–  व्हायब्रेशन्स !

या लेख-मालीकेतले सुरवातीचे भाग इथे वाचा:

बाबाजींचा अनुभव : भाग ३ – बाबाजी भेटले !

बाबाजींचा अनुभव : भाग २– मनकवडा !

बाबाजींचा अनुभव : भाग १ – अयोध्या !

“हे ट्रॅपीझॉयडल चार्जिंग असे काम नाही करणार बेटा !”

बाबाजी मलाच उद्देशून बोलत होते…

“बाबाजी,  हे ‘ट्रॅपीझॉयडल चार्जिंग ’ सर्किट आहे हे आपण कसे काय ओळखले? “

“थोडा बहुत हम भी तो जानत है बबुआ..”

“आपला या विषयाचा अभ्यास आहे काय?”

“एम. एस्सी. फिजिक्स, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी.”

मी मनात म्हणालो , बापरे … हा तर एकदम  एज्युकेटेड, हाय- टेक  बाबाजी दिसतोय..

“सर्किट मध्ये डाउनवर्ड रॅंम्प ला समस्या आहेत , तो सी – ३ कपॅसिटर आहे ना तो रॅपीड डीसचार्ज होतोय…त्याच्या डीसचार्ज पाथ मधल्या आर – १७ ची व्हॅल्यू वाढव आणि त्या क्यू – ५ ट्रांसीस्टर च्या बायसिंग मध्ये जो डायोड टाकला आहेस ना तो काढून टाक , बस्स झाले तुझे काम !”

“हे अशक्य आहे !”

‘बेटा, कोणतीही शंका नको घेऊस, मी सांगीतले ते बदल कर , तुझे काम झाले म्हणुन समज..”

“बाबाजी, मी तुमच्या सुचनेला अशक्य म्हणालो नाही… एम. एस्सी. फिजिक्स असो वा एम टेक इलेक्ट्रॉनिक्स , या A3 साईज मधल्या सर्किट मधली समस्या मी न सांगताच आपल्याला कळणे आणि केवळ एका दृष्टीक्षेपात त्याचे उत्तरही देता येणे दोन्ही ही अशक्य आहे असे मला म्हणायचे येते … मला तर हे अन-ह्युमन वाटतेय.”

बाबाजी पुन्हा एकदा हसले…

काय जादू होती त्या हसण्यात कोण जाणे.. आता मात्र मी सरळ जागेवरुन उठलो आणि बाबाजींना वाकून नमस्कार केला. मी आधी लिहले होते तसे , ते हसणे इतके मंत्रमुग्ध करणारे होते की समोरची व्यक्ती नमस्काराला वाकलीच पाहीजे !

“तुझे बरोबर आहे.. मी जे सांगू शकलो ते काहीसे ..तू काय म्हणलास … अन-ह्युमन ..त्यातलेच आहे”

मी हादरलो , ते डोळे , ते हसणे मी समजू शकत होतो.. तसे मी बरेच साधू, बैरागी पाहीले होते .. मी लहान असताना पंढरपूर चे निवृत्तीबुवा नामक सेवेकरी आमच्या घरी दरवर्षी यायचे ते असेच प्रासादीक, सात्विक होते..

चेहरा पाहून भविष्य सांगणार्‍याला ही एकदा भेटलो होतो, पण त्यात भविष्या पेक्षा ज्याला आपण ‘कोल्ड रीडींग’ म्हणतो तोच भाग जास्त होता. पण बाबाजींचा हा अनुभव एकदम वेगळा होता. त्या सर्किटवर मी इतके काम केले होते की बाबाजींनी फॉल्ट सांगताच माझ्या डोक्यातल्या सर्व ट्यूबां लख्खक्कन पेटल्या … हा  फॉल्ट आणि हे त्याचे उत्तर !

म्हणूनच बाबजींच्या बाबतीत’कोल्ड रिडींग’ किंवा ‘शुटींग इन डार्क’ असे म्हणायला काही चान्सच नव्हता … हा सुर्य हा जयद्रथ , इतके ते कनव्हिन्सींग  होते.

“बाबाजी पण हे तुम्ही कसे सांगीतले ?”

“काही अन-ह्युमन टेक्निक्स.. पण ती तुला सांगता येणार नाहीत आणि सांगीतली तरी समजणार नाहीत, त्या साठी तुला माझ्या सारखा ‘बाबाजी’ बनायला पाहीजे ”

यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो. इतका वेळ वरच्या बर्थ वरुन आमचे बोलणे ऐकणारा रमणिकलाल का हरिस भाय (चू.भू. दे.घे.) पण फिस्सकन हसला.

“क्षमा करा बाबाजी, जरा छोटा मुहँ बडी बात लगेगी लेकिन.. एम. एस्सी. फिजिक्स, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ते    ‘बाबाजी’ हा बदल कसा काय झाला?”

बाबाजी मिस्किल पणे हसत म्हणाले ..

“असे काही होईल ते मला सुद्धा माहीती नव्हते … एम. एस्सी. झाल्यानंतर मी काही काळ आय.आय.टी मध्ये शिकवत होतो. तेव्हा अचानक म्हणता येईल अशा काही घटना घडत गेल्या आणि बाबाजी बनलो.. हाय टेक बाबाजी… मघाशी तुझ्या मनात नेमके हेच आले होते ना? ”

“बाबाजी … डेंजरस आहे हे .. मनातले जाणता तुम्ही..”

“इसमे घबराने की क्या बात है ।”

“घाबरु नको तर काय करु.. माझ्या मनात जे येणार ते तुम्हाला कळणार … म्हणजे तुमच्या समोर मी उघडा – नागडा होणार..”

“वैसे तो हम इस फेसीलीटी को  स्वीच ऑफ भी कर सकते है ।”

“तो क्या आप अभी इसे स्वीच ऑफ कर सकते है ? ”

“क्यों नहीं , जैसा तू कहेगा ।”

मी त्या वरच्या बर्थ वरच्या रमणिकलाल का हरिस भाय (चू.भू. दे.घे.) कडे पाहीले … बाबाजी मनातले विचार ओळखतात हे कळताच त्याने दुसरी कडे तोंड फिरवले होते.. पक्की बनेल जमात !”

“बाबाजी … मला खात्रीच पटली  आहे…  ‘अन- ह्युमन ’ मानवी क्षमतेच्या पलीकडले जाऊन काही तरी..  आपल्यात नक्कीच अशी काही  क्षमता  असणार”

“ईश्वर की कृपा से!”

“म्हणजे नेमके काय आहे. एखादी विद्या – साधना का जन्मजात प्राप्त झालेली दैवी देणगी?”

“दोनों ही”

बाबजी पुन्हा हसले !

या बाबाजींना त्यांचे हसणे बंद करायला सांगायला पाहीजे कोणीतरी.. असे काही हसतात की समोरचा माणूस लोळागोळाच होऊन जातो…

“बेटा, जरा अपना हाथ आगे बढा दे..”

मी माझा हात बाबाजींच्या समोर धरला. बाबाजींनी माझा हात त्यांच्या हातात घेतला.. बाबजींनी क्षणभर डोळे मिटले आणि माझा हात सोडून दिला.

मी बाबाजीं कडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले..

“तुझी व्हायब्रेशन्स तपासली ..”

“नाडी परिक्षा?”

“नाही, ती हार्ट बीट्स झाली… ही प्राणिक व्हायब्रेशन्स .. किंवा प्राणिक सिगनेचर म्हणूयात”

“ हे काय असते ?”

“या विश्वातली प्रत्येक वस्तू व्हायब्रेट होत असते .. वेगवेगळ्या फिक्वंसी वर . या सगळ्या विश्वाच्या पसार्‍याचे मुळ ही व्हायब्रेशन्स आहेत.”

“तुमच्याच विज्ञानातल्या एका गुरु ने निकोल टेस्ला ने म्हणलेय – “If you want to find the secrets of the Universe, think in terms of energy, frequency and vibration. “ . हे लक्षात ठेव .. तू ..मी… हे रेल्वे चे बाक.. ती खिडकी.. खिडकीतून दिसणारा निसर्ग … हा केवळ आऊटरफेस आहे .. किंवा अ‍ॅडाप्टेड रिअ‍ॅलिटी आहे .. त्याच्या अंतरंगात किंवा कोअर मध्ये आहेत ती फक्त प्युअर energy vibrations “

“माझ्या डोक्यावरून जातेय हे..”

“तुला ही ते समजेल एके दिवशी .. वो वक्त भी आनेवाला हैं “

“माझा हात हातात घेऊन माझी व्हायब्रेशन्स तपासलीत  इथे पर्यंत लक्षात आले पण त्यातून आपल्याला काय ज्ञात झाले?”

“आपल्या कडे काही हस्ताक्षर तज्ञ असतात, ते एखाद्याच्या हस्ताक्षरावरुन किंवा त्याच्या केवळ ‘सही’ वरुन त्या व्यक्तीचा स्वभाव , गुण – अवगुण सांगू शकतात नाही का?”

“हो. मला माहीती आहे ते , ग्राफोलोजिस्ट म्हणतात त्यांना..”

“तसेच मी  एखाद्याची व्हायब्रेशन्स तपासून त्या व्यक्ती बद्दल बरेच काही  जाणू शकतो..”

“तुझ्या व्हायब्रेशन्सशी माझी व्हायब्रेशन्स अलाईन केली की झाला डेटा ट्रान्स्फर ! कण कण में भगवान म्हणतात ते उगाच नाही , हे सगळे विश्व एकाच एनर्जी सोर्सची होलोग्राफीक रिप्लिका आहेत. सगळे एकच आहे. एकदा हे सभोवतालचे विश्व एनर्जी व्हायब्रेशन्स च्या चष्म्यातून पहावयास लागलास की सगळा खुलासा आपोआपच व्हायला लागेल.. “

“मी ज्योतिषाचा अभ्यास करतोय.. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करुन असे आडाखे कसे बांधयचे हे शिकतोय सध्या…  ही व्हायब्रेशन्स म्हणजे एक प्रकारची कुंडलीच असणार ..”

“सही …. आणि डी.एन.ए. म्हणजे  तरी काय एक प्रकारची कुंडलीच असते की”

“हा निकोल टेस्ला शास्त्रज्ञ मला फार आवडायचा .. त्याचे अजुन एक वाक्य सांगतो –

The day science begins to study non-physical phenomena, it will make more progress in one decade than in all the previous centuries of its existence.”

“बाबजी हे वाक्य मी  पण एकादा ऐकलय .. पण  non-physical phenomena  म्हणजे तरी काय  ?”

“विज्ञानवाला ना तू .. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो,  प्रत्येक  गोष्ट तुमच्या विज्ञानाच्या अत्यंत  मर्यादीत अशा फुटपट्टीने मोजता आल्या पाहीजेत मगच तुम्ही त्या खर्‍या मानणार किंवा त्यांचे आस्तित्व मान्य करणार .. पण अशाही काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या विज्ञानाचे निकष लावून सिद्ध करता येणार नाहीत, त्यांचे आस्तित्व जाणवते , अनुभव येतो पण  ‘आमच्या समोर  ते आणून दाखवा / करुन दाखवा’  असा त्याचा पडताळा देता येत नाही, असे जे काही आहे त्याला  non-physical phenomena   म्हणता येईल

“म्हणजे आम्ही जे अमानवी किस्से ऐकतो जसे भूत – पिशाच्च, यक्ष –गंधर्व योनी.. काही जणांना कर्णपिशाच्च वश झाले होते असे लोक बोलतात.. ह्याला  non-physical phenomena म्हणायचे का?”

“तू भलत्याच  विषयाला हात घातला आहेस बेटा !”

“आमच्या दृष्टीने non-physical phenomena  म्हणजे भूत – पिशाच्च असेच काही किंवा संत-महात्म्यांना चिकटवलेले चमत्कार … ”

“तू म्हणतोस ते दोन्ही प्रकार non-physical phenomena  मध्येच मोडतात् पण ते प्रकार हे  मुळात एनर्जी  – व्हायब्रेशन्स प्रिन्सीपल्स चे  मॅनीफेस्टेशन आहे..  तुझ्या सारख्या विज्ञान वाद्याने ह्या दोन्ही प्रकाराच्या मॅनीफेस्टेशन्स च्या मागे न लागता…  टेस्ला म्हणतो तसे कोअर प्रिंसिपल कडे लक्ष द्यायला पाहीजे ”

“पण त्या आधी ती कोअर प्रिन्सीपल्स नेमकी काय आहेत ती तरी कोणी समजाऊन दिली पाहीजेत ना?”

