– अयोध्या

वाचकांना कबूल केल्या प्रमाणे मला आलेल्या कर्णपिशाच्च किंवा तत्सम अतिंद्रिय शक्तींच्या अनुभवां बद्दल लिहीत आहे…

मला पुणे- दिल्ली प्रवासात भेटलेल्या बाबाजींच्या अनुभवा पासुन सुरवात करतो..

ही पूर्ण पणे सत्य घटना आहे… जसे घडले , जसे अनुभवले तसे उतरवून काढले आहे..

माझ्या लिखाणाच्या शैलीनुसार ‘कोलाज’पद्धतीने हा अनुभव लिहीत आहे, म्हणजे नेहमी सारखे सुरवात- मध्य – शेवट असा क्रम नाही… मधूनच सुरवात आहे … मागे –पुढे करत लिहिले आहे …

बाबाजींशी माझे सगळे बोलणे हिंदीत झाले होते , बाबाजीं आपल्या संस्कृतप्रचुर, शुद्ध , हरिद्वार स्टाइल हिंदीत बोलत होते तर मी आपला ‘मिरज’ स्टाईल हिंदीत ( मै  कर्‍या,, मै बैठ्या, वो आयाच नै.. मै उपरसे गिर्‍या और निचे जमीनपर हापट्या…) सुरवातीला बाबजींचे मला आणि माझे बाबाजींना समजत नव्हते पण ह्ळूहळू , सरावाने जमायला लागले.

सगळे संभाषण हिंदीत झालेले असले तरी लिखाणाच्या (आणि आपल्याही ) सोयी साठी माय मराठीत देतो आहे , गोड मानून घ्या!

तर हा आहे बाबाजींचा अनुभव…

“जरा तो पेपर दे ..”
मी पेपर बाबाजींच्या कडे दिला.
“पेन ..”
बाबाजींनी माझ्या खिशाला लावलेले बॉलपेन मागून घेतले.
बॉलपेनच्या टोकाने बाबजींनी त्या पेपरला मधोमध असे लहानसे छिद्र पाडले.. आणि पेपर माझ्या कडे देत बाबाजी म्हणाले..
“ आता ह्या छिद्रातून बघ काय दिसते ते…”
मी तो पेपर माझ्या डोळ्यासमोर धरला… आणि त्या छिद्रातून आरपार बघितले..
“बाबाजी मला ट्रेनची खिडकी… त्या खिडकीतून बाहेरचे दृष्य म्हणजे शेते, झाडे असे नेहमीचेच दिसते आहे..”
“बेटा एकाग्र होऊन बघ … कॉन्संट्रेशन कर …”
मी तसे केले आणि काय आश्चर्य … आत्ता पर्यंत जे दिसत होते ते घूसर व्हायला लागले… मी तसाच बघत राहीलो.. पण फक्त काही सेकंदच !
त्याच वेळी माझ्या डोक्यात नव्हे मेंदूत हलके स्फोट होत आहेत असे वाटायला लागले… सगळे अंग थरथरायला लागले… हातपाय गळल्या सारखे झाले .. माझ्या हातातून पेपर गळून पडला …

क्षणभर मला काहीच कळत नव्हेत नेमके काय झाले आहे किंवा काय होते आहे ? एका पाठोपाठ विचित्र अनुभव यायला सुरवात झाली… रस्त्यावरुन चालताना आपल्या शेजारुन भरधाव वेगाने एखादा मोठा ट्रक गेल्यावर अगदी क्षणभर आपल्याला वाटते तसे काहीसे पण खूपच तीव्र इंटेन्स असे काहीतरी..

मी काहीच बोलू शकलो नाही..

“घाबरु नकोस, तुला काहीही होणार नाही…”
असे बोलून बाबाजींनी माझ्या डोक्यावर एक हलकी टप्पल मारली..
त्या क्षणी आधीची सर्व लक्षणे निघून गेली वेदना थांबल्या … मी पृर्ववत झालो..

माझ्याकडे बघून बाबाजी मंद हसले आणि म्हणाले …
“आता पुन्हा एकदा प्रयत्न कर … बघ काय दिसते ते..”

