नीच्या विदशेत घटना घडण्याची शक्यता फार कमी आहे. तेव्हा आपल्याला ही बुधाची अंतर्दशा सोडून द्यावी लागेल (नंतर वाटल्यास पुन्हा या शनी विदशेचा विचार करता येईल)

शनी विदशा संपताच बुधाची अंतर्दशा पण संपणार. त्यानंतर केतु ची अंतर्दशा चालू होईल.

आता या केतु अंतर्दशेत तरी घटना घडणार का ?

या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा:

बळीचा बकरा – भाग २

बळीचा बकरा – भाग १

 

अथर्वचा , प्रश्न नेमका मला समजला ती वेळ घेऊन केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.

 

प्रश्न नोकरी जाणार का ?

०६ नोव्हेंबर २०१६, २०:३०:२३ गंगापूर रस्ता – नाशिक 

 

 

 

 

 

 

 

 

बुधा नंतर केतु ची अंतर्दशा येणार ती १७ जानेवारी २०१७ ते २५ मे २०१७ अशी असणार आहे.

या केतु चे कार्येशत्व तपासु.

केतु भाग्यात ( ९) , केतुला राशीचे स्वामीत्व नसते, केतु राहु च्या नक्षत्रात राहु त्रितिय (३) स्थानात.

केतु शनीच्या राशीत असल्याने शनीचे कार्येशत्व पण केतुला मिळणार आहे.

शनीचे कार्येशत्व आपण मागच्या भागात पाहीले आहे :

शनी: ५ /  ६ / १ , २ , ५ / ९ , १०

शुक्र आणि शनी , केतु च्या केंद्र योगात आहेत , यातल्या शनी चा विचार घेतला आहे , शुक्राचा केंद्र योग १५ अंंशा इतका वाईड असल्याने त्याचा विचार इतक्यातच करायला नको  , केतु कोणाही ग्रहाच्या युतीत नाही म्हणजे केतु चे कार्येशत्व असे असेल:

केतु:  ३ / ९   राशी स्वामी – शनी ५ / ६ / १, २, ५ / ९, १०  

 

केतु च्या माध्यमातुन नोकरीच्या विरोधी ३ , ५ , ९ ही  सर्व स्थाने ही कार्यांन्वित होत आहेत . म्हणजे या केतु अंतर्दशेत अथर्व ची  नोकरी जाण्याची शक्यता जास्त आहे. शनी च्या माध्यामातुन ६, १० ही स्थाने प्रभावित होत असली तरी त्यांचा दर्जा दुय्यम आहे.

 

या अंतर्दशा स्वामी केतु चा सब बघुया . केतु स्वत:च्याच सब मध्ये आहे !  केतु स्वत:च्याच ‘सब’ मध्ये असल्याने  या केतु अंतर्दशेत अथर्वची नोकरी जवळ जवळ जाणार असे दिसते !

१७ जानेवारी २०१७ ते २५ मे २०१७ या केतु  अंतर्दशा कालावधीत अथर्व ची नोकरी जाईल असा निष्कर्ष  काढायचा का?

थांबा!

आपण अजुन ट्रांसिट्स तपासले नाहीत. बंदुकीत काडतुस असुन भागत नाही तर गोळी उडवण्यासाठी ट्रिगर दाबायला लागतो, तो नसेल तर गोळी उडणार नाही. जरी महादशा अंतर्दशा स्वामींनी नोकरी जाणार असा स्पष्ट कौल दिला असला तरी ट्रांसिट च्या रुपातला ट्रिगर मिळाल्या शिवाय घटना घडणार नाही.