“बाकी तुझा स्टान्स , बरोबर ना ? स्टान्स च म्हणता ना?  मला आवडला….तुझी जिग्यासा मी समजू शकतो पण या विषयाचा आवाका ही तितकाच मोठा आहे ”

“सगळे सांगू नका ..निदान थोडीफार तरी कल्पना द्या..”.

“हां ,  कुछ चिजें बता सकता हूँ  ..”

“नेकी और पूछ पूछ !”

बाबाजी हसले..

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

20 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anant

  श्री. सुहासजी,

  बाबाजीनी वेड लावले आहे.
  निकोल टेस्ला, एम. एस्सी., आय.आय.टी प्रोफेसर – क्या बात है !

  सेजल आणि प्रियदर्शनी ची कथा पण उत्सुकता वाढवत आहे.

  सद्या – एकदम मस्त !

  तुमच्या ब्लॉगचे व्यसन लागले आहे. सकाळी सकाळी एक – सुहास गोखलेंचा लेख वाचल्या शिवाय दिवस सुरु होत नाही

  धन्यवाद .

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मी जे लिहले आहे अगदी खरे आहे . तुम्हाला कदाचित माहीती असेल ओशो (रजनीश) हे सुद्धा खूप शिकलेले होते आणि काही वर्षे कॉलेजात प्रोफेसर म्हणून काम करत होते. स्वामी सुखबोधानंदजी सुद्धा आय.आय.टी ग्रज्युएट आहेत आणि टाटा इलेक्ट्रीक मध्ये नोकरी करत होते.

   असे विज्ञान / तत्वज्ञानाचा अभ्यास असलेले लोक खरे बाबाजी असतात. बाकी भगवी कफनी घालून स्वामी बनणे काही अवघड नाही , मी सुद्धा त्याचा विचार करतोय… तसे माझ्या कडे भरपूर स्वामी / बाबाब/ बापू / बुवा / महाराज मटेरियल आहेच!

   सेजल ची स्टोरी खूप चांगली आहे ती ही एका सत्य घटने वर आधारीत आहे ..

   सुहास गोखले

   0
 2. Himanshu

  एनर्जी व्हायब्रेशन्स! छान. मला हे ज्ञान तुमच्याकडुन मिळतंय…माझ्यासाठी तुम्हीच बाबाजी.

  0
  1. सुहास गोखले

   श्री.हिमांशुजी,

   अहो मी कसला बाबाजी ! पण व्हायब्रेशन्स वर लक्षा ठेवा … तीच पाचवी मिति आहे ! जसे जसे आपण 5 वा त्याहून ही वरच्या मितित जातो तसे तसे ही थॉट्स व्हायब्रेशन्स च आपले प्राइम मुव्हर बनतात .

   आणखी एक सांगतो… आपल्या भावना (ज्याला इंग्रजीत ईमोशन्स म्हणतात) आणि आपले विचार (ज्याला इंग्रजीत थॉट्स म्हणतात) ह्या दोन फॅकल्टीज आपल्या कडे आहेत , त्याचा खास अभ्यास करा … विचार ही एक मोठी एनर्जी आहे, त्याचा आपल्याला अतिशय छान उपयोग करुन घेता येतो. त्याबद्दल कधीतरी (मूड लागेल तेव्हा !) लिहायचे मनात आहे.

   सुहास गोखले

   0
 3. स्वप्नील

  मस्त सुहासजी . मी अनंतजी शी सहमत आहे . खरोखर तुमचे लिखाण वाचल्याशिवाय दिवस सुरु होत नाही . व्यसन लागलेलेच आहे आम्हाला . आता पुढचा भाग वाचण्यास आणखीनच उत्सुक आहे . तुम्ही म्हणता तसे पुण्याचे डॉ.वर्तक यांचे लिखाण खूपच सायंटिफिक असते .अध्यात्म अगदी शुद्ध सायंटिफिक भाषेत पटवून देतात ते . असो . मी खूप लोकांचे या प्रकारचे अतर्क्य अनुभव वाचले आहेत , पण तुमचा हा अनुभव वाचताना का कोणास ठाऊक खूप वेगळे वाटले . अंतर्मुख व्हायला झाले . मस्त . पुढचा भाग लवकरच लिहा हि विनंती .

