अगदी सरळ , स्वच्छ आहे : हा करार , हे आश्वासन , ही ऑफर , हे डील जे काही असेल ते सगळे काही फसवणूक करणारे आहे , एखादी महत्वाची माहीती / कलम निखील पासुन दडवून ठेवण्यात आले आहे किंवा कराराच्या काही बाबीं पुरेशा स्पष्ट भाषेत नाहीत , कराराचा असुदा असा तयार केला गेला अहे / केला जाईल की उद्या कंपनी त्यातून स्वत:च्या फायद्या साठी कसाही , कोणताही अर्थ काढू शकेल अशी मखलाशी केली असण्याची मोठी शक्यता आहे

या लेखमालेतील पहीले दोन भाग :

बापू बिझनेस के लिये .. (भाग – 2)

बापू बिजनेस के लिए… ये तो हानीकारक है । (भाग – १)

पुढे चालू…

निखीलच्या या प्रश्ना साठी केलेली प्रश्नकुंडली पुन्हा एकदा छापत आहे.

nikhil-case-horary-chart

होरारी चार्ट चा तपशील

दिनांक: १९ मे २०१६  वेळ:  २०:४७:०६ स्थळ: गंगापूर रोड , नाशिक

प्लॅसिडस,  ट्रॉपीकल , मीन नोड्स
आता करार करणे , आर्थिक गुंतवणूक करणे हे सर्व निखिल त्याच्या व्यवसाया साठी करणार असल्याने निखिलचा व्यवसाय काय म्हणतो ते पाहणे महत्वाचे आहे…..

‘शुक्र’ निखीलच्या व्यवसायाचा प्रतिनिधी आहे. हा शुक्र पंचमात आहे , पंचम स्थान म्हणजे ‘स्पेक्युलेटीव्ह / धाडसी गुंतवणूक’ , सध्याची निखिलच्या व्यवसायाची स्थिती हा शुक्र अगदी बरोबर दाखवत आहे. पण हा शुक्र पंचम स्थान सोडायच्या बेतात आहे, पुढच्या षष्ठम स्थानाच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या पाच अंश मागे आहे, त्यातच हा शुक्र रवी च्या मागे फक्त ५ अंश असल्याने तो कंब्युस्ट (अस्तंगत)  आहे, कोणताही ग्रह जेव्हा कंब्युस्ट असतो तेव्हा तो  रवीच्या तेजाने झाकोळला जातो, गलितगात्र (पॉवरलेस) होतो, आंधळा होतो, (अपवाद मंगळाचाच त्ये बेणं काही रवीला जुमानत नाही!).

 

Combustion is a situation where a planet cannot be seen in the sky either day or night, because it is too close to the Sun and the Sun’s light obliterates it. As the original basis of Astrology was the transmission and reflection of light, a situation where a planet cannot be seen at all, is taken as a serious debility. That was/is the situation for Astrology in general, not just Horary in particular.

Since Medieval times the span of Combustion has been taken as within 8 degrees of the Sun, both before and after the conjunction with the Sun. There is a further band called Under the Beams which stretches out to 17.5 degrees either side. It too is seen as a debility but not as serious as Combustion.

Any planet suffering combustion, is rendered weak at the very best, downright malicious at worst. The combust planet is extremely weakened, or shows mischief (especially in the case of Mercury), or shows “inability to be seen or heard”, or shows death, health detriment and so on, depending on what the planet being combust signifies and what matter the question is about. The fortunes lose their power to do good and the infortunes are rendered either weak or more malicious depending on their dignities.

Interpret it as a situation where the thing or person signified by a planet is unable to be seen (either literally or metaphorically) or extend it to mean that the thing or person signified by the planet is unable to see (either literally or metaphorically) because it’s blinded by the Sun.

Context and common sense are important.

