“काका एक अर्जंट काम आहे..” …………….
राहुलचा अमेरिकेतून फोन.
“बोल, तू ओबामाचा जावईच ना , तुझे काम अर्जंटच असणार”
“काय काका चेष्टा करताय. खरेच अर्जंट काम आहे, मोठी काळजी लागुन राहीली आहे, म्हणून तुम्हाला त्रास देतोय”
“डॉलर मिळवून देणारे त्रास अच्छे होते हैं । “
“काका…”
“मुद्द्याचे बोल, नाहीतर मी तुला ‘पर मिनीट’ पद्धतीने चार्ज करीन”
“काका, मला एक योग शास्त्रावरचे पुस्तक हवे होते ते माझ्या बाबांनी भारतात खरेदी करुन मला पाठवले, आता त्याला चक्क दिड महीना झाला पण पुस्तकाचा अजून पत्ता नाही..”
“राहुल्या , लेका, हे तझे अर्जंट काम होय ? पुस्तकच आहे ना , येईल सावकाश आज ना उद्या , त्या साठी ’ज्योतिषी’ कशाला वेठीस धरतोस ? हे पवित्र शास्त्र इतक्या आलतुफालतु , आमच्या सांगली कडच्या भाषेत बोलायचे तर ‘XXX पादल्या’ कामासाठी वापरु नये रे, शास्त्राची चेष्टा होते त्यात ! ”
“नाही काका, नुसते पुस्तकच येणार असते तर मी पण तुम्हाला विचारले नसते, पण त्या पुस्तका बरोबर बाबांनी एका महत्वाचे कागदपत्र ही पाठवले आहे, आत्ता मला त्याची अत्यंत गरज आहे”
“ट्रॅकिंग इनफॉरमेशन काय सांगते आहे”
“कसले ट्रॅकिंक घेऊन बसलात, साध्या पोष्टाने पाठवले आहे ..”
“पुस्तक साध्या पोष्टाने पाठवले तर चालले असते पण त्यासोबत महत्वाचे कागदपत्र पाठवायचे असताना एखादी ट्रॅकिंग वाली कुरीयर सर्व्हीस वापरायची ना?”
“मी बाबांना तसेच सांगीतले होते , पुस्तक आणि कागदपत्र वेगवेगळे पाठवा पण बाबांचा काटकसरी स्वभाव नडला ना ! कशाला डब्बल खर्च करायचा , एकाच पाकीटातून जातील ना दोन्ही असा विचार करुन त्यांनी GPO गाठले , आता पुस्तक ही नाही आणि कागदपत्र ही नाही”
“ठीक आहे बघू , केव्हा भेटते हे कागदपत्र तुला, अर्थात भेटण्याची शक्यता असेल तर..”
“काका, असे बोलुन तुम्ही मला घाबवरुन सोडताय..”
“मी फक्त दोन्ही शक्यतांचा उल्लेख केला रे, भाकित नाही. त्यासाठी प्रश्नकुंडली इ सोपस्कार पार पाडायला नकोत का?”
“मग परत केव्हा फोन करु?”
“ भारतातल्या वेळे प्रमाणे आजच संध्याकाळी उशीरा ८ – ८:३० पर्यंत “
“चालेल आणि तुमचे मानधन पण आत्ता लगेच ट्रांस्फर करतो”
“माझा गुणाचा राहुल तो ! पण या खेपेला २ डॉलर जास्तच येऊ देत , दिवाळी तोंडावर आली आहे, जरा मोठा आकाशकंदील लावावा म्हणतो.. कालच्या दै.‘सकाळ’ मध्ये बातमी आहे: आकाशकंदीलाचे भाव वाढले ..”
“काका..”
असो.
राहुलचा फोन आला होता ०७ ऑक्टोबर २०१५, दुपारी १२:५१:५९ या वेळेचा वेस्टर्न होरारी चार्ट शेजारीच छापला आहे.
7 Oct 2015 , 12:51:59 PM , Deolali, 73e50’00, 19n57’00, Geocentric, Tropical, Placidus
वेस्टर्न होरारीत प्रश्ना साठीची कुंडली मांडली गेली की सर्वप्रथम तपासायच्या त्या दोन गोष्टीं:
जन्मलग्न बिंदू (Ascendant) आणि चंद्र.