  0
 4. स्वप्नील

  …. आणि सुहास जी एक Thought Share करतो काही जण असे म्हणतात कि या विश्वात एनर्जी आहे… असे म्हणण्या पेक्षा सगळीकडे एनर्जीच आहे आणि त्यात विश्व आहे असे म्हणणे जास्त योग्य . असो दोघांचे म्हणे एकच पण थोडा बदल केला कि दुसरे वाक्य जास्त मनाला किवा बुद्धीला भावते / पटते .सहज आठवला विचार म्हणून Share केला . धन्यवाद !!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   आपले म्हणणे बरोबर आहे. आपल्या कडे म्हणले जाते की परमेश्वर हा या चराचरात भरलेला आहे आपण सारे ह्या परमेश्वारची अनेक रुपें आहोत तेव्हा इनडारेक्ट ली आपण एनर्जी बाबतच बोलत असतो. हे विश्व जसे आपण आपल्या पाहतो , अनुभवतो हे एक एका खास हेतुने केलेले मॅनीफेस्टेशन आहे किंवा प्रोजेक्शन आहे… आपण ज्याला खरे समजतो तो एक निव्वळ आभास आहे आपण स्वत:च निर्माण केलेला. परमेश्वर ही कल्पना एक अल्टीमेट एनर्जी सोर्स अशा तर्हेनेच घेतली पाहीजे.

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    बरोबर सुहास जी त्यालाच त्या एनर्जिलच आपल्या ऋषीमुनींनी परब्रह्म म्हंटले आहे पण पुढे जसे जसे खोलात जाऊ तसे अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर अवतार घेतो का ? अवतार घेतला तर मग त्याला मर्यादा पडतात का ? मग असा परमेश्वर आहे तर आता जी जगात बोम्बामोंब चालली आहे त्यात तो ढवळाढवळ का करत नाही ? या प्रश्नाची यादी आणि लांबवता येईल . याबाबतही पुढे काही लिहिता आले तर जरूर लिहा .

    0
    1. सुहास गोखले

     श्री स्वप्नीलजी,

     परब्रम्ह किंवा ईश्वर काहीही असो ते त्या एनर्जीला दिलेले नाव आहे. आपण सर्वच जण सजीव , निर्जीव सगळेच त्या शक्तीचा एक अंश आहोत फरक आहे तो व्हायब्रेशनल फ्रिक्वंसीचा ! त्यामुळे देवाचा अवतार असे काही नाही, आपल्या सारख्याच हाडमांसाच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या काही लोकोत्तर कामां मुळे जरा व्हि.आय.पी. ट्रीटमेंट दिली गेली इतकेच ! म्हणूनच एनर्जी बॅलंस , एनर्जी डिस्ट्रीब्युशन आणि एनर्जी मॅनीफेस्टेशन मध्ये ते तथाकथित अवतार काहीही करु शकले नाहीत. अन्यथा शिशुपाला ला मारण्या पेक्षा त्याचे ब्रेन मॅपींग बदलून / डी.एन.ए आल्टर करुन त्याचे चांगल्या माणसात रुपांतर करता आले नसते का?

     हे झाले राम कृष्ण इ. अवतारां बद्दल … बाकी नंतरच्या काळातले ज्यांनाही अवतार मानले गेले अशा अनेक बुवा / महाराज / स्वामीं बद्दल काही बोलायलाच नको इतका आनंदीआनंद आहे ! सगळे इथे लिहता येत नाही, ही पब्लीक प्लेस आहे याचे भान ठेवावे लागते .. कोणाच्या भावना कशा, केव्हा आणि किती दुखावल्या जातील याचा नेम नाही.

