प्लंबर ही काय जमात आहे हे आपल्याला वेगळे सांगायला नकोच !

 

प्लंबर बोलावायची वेळ कोण्णा कोण्णा वर येऊ नये म्हणतात ! पण माझ्या वर आली !

माहीतीत जेव्हढे म्हणून प्लंबर होते त्यांना संपर्क करुन झाला पण ‘आलोच” . ‘निघालोच” असे म्हणणारा एक ही प्लंबर काही फिरकला नाही. शेवटी एका प्लंबर ला दया आली, “सर, आज नाही जमणार पण उद्या नक्की पहीले काम तुमचेच करतो. काही काळजी करू नका सर, आजच्या दिवस जरा कळ काढा’

हा ‘ उद्या’ उजाडला , सकाळचे १२ वाजले प्लंबर सायबांचा पत्ता नाही, फोन केला तर ‘नॉट रिचेबल” , आधीच तुंबलेल्या बाथरुम ने वैताग दिला होता त्यात हा प्लंबर ‘नॉट रिचेबल”

मनात विचार आला ‘हीच ती वेळ , हाच तो क्षण प्रश्न कुंडली मांडायचा”

 

“प्लंबर आज तरी येईल का? केव्हा ?”

दिनांक: 28 फेब्रुवारी 2018

वेळ: 12:22:07 (दुपार)

स्थळ: गंगापूर रोड , नाशिक

जिओसेंट्रीक, ट्रापीकल, प्लॅसिडस, मीन नोडस

 

 

पाश्चात्य होरारी अ‍ॅनॅलायसीस मध्ये काही प्रारंभिक तपास करावा लागतो त्यात जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , कसा आहे, शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि विषयाचे (वस्तूचे) प्रतिनिधी ठरवावे लागतात.

चला तर मग, आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करू या.

जन्मलग्न:

जन्मलग्न १४ मिथुन ५१ असे आहे त्यामुळे ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ हे दोन्ही फॅक्टर्स निकालात निघाले.

(ज्यांना या ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स:

चंद्र  सिंहेत १५:५८ अंशावर आहे,  सिंहेत असे पर्यंत हा चंद्र  गुरु  आणि मंगळाशी शी योग करणार असल्याने चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ नाही, काळजी नको!

(ज्यांना चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

शनी:

शनी सप्तमात आहे, , सप्तमात शनी ही खास दखलपात्र ग्रहस्थिती असते पण इथे मी स्वत:च स्वत:साठी प्रश्न विचारला असल्याने त्यामुळे या सप्तमातल्या शनीची काळजी करण्याची आवश्यकता नाही.

(ज्यांना सप्तमातल्या शनी बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

चार्ट किती रॅडीकल आहे ते पाहा, बाथरुम अष्टम स्थाना (८) वरुन पाहतात , या पत्रिकेत ‘प्लुटो’ सारखा विध्वंसी ग्रह अष्टम स्थानात असणे हे बाथरुम मध्ये मोठ्या समस्या आहेत याचेच द्योतक आहे.

सर्व प्रथम या केस मध्ये सक्रिय असलेल्या / असू शकणार्‍या सर्व पात्रांची – अ‍ॅक्टर्स ची एक यादी बनवूया.

अशी कोण कोण पात्रें  – अ‍ॅक्टर्स आहेत?

 1. मी
 2. प्लंबर महाराज

चला आता ही पात्रें आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह कोण आहेत ते तपासूया.

मी:

प्रश्नकर्ता लग्न भावा (१) वरून बघतात, या चार्ट मध्ये मिथुन लग्न आहे म्हणजे मिथुनेचा स्वामी ‘बुध’  प्रश्नकर्त्याचे म्हणजेच माझे प्रतिनिधित्व करणार, लग्नस्थानात कोणताही ग्रह नाही. ‘चंद्र’ हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतो.

बुध आणि चंद्र हे सर्व माझे प्रतिनिधित्व करतील. बुधा सारखा ग्रह माझ्या सारखा हुषार (?) , चौकस (?), चतुर (?) , लेखक – वक्ता (?) व्यक्तीचा प्रतिनिधी असणे हे हा चार्ट रॅडीकल असल्याची एक खूण.

प्लंबर महाराज:

प्लंबर, रंगारी, कार मेकॅनिक , इलेक्ट्रीशन ज्याला आपण ट्रेड्सन / हॅडीमॅन / आर्टीसान / क्राफ्ट्समन / worker in a skilled trade / कारागीर म्हणतो , ज्यांना आपण मजुरी वर काम देतो अशा व्यक्ती नेहमीच षष्ठम (६) स्थानावरुन पाहतात. षष्ठेश आणि पष्ठम स्थानातले ग्रह एकत्रित पणे प्लंबर महाराजांचे प्रतिनिधित्व करतील.

षष्ठम स्थानाची सुरवात ११ वृश्चिक ०४  वर आहे , म्हणजे मंगळ हा ं षष्ठेश म्हणून प्लंबर महाराजांचे प्रतिनिधित्व करणार. गुरु षष्ठम स्थानातच असल्याने मंगळ आणि गुरु हे दोघेही प्लंