त्या दिवशीचा एक हेक्टिक लेक्चर सेशन (मी मास्तर आहे त्यामुळे कंपन्यांत आणि विजिनियरिंग क्वालीजात अधून मधून शिकवण्यास जात असतो!) संपवून घरी परतायला रात्रीचे सात – साडे सात वाजले होते, जरा फ्रेश  होऊन चहा घेत होतो , आमच्या घरात असलेल्या मुक्ताई आणि भुरकाई या (ड्यांबिस!) मांजर्‍या भोवताली घुटमळत होत्या त्यांची चौकशी चालू होती,  इतक्यात  फोन वाजला….

पुण्याच्या निखीलचा फोन, माझा एक जुना मित्र! निखिल अशा काही व्यक्तीं पैकी आहे की ज्यांचे फोन मी टाळूच शकत नाही आणि तसा निखील कारण नसताना वेळी अवेळी फोन करणार्‍यातला नाही. त्याने इतक्या उशीरा फोन केला म्हणजे काही तरी महत्वाचेच असणार !

“बोल, भाऊ, काय काम काढले आज”

“अर्जंट आहे”

“ते लक्षात आलेलेच आहे , त्या शिवाय का अवेळी कॉल करणार तू “

“मी उद्या ऑफिस टाईम मध्ये फोन करणार होतो पण तूच मागे म्हणाला होतास ना ‘एखाद्या प्रश्नाची भावना तीव्रतेने जाणवायला लागते तीच वेळ , तो क्षण महत्वाचा…’

“हे एव्हढे बरे लक्षात ठेवता रे तुम्ही लोक आणि मानधना बद्दल लिहलेले असते ते कसे नाही लक्षात राहात ?”

“बस का राव! मी फुकट्यातला नाय हां”

“गंमट क्येली रे, ते जाऊदे,  ‘समस्या’ काय ते सांग”

“हायला येकदम ‘समस्या’ असे काय म्हणु नको रे , आणखी टेन्शण येऊन राहते ना बे”

“बरे काय म्यॅटर आहे ते सांग मग ठरवूया त्याला ‘समस्या’ म्हणायचे का आणखी काही’

……

निखील चा भोसरी एम.आय.डी.सी – पुणे येथे स्पेशल जॉब वर्कींग , अ‍ॅटोमेटेड टेस्टींग  मशीन्स, टूल्स , जीग्ज अँड फिक्चर्स चा लघु उद्योग आहे. उद्योग तसा बरा चालला होता. नुकतेच एका बड्या कंपनी शी त्यांचा संपर्क आला होता, ती कंपनी निखील ला मोठी ऑर्डर देणार होती पण त्यासाठी निखील ला जागा, यंत्रसामुग्री, प्रशिक्षीत मनुष्यबळ अशी बरीच गुंतवणूक करायला लागणार होती.  आता अशी गुंतवणूक करायची म्हणजे कर्जच काढावे लागणार होते. रिस्क जरा मोठी होती आणि म्हणूनच निखील मला विचारत होता–

“ही गुंतवणूक करण्यात काही धोका नाही ना? गुंतवणूक लाभदायक ठरेल का?”

जातकाने प्रश्न विचारला , मांडली लगेच प्रश्न कुंडली असे करु नये. आधी जातकाशी सविस्तर चर्चा करुन , प्रश्न विचारुन संपूर्ण माहीती मिळवावी. प्रश्ना मागची पार्श्वभूमी समजाऊन घ्यावी. सगळे संदर्भ तपासून , नोंदी करुन घ्यायच्या. बर्‍याच वेळा जातकाच्या मनात एक असते पण प्रश्न वेगळाच विचारलेला असतो, काही वेळा विचारलेल्या प्रश्नाची भाषा दिशाभूल करणारी असू शकते, खरा प्रश्न त्या मागे दडलेला असतो. तो खुबीने बाहेर काढायचा असतो. असा पूर्ण खुलासा होऊन प्रश्नाचे पूर्ण आकलन झाल्या खेरीज प्रश्न कुंडली मांडायची गडबड करु नये.