     सुहास गोखले

     0
 5. माधुरी लेले

  बाबाजी उत्सुकता वाढवताहेत..किती विलक्शण जग आहे हे.. अनेक संत चरित्रात अशा प्रकारचे अनुभव वाचले आहेत.. अलिकडेच M यांचे “हिमालयातील गुरुंच्या शिष्यांच्या आठवणी” या पुस्तकात त्यांनी त्यांच्या गुरुंबद्दल अशा काही आठवणी लिहील्या आहेत… माझ्या सारख्या सामान्य स्त्रीला हे म्हणजे चमत्कारच वाटतात.. अशा सत्पुरुषाची भेट होणे हीच किती मोठी भाग्याची गोष्ट आहे़.
  वर लिहिलेल्या प्रत्युत्तरात म्हटल्या प्रमाणे विचार, भावनांवर कधी लिहीता याची वाट पहातेय.

  0
  1. सुहास गोखले

   माधुरी ताई,

   चमत्काराला लाभलेले अनावश्यक दैवी वलय बाजूला करुन त्यामागचे प्रिन्सीपल तपासायला हवे. विचार व इमोशन्स या दोन महत्वाच्या फॅकल्टीज आपल्याला मिळाल्या आहेत त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येऊ शकतो याबद्दल मी बरेच वाचले आणि अनुभवले आहे , त्यातले काहीतरी लिहावयाचा प्रयत्न जरुर करेन.

   सुहास गोखले

   0
 6. स्वप्नील

  बरोबर सुहास जी कृष्णाला पण युद्ध रोखता आले नाही . आणि तुम्ही तुमच्या लेखात कृष्णाच्या आयुष्यातील घटनांचा थोडक्यात आढावा घेतला आहेच . पण मग गीतेमध्ये असे कसे म्हंटले आहे कि मी अधर्माच्या नाश करिता प्रत्येक युगात अवतार घेतो वगरे किवा गुरुचरित्रात आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात दत्तप्रभूंच्या अवतारांची कहाणी आहे , यामागे नक्की काय Logic / Principle असेल ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   अवतार घेतो याचा शब्दश: अर्थ घेऊ नका. अवतार म्हणजे नवा विचार, नवे तत्वज्ञान, नवी संस्कृती, नवी जिवन शैली असे ही असू शकते. संगणक , देवीची लस, प्लॅस्टीक हे अवतारच आहेत ! गुरुचरित्र आणि त्यातल्या गोष्टी !!!! नको यावर नको चर्चा करायला … ते भावना का काय त्या दुखावतात म्हणे !
   सुहास गोखले

   0
 7. प्राणेश

  सुहासजी,

  बाबांजींचा पाचवा भाग कृपया लवकर लिहा! अनेक चातक (माझ्यासारखे) प्रतीक्षेत आहेत!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   मी समजू शकतो, काही तांत्रिक अडचणीं मूळे पुढचे भाग प्रकाशीत करायला विलंब होत आहे.

   सुहास गोखले

   0
 8. अमित

  या लेखमालेचा पाचवा भाग आला आहे का ?
  संपूर्ण अनुक्रमणिका शोधूनही नाही सापडला अजून…..

  (शुद्धलेखनाच्या चुका कृपया डोळ्याआड कराव्यात)

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अमितजी
   अभिप्राया बद्दल धन्यवाद
   बाबाजींच्या लेखमालेतले उर्वरीत भाग या जुलै मध्ये प्रकाशीत करेन.

   धन्यवाद
   सुहास गोखले

   0
 9. Suresh

  सुहासजी, बाबाजींचा अनुभव ही मालिका पुन्हा केंव्हा सुरु करताय? कृपया जमल्यास लवकर करा…असे अनुभव फार कमी मिळतात वाचायला..त्यातही १००% सत्य असेल याची खात्री देता येत नाही…परंतु तुम्ही लिहिलेले अनुभव १००% सत्य आहेत आणि असणार याची खात्री आहे म्हणून ही विनंती

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री सुरेशजी

   त्या लेखमालेतले पुढचे भाग म्हणले तर लिहून तयार आहेत पण मला ते प्रकशीत करावे असे वाटत नाही, योग्य ते संकेत मिळण्यासाठी थांबलो आहे

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.