जन्मलग्न बिंदू चे अंश काय आहेत हे महत्वाचे असते. जर जन्मलग्न बिंदू (तो कोणत्याही राशीत असू शकतो) ० ते ३ अंशात असेल तर त्याचा अर्थ असा होतो की प्रश्न जरा वेळे आधीच विचारला गेला आहे , प्रश्नासंदर्भात अजून बरीच उलथापालथ होणार आहे, कदाचित कहानी में व्टिस्ट पण आनेवाला हय तेव्हा आत्ताच त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे उचित नाही किंवा उत्तर शोधताना ही ‘व्टीस्ट’ वाली बाब लक्षात घेतली पाहीजे. (आणि बर्याच वेळा असा व्टिस्ट आहे का आणि असल्यास तो कशा प्रकारे असू शकेल याचा अंदाज पत्रिकेतून मिळतोच मिळतो, शोधा म्हणजे सापडेल!)
जर लग्न बिंदू २७ ते ३० अंशात असेल तर त्याचा अर्थ असा असू शकतो की परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे. आणखी एक अर्थ असा निघू शकतो की जातक प्रश्ना बाबतीत फारसा गंभीर नाही , त्याने अगदी कॅज्युअली, सहज, जाताजाता , टाईमपास , चेष्टा ,ज्योतिषाची परिक्षा घेणे अशा एखाद्या उद्देशाने प्रश्न विचारला आहे. याचा ही योग्य (?) तो उपयोग करुन घ्यावा लागतो.
चंद्रा कडे ही लक्ष द्यावे , चंद्र जर ‘व्हाईड ऑफ कोर्स ‘ असेल म्हणजेच चंद्र सध्या ज्या राशीत ज्या अंशावर आहे तिथे पासुन चंद्र ती राशी ओलांडे पर्यंत त्याचे कोणत्याही ग्रहा बरोबर योग होत नाहीत अशी स्थिती. या स्थितीत दुहेरी परिणाम मिळतात. म्हणजे प्रश्ना संदर्भातली परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे असा अर्थ निघू शकतो. किंवा प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची मोठी शक्यता असते. चंद्र हा कालमापनासाठी वापरला जात असल्याने चंद्र त्याची सध्याची राशी बदले पर्यंत एक ही ग्रह योग करणार नसेल तर कालनिर्णय कसा करता येईल ? चंद्राला राशी बदलल्या खेरीज नवा ग्रहयोग करता येणार नाही म्हणजे प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडेलही (इतर अनुकूल परिस्थिती व ग्रहयोग असतील तर ) पण त्यासाठी प्रश्ना संदर्भात बरेच काही मोठे बद्ल झाल्यावरच ! आणि ते कोणते बदल हे पण पत्रिका सांगू शकते , शोधा म्हणजे सापडेल !!.
पत्रिकेत लग्नबिंदू १० मकर ११ असल्याने , लग्नबिंदू संदर्भातली काळजी नाही.
चंद्र सिंहेत ११: ४२ अंशावर आहे, चंद्र सिंहेत आहे तो पर्यंत तो रवी, प्लुटो, युरेनस यांच्याशी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही. म्हणजे ही पण काळजी मिटली.
प्रश्न राहुल ने विचारला आहे , प्रश्नकर्ता नेहमीच लग्न स्थाना वरुन पाहतात. मकर लग्न असल्याने ‘शनी’ राहुलचे प्रतिनिधित्व करेल. प्लुटो लग्नात असल्याने तो ही राहुलचे प्रतिनिधित्व करेल. चंद्र हा तर प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतोच.
प्रश्न न मिळालेल्या पुस्तक – कागदपत्रा बद्दलचा आहे . राहुल ला पुस्तका बद्दल फारशी काळजी नाही , त्याच्या दृष्टीने त्या पुस्तका बरोबर त्याच पाकीटातून पाठवलेले कागदपत्र जास्त महत्वाचे असल्याने आपण ‘पुस्तक’ ही गोष्ट विचारात न घेता फक्त कागदपत्र या अंगाने ह्या केसचा विचार करुयात.
कागदपत्रे नेहमीच त्रितिय स्थानावरुन पाहतात. त्यामुळे त्रितिय (३) स्थान महत्वाचे होणार. पण हे कागदपत्र पोष्टाने पाठ्वले आहे ही बाब लक्षात घेतली पाहीजे, म्हणजे या केस मध्ये राहुल, ते कागदपत्र या बरोबरच ते कागदपत्र पोष्टाने पाठवणार्या व्यक्तीचा पण विचार केला पाहीजे. आता हे कागदपत्र पाठवले होते राहुलच्या बाबांनी, ते या मेसेज चे सेंडर आहेत, जर काही कारणामुळे पत्र परत आले तर ते राहुलच्या बाबांच्या हातात सोपवले जाईल, म्हणजे जोपर्यंत कागदपत्र राहुलला मिळत नाही तो पर्यंत राहुलचे बाबाच त्याचे मालक असणार. तेव्हा आपल्याला कागदपत्रा साठी म्हणून त्रितिय (३) स्थानच पहावयाचे आहे पण ते राहुल चे नसून राहुलच्या बाबांचे असेल ! हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या केस मध्ये आहे, याची नोंद घ्यावी.