मी पुन्हा पेपर हातात घेतला… पूर्ण क्षमतेने एकाग्र होऊन , त्या छिद्रातून आरपार पाहू लागलो…

प्रथम मला तेच दृष्य दिसले… रेल्वेच्या डब्ब्याची खिडकी, खिडकीतून दिसणारी शेतें , झाडें, घरें, झोपड्या इ. पण क्षणार्धात ते सर्व धुसरे झाले आणि काहीतरी वेगळेच दिसायला लागले … धुसर पणा कमी झाला आणि आता स्पष्ट दिसायला लागले..माझ्या चेहेर्‍यावरचे पालटलेले भाव बाबाजींच्या लक्षात आले असावेत बहुदा कारण तेच म्हणाले…

“काय दिसते आहे बेटा ?”
“नुसती माणसेच माणसे दिसताहेत , प्रचंड मोठा जमाव आहे …हजारोंचा..”
“आणखी काय दिसतेय..”
“काही स्पष्ट दिसत नाही,  खूप उंचावरुन एखाद्या सभेचा शॉट घेतल्या सारखी माणसांची गर्दी..”
“आता बघ ….. ते तुम्ही म्हणतात ना ते ‘झूम’  का काय ते करतो.  पण हे होलोग्राफिक झूम आहे .. आता बघ आता काही वेगळे दिसते का ..”

“ हो … मघाशी दिसत नव्हते ते आता दिसायला लागले आहे ..बरेच नवे काहीतरी  दिसत आहे..”
“काय?”
“ त्या लोकांच्या हातात भगवे झेंडे आहेत , पताका , त्रिशुळ सदृश हत्यारे आहेत.. , हे सगळे मोठ्या आवाजात ओरडत आहेत, जोरदार घोषणा देत आहेत असा त्यांच्या अविर्भाव आहे“
“हो घोषणाच आहेत त्या,  मला त्या ऐकायला येत आहेत पण तुला ऐकायला येणार नाहीत… .. सध्या तू काय दिसते ते बघ .. असेच पाहात राहा … आणखी काय दिसतेय..”

“आता काही चेहेरे स्पष्ट दिसायला लागलेत.. खूप त्वेषाने … आरडाओरडा करत पळत आहेत , कशा वर तरी हल्लाबोल केल्याचा आवेश आहे.. बापरे काही जणांच्या हातात पहार ,लोखंडी कांबी, कुदळी सारख्या वस्तू आहेत ”
“हो ते तसेच आहे… ते हल्लाच करत आहेत… आणखी लक्ष केंद्रित कर , बघ काय दिसते ते…”
“खूप धुरळा …. हो… आता स्पष्ट दिसतेय… एक जुनी ईमारत आहे .. मोठी , दगडाच्या भिंती… वरती कळस आहेत …नाही नाही ते कळस नाहीत , घुमट आहेत ते … हो घुमटच … तीन आहेत .. मशिदी सारखे …”

बाबाजींनी खस्सकन पेपर माझ्या समोरुन दुर केला …

“बस्स्स… आता जे पाहीलेस त्यावर कसलाही विचार करु नकोस , कोणाला सांगू नकोस… पुढच्या वर्षी या असल्याच पेपर मध्ये तू जे पाहीलेस त्याचे फोटो झळकतील .. मोठी घटना असेल ती…तुला ती बरीच आधी समोर घडताना पहावयास मिळाली..”

मला एकद गरगरल्या सारखे झाले , शरीरातली सगळी शक्ती पायातून वेगाने जमीनीत खेचली जात आहे असे वाटायला लागले, मी बाबाजींना काही सांगणार इतक्यात बाबाजीच म्हणाले..

“घाबरु नकोस..तुला काहीही होणार नाही… डोळे मिटून शांत बसा थोडा वेळ आणि मी सांगतो ती दोन अक्षरे डोळ्या समोर आण, जसे काही ती अक्षरें तू एखादा फळा /वार्ताफलका वर लिहलेली  वाचतोय तसे “ ..
“आणि हे बघ … आत्ता पाच मिनिटात एक स्टेशन येणार आहे…ही गाडी या स्टेशन वर कधीच थांबत नाही,  पण आज थांबणार आहे .. वरकरणी ते एक तांत्रिक कारण असेल..पण गाडी माझ्या साठी थांबवली जाईल कारण मला इथेच उतर असा आदेश मिळाला आहे .. “

“तेव्हा आता डोळे बंद कर आणि गाडी येणार्‍या स्टेशनला थांबून परत चालु होई पर्यंत डोळे उघडू नकोस  , माझ्यावर विश्वास ठेव, मी सांगतो ते कर त्यात तुझे हित आहे

बाबाजींनी ती दोन अक्षरे सांगीतली…(कोणती ते इथे सांगता येणार नाही…)

मी तसे सुरु केले केले , गाडी अगदी एखादा मिनीट  थांबल्याचे आणि गाडीने परत पुर्ववत गती घेतल्याचे मला जाणवले होते… तरीही मी डोळे बंदच ठेवून ती दोन अक्षरें सतत डोळ्यासमोर आणत राहीलो, साधारण दहा मिनिटांत माझे डोळे आपोआपच उघडले , अगदी कोणीतरी माझ्या डोळ्याच्या पापण्या जबरदस्तीने उघडल्या सारखे वाटले.. पण आता मघाची सर्व लक्षणे दूर झाली , मला एकदम फ्रेश वाटायला लागले …..

मी आजूबाजूला बघितले तेव्हा बाबाजी शेजारी नव्हते…

क्रमश:
ही पोष्ट प्रसिद्ध झाल्यावर काहि वाचकांनी कॉमेंट्स लिहल्या आहेत , त्यांना मी उत्तरें दिली आहेत , पोष्ट वाचणारे सर्वच कॉमेंट वाचतात असे नाही म्हणून त्यांना दिलेली उत्तरें इथे पॅच करत आहे …

1>ते संमोहन नव्हते हे मी खात्रीने सांगू शकतो कारण त्याआधीच १९८९ मध्ये मी स्वसंमोहना चा लहानसा कोर्स केला होता आणि नंतर ही त्या विषयावर बरेच वाचले होते आणि प्रयोग केले होते. माझ्यावर असा प्रयोग कोणी करत असता तर मला ते लगेच कळले असते आणि त्याच्या बचाव माझ्या कडे होता.

आणि ते संमोहन होते हे क्षणभर वादा साठी मान्य केले तरी एखादी भावी घटना प्रत्यक्ष घडताना दाखवणे हे संमोहना द्वारे कदापीही शक्य होणार नाही…संमोहना द्वारे गत आयुष्यातल्या घटनांचा मनावर खोल उमटलेले वाईट परिणाम दूर करायला काही प्रमाणात उपयोग होतो..भविष्यातल्या घटनां बाबत संमोहन काहीच करु शकत नाही.

पण बाबाजींनी जे केले ते ‘पाचव्या / सहाव्या / सातव्या डायमेन्शन मधले होते हे नक्कीच …पुढच्या भागात मी यावर काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन..

2> मुळात हे सर्व ‘पॅरलल युनिव्हर्स ‘ या संकल्पनेचाच एक भाग आहे. जी घटना आपल्याला आत्ता आपल्या समोर घडत आहे असे वाटत आहे ती प्रत्यक्षात पुर्वीच (दुसर्‍या विश्वात ?) होऊन गेलेली असते आणि तशीच ती पुढे केव्हातरी तिसर्‍या विश्वात घडणार आहे. आपल्यावर असलेल्या काही विषीष्ठ बंधनां मुळे आपण सर्व एकाच विश्वात ज्याला आपण अज्ञानाने ‘रिअ‍ॅलीटी’ मानत आहोत त्यात गुरफटलो गेलो आहोत, आपली पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला जे सांगतात तेच आपण खरे मानत असतो पण ह्या पाच ज्ञानेंद्रियांची क्षमता अत्यंत तोकडी आहे. आपल्या पेक्षा प्राणी (मांजर / कुत्रा इ.) अनेक गोष्टी जाणू शकतात (वास, आवाज इ.)

आपल्या कडे नैसर्गीक क्षमता नाही असे नाही पण कदाचित त्याचा ‘पासवर्ड’ माहीती नसल्याने अनेक दरवाजे आपल्यासाठी बंद झाले आहेत. काही खास साधना करुन यातले काही दरवाजे तरी निश्चित किलकिले करता येतात. आपण एका विश्वातून दुसर्‍या विश्वात जाऊ शकतो , आपल्या दृष्टीने जो भवीष्य काळ आहे (तसा तो नसतो हा भाग वेगळा) तो आपण आजच पाहू , अनुभवू शकतो! भूतकाळ ही असाच जाणता येतो .. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात नेमके काय घडले ते आजही बघता येऊ शकेल!

आपल्या 4 मितिच्या विश्वात काळाला Time काही अर्थ आहे , काळ सतत पुढे जात असतो इ. असे आपण मानत असतो..पण आपण जेव्हा पाचव्या मितीत दाखल होतो तेव्हा ‘काळ’ ही संकल्पनाच नष्ट होते. तिथे ‘काळ’ असे काही नाही.. .. भूतकाळ नाही आणि भविष्यकाळही नाही जे आहे ते सगळेच वर्तमानात असते.

(आपण 4 मितीच्या विश्वात आहोत ते बरे आहे , भविष्य आहे , ते अज्ञात आहे म्हणुन तर आमची ज्योतिषांची दुकानें चालू आहेत … पाचव्या मितीत बहुदा नारळ आणि रद्दी चे दुकान टाकावे लागेल मला !)

असो , या वर मी आणखी लिहणार आहे

शुभं भवतु

सुहास


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

19 प्रतिक्रिया

///////////////
 1. Santosh

  सुहासजी,

  फारच वेगळा विषय निवडला आहे… पुढील पोस्ट लवकर येऊद्या उत्सुकता वाढली आहे 🙂

  संतोष

  0
  1. सुहास गोखले

   संतोषजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद , पुढील भाग लैकरच येत आहेत , सत्य घटना आहे ही… आज ही आठ्वण काढली की तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्या समोर येतो…

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  Amezing….!! खूप आश्चर्यकारक अनुभव सुहास जी . पुढे वाचण्यास खूपच उत्सुक आहे मी .

  0
 3. स्वप्नील

  सुहास जी तुमच्यावर जो काही प्रयोग केला त्या बाबाजीनी तो कदाचित संमोहन पेक्षा Advance असा काहीतरी असणार . कारण संमोहन मध्ये तुमच्या मनाची तयारी लागते व त्याला करण्यास साधारणतः १० ते १५ मी. लागतात . आणि अश्या भावी घटना पहायच्या असतील तर ते अवघड आहे एवढ्या कमी कालावधीत . नक्कीच आता पुढे उत्सुकता वाढलीये .

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   ते संमोहन नव्हते हे मी खात्रीने सांगू शकतो कारण त्याआधीच १९८९ मध्ये मी स्वसंमोहना चा लहानसा कोर्स केला होता आणि नंतर ही त्या विषयावरा बरेच वाचले होते आणि प्रयोग केले होते. माझ्यावर असा प्रयोग कोणी करत असता तर मला ते लगेच कळले असते आणि त्याच्या बचाव माझ्या कडे होता.

   आणि ते संमोहन होते हे क्षणभर वादा साठी मान्य केले तरी एखादी भावी घटना प्रत्यक्ष घडताना दाखवणे हे संमोहना द्वारे कदापीही शक्य होणार नाही…संमोहना द्वारे गत आयुष्यातल्या घटनांचा मनावर खोल उमटलेले वाईट परिणाम दूर करायला काही प्रमाणात उपयोग होतो..भविष्यातल्या घटनां बाबात संमोहन काहीच करु शकत नाही.

   पण बाबाजींनी जे केले ते ‘पाचव्या / सहाव्या / सातव्या डायमेन्शन मधले होते हे नक्कीच …पुढच्या भागात मी यावर काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन..

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   हिमांशुजी , विश्वास ठेवा , हे अगदी खरे आहे , सत्य आहे , 100%. विज्ञानाच्या आकलन शक्ती बाहेर अजून बरेच आहे … पुढचे काही भाग मी ह्याच बाबाजिंचे काही अनुभव सांगतो आणि काहि नव्या संकल्पना… आपल्याला 4 डायमेंशन माहीती आहेत ( लांब-रुंदी- उंची – वेळ) पण त्याच्याही पलीकडे 5 , 6 ,7 …10 डायमेंशन आहेत ज्याचे आकलन करुन घ्यायला आपल्या कडे ज्ञानेंद्रिये नाहीत… ज्योतिष हे 5 व्या डायमेंशन वर चालते (!)

   सुहास गोखले

   0
 4. Anant

  श्री. सुहासजी ,

  जबरदस्त सुरुवात झाली आहे. पुढील भागाची उत्सुकता लागली आहे.
  आपण म्हणता तसे हे संमोहन नाही पण याला काही नाव देता येईल का ?

  पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   अनंतजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद .

   मुळात हे सर्व ‘पॅरलल युनिव्हर्स ‘ या संकल्पनेचाच एक भाग आहे. जी घटना आपल्याला आत्ता आपल्या समोर घडत आहे असे वाटत आहे ती प्रत्यक्षात पुर्वीच (दुसर्‍या विश्वात ?) होऊन गेलेली असते आणि तशीच ती पुढे केव्हातरी तिसर्‍या विश्वात घडणार आहे. आपल्यावर असलेल्या काही विषीष्ठ बंधनां मुळे आपण सर्व एकाच विश्वात ज्याला आपण अज्ञानाने रिअ‍ॅलीटी मानत आहोत त्यात गुरफटलो गेलो आहोत, आपली पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला जे सांगतात तेच आपण खरे मानत असतो पण ह्या पाच ज्ञानेंद्रियांची क्षमता अत्यंत तोकडी आहे. आपल्या पेक्षा प्राणी (मांजर / कुत्रा इ.) अनेक गोष्टी जाणू शकतात (वास, आवाज इ.)

   आपल्या कडे नैसर्गीक क्षमता नाही असे नाही पण कदाचित त्याचा पासवर्ड माहीती नसल्याने अनेक दरवाजे आपल्यासाठी बंद झाले आहेत. काही खास साधना करुन यातले काही दरवाजे तरी निश्चित किलकिले करता येतात. आपण एका विश्वातून दुसर्‍या विश्वात जाऊ शकतो , आपल्या दृष्टीने जो भवीष्य काळ आहे (तसा तो नसतो हा भाग वेगळा) तो आपण आजच पाहू , अनुभवू शकतो! भूतकाळ ही असाच जाणता येतो .. शिवाजी म्हाराज आणि अफजलखान यांच्यात नेमके काय घडले ते आजही बघता येऊ शकेल!

   आपल्या 4 मितिच्या विश्वात काळाला Time काही अर्थ आहे , काळ सतत पुढे जात असतो इ. असे आपण मानत असतो..पण आपण जेव्हा पाचव्या मितीत दाखल होतो तेव्हा ‘काळ’ ही संकल्पनाच नष्ट होते. काळ असे नाही.. .. भूतकाळ नाही आणि भविष्यकाळही नाही जे आहे ते सगळेच वर्तमानात असते.

   (आपण 4 मितीच्या विश्वात आहोत ते बरे आहे , भविष्य आहे , ते अज्ञात आहे म्हणुन तर आमची ज्योतिषाची दुकानें चालू आहेत … पाचव्या मितीत बहुदा नारळ आणि रद्दी चे दुकान टाकावे लागेल मला !)

   असो , या वर मी आणखी लिहणार आहे …

   सुहास गोखले

   0
 5. स्वप्निल

  बरोबर सुहासजी, ३ मितिपेक्षा पुढील आणि अनेक मिती आहेत. याबाबत श्री.अ.ल.भागवत, मुंबईचे परामानस शास्त्राचे गाढे अभ्यासक श्री.मधुकर दिघे व स्वामी दत्तावधुत यांनी त्यांच्या पुस्तकातुन छान माहिती दिली आहे. आणखीन बरीच नांवे सा्गता येतील. आता आपल्याकडुन एकण्यास उत्सुक आहोत.

  0
 6. Mandar joshi

  जबरदस्त आहे सर्व , वाचताना काटे आले पण तुम्ही तर अनुभव घेऊन आले 😊

  येऊ देत अजून

  0
  1. सुहास गोखले

   श्री अभिजीतजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद,

   आपल्या सारख्या वाचकांचा आधार / पाठींबा आहे म्हणूनच , लिहायचे बंद करायचे असे ठरवले असताना पुन्हा नव्या उमेदीने लिहायला सुरवात केली आहे. आपला पाठींबा असाच राहू द्या ही विनंती.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.