक्यावरुन गेली!

‘राशी भविष्य’ लिहणे माझ्या साठी डाव्या हातचा मळ आहे, आणि मी जर का ‘राशी भविष्य’ लिहलेच तर मराठी ज्योतिषात आदर्श / सर्वोकृष्ट ठरेल, मी हे कधीही करणार नाही. केवळ सवंग प्रसिद्धी साठी, ब्लॉग चा वाचक वर्ग वाढवण्या साठी , गिर्‍हाईके गोळा करण्यासाठी , शास्त्राशी अप्रामाणीक असणार्‍या गोष्टी मी कदापीही करणार नाही. ‘राशी भविष्य’ हा या पवित्र ज्योतिषशास्त्राला लागलेला सगळ्यात मोठ्ठा ‘कलंक’ आहे असे माझे मत आहे! आधीच ज्योतिषशास्त्र बदनाम त्यात भर म्हणून ज्योतिष ज्योतिष शास्त्राची उरली सुरली विश्वासार्हता घुळीस मिळवणास हे एकटे ‘राशी भवीष्य’ जबाबदार आहे! आणि हे माहीती असताना सुद्धा चार पैसे मिळवण्यासाठी ब्लॉग /वृत्तपत्रे/ मासिके/ टिव्ही चॅनेल सारख्या माध्यमातून राशी भविष्याचा रतीब घालणारे तथाकथित ज्योतिषी गुन्हेगार आहेत!

माझ्या ब्लॉग पोष्ट ची स्निपेट माझ्या फेसबुक वॉल वर पोष्ट करतो आणि गुगल बाबाचे सर्च इंजिन थोडी फार प्रसिद्धी देत या व्यतीरिक्त माझा ब्लॉग जास्ती लोकां पर्यंत पोहोचावा असे काही केले नाही, ही कदाचित गफलत झाली असेल.  पण जे वाचक ‘ब्लॉग बंद करु नका’ असे सांगतात त्यांनी कितीवेळा माझी फेसबुक पोष्ट आपापल्या वॉल वर शेअर करुन माझा वाचक वर्ग वाढवायला मदत केली आहे?  पुण्याचे श्री जोशी वगळता फारसे कोणी हे एका माऊस क्लिक वर होणारे सोपे काम केलेले नाही! ५० मूळ वाचकांनी माझी पोष्ट शेअर केली तर , प्रत्येकाची सुमारे ३०० ची फ्रेंड लिस्ट गृहीत धरली तर, माझी पोष्ट १५००० लोकां पर्यंत पोहोचू शकली असती ना!

मी ‘काप्पे अ‍ॅस्टॉलॉजी ‘ लिहले ते केवळ या विषयावर असे कोणी लिहलेले नाही (निदान माझ्या माहीतीत तरी कोणी असे लिहायचा प्रयत्न केलेला नाही) , आपण एक सुरवात का करुन देऊ नये इतकाच हेतु होता त्यामागे.

याचे फळ काय मिळाले ? पुण्याच्या स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेणार्‍या ७० वर्षाच्या एकाने त्यावर घाणेरडी पिचकारी मारली! ३०-४० वर्षे ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेल्या या व्यक्तीला इतक्या वर्षात स्वत:ची अशी एक ओळ लिहता आली नाही पण पिचकारी मारायला मात्र तत्परतेने पूढे आले! स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा काही करतो म्हणला तर त्याची हेटाळणीं करायची. मत्सर ! दुसरे काही नाही.

पुढे काय?

अ‍ॅमेझॉन ने उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्यामुळे मध्यंतरी बाजूला ठेवलेल्या ‘पुस्तक प्रकाशन’ प्रकल्पाने पुन्हा उचल खाल्ली आहे, ‘ऑन लाईन’  कोर्स मधल्या तांत्रीक अडचणी वाढल्या आहेत तिकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. भारतात माझ्या या धडपडीची कोणी फारशी दखल घेतली नसली तरी ज्या पाश्चात्य ज्योतिष समुदायात मी सध्या जास्त वेळ घालवतो तिथे मात्र चांगले स्वागत झाले आहे,

 

‘होरारी अ‍ॅस्टॉलॉजी’ या विषयावर एक संशोधन प्रकल्प सुरु होत आहे आणि मला त्यात भाग घेण्याचे सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाले आहे, ज्या पाश्चात्य ज्योतिर्विदांना गुरु मानले, ज्यांची पुस्तके वाचत मी हे शास्त्र शिकलो त्यांच्या कडुनच असे आमंत्रण मिळणे  हा मी माझा बहुमान समजतो.

 

लेखनाच्या बाबतीत माझे काही चांगले लेखन इंग्रजीत भाषांतर करायची प्रेमळ सक्ति होत आहे ते काम प्राधान्य क्रमाने हाती घेत आहे.