पत्रिकेतले दशम स्थान हे वडिलांसाठी बघितले जाते . इथे के.पी. वाले नक्षत्र शिरोमणी , नक्षत्र भूषण, नक्षत्र विशारद चवताळुन उठतील ‘ नवम स्थान , नवम स्थान , नवम स्थान ‘ . पण स्वारी , पारंपरिक मध्ये वडिलांसाठी दशम स्थानच बघतात , तेच बरोबर आहे असा माझा आणि इतर बर्याच जणांचा अनुभव आहे . बाकी या वर वादविवाद करण्यात मला स्वारस्य नाही.
दशमाचे (१०) त्रितिय (३ ) स्थान म्हणजे व्यय स्थान ( १२ ), हे व्ययस्थान कागदपत्रा साठी पाहूयात.
व्ययस्थानावर १५ धनु २४ असल्याने व्ययस्थानाचा स्वामी ‘गुरु’ कागदपत्राचा प्रतिनिधी असेल. आणि योगायोगाची गोष्ट पहा, राहुलच्या त्रितिय स्थाना (राहुलच्या कागदपत्राचे स्थान) वर मीन रास असल्याने त्याचाही प्रतिनिधी ‘गुरु’ च आहे! चार्ट रॅडीकल असल्याचाच हा दाखला आहे.
आता पुढचा टप्पा – कागदपत्र राहुल ला मिळणार का?
कागदपत्र राहुलच्या हातात पडणार असेल तर राहुल चा प्रतिनिधी (शनी) व कागदपत्राचा प्रतिनिधी (गुरु) यांच्यात कोणता तरी योग व्हावयास हवा.
शनी धनेत ०१:३३ अंशावर आहे तर गुरु कन्येत १२:०७ अंशावर आहे, यामुळे गुरु कन्येत असे पर्यंत तरी ह्या दोघांत कोणताही योग होणार नाही.
पण राहुलचा दुसरा प्रतिनिधी प्लुटो मकरेत १३:०० अंशावर आहे म्हणजे गुरु कन्येत १३:०० वर आला की या दोघांत नव-पंचम योग होईल. याचा अर्थ कागदपत्र राहुल ला मिळणार!
पण आपण या प्लुटो वर विसंबून राहू शकत नाही, वर्षानुवर्षे एकाच राशीत ठाण मांडून बसणार्या ग्रहमालेतल्या सगळ्यात लांबच्या या ग्रहाचा भविष्यकथनात अगदीच मर्यादीत वापर होतो. निदान या केस मध्ये तरी मला प्लुटोची मदत घेणे श्रेयस्कर वाटत नाही.
मग कागदपत्र राहुलला मिळणार नाही असा अर्थ काढायचा का? तसेही लगेच म्हणता येणार नाही. जरी गुरु- शनी प्रत्यक्ष (डायरेक्ट) योग होऊ शकत नसला तरी अप्रत्यक्ष (इनडायरेक्ट) योग होऊ शकतो का ते तपासायला पाहीजे. इथे ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट’ ची शक्यता आहे का ते पाहूया.
गुरु (कागदपत्र) आणि शनी (राहुल) या दोन मंद गती ग्रहां मध्ये मांडवली करायची असल्याने आपल्याला या दोन्ही ग्रहां पेक्षा जलद ग्रह लागेल , रवी, चंद्र, बुध ,शुक्र, मंगळ यापैकी कोणताही ग्रह चालू शकेल. आपण क्रमाक्रमाने हे सर्व ही ग्रह तपासूयात. हे कसे तपासायचे ?
‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट’ करणार्या ग्रहाने तो त्याच्या सध्याच्या राशीत असताना शनी किंवा गुरु शी एखादा योग केलेला असला पाहीजे किंवा करणार असला पाहीजे आणि हा योग संपल्यानंतर त्याच राशीत असताना त्याचा उर्वरीत (शनी किंवा गुरु) ग्रहाशी योग व्हावयास पाहीजे.
