– मनकवडा

ही पूर्ण पणे सत्य घटना आहे… जसे घडले , जसे अनुभवले तसे उतरवून काढले आहे..

“बिलकुल त्या ‘रामायण’ मालिकेतल्या वशिष्ठ मुनीं सारखे दिसताय”

“तसा मी मुनीच आहे … फक्त दाढी अजून मोठी पाहीजे होती..”

बाबाजी मिस्किलपणे हसत म्हणाले..

“कोठे चालला आहेस?”

“दिल्लीला, कंपनीचे काम आहे .. “

“अच्छा, मग वापस केव्हा ?”

“तीन दिवसां नंतर. रिटर्न रिझर्वेशन आहे..२२ तारखेचे”

“दिल्लीत पोचल्या बरोबर दुसरे दिवशी जाऊन ते रिझर्वेशन रद्द करुन २६ तारखेचे मिळते का ते पहा…”

“मला समजले नाही..”

“बेटा दिल्लीत तू जास्त काळ राहणार आहेस..”

“तुम्ही काय ज्योतिष वगैरे पाहता का ?”

”हां , तसेच समज..”

“मी पण ज्योतिषाचा थोडाफार अभ्यास केला आहे. पण मी जन्मपत्रिकेवरुन पाहतो.. आपण चेहेर्‍या वरुन भविष्य सांगता का?”

“चेहेराच समोर पाहीजे असे नाही… व्यक्तीचे नाव पुरेसे असते..”

“एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात !”

“हो ते शक्य आहे पण प्रश्न विचारताना तुझ्या मनात कोणती व्यक्ती आहे , हे मला कळतच असते ना?”

“मनकवडा……दुसर्‍याच्या मनातले ओळखणार्‍याला मनकवडा म्हणतात , हे असेच काही असते का?”

“हो , तसेच … काही लोकांना तसे जमते… काहींना जन्मजात दैवी देणगी असते, काहींना साधना करुन ही सिद्धी प्राप्त होते .”

“माझ्या कडे नाही”

“तुला जमेल… साधना केलीस तर… “

“बाबाजी मला नको असली विद्या … असे दुसर्‍याच्या मनातले वाचता आले तर आपल्याला जगणे अशक्य होईल नाही का!”

“अगदी बरोबर , ते अज्ञानात सुख म्हणतात ना तसेच असावे… “

“तुम्ही मघाशी म्हणालात माझा दिल्लीतला मुकाम ४ दिवस वाढणार आहे , म्हणजे नेमके काय होणार आहे..काही काळजीचे कारण आहे का ?”

“बेटा , असे काही नाही, तू काळजी करु नको पण जास्त खोलात जाऊ नको.. मघाशी मी काय म्हणालो होतो… अज्ञानात सुख.. बस्स तेच लक्षात ठेव..”

“ठीक आहे , नाही करत मी काळजी , जे व्हायचे ते होऊ दे, पण बाबाजी एक विचारु ?”

“बोल बेटा..”

“चेहेरा पाहून एखाद्याचा स्वभाव जाणता येईल. जन्मराशी किंवा जन्मलग्नाचा अंदाज बांधता येईल. पण पुढच्या घटना एव्हढ्या माहीतीवर सांगता येतील?”

“नाही सांगता येणार , तू म्हणतो आहे ते बरोबरच आहे .”

“पण मग तुम्ही कसे काय सांगीतले ? तुमच्या कडे दुसरी कोणती तरी विद्या असणार ..”
“आहेच..”
“कोणती..”
“कर्णपिशाच्च !”