निखीलचा प्रश्न जेव्हा मला पूर्णपणे समजला त्या वेळेची कुंडली तयार केली , निखील प्रश्न विचारताना पुण्यात होता , मी नाशकात , प्रश्न दुसर्‍या ठिकाणाहून (या केस मध्ये , पुण्यातून) विचारला असला तरी प्रश्न सोडवताना ज्योतिर्विद ज्या स्थानी असतो त्याच जागेचे अक्षांश – रेखांश वापरायचे , म्हणून माझ्या गंगापूर रोड , नाशिक लोकेशन चे को-ऑर्डिनेट वापरले आहेत.

 

nikhil-case-horary-chart


होरारी चार्ट चा तपशील

दिनांक: १९ मे २०१६  वेळ:  २०:४७:०६ स्थळ: गंगापूर रोड , नाशिक

प्लॅसिडस,  ट्रॉपीकल , मीन नोड्स

 

“गुंतवणूक करु का नको?” असा प्रश्न आहे म्हणून लगेच ‘पंचम स्थान’ , ‘पंचम स्थान’ असे त्या के.पी. वाल्यां सारखे नाचत सुटू नये!  गुंतवणूकी चे म्हणून ‘पंचम स्थान (५)’ महत्वाचे आहेच पण त्या आधी निखील , त्याचा व्यवसाय , निखील ज्यांच्याशी करार करणार आहे ती कुंपणी,  निखील चा पैसा , कुंपणीचा पैसा , ह्या दोघांत होणारा ‘करार’ असे अनेक घटक विचारात घ्यावे लागणार हे उघड आहे.

(वेस्टर्न) होरारी कुंडली मांडली की सर्वप्रथम तपासायच्या गोष्टीं ज्याला Considerations before judgment’  म्हणतात त्या अशा:

  1. अर्ली / लेट असेंडंट
  2. चंद्र व्हाईड ऑफ कोर्स
  3. लग्न स्थानातला किंवा सप्तमातला शनी
  4. ‘व्हिया कंबुस्टा’ मध्ये कोणता ग्रह आहे का

तसे ग्रंथां मधुन इतर अनेक कन्सीडरेशन्स लिहून ठेवेलेली आहेत पण ती फारशी महत्वाची नाहीत.

अर्थात ह्या वर दिलेल्या कन्सीडरेशन्स  पैकी काही लागू पडत असतील तरी केवळ त्याचे निमित्त करुन कुंडली बाद करायची किंवा प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणून केस बंद करायची नसते. ह्या कन्सीडरेशन्स ने केवळ एक वार्निंग दिलेली असते ती लक्षात ठेऊन पुढचे अ‍ॅनॅलायसीस करावे.

या प्रश्नकुंडलीत लग्न बिंदू (असेंडंट) २२ धनु २९  वर आहे त्यामुळे तो अर्ली किंवा लेट असेंडंट नाही. एक काळजी मिटली.

चंद्र ४ वृश्चिक २०  वर आहे म्हणजे अगदी नुकताच वृश्चिकेत दाखल झाला आहे त्यामुळे वृश्चिकेत असे पर्यंत तो अनेक ग्रहयोग करणार आहे , तो ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ नाही.

शनी व्ययस्थानात आहे (लग्नात  किंवा सप्तमात नाही) त्यामुळे ही पण काळजी नाही.

मात्र चंद्र ४ वृश्चीके वर असल्याने तो १५ तुळ ते १५ वृश्चिक या भागात म्हणजेच व्हिया कंबुस्टा आहे !  जुन्या ग्रथांतुन या बद्दल अशुभ लिहले आहे पण तसा अनुभव येतोच असे नाही. त्यातही या विभागात असताना एकट्या चंद्रालाच त्रास होतो , बाकी ग्रहांना काहीही होत नाही असेही लिहले आहे.  आता चंद्र हा नेहमीच जातकाचा (प्रश्नकर्त्याचा) प्रतिनिधी असतो, चंद्राचा संबंध मानसिक स्थितीशी असल्याने चंद्र विया कंबुस्टा मध्ये असेल तर जातकाच्या मन:स्थिती वर काहीसा परिणाम होणे स्वाभाविक आहे पण त्याने फार मोठी उथलपुथल होण्याची शक्यता नसते . जातकाच्या निर्णय क्षमते वर काहीसा परिणाम होऊ शकतो याचे भान ठेवले म्हणजे झाले.  या विषय अभ्यासताना मी काही नोट्स तयार केल्या होत्या त्यातला काही भाग आपल्या समोर सादर करतो.

