“ही गुंतवणूक करण्यात काही धोका नाही ना? गुंतवणूक लाभदायक ठरेल का?”…

निखील मला विचारत होता…

पुढे चालू…

निखीलच्या या प्रश्ना साठी केलेली प्रश्नकुंडली पुन्हा एकदा छापत आहे.

(बापू बिजनेस के लिए… ये तो हानीकारक है । (भाग – १))
nikhil-case-horary-chart

होरारी चार्ट चा तपशील

दिनांक: १९ मे २०१६  वेळ:  २०:४७:०६ स्थळ: गंगापूर रोड , नाशिक

प्लॅसिडस,  ट्रॉपीकल , मीन नोड्स

भाग – १  मध्ये आपण या खेळात सामील असलेली पात्रें (अ‍ॅक्टर्स) निश्चित केली , आता या भूमिकां कोण करणार ते ठरवून टाकू …

निखिल – प्रश्नकर्ता :  धनु लग्न असल्यामुळे ‘गुरु’ निखिलचे प्रतिनिधीत्व करेल. प्लुटो लग्नातच आहे पण सहसा या ग्रहाचा प्रतिनिधी म्हणून वापर होत नाही . चंद्र हा प्रश्नकर्त्याचा निसर्गदत्त प्रतिनिधी असतो. तेव्हा ‘गुरु’ आणि ‘चंद्र’ दोघे  निखिल चे प्रतिनिधीत्व करतील. प्लुटो ला आपण प्रतिनिधीत्व दिले नसले तरी प्लुटो एक डांबिस ग्रह असल्याने त्याच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

कुंपणी: ज्या कुंपणी शी निखील व्यवहार करणार आहे ती सप्तम स्थाना (७) वरुन पहावयास पाहीजे. सप्तमस्थाना वर बुधाची मिथुन रास, सप्तमात कोणी ग्रह नाही, म्हणजे सप्तमेश ‘बुध’ एकटाच कुंपणीचे प्रतिनिधीत्व करेल.

निखिलचा व्यवसाय:  नोकरी – व्यवसाय नेहमीच दशम स्थाना (१०) वरुन पहायचे त्यामुळे दशमेश आणि दशमातले ग्रह निखिलच्या व्यवसायाचे प्रतिनिधीत्व करणार , दशमावर शुक्राची तूळ रास आहे , दशमात कोणी ग्रह नाही, म्हणजे एकटा दशमेश ‘शुक्र’ हा निखिलच्या व्यवसायाचे प्रतिनिधीत्व करेल.

निखीलच्या व्यवसायातील फायदा- तोटा: दशमाचे द्वितीय स्थान म्हणजे एकादश स्थान – लाभ स्थान (११) निखिलच्या व्यवसायाला नफा-तोटा दाखवेल. लाभावर मंगळाची वृश्चिक रास म्हणजे ‘मंगळ’ निखिल च्या व्यवसायातल्या नफा-तोट्या चे प्रतिनिधीत्व करेल. लाभात चंद्र आहे पण चंद्र जातकाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आता चंद्राला इथले प्रतिनिधीत्व नाही मिळणार.

निखिलचा पैसा: लग्नस्थानावरुन  निखिल म्हणजे  पत्रिकेतले द्वितीय स्थान निखिल चा पैसा ! धनस्थानावर (२) शनीची  मकर रास आहे , धनस्थानात कोणताही ग्रह नाही म्हणजे एकटा ‘शनी’ निखिलच्या पैशाचे प्रतिनिधीत्व करणार.

कुंपणी  व निखिल मधला करार / कुंपणीची ऑफर : अर्थातच त्रितिय स्थान (३) ! त्रितिय स्थानावर शनीची कुंभ रास , त्रितिय स्थानात गुरु ची मीन रास लुप्त !  शनी निखिल च्या पैशाचे पण प्रतिनिधीत्व करत असल्याने त्रितीय स्थानातल्या नेपच्युनला ‘करारा’ चे प्रतिनिधीत्व दिले पाहीजे! तसेही त्रितीयात  लुप्त असलेल्या मीन राशीचे स्वामीत्व नेपच्युन कडेच असते!