मी क्षणभर हादरलोच, पाठीच्या मणक्यातून बर्फ़ सरकत गेल्यासारखे वाटले.. अगदी उत्स्फुर्तपणे मी जवळ जवळ किंचाळलोच…

“काय ?”
“हो बेटा कर्ण पिशाच्च”
“असे काही असते ? मला खरे वाटत नाही..”
“हे तुझे अज्ञान आहे..”
“दिल्लीत माझा मुक्काम वाढणार आहे , हे तुम्हाला काय त्या कर्णपिशाच्चाने सांगीतले..”
“हो…”
“बापरे… पण बाबाजी दिल्लीत काय घडणार आहे ते अजून घडायचे आहे , त्यानंतरच खरे खोटे ठरणार नाही का..”
“अलबत.. बेटा तू   इंजिनियर आहेस , विज्ञान तंत्रज्ञान शिकलेला तेव्हा अशा शंका येणारच ! पण लक्षात ठेव जे मी सांगीतले तसेच घडणार…”

मी इंजिनियर आहे हे बाबाजींना कसे कळले… कदाचित तो त्यांचा अंदाज असावा.. माझे कपडे , बोलण्यात येत असलेले इंग्रजी शब्द आणि एकंदरच चौकस अविर्भाव पाहता असा तर्क करणे शक्य असेल..

“माझा विश्वास बसत नाही..”

बाबाजींनी माझ्या कडे रोखून बघितले… मला वाटले बाबाजी चिडले… पण दुसर्‍याच क्षणाला बाबाजी म्हणाले..

“तुमच्या घरी पाळलेले पांढरा शुभ्र मांजर..छान होते नाही..आणि तुम्ही त्याचे नाव ही मजेदार ठेवले होते… ‘मट्टू” पण तुझी आई त्याला ‘मेटम’ म्हणून हाक मारायची…”

मी सर्द झालो… खरेच १९७१ साली (मी तेव्हा चौथीत होतो) , आमच्या घरी पूर्ण शुभ्र रंगाचे मांजर होते , अगदी एक इंचभर सुद्धा काळा डाग नसलेले … आम्ही त्याला ‘मट्टू’ म्हणत होतो आणि माझी आई त्याला ‘मेटम’ म्हणत होती.. मजेदार नाव होते खरे.. पण ही गोष्ट बाबाजींना कशी कळली?

“बेटा ,  अजून एक खूण सांगतो… डॉ. व्ही.व्ही. दातार … सत्तीकर बोळाच्या तोंडावर दवाखाना आहे त्यांचा .. आणि तुम्ही ‘गोखले’ कुटुंबिय त्यांचे अगदी पहीले पेशंट आहता… केस पेपर क्रमांक ३ !”

हे बाबजींना कसे कळले ….  आता त्यानी माझे आडनाव सांगीतले… डॉ. दातारांचा संदर्भ ही अगदी अचूक !!  सांगलीचा आहे का बाबाजी ?

“नाही मी सांगलीचा नाही…”
बाबाजींनी माझ्यावर बॉम्बच टाकला.. ‘हा बाबाजी सांगलीचा तर नाही..’ हा माझ्या मनात आलेला विचार ह्यांना कळला ? कसा काय ?
बाबाजी मोठ्यांनी हसले..

“मनकवडा  …. तूच  मगाशी म्हणाला होतास ना ? आणखी काय सांगू म्हणजे तुझी खात्री पटेल ?”

मला काय बोलायचे तेच सुचले नाही….

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

18 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  मस्त सुहास जी . तीन मितीच्या पलीकडे अनेक मिती असतात . श्री अ.ल. भागवत , मुंबई चे परामानस शास्त्रज्ञ मधुकर दिघे . स्वामी दत्तावधूत यांनी सुधा त्यांच्या पुस्तकातून यावर काही माहिती दिली आहे . असो . तुमचे अनुभव वाचताना या सर्वांची परत आठवण झाली . पण एक शंका काही तांत्रिकांच्या मते काही कर्णपिशाच्च फक्त भूतकाळाच नाही काही प्रमाणात भविष्यकाळ सुधा सांगू शकतात हे खरे आहे काय .पण उत्सुकता खूप वाढतीये पुढे काय घडले असेल असे वाटून …

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नील जी,

   कर्णपिशाच्च हे एक कॉमन नाव आहे असे समजा … जसे सगळ्या नूडल्स ला आपण मॅगी म्हणतो, सगळ्या बाटलीबंद पाण्याला बिसलेरी म्हणतो सगळ्या वनस्पती तूपाला डालडा म्हणतो तसे. प्रत्यक्षात पुढच्या (5/6/7/..) मितिं मध्ये प्रवेश करणे अनेक मार्गाने शक्य असते … लोक या सगळ्या मार्गांना एकच एक ‘कर्ण पिशाच्च’ असे संबोधतात, ते अर्थातच चूक आहे.

   मिती प्रवेश करण्या साठी कोणता मार्ग अवलंबला त्यावरुन रिझल्ट्स कसे मिळतात ते ठरेल. ज्यांना ‘आकाशीक रेकॉर्ड’ पाहता येतात त्यांना सगळेच कळते ..

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  सुहास जी याबद्दल म्हणजे या मितीबद्दल अ. ल.भागवत , मुंबईचे परामानस शास्त्रज्ञ मधुकर दिघे, स्वामी दत्तावधूत यांनी त्यांचे पुस्तकातून लिखाण केले आहे . आपला अनुभव वाचून परत त्यांची आठवण झाली . पण काही तांत्रीकांचे म्हणणे आहे कि काही कर्णपिशाच्च हि फक्त भूतकाळाच नव्हे तर भविष्यकाळ सुधा सांगतात . हे खरे आहे काय ? कारण आपल्या बाबतीत तेच झाले . पिशाच्च हि चतुर्थ मितीत असतात असे म्हणतात . असो .पुढील भागाविषयी अर्थातच उत्सुकता आहेच .

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नील जी ,

   एक सुधारणा सुचवतो.. क्यतुर्थ मिती ही ‘काळ – Time’ आहे (बाकीच्या तीन मितीं लांबी-रुंदी – खोली अशा आहेत) , पिशाच्च इ योनी पाचव्य मिती च्याही पलीकडे असतात. ज्याला आपण देव / परमात्वा / परमतत्व असे मानतो ते सातव्या मिती नंतर चालू होते..

   सुहास गोखले

   0
 3. Himanshu

  Interesting. So if he told you about your stay in Delhi, was it possible for you to get off the train on next station and come back? I mean could you alter the future knowingly? I’m guessing no, because in that case a lot of good/bad events can be averted.

  0
  1. सुहास गोखले

   हिमांशुजी,

   मी तसे केले असते तर नक्की काय झाले असते हा तर्कच असेल. आपल्या आयुष्यातल्या सगळयाच घटना ‘टु द टी’ म्हणतात तशा प्लॅन्ड असतीलच असे नाही, काही घटनां बाबतीत आपल्याला खरेच थोडा फार चॉईस / leeway असतो. तशा घटनांच्या बाबातीत आपण म्हणता तसा परिणाम मिळू शकेल ही. पण जर काही घट्ना अटळ असतात त्या टाळणे अशक्य आहे … विनाशकाले विपरित बुद्धी असे म्हणले जाते ते अशाच अनुभवातून. या बाबतीत भास्कराचार्य आणि त्यांची कन्या लिलावती यांच्या बाबतीतला किस्सा प्रसिद्धच आहे.

   सुहास गोखले

   0
   1. Himanshu

    Yes!…stupid me…I was only thinking about free will….forgot that destiny and free will go hand in hand.

    0
 4. माधुरी लेले

  सगळं सुरस आणि चमत्कारीक वाटतय..पण जाम उत्सुक आहे पुढील भाग वाचायला.. डॉ. दातारांची आठवण जागवलीत..ते आमचेपण डॉक्टर होते.

  0
  1. सुहास गोखले

   माधुरीताई,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद ! आपण सांगलीच्या आहता असे दिसते ! बाकी डॉ.दातारां बद्दल मी काय लिहू… सांगली सोडल्या नंतर मी ड्जनापेक्षा जास्त गावात वास्तव्य केले आहे पण डॉ.दातारांच्या तोडीचा फिजिशियन बघितला नाहि !