रवी: तुळेत १३ :४२ वर आहे, रवी तुळेत असताना त्याचे शनी व गुरु शी योग होत आहेत का ? रवी तुळेत आल्या क्षणीच त्याचा धनेतल्या ०१:३३ अंशा वरच्या शनीशी लाभयोग झाला होता , एक टप्पा पार पाडला होता, पण दुसरा ग्रह गुरु कन्येत आहे , दोन पाठोपाठच्या राशीत असताना दोन ग्रहांत युती, लाभ, केंद्र, नव-पंचम, प्रतियोग होत नाहीत , म्हणजेच रवी ने या आधीच शनीशी लाभ योग केलेला असला तरी तो तुळेत असे पर्यंत गुरु शी योग मात्र करु शकत नाही. म्हणजे रवी काही मांडवली करु शकणार नाही.
चंद्र: चंद्र सिंहेत ११:४२ वर आहे , तो सिंहेत ०१:३३ वर असताना त्याचा धनेतल्या ०१:३३ अंशातल्या शनीशी नव-पंचम झाला होता पण चंद्र सिंहेत असताना त्याचा कन्येतल्या गुरुशी (दोन पाठोपाठच्या राशी) कोणताही योग होऊ शकणार नाही. सबब चंद्र बाद!
बुध: बुध तुळेत ०१:२२ अंशावर आहे, वक्री आहे तो पुढे मागे मार्गी होऊन धनेतल्या ०१:३३ अंशातल्या शनीशी लाभयोग करेल , एक टप्पा पार पडेल, पण गुरु कन्येत असल्याने बुध तुळेत असे पर्यंत बुध – गुरु योग (युती, लाभ, केंद्र, नव-पंचम, प्रतियोग) होण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे बुध काही मांडवली करु शकणार नाही.
शुक्र: शुक्र सिंहेत २८:५० वर आहे , तो सिंहेत असताना त्याचा शनी शी योग झाला नव्हता आणि पुढेही होणार नाही, गुरु कन्येत असल्याने शुक्र सिंहेत असे पर्यंत शुक्र – गुरु योग (युती, लाभ, केंद्र, नव-पंचम, प्रतियोग) होण्याची सुतराम शक्यता नाही. सबब शुक्र ही बाद!
मंगळ: मंगळ कन्येत ०७:३६ अंशावर आहे, मंगळ कन्येत आल्या क्षणीच त्याचा धनेतल्या ०१:३३ अंशा वरच्या शनीशी केंद्र योग झाला होता , एक टप्पा पार पाडला होता, गुरु कन्येतच १२:०७ अंशावर असल्याने मंगळ गुरु शी युती करेल ! आपला दुसरा टप्पा ही पार पडतोय! म्हणणे मंगळ भाई शनी – गुरु अशी मांडवली करणार तर !
झाले तर, अशा तर्हेने एकदाची मांडवली झाल्या मुळे राहुल ला त्याचे कागदपत्र मिळणार यात शंकाच नाही, बस्स, आता फक्त ठरवायचे की हे कागदपत्र राहुलच्या हातात केव्हा पडणार ते !
चंद्र हा नेहमीच कालनिर्णया साठी वापरला जातो , इथे चंद्र (राहुल), गुरु (कागदपत्र) यांच्यात कोणताही योग होत नाही, चंद्र आणि शनी मध्ये ही कोणताच योग होत नाही त्यामुळे चंद्र आपल्याला कालनिर्णयाला वापरता येणार नाही. त्यामुळे आपल्याला आता मांडवली करणार्या मंगळाचे पाय धरायची वेळ आली आहे.
मंग़ळ ४:३० अंश पुढे सरकला की तो गुरु शी युती करेल म्हणजेच तो अप्रत्यक्ष पणे गुरु (कागदपत्र ) आणि शनी (राहुल) यांची गाठ घालून देईल.
आपले स्केल दिवस- आठवडे –महीने किंवा आठवडे – महिने – वर्ष असे असू शकते , पण मंगळाची राशी व भाव बघता ‘आठवडे’हे प्रमाण जास्त सयुक्तिक वाटते म्हणजे प्रश्न विचारल्या दिवसा पासुन सुमारे चार – साडेचार आठवड्यात कागदपत्र राहुलच्या हातात पडतील. प्रश्न विचारला होता ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी, त्या हिषेबाने कागदपत्र ०७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर पर्यंत मिळतील.
या केस मध्ये चंद्र कालनिर्णयासाठी वापरता येत नसल्याने आपल्याला आता थोडेफार स्वातंत्र मिळाले आहे , त्याचा लाभ उठवून आपण कालनिर्णयाच्या बाबतीतली आणखी एक ट्रीक विचारात घेऊ , ती म्हणजे प्रत्यक्ष एफेमेरीज मधून कालनिर्णय!