कुंपणीचा पैसा/ निखिलचा घाटा : सप्तमावरुन कंपनी म्हणजे सप्तमाचे  द्वितीय म्हणजे अष्टम स्थान (८) कुंपणीचा पैसा दाखवेल. हेच अष्टम स्थान निखीलचा ‘घाटा’ पण दाखवते. अष्टम स्थान कर्केत सुरु होते , अष्टमात कोणी ग्रह नाही त्यमुळे अष्टमेश चंद्र कुंपणीच्या पैशाचे प्रतिनिधीत्व करेल. आता चंद्र आधीच जातकाचे प्रतिनिधीत्व करतो त्यामुळे चंद्राकडे आता दोन घटकांचे प्रतिनिधीत्व आले आहे , चंद्र डिस्पुटेड ग्रह झाला आहे, अशावेळी चंद्राचे जातकाचे प्रतिनिधीत्व काढून घ्यावे, म्हणजे आता चंद्र फक्त कुंपणीच्या पैशाचे प्रतिनिधित्व करेल , जातकाचे नाही.

हुश्श ! झाली एकदाची पात्र योजना !

अहो, हीच तर स्टेप अत्यंत महत्वाची असते , इथे चूक झाली तर सगळच फिसकटते.  वाचताना हे सहज , सोपे वाटेल पण काही वेळा हे काम कमालीचे क्लिष्ट बनते , फार गुंतागुंत होते , तशा पत्रिका असलेल्या काही केसेस मी सोडवल्या आहेत , त्याबद्दल नंतर कधी तरी…

आता या पत्रिकेचा जरा बारकाईने अभ्यास करु या…

पत्रिका धनु लग्नाची आहे. होरारी पत्रिकेत जेव्हा धनु रास उदीत असते तेव्हा साधारण असे संकेत मिळतात:

The world is filled with adventure, new things to experience, and, most of all, hope, with this Ascendant. There is an unmistakable faith and enthusiasm with Sagittarius rising. Grand schemes, big promises, and a willingness to explore and experiment are themes, although follow-through is not a strong characteristic of Sagittarius.Weaknesses could include extravagance, impatience, ambivalence, a lack of concentration–not only mentally, but also in habits and behavior generally. Often there is a trace of the gambler. Too frequently the “Archer” will shoot his arrows far wide of the desired mark. Temperamentally, there may be a conflict between respect for convention and your freedom-loving inclinations. This can cause you sometimes to be illogical and even hypercritical. There easily could be something of the snob about you at times.

बदल, प्रेरणा, एखादे नविन ध्येय डोळ्यासमोर असते, अपेक्षा वाढलेल्या असतात आणि ते  लक्ष गाठण्याची एक प्रकाराची घाई झालेली असते , एक अस्वस्थता आलेली असते. नवी आव्हाने स्विकरायची तयारी केली जात असते. जुने जे काही आहे त्याचा त्याग करुन नव्या कडे डोळे लागलेले असतात, मात्र हे करत असताना ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे धावल्या’ सारखी परिस्थिती निर्माण होते.

जेव्हा होरारीत किंवा कन्सलटेशन चार्ट मध्ये धनु लग्न असते तेव्हा जातकाला सध्याचे आयुष्य (लाईफ) निरस , शेवाळे धरलेल्या डबक्या सारखे झाले आहे असे वाटत असते आणि काहीही करुन त्यात बदल घडावायचा निश्चय झालेला असतो.  या प्रक्रियेत नवी वळणें, नवी आव्हाने , नव्या कल्पना, नव्या व्यक्ती, नवी ठिकाणे, नवे व्यवसाय, नवे छंद , नव्या वाटां धुडाळण्या कडे जातकाचा कल असतो. जुन्या पद्धतीने कामे करण्याला जातक कंटाळलेला असतो, काहीही करुन हे दुष्टचक्र भेदून , नवीन काही तरी घडवण्याकडे त्याचा कल असतो.