 

निखीलचा व्यवसाय हा असाच आंधळा होऊन एक जुगारी पद्धतीच्या गुंतवणूकीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे हेच यातून सुचित होते नाही का?
बाकी हा शुक्र (निखिलचा व्यवसाय) आहे कोणत्या परिस्थितीत ? शुक्र स्वत:च्याच राशीत आहे म्हणजे बाळ गुटगुटीत आहे पण तो चंद्राच्या एक्सालटेशन आणि ट्रीप्लिसिटीत आहे , चंद्र तर निखिलचा घाटा दाखवतो म्हणजे निखीलचा व्यवसाय या घाट्या कडे खेचला जात आहे. शुक्र शनीच्या टर्म आणि फेस मध्ये आहे ह्या मायनॉर डिग्निटीज काहीश्या बर्‍या आहेत , कारण शनी निखीलचा पैसा आहे, निखीलचा व्यवसाय कर्ज उभे करण्याच्या विचारात आहे  त्याचे संकेत यातून मिळत आहेत. पण शुक्र मंगळाच्या डीट्रीमेंट मध्ये आहे ! झाला ना घोट्टाळा !! मंगळ निखिलच्या व्यवसायातला नफा- तोटा दाखवतो आणि व्यवसाय अशा तर्‍हेने नफा-तोट्याच्या डिट्रीमेंट मध्ये म्हणजे खात्रीने लाखाचे बारा हजार !  या शुक्राला कोणतीही डिग्नीटी मिळालेली नाही म्हणजे तो चक्क ‘पेरेग्राईन’ आहे, अत्यंत दुर्बळ अवस्थेत आहे.

प्रश्न निखील च्या पैशाचा सुद्धा आहे. शनी निखीलचा पैसा दाखवते. वा रे वा , पैशाचे प्रतिनिधीत्व शनी करतो आहे म्हणजे आशाच सोडायची, त्यात हा शनी वक्री अवस्थेत , व्ययस्थानात आहे, आता काय बोलायचे? हा शनी गुरुच्या (निखील) राशीत आणि गुरुच्याच ट्रीप्लिसीटीत आहे , हे स्वाभावीकच आहे म्हणा, शनी निखिलचा पैसा आहे ना! पण शनी बुधाच्या (कुंपणी) टर्म आणि बुधाच्याच डिट्रीमेंट आहे म्हणजे निखिलचा पैसा धोक्यात आहे. शनी ला पण कोणतीच डिग्नीटी नाही तोही ‘प्रेरेग्राईन’ आहे. हे काही चांगले लक्षण नाही. व्यवसाय वाढावा, पैसा मिळावा म्हणून निखिल जे काही करायचे योजत आहे त्याला हरताळ फासला जाण्याचे संकेत आहेत म्हणायचे.

निखिलच्या व्यवसायातला नफा – तोटा म्हणजे मंगळ वक्री अवस्थेत धनेत आहे, सुरवातच वाईट आहे. मंगळ कशा स्थितीत आहे ? मंगळ  गुरुच्या (निखील) च्या राशीत,  गुरुच्या ट्रीप्लिसीटीत आणि गुरुच्याच टर्म मध्ये आहे , हे चांगलेच आहे , किंबहुना ती एक वस्तुस्थितीच आहे.  निखिल ला ‘नफा’ हवाच आहे ना? त्यात काय चुक ? पण अडचण अशी की हा मंगळ , बुधाच्या (कुंपणी) च्या डीट्रीमेंट मध्ये आहे , हे अशुभ आहे , व्यवसायातला नफा, ग्राहकांचा (कुंपणी) तिटकारा करुन कसा मिळेल ? मंगळाची ही स्थिती ‘नफा’  मिळण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल आहे यात शंकाच नाही.

पत्रिके कडे वरवर पाहीले तर असे दिसते की मंगळ  सध्या वक्री आहे पण तो मार्गी होऊन १४ धनु १०  वरच्या शनी शी युती करेल त्याच वेळी तो १३ कन्या २४ वरच्या गुरु शी (निखील) केंद्र योग करेल… आणि तसे झाले तर निखील ला पैसे मिळणार !  चांगलेच आहे की !!! पण हे योग होतील  का?