‘कपूर अंकल’ सारखी ‘ न भुतो न भवीष्यती ‘ अशी महत्वाकांक्षी ‘अ‍ॅस्ट्रो नॉव्हेल’ आता मराठीत लिहण्यापेक्षा इंग्रजीतच लिहणे मला जास्त सयुक्तिक वाटत आहे.

ब्लॉग चालू ठेवणे आता वेळेचा विचार करता पांढरा हत्ती पोसल्या सारखे झाले आहे.

माझ्या ब्लॉग वर अपुर्ण असलेल्या काही लेखमाला प्राधान्य क्रमाने पूर्ण करेन

……….. पुढचे आत्ताच काही सांगत नाही………

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Ninad Phatak

  Suhasji,
  Namaste!It was a feast to read your articles on astrology!
  I came to know about your blog just today after I saw its link shared by someone on my facebook.
  Please do not stop writing.What you write is exremely interesting and it definitely helps to grow our understanding of astrology.
  I can imagine how one must be feeling when one gets response not as expected,but please do not stop writing.
  I HAVE BECOME BIG FAN OF YOUR WRITING.
  I HOPE YOU WILL CONTINUE TO WRITE.
  Once again thank you very much for your interesting writing.
  I came to know about your blog just today.So for next few days i am going to be hooked into your site.

  0
  1. सुहास गोखले

   श्री निनादजी,

   अभिप्रया बदल धन्यवाद आणी माझ्या वेब-साईट वर आपले स्वागत !

   मला लिहायला आवडते , थोडे फार जमते देखिल. लिहण्या सारखे खूप आहे माझ्या कडे पण या सगळ्याला फार वेळ लागतो आणि सध्या माझ्या कडे हा वेळॅच कमी पडत आहे. इतके चांगले लिहून सुद्धा कोणी वाचत नसेल तर असे लिहण्यात वेळ तरी का घालवायचा? त्या पेक्षा हाच वेळ इतर बाबतीत खर्च केला तर मला चांगले लाभ होतील.

   सुहास गोखले

   0
 2. Gorakshnath Kale

  Sir “ummid pe duniya kayam hai” asa karu naka sir aadhich marathit koni lihit nahi ho, tyatahi jyotish shastrabaddal!!
  please blog band karu naka.

  0
 3. Rakesh

  Suhas ji, adhich marathit koni jast lihit nahi ani asa likhan ,,analysis…case studies..koni karat nah…western horaray baddl mala tumchyakadunach kalala….vaidik jyotishi war koni attaparyant analysis kelela athwat nahi…khup jana KP chya case studies taktat..pustak pan ahe…pan tumhi KP ,horary,ani vaidik sagla takta…babajincha anubhav, malawarcha khel sarkhe mast anubhav share karta he khup chhan ahe ani tumchi vinodi lekhan shaili tar far mast ahe….FB war mi swatach jast active nahi mahinyatun 1-2 wela log in karto mhanun tumcha page babtit kahi karu shaklo nahi…pan tumchi blog link mi whatsap group war share karat asto….Keep writing…if possible…
  Thanks…

  0
  1. सुहास गोखले

   श्री. राकेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपले निरिक्षण बरोबर आहे, खरेच आजकाल ‘मराठी’ कोणी वाचत नाही , त्यातच वेबसाईट / ब्लॉग वाचण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. आज फक्त फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्वीटर अशा माध्यमातून केलेले लेखच (पोष्ट / फॉरवर्ड्स) काय ते वाचले जाते त्यातही परत ल्हानशी पोष्ट असेल तरच वाचली जाते मोठी पोष्ट असेल तर तिला न वाचतात डीलीट केले जाते. अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने वेळ खर्च करुन काहीतरी चांगले लिहणे वेडेपणा ठरत चालला आहे. मी एक प्रयत्न करुन बघितला पण इतके चांगले लिहून देखील ते अगदी कमी लोकांनी वाचले त्यामुळे निराश व्हायला होते. मुळात असे लिहणे करण्यात फार वेळ जातो आणि त्यातून कोणतेही आऊटपूट नाही मग हा वेळ कशाला वाया घालवायचा ? कोणा साठी? असा प्रश्न पडतो.

   जर लिहायचेच तर ‘इंग्रजी’ मध्ये लिहले तर किमान एका मोठ्या वाचकवर्गा पर्यंत पोहोचता येईल, महाराष्ट्रा बाहेर , परदेशात बरेच ज्योतिष अभ्यासक / वाचक आहेत त्यांना मराठी येत नाही, इंग्रजीतला लेख अशा सगळ्यांना वाचता येईल. त्यामुळे मी या पुढे बहुतांश लेखन ‘इंग्रजी’ मध्ये करायचा विचार करतोय. माझाही नाईलाज आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.