 

 

प्रश्नकुंडलीत ट्रांसिट पाहताना ,

जर घटना दिवसभरात घडेल असेल असा अंदाज असेल तर आपण लग्नाचे भ्रमण तपासतो, महिन्याभरात होऊ शकणार्‍या घटनां साठी चंद्राचे भ्रमण आणि घटना काही महिन्यात पण एक वर्षाच्या आत घडण्याची शक्यता असल्यास रवी चे भ्रमण तपासायचे , जर घटना घडायला वर्षा पेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर  गुरु चे भ्रमण तपासावे लागते. पण मला वाटते हे गुरु चे भ्रमण बघण्याची आवश्यकता नाही , कारण प्रश्नकुंडलीचा आवाका साधारणपणे काही महीने इतकाच असतो , जास्तीत जास्त एक वर्ष , या पेक्षा मोठा कालावधी विचारात घेऊ नये. 

आपली अपेक्षित घटना सहा महिन्यात (१७ जानेवारी २०१७ ते २५ मे २०१७) घडणार असल्याने आपल्याला रवी चे भ्रमण तपासले पाहीजे.

हे भ्रमण तपसाताना, रवी आपण निवडलेल्या महादशा- अंतर्दशा स्वामींच्या राशी – नक्षत्रातुन भ्रमण करतो का ते तपासले पाहीजे. जर असे ट्रांसिट मिळाले नाही तर घटना त्या अंतर्दशेत घडणार नाही , पुढची अंतर्दशा पाहावी लागेल किंवा घटना घडणार नाही असा अर्थ निघतो.

आपला महादशा स्वामी रवी आहे आणि निवडलेली अंतर्दशा केतु ची आहे म्हणजे आपले कॉम्बीनेशन असे असू शकते:

रवीची सिंह रास आणि केतु चे नक्षत्र

किंवा

केतु ला स्वत:ची राशी नसल्याने तो ज्या  राशीत आहे त्या राशी स्वामीची रास आणि रवी चे नक्षत्र. केतु कुंभेत आहे म्हणजे शनीच्या

मकर / कुंभ  राशी आणि रवी चे नक्षत्र.

आपला अपेक्षित कालावधी १७ जानेवारी २०१७ ते २५ मे २०१७  असा आहे या काळात रवी गुरुची  धनु , शनी च्या मकर – कुंभ, गुरु ची मीन, मंगळाची मेष , शुक्राची वृषभ या राशींतुन भ्रमण करेल.

या पैकी गुरु , मंगळ आणि शुक्र आपल्या दशा – अंतर्दशा साखळीत नसल्याने त्यांच्या राशी आपल्या उपयोगाच्या नाहीत.

शनीच्या मकर आणि कुंभे पैकी मकरेत रवीचे नक्षत्र आहे ! म्हणजे मकर रास – रवीचे नक्षत्र ही साखळी जुळते .

रवी मकरेत १४ / १५ जानेवारीला दाखल होतो आणि सुरवातीचेच नक्षत्र रवीचे आहे , मकर रास – रवी चे नक्षत्र हा कालावधी १४ / १५ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान येतो.

या कालवधीत रवी महादशा- केतु अंतर्दशा- केतु विदशा अशी साखळी  पूर्ण होत आहे !

एखाद्या ग्रहाची महादशा आणि त्याचीच अंतर्दशा  किंवा  एखाद्या ग्रहाची अंतर्दशा आणि त्याच ग्रहाची विदशा नेहमीच बलवान असतात आणि घटना घडवून आणतात असा नेहमीचाच अनुभव असल्याने . आपल्याला रवी महादशाा- केतु अंतर्दशा- केतु विदशा  असा विचार करायला हरकत नाही.

केतु ची विदशा १७ जानेवारी ते २१ जानेवारी २०१७ अशी आहे.  म्हणजे  १७  जानेवारी २०१७ ते २१  जानेवारी २०१७  या कालावधीत अथर्व ची नोकरी जाईल हे नक्की .

अजून काही धागेदोर मिळतात का ते पाहू.