मंगळ जेव्हा गुरुशी युती करेल तेव्हा मांडवली होईल. कागदपत्र राहुलच्या हातात पडेल. अंशात्मक अंतराचा (४:३० अंश) विचार करुन चार-साडे चार आठवडे हा कालावधी मिळाला होता. आता आपण प्रत्यक्ष एफेमेरीज तपासून कॅलेंडर मध्ये ही मंगळ- गुरु युती केव्हा होते ते तपासूया.
एफेमेरीज पाहील्या तर हे लक्षात येईल की दिनांक १८ ऑक्टोबर २०१५ रोजी ही मंगळ-गुरु युती आकाशात दिसणार आहे. १८ ऑक्टोबर ला रवीवार असल्याने पोष्टाला (USPS) सुट्टी असणार त्यामुळे राहुल ला कागदपत्र (आणि पुस्तक) १६ किंवा १९ ऑक्टोबर २०१५ रोजी मिळू शकेल.
आता आपल्या कडे दोन कालावधी आहेत:
०७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर आणि १६ किंवा १९ ऑक्टोबर !
पत्र पाठवून आधीच दीड महिना झालेला होता तेव्हा त्याचा विचार करुन मी १६ किंवा १९ ऑक्टोबर हा कालावधी योग्य मानला व तसे त्या ओबामाच्या जावयाला सांगीतले.
आणि अक्षरश: तसेच झाले , फक्त एक दिवसाने उशीरा म्हणजे मंगळवार , दिनांक २० ऑक्टोबर रोजी कागदपत्र राहुल च्या हातात पडले !
कागदपत्र मंगळवारीच मिळाले कारण मंगळाने मांडवली केली होती तेव्हा मंगळाचा प्रभाव कोठेतरी दिसायला हवाच ना !
हा माझा नेहमीचा अनुभव आहे की जो ग्रह मांडवली करतो तो आपला ठसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने उमटवतोच !
मागच्या एका केस स्ट्डी मध्ये चंद्राने मांडवली केली होती तेव्हा प्रत्यक्षात ज्या व्यक्तीने मध्यस्ती केली होती तो पूर्ण टकलू होता !!
राहुलचा ‘आभार प्रदर्शनाचा ‘ कार्यकम झाल्यावर मी माझे दोन शब्द बोललो:
“पुढ्च्या खेपेला तुझ्या बाबांना एखादी चांगली फेडेक्स सारखी कुरियर सर्व्हीस वापरायला सांग, नाहीतर परत तुला मला डॉलर द्यायला लागतील , मला काय , डॉलर मिळाले तर हवेच आहेत , आकाशकंदीलाची तर झक्कास सोय केलीस मर्दा तू ! आता येत्या संक्रांतीला जरा चार पाच मोठे पतंग ऊडवावे म्हणतोय..”
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुंदर. कधी कधी कल्पनातीत वाटत सगळं. 😊
श्री. हिमांशुजी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद.
सगळ्याच केसेक बाबतीत असे रिझल्ट्स मिळतीलच असे नाही. प्रश्ना मागची तळमळ , प्रश्न विचारायची वेळ आणि प्रश्नाचे (बरोबर) उत्तर जातकाला मिळावे अशी नियतीचीच जर इच्छा असेल तर स्गळे जमून येते , आपण प्रयत्न करत रहायचे.
आपला
सुहास गोखले
खूप छान आणि सविस्तर केस स्टडी …. धन्यवाद सर.. 🙂
श्री.गौरवजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले
सुहासजी नमस्कार
पारपारिक ज्योतिष शास्ञात अयनांश कोणते वापरावे.आणी नषञाचा अभ्यासाठी पुस्तक कोणती घ्यावी. कृपया मार्गदर्शन करावे.
श्री. उमेशजी ,
सप्रेम नमस्कार,
पारंपरिक ज्योतिषा साठी ‘लाहीरी अयनांश’ वापरावेत , , अर्थात पारंपरिक मध्ये अंशात्मक असे काही फारसे बधितले / विचारात घेतले जात नसल्याने कोणतेही अयनांश वापरले तरी चालतील.
नक्षत्रांच्या अभ्यासा साठी श्री. प्राश त्रिवेदी (यांच्या पुस्तकाचे परिक्षण मी माझ्या ब्लॉग वर केले आहे), श्री. संजय रथ व श्री. शुभाकरण यांनी लिहलेली पुस्तके वापरावीत, ही तिन्ही पुस्तके इंग्रजीत आहेत पण स्मजायला फारशी अडचण येणार नाही. मराठीत श्री. अंबेकरांचे एक टुकार पुस्तक आहे, चुकून सुद्धा त्याच्या कडे बघू नका , भयंकर चुकांनी भरलेले , अश्लील भाषेत लिहलेले पुस्तक आहे.
शुभेच्छा
सुहास गोखले