माझे बहुतेक वाचन इंग्रजी मध्ये असते त्यामुळे नोट्स काढणे स्वाभाविक पणे इंग्रजीत होत असते आता या सार्‍यांचे माय मराठीत भाषांतर करणे वेळे अभावी शक्य होणार नाही , तेव्हा इंग्रजीतला हा नैवैद्य च गोड मानून घ्यावा द्येवानु  !

The Via Combusta—The Burning way or Combust Way—is the section of the zodiac between 15° Libra and 15° Scorpio, except for 23° through 24° Libra. In olden days, the Via Combusta was reputed to be the most dangerous part of the twelve signs, owing to many violent fixed stars found there. But the stars are no longer in the same place relative to the signs, so modem astrologers ignore the rule. The exception of 23° Libra through 24° Libra is understandable —these are the degrees (in our present time) containing Spica and Arcturus, thought to be fortunate stars.

Looking at the matter objectively, there is not a single reason for clinging to the Via Combusta, and certainly not for deciding that a chart is incapable of being safely judged because of it. However, it must be mentioned that, guided by personal experience, some Astrologer don’t completely abandon the Via Combusta rule. They found the effect to be similar to that of a Moon/Uranus conjunction, in which events take a sudden, unpredictable turn that is not always relished by the querent. It is also found that there is something compulsive and calamitous involved.

The fact that there is so little agreement on the rule, and that the majority of astrologers are inclined to throw it overboard, should serve as a warning to be very circumspect in its use.

 

चला ,  Considerations before judgment’   तपासून झाल्या आता आपल्या प्रोसीजर प्रमाणे या खेळातले प्रमुख खेळाडू  आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित करु. या खेळात कोण कोण आहेत?

 

निखील: प्रश्नकर्ता / जातक

कुंपणी: निखील सध्या ज्या कंपनीशी व्यवहार करु पाहात आहे ती संस्था – ‘कुंपणी’

करार: निखील आणि  कुंपणी  मधला करार (हा करार अजून व्हायचा आहे , त्यामुळे आपण याला कुंपणी ने दिलेले ‘आश्वासन’ किंवा अगदी टोकाला जाऊन ही कुंपणी ने मारलेली थाप असे ही समजू शकतो)

व्यवसाय: निखीलचा व्यवसाय  हा पण एक पार्टी म्हणून विचारात घेतली पाहीजे,

नफा – तोटा: आता व्यवसाय म्हणले की नफा – नुकसान आलेच त्यामुळे निखील च्या व्यवसयाचा नफा- तोटा ही एक बाब विचारात घेतली पाहीजे,

निखीलचा पैसा:  निखील कर्ज काढून ही गुंतवणूक करणार आहे , त्यामुळे निखीलचा पैसा सुद्धा विचारात घेतला पाहीजे.

कुंपणीचा पैसा: हा  घटक फारसा महत्वाचा नाही, कुंपणी अशा अनेक ‘निखील ‘ शी एकाच वेळी व्यवहार करत असेल त्यामुळे कुंपणीच्या पैशाचा या केस मध्ये फारसा संबंध येणार नाही. केवळ एक उत्सुकता म्हणून हा घटक बघायाचा ( त्यावर फारसा विचार करायची आवश्यकता नाही, आता जर हा व्यवहार जर निखील – कुंपणी ऐवजी निखील – दुसरी व्यक्तीं  असा होत असता तर ‘त्या दुसर्‍या व्यक्तीचा पैसा’ हा मुद्दा  महत्वाचा ठरला असता , हा फरक लक्षात ठेवा , पुढे मागे उपयोगी पडेल !) .

चला , अशा तर्‍हेने पात्रें (अ‍ॅक्टर्स) निश्चित झाली , आता या भूमिका कोण करणार ते ठरवून टाकू …

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.