जातक नोकरी सोडत नाही आहे तर त्याला बळजबरी राजीनामा द्यायला लावून नोकरीतून काढून टाकणार आहेत (आय . टी . मध्ये असेच असते  !) म्हणजे आधी विचार केला त्याप्रमाणे  नोकरी जाण्याच्या वेळी  असणारे दशा- अंतर्दशा- विदशा स्वामी   कदाचित सुक्ष्मदशा स्वामी  मिळून ५, ९, ३ बरोबरच ,८ आणि १२ चे बळकट कार्येश असले पाहीजेत.

दशा स्वामी रवी:   पंचमाच काय तो कार्येश आहे तो ही ‘ब’ दर्जाचा.

अंतर्दशा स्वामी केतु :  ३ आणि ९ चा ‘अ’ दर्जाचा  कार्येश आहेच शिवाय राशी स्वामी शनीच्या  माध्यमातुन पंचमा (५) चा पण ‘अ’ दर्जाचा कार्येश होत आहे.

केतुुनेे बर्‍याच बॉक्सेस चेक केल्या असल्या तरी ८ आणि १२ चे काय ? अथर्व च्या केस मध्ये ८ व १२ ला महत्व आहे !

मग केतु ची अंतर्दशा  / विदशा अशीच सोडून द्यायची ?  अजिबात नाही ! घटना केतुच्याच अंतर्दशेत आणि केतुच्याच विदशेत घडणार आहे हे नक्की पण आपल्याला केतु च्या विदशेतच  ८, १२ चा जोरदार कार्येश ग्रहाची सुक्ष्मदशा  निवडायची .

मग असे कोण ग्रह आहेत जे ८, १२ चे जोरदार कार्येश आहेत?

व्यय (१२) स्थानाचे कार्येश आपण पाहिले. शुक्र आणि मंगळ !

अष्टम स्थानाचे काय ?

अष्टम (८) स्थानात चंद्र आणि  मंगळ अंशात्मक युती आहे,  गुरु अष्टमेश आहे, मंगळाच्या नक्षत्रात ग्रह नाहीत आणि गुरु चंद्राच्या नक्षत्रात आहे. भावेश गुरुच्या नक्षत्रात  रवी , बुध जोडगोळी आहे.

म्हणजे अष्टम (८) स्थानाचे एकूण कार्येश ग्रह असे आहेत:

गुरु /  चंद्र , मंगळ  / रवी , बुध  / गुरु

याचा विचार करता चंद्र  आणि मंगळ हे दोघेही ५ , ८ , १२  या स्थानां चे बळकट कार्येश आहे , यांची जोड जर ५, ९, ३ च्या ‘अ’ दर्जाच्या कार्येश असलेल्या केतू ला लाभली तर घटना नक्की घडणार !! गुरु देखील चालला असता पण त्याचा सुक्ष्मदशा कालावधी आपल्याला हव्या असलेल्या ट्रांसीट कालवधी मध्ये येत नाही.

म्हणजे रवी महादशा – केतू  अंतर्दशा – केतू विदशा – चंद्र सुक्ष्मदशा

किवा

रवी महादशा – केतू  अंतर्दशा – केतू विदशा – मंगळ सुक्ष्मदशा 

अशी साखळी जमू शकते .

ट्रंसिट चा विचार केला तर

रवी महादशा – केतू  अंतर्दशा – केतू विदशा  ही साखळी जुळते आहेच.

रवी महादशा – केतू  अंतर्दशा –  केतु विदशा आणि चंद्र  किंवा मगळ  विदशा  हा कालवधी येतो  २० जानेवारी  २०१७ . 

 

१७  जानेवारी २०१७ ते २१  जानेवारी २०१७  या कालावधीत अथर्व ची नोकरी जाईल !

 

आणि झाले ही तसेच !!!

शुक्रवार , २० जानेवारी, २०१७ ला अथर्वची नोकरी गेली , म्हणजे त्याच्या कडून सक्तीने राजीनामा लिहून घेण्यात आला.

 

समाप्त 

 

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.