जातकाची सध्याची मन:स्थिती, जातकाचा समोरचा प्रश्न पत्रिकेतल्या धनु लग्नाने अचुक दाखवला आहे.

चला आता या सगळ्यां पात्रांची (अ‍ॅक्टर्स) ची स्थिती कशी काय आहे ते तपासूया.

या साठीचे डिग्निटी टेबल असे आहे:

nikhil-case-dignity

निखिल:

निखिल चा प्रतिनिधी गुरु आहे. गुरु कन्येत असून नवम स्थानात आहे. गुरु बुधाच्या कन्या राशीत ,  ही कन्या रास बुधाची एक्सालटेशन राशी पण आहे त्यामुळे गुरु (निखिल) जो बुधाच्या (कुंपणी) स्वराशीत व कुंपणी च्या एक्सालटेड (उच्च) राशीत असल्याने निखील कुंपणी च्या फारच प्रेमात पडला आहे इतका की तो त्या कुंपणीच्या कह्यात गेलेला आहे असेच म्हणावे लागेल. पण कन्या रास ही गुरुची  डिट्रीमेंट (बलहीन)  रास असल्याने गुरु (निखिल) बलहीन आहे,  कन्या राशी ही  शुक्राची  फॉल (नीच ) राशी आहे आणि शुक्र तर निखिलचा व्यवसाय ! निखील स्वत: काही काही चांगल्या स्थितीत नाही. त्या कुंपणीचा निखिल वर जबरदस्त प्रभाव पडला आहे दिसतेच आहे , असे असणे वाईट असते अशातला पण भाग नाही पण ह्या स्थितीत काही चांगले घडवण्या साठी / परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी जे बळ लागते ते निखिलपाशी नाही (कारण निखिल स्वत:च्याच डिट्रीमेंट राशी मध्ये आहे) , शिवाय ही बाब निखीलच्या व्यवसायाला सुद्धा घातक ठरु शकते कारण निखील स्वत:च्या व्यवसायाच्या फॉल राशी मध्ये आहे. पण थांबा , इतक्यातच आपल्याला निष्कर्ष बांधता येणार नाही. अजून बरीच बॅटींग शिल्लक आहे , भाऊ !

माझ्या जवळजवळ सगळ्याच नोट्स इंग्रजीत असल्याने हा भाग पण इंग्रजीतच आहे, भाषांतर करावे असे मनापासून वाटते पण वेळ मिळणे मुश्किल आहे. तेव्हा हे इंगरजीतच वाचा व समजून घेण्याचा प्रयत्न करा.

If a planet is situated in a sign which opposes its own it is said to be in detriment, a word which literally means to be harmed or damaged. Since a planet’s own sign is regarded as its stronghold, it follows that the furthest sign from this should be viewed as its most vulnerable position.

Similarly, just as signs of exaltation are said to elevate the planetary influences to their highest level, their opposing signs are known as signs of fall, because here the planets suffer loss of strength and a reduction of potency.

As in taking the Fortitudes of the Planets, great care ought to be had, so their Debilities must be observed with no less care and prudence; wherein I advise you to beware of the Effects or Influence of a Planet when he is in Detriment; rather than when he is in Fall. For a Planet in his Detriment is like a person cast out of all his Estate without hopes of Recovery, whereas the Fall shows but a present subjection unto a misfortune with hopes of Recovery

A planet in detriment or fall is in a precarious condition, more so if it is peregrine or otherwise afflicted. In horary, the use of this symbolism is often remarkably literal and can be used to describe someone who has ‘fallen’ from grace or is incapable of maneuvering a situation to their advantage. In charts drawn to find a missing object, for example, a significator in detriment may suggest the object has been damaged; in its sign of fall it may have physically fallen to the floor. To have many planets debilitated in this way in a nativity is considered a sign of obscurity and low birth. Firmicus described such a person as: wretched, poor, low of birth and constantly plagued by had luck

थिअरी फार झाली, चला पुन्हा एकदा पत्रिके कडे वळू !

या गुरुने (निखिल) पूर्वी म्हणजे तो कन्येत दाखल झाल्या नंतर नेपच्युन (करार) शी प्रतियोग केलेला होता! आता आपण पाहीले आहे की नेपच्युन हा निखिल आणि कुंपणी मधला करार दाखवतो. हा प्रतियोग काय सांगतो? करार झाला? नाही, निखील च्या बोलण्या नुसार त्याने कुंपणी शी करार केलेला नाही, म्हणजे कुंपणी जे काही सांगत आहे ते आश्वासन च आहे आणि  ते निखील पर्यंत पोहोचले आहे हाच त्याचा अर्थ. आणि  इथे कारक ग्रह दस्तुरखुद्द नेपच्युन ( ‘बाई वाड्यावर या ‘ असे खुद्द निळू भाऊच म्हणतात मग काय  बोलणार ?) सामील असल्याने , कुंपणीच्या बोलण्याची / आश्वासनांची  निखीलला भूरळ पडणे स्वाभाविकच आहे. धीस पॉईंट शुड बी नोटेड मिलॉर्ड !

आता कुंपणीच्या त्या तथाकथित  आश्वासनाचा विषय निघलाच आहे तेव्हा लगे हाथ , ते काय आहे , कसे आहे ते पण पाहुन घेऊया कसे?

निखिल आणि कुंपणी तला करार इ. त्रितीय स्थानावरुन पाहायचा. नेपच्युन या कराराचे प्रतिनिधीत्व करत आहेच शिवाय तो स्वत:च त्रितिय स्थानात पण आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावे लागेल.

या नेपच्युनची मोठी दहशत आहे , त्याबद्दल बोलावे तेव्हढे थोडेच. या ग्रहाचे मला फर आकर्षण  आहे . या बद्दल मी बरीच म्हणजे अक्षरश: एक चारशे पानी पुस्तक लिहून होईल इतकी माहीती गोळा केली आहे. त्यातलाच काही भाग आपल्या समोर ठेवतो,  अर्थातच माझ्या जवळजवळ सगळ्याच नोट्स इंग्रजीत असल्याने हा भाग पण इंग्रजीतच आहे, भाषांतर करावे असे मनापासून वाटते पण वेळ मिळणे मुश्किल आहे. तेव्हा हे इंगरजीतच वाचा व समजून घेण्याचा प्रयत्न करा.

Neptune is a synonym for flexibility, governing abstract ideas, illusion and mystery. Naturally, whatever is touched by Neptune is receiving a misty outlook, and the planet’s secretive fog can hide a lot that simple eyes cannot observe.

Being the higher octave of Venus it governs the fine arts, while also all activities that can induce trance such as meditation. Being the planet of illusions, Neptune is highly associated with artificial transcendence towards altered states of consciousness. Alcohol, drugs, medicine and everything that can distort our view on stable reality are being governed by the mystical blue giant. Of course, as every planetary force has its light and dark sides, Neptune can bring through these spiritual enlighten or dependence and self-destruction.

Neptune can suffer from oversensitivity towards such currents. Sometimes, the planet can even lead towards isolation, as it can become unbearable to feel every single person near you in such a strong way. What the planet does is distorting the borders between your own self and the other individual. Neptune does not like and does not have borders; it can smooth them so much that they become non-existent. Through Neptune, one can connect with anything else without an effort – just by being present.

The mystical planet is a rather passive one, having strongly feminine energy and a receptive nature. It is therefore not a surprise that it also rules hypnosis, religious delusions and spiritual manipulation. A person with an adversely aspected Neptune should guide from charlatans who would offer him false perceptions of reality just in order to use him.

As every planet, Neptune also does have his dark side. Lies and (self)-deception, victimization and escapism are just some of the difficult traits that the planet can offer. As easily it can make someone a dreamer and a visionary, so he can make him a procrastinator, a madman or a junkie. Neptune rules masochism and submission; when these two apply to the non-sexual aspects of one’s life he can become very passive. Becoming a marionette of other people or of the random events of your surroundings, does not really seem the wisest life perception.

Many times, Neptune is operating as a malefic because it has low guard towards external interventions; the planet is famous for distorting any information connected with it.

मुळात हा नेपच्युन गुरुच्या मीन राशीत आहे आणि मीन रास नेमकी ‘करार – मदारा’ च्या त्रितिय स्थानात लुप्त आहे . जेव्हा एखादा ग्रह असा लुप्त राशीत असतो तेव्हा तो बर्‍याच गोष्टी लपवून ठेवत असतो.

Every time there is an intercepted house ruling a significant part of the horary; you can count on the fact there is always some very important, secretive activity taking place somewhere. It is almost the same as the 12th house energy, indicating that something is deceiving, coloring, hiding or masking the real truth of the matter.

 

नेपच्युन गुरुच्या (निखिल) मीन राशीत, शुक्राच्या (निखिलचा व्यवसाय) एक्सालटेशन राशीत , मंगळाच्या (निखीलच्या व्यवसायातला नफा- तोटा) ट्रिप्लीटीत! हे पाहीले तर वाटते की हा करार निखील साठी अगदी ‘गोल्डन पास’ आहे !! पण पुढे पहा हा नेपच्युन (करार) बुधाच्या (कुंपणी) च्या डिट्रीमेंट आणि बुधाच्याच फॉल मध्ये आहे . याचे दोन अर्थ निघू  शकतात.
१)  हा करार निखिलला वरदान आणि कुंपणी साठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरणार आहे. पण मंडळी असे कधी होईल का? ती ‘कुंपणी’ काय निखिल सारख्या लघु उद्योजकाचे भले व्हावे म्हणून तळमळत आहे , कधी एकदा ‘करार’ करतो आणि निखिल ला मालामाल करुन टाकतो असे त्या कुंपणीला झाले आहे का ? असे होणार नाही. कुंपणी स्वत:चा फायदा पहील्यांदा बघणार मग कोठे निखिल भाऊंचा विचार. फायदा झाल्याशी मतलब मग असे अनेक निखिल वापरुन फेकून द्यावे लागले तर काय चुकले?

२) कराराचा प्रतिनिधी नेपच्युन बुधाच्या (कुंपणी) च्या डीट्रीमेंत आणि फॉल मध्ये असल्याने कुंपणी हा करार करण्याच्या स्थितीत नाही किंवा हा करार कुंपणी करणार नाही.

ह्या दुसर्‍या शक्यतेचा आपण स्वतंत्रर विचार करु .

आत्ता पर्यंत केलेल्या अ‍ॅनॅलायसीस वरुन प्राथमिक निष्कर्ष काय ?
अगदी सरळ , स्वच्छ आहे : हा करार , हे आश्वासन , ही ऑफर , हे डील जे काही असेल ते सगळे काही फसवणूक करणारे आहे , एखादी महत्वाची माहीती / कलम निखील पासुन दडवून ठेवण्यात आले आहे (मीन राशी लुप्त आहे आणि कराराचा प्रतिनिधी नेपच्युन याच लुप्त राशीत आहे!) किंवा कराराच्या काही बाबीं पुरेशा स्पष्ट भाषेत नाहीत , कराराचा असुदा असा तयार केला गेला अहे / केला जाईल की उद्या कंपनी त्यातून स्वत:च्या फायद्या साठी कसाही , कोणताही अर्थ काढू शकेल अशी मखलाशी केली असण्याची मोठी शक्यता आहे

आता करार करणे , आर्थिक गुंतवणूक करणे हे सर्व निखिल त्याच्या व्यवसाया साठी करणार असल्याने निखिलचा व्यवसाय काय म्हणतो ते पाहणे महत्वाचे आहे…..

क्रमश:

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.