   ही मालीका लोकांना इतकी आवडेल याची मला कल्पना नव्हती, अन्यथा मी या आधीच असले काही लिहले आहे … बरेच अनुभव आहेत माझ्याकडे … बाबाजी… गोविंदाचार्य… तम्मण्णा शास्त्री… बशीर खाँ …

   सुहास गोखले

   0
 5. माधुरी लेले

  हो, काही वर्षं सांगलीत होते.. आपले अनुभव वाचण्याची खूप उत्सुकता आहे कारण तुमच्यासारख्या व्यक्ती कडून कळलेले असे अनुभव अधिक विश्वसनीय वाटतात.

  0
  1. सुहास गोखले

   माधुरीताई ,
   धन्यवाद , मी मुळचा सांगलीचा त्यामुळे कोणी सांगलीचे भेटले की मला माहेरचे माणुस भेटल्याचा आनंद होतो!
   बाकी लेखमाला उत्सुकतेने वाचताय हे पाहून समाधान वाटले… कोणीतरी वाचावे या हेतूनेच तर लिहले जातेय !

   बाबाजींचे अनुभ्व जे लिहले आहेत ते 100% खरे आहे , बाबरी मशीद पाडण्याचा प्रसंग मी एक वर्ष आधी माझ्या डोळ्यांनी बघितला होता हे निखळ सत्य आहे.

   माझ्या कडे असे बरेच अनुभव आहेत , बर्‍याच लोकांना मी भेटलो आहे… माझ्यात असे काय आहे कोणास ठाऊक पण असे अनुभव मला खूप आले आहेत. त्यातले जेव्हढे जमतील तेव्हढे सांगायचा प्रयत्न करेन.

   सुहास गोखले

   0
   1. माधुरी लेले

    आपण माझ्या माहेरचेच आहात वाचून फार बरे वाटले..शेवटी माहेर ते माहेर. आपली लिहीण्याची शैली पण फार रसाळ आहे..उत्सुकता जाम ताणली जातेय..रोचक.. अशा प्रकारचे अनुभव अथवा सत्पुरुषांच्या भेटीसाठी पत्रिकेतील ग्रहयोग पण तेवढेच बलवत्तर हवेत ना? आपणच त्या विषयी अधिकाराने सांगू शकाल..लिहीत रहा..छान लिहीता आपण.

    0
    1. सुहास गोखले

     धन्यवाद माधुरी ताई. माहेरच्या माणसां कडून असे कौतुकाचे चार शव्द आले की फार बरे वाटते … मूठभर मांस चढले असे म्हणणार होतो पण जिभ चावली याला कारण माझे डॉकटर ! गेल्या महिन्यातल्या चेकअप मध्ये माझे वजन वाढलेले दिसल्या मुळे त्यांनी मला बरेच झापले आहे ! ते असेच झापतात मला , मी नाठाळ आणि ते कडक्क गुर्जी मग काय होणार ? बाकी कडू कडू औषधे देतात, जिलबी खायची नै म्हणतात (दुष्ट !) , अधून मधून टुच्च करतात, आणि पैसे मागतात, तेव्हढे एक सोडले बाकी देवमाणूस हो तो देवमाणूस !

     असो.

     सत्पुरुषाची भेट होणे हा चांगला योग असला तरी ते ग्रह तार्‍यांच्या माध्यमातून कळणे जरा अवघड आहे , गुरु कृपा होणार असेल तर किंवा आध्यात्मिक प्रगती होणार असेल तर ते कळू शकते.

     सुहास गोखले

     0
 6. Mandar joshi

  ऊत्सुकता वाढत चालली आहे लवकर लवकर टाका चातक वाट बघत आहे

  0
 7. Suresh

  मस्तच.
  पुढे काय झाले reservation चे? तुम्ही cancel केले का? कि करावे लागले? आणि ज्या दिवशी आधी केले होते त्या दिवशी काही अघटीत घटना घडली का? थोडा खुलासा वाचायला आवडेल.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.