खात्री करुन घेण्यासाठी एफेमेरीज बघणे अत्यावश्यक आहे,

 

nikhil-ephemeries1

आता एफेमेरीज बघितल्या तर असे लक्षात येते की  मंगळ वक्री अवस्थेत धनेतून वृश्चिकेत जाणार आहे. पुढे मागे तो मार्गी होऊन पुन्हा धनेत येऊन वर लिहलेलेल योग करेल ही पण त्या आधी तो दोनदा (वृश्चिकेतुन धनेत आणि नंतर धनेतुन वृश्चिकेत) राशी बदल करत असल्याने सध्याच्या प्रश्नांचा संदर्भात हे योग नंतर झाले तरी आपल्याला त्यांचा विचार करता येणार नाही. (होरारीत राशी न बद्लता होणारे योगच बघायचे असतात हे लक्षात ठेवा)

शनी (निखीलचा पैसा) आणि गुरु (निखील) लौकरच केंद्र योग करत आहेत. म्हणजेच लौकरच निखील पैशा संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे याचे संकेत आहेत. लग्नातला प्लुटो वक्री असून तो निखील च्या पार्ट ऑफ फॉरचुन (फॉर्चुना) शी प्रतियोग करत आहे, हा फॉरच्युना अष्टम स्थानात म्हणजे नुकसान , मन:स्तापाच्या स्थानात आहे. याचा सरळ सरळ अर्थ निखीलचा आर्थिक बाबतीतला निर्णय चुकीचा ठरुन  आर्थिक फटका (प्लुटो) बसण्याची चिन्हे आहेत, प्लुटो असल्याने हा पैशाचा मृत्यू योगच!

आता आपण या खेळातली राक्षस पार्टी म्हणजे निखिल ज्या कुंपणी बरोबर डिल करणार आहे ती काय म्हणतेय ते पाहुया.

सप्तमेश बुध कुंपणी चा प्रतिनिधी आहे. हा बुध वक्री अवस्थेत वृषभेत आहे , निखिल च्या पंचमात (स्पेक्युलेटीव्ह / धाडसी गुंतवणूक) आहे. या बुधाचा तो ११ अंशावर असताना नेपच्युन (करार) शी लाभ योग झाला होता. म्हणजेच कुंपणीने कराराचा मसुदा तयार केला होता. बुधा सारखा (लबाड) ग्रह , नेपच्युन सारख्या फसवणूक करणार्‍या ग्रहाशी करार करु पहात आहे म्हणजे तो ‘करार’ काय चीज आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल, ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है ।“

हा बुध वक्री असल्याने त्याची नियत चांगली नाही हे लक्षात येतेच आहे. बुध शुक्राच्या (निखीलचा व्यवसाय) राशीत आहे, चंद्राच्या ( निखिलचा घाटा – कुंपणीचा पैसा) एक्सालटेशन आणि फेस मध्ये. स्वत:च्याच टर्म मध्ये आहे. म्हणजे बुधाला (कुंपणी) ला शुक्रा (निखिल चा व्यवसाय) बद्दल प्रेम (?) आहे , कुंपणी ला स्वतळ्चा फाय्दा / निखीलचा तोटा (चंद्र) प्रिय आहे , इथेपर्यंत स्वाभाविकच आहे , कुंपणी नफा कामावण्या साठीच धंदा करत आहे , ठीक आहे म्हणता येईल पण हा बुध मंगळाच्या (निखीलच्या व्यवसायातला नफा तोटा) डीट्रीमेंट मध्ये आहे , इथेच पाचर मारुन ठेवली ना भाऊ. म्हणजे हा बुध काही निखीलला नफा व्हावा यासाठी काही करेल , शक्यताच नाही!

कुंपणी चा पैसा म्हणजे सप्तमाचे (कुंपणी) चे लाभ स्थान म्हणजेच अष्टम स्थान (८) , चंद्र अष्टमेश आहे , अष्टमात कोणीही ग्रह नाही, चंद्र एकटा कुंपणीच्या पैशाचा प्रतिनिधी असेल. हा चंद्र लाभात आहे म्हणजेच निखीलच्या व्यवसायाचा नफा- तोटा स्थान ! चंद्राची इथली उपस्थिती आपल्याला हेच सांगतेय की कुंपणी निखिलच्या  व्यवसायातल्या पैशा वर नजर ठेऊन आहे , निखील ला लुबाडण्याचा हेतु आहे. याला आणखी एक टेस्टीमोनी म्हणजे चंद्र लौकरच नेपच्युन (करार) शी नव-पंचम करणार आहे ! आता पैसा काही स्वत: करार करु शकत नाही म्हणजे या नव-पंचमाचा अर्थ निखिल – कुंपणी मध्ये करार होणार असा घेता येणार नाही तर ह्या कराराचा मसुदा कुंपणी चा जास्तीतजास्त फायदा कसा होईल ते बघूनच तयार केला आहे / जाणार आहे. आपण आधी बघितलेच आहे की  निखिल चा फॉरच्युना सप्तमातच आहे म्हणजे सगळे मिळून निखील ला आर्थिक सापळ्यात अडकवण्यासाठीच चालले आहे!

हा चंद्र कशा अवस्थेत आहे हे बघणे ही मोठे मनोरंजक ठरेल ! चंद्र मंगळाच्या (निखिलच्या व्यवसायातला नफा-तोटा) राशीत, मंगळाच्याच ट्रीप्लीसिटीत, मंगळाच्या टर्म मध्ये आहे , कहर म्हणजे शुक्राच्या (निखिलचा व्यवसाय खुद्द्) डिट्रीमेंट मध्ये आणि स्वत:च्याच फॉल मध्ये आहे. आता इतके सगळे असेल तर निखिलच्या व्यवसायाचा गळा किती शास्त्रशुद्ध पद्धतीने घोटला जाणार आहे याची कल्पनाच केलेली बरी!!

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे निखिल खरोखरीच त्या कुंपणी बरोबर करार करु शकेल का?

या साठी निखिल चा प्रतिनिधी आणि कुंपणीचा प्रतिनिधी यात कोणता तरी योग व्हायला हवा ना ?  निखिलचा प्रतिनिधी  गुरु आहे तर बुध कुंपणीचे प्रतिनिधित्व करत आहे. जरा पाहा ,  बुध सध्या वक्री आहे  आणि वक्री अवस्थेत मागे जात आहे. बुध सध्या  १४ वृषभ ३९ वर आहे तर गुरु १३ कन्या २४ वर आहे . वाटते की हा बुध वक्री असल्याने तो मागे जात १३ अंशावर गेला तर ह्या दोघात नव-पंचम योग होईल !  पण असे होणार का ?  नक्की ? थांबा… ? एफेमेरीज पाहणे ओघानेच आले! बुध सध्या १४ वृषभ ३९ वक्री अवस्थेत आहे, बुध वक्री अवस्थेत १४ वृषभ २० पर्यंत मागे जाईल, नंतर मार्गी होईल आणि पुढे जात राहील आणि शेवटी वृषभ राशी ओलांडेल. गुरु (निखील ) १३ कन्या २४ वर आहे , पण बुध ह्या अंशावर येणारच नसल्याने तो म्हणजे बुध गुरु शी नव –पंचम योग करु शकणार नाही, म्हणजे निखील व कुंपणीत करार होणार नाही !

आता इतके सगळे अ‍ॅनॅलायसीस केल्या नंतर आणि इतके सारखे प्रतिकूल संकेत मिळाल्यावर निखील ला काय सांगायचे ? ‘जा खड्ड्यात उडी मार!” नाही , आपला निखील ला एकच सल्ला असेल .. “ही कुंपणी … हा करार तेरे काम का नहीं  तेरे काम का नहीं ‘

”ही कुंपणी, त्यांचे आश्वासन, त्यांचा करार सगळे गोलमाल आहे, आगे खतरा है । फसवणूकी शिवाय पदरात काहीही पडणार नाही , तेव्हा ह्या कुंपणीची ऑफर धुडकावून लावणे हेच उत्तम.. “

मी निखील ला हेच सांगीतले:

“बापू बिजनेस के लिए… ये तो हानीकारक है । “

माझे रीडींग ऐकून निखील जरा निराश झाल्या सारखा वाटला , त्याच्या मते ही एक चांगली व्यावसायीक संधी आहे आणि थोडी रीस्क घेऊन का होईना या संधीचा लाभ घेतला पाहीजे , बिझनेस म्हणजे रिस्क आलीच , कागदपत्रे निट तपासून घेऊ इ. मी म्हणालो, तू एक प्रश्न विचारलास त्याचे ज्योतिषशास्त्रा नुसार येणारे उत्तर मी तुला दिले… बाकी, निर्णय तुझाच आहे!

या घटनेला पाच -सहा महिने झाले, निखील ने नेमके काय केले, कोणता निर्णय घेताला हे त्याने कळवले नाही. ९० टक्के जातक असा कोणताही फिडबॅक देत नाहीत!

मी पण हे विसरुन गेलो होतो. डिसेंबर मध्ये कामा निमित्त पुण्याला भेट दिली असतात अचानक निखीलची भेट झाली, त्याच्याकडून कळले..

निखील ने माझा सल्ला धुडकावून त्या कुंपणीशी करार करायची तयारी केली, पण करार होऊ  शकला नाही कारण निखिल ला वित्त पुरवठा करणार्‍या बँकेनेच यावर आक्षेप घेतला, कुंपणी ने निखिल वर बराच दबाब आणला तेव्हा निखील सावध झाला, त्याने वेळ मागून घेतला .. दरम्यान कुंपणी स्वत:च कोणत्यातरी आर्थिक  अडचणीत सापडली (प्लुटो इफेक्ट!) आणि निखीलने त्या सगळ्यातून अंग काढून घेतले.

होरारी हे एक अत्यंत पॉवरफुल साधन आहे … निखिल ने जरी होरारीने दिलेला सल्ला फारस मनावर घेतला नसला तरी तो सल्ल किती यथार्थ होता हेच सिद्ध होते..

समाप्त

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Pranesh

  सुहासजी,

  केस स्टडीज् मधील होरारी चार्ट्स भारतीय पद्धतीप्रमाणे सुद्धा देता येतील का? पाश्चात्य पद्धतीप्रमाणे थोडा गोंधळ होतो. तसेच या एफेमेरीज कोणत्या software मधून मिळवता येतील? Paid software असेल तरी चालेल.

  धन्यवाद!

  +1
  1. सुहास गोखले

   श्री प्राणेशजी,

   धन्यवाद. वेस्टर्न होरारी मध्ये मुख्यत: अस्पेक्ट (ग्रहयोग) वर जास्त भर असतो आणि तेही अंशात्मक असे पाहवे लागतात. वर्तुळाकार मांडणी मध्ये असे अंशात्मक ग्रहयोग बघणे कमालीचे सोपे जाते, एका साध्या दृष्टीक्षेपात सगळे अस्पेक्ट्स चटकन नजरेत भरतात , तसेच मोडॅलिटी व इलेमेंट्स चा विचार पण चटकन करता येतो. ग्राफिक्स च्या दृष्टीने ही वर्तुळाकार मांडणी नि:संशय उजवी आहे. होरारीत वापर नसला तरी दोन वेगळ्या व्यक्तींचा पत्रिका एकाच वेळी अभ्यासायच्या असतात (विवाहा भागीदारी ) तेव्हा या दोन कुंडल्या सुपर इंपोज्ड कराव्या लागतात तेव्हा फक्त वर्तुळाकार रचनेतच हे चांगले करता येते. तसेच ट्रनिस्ट्स पण असेच मूळ कुंडली वर सुपर इंपोज करता येतात. मी तर एकाच वेळी तीन प्रकारच्या कुंडल्या सुपर इंपोज्ड करुन अभ्यासतो ! असे अनेक फायदे आहेत.

   आता राहीला प्रश्न सवयीचा ! एकदा सवय झाली की सोपे जाईल. प्रयत्न तर करुन पाहा !

   आणि एका साध्या कागदा वर मी दिलेली पत्रिका आपल्याला सवयीच्या पद्धतीने (नॉर्थ डायमंड, साऊथ स्क्वेअर इ.) काढून अभ्यासता येईलच ना? मी तर म्हणतो तसेच करा , मी स्वत: आज ही तसे करतो. म्हणजे संगणकाच्या स्क्रिन वर आलेली पत्रिका मी कागदावर उतरवून घेतो आणि मगच माझा अभ्यास सुरु करतो. असे केल्याने त्या कुंडलीची आणि आपली जवळीक निर्माण होते !

   एफेमेरीज आपल्याला कोणत्याही अ‍ॅस्ट्रॉलॉजी साफ्टवेअर मार्फत तयार मिळू शकतील. मी के.पी. स्टार (मोफत , लायसेंस फ्री) आणि जानुस (लायसेंस वाले, अंदाजे १५००० रुपये ) ही सॉफ्टवेअर्स वापरतो.

   ईंटरनेट वर सर्च केल्यास पण आपल्याला अनेल वेबसाईट एफेमेरीज मोफत देताना सापडतील .

   कळावे ,

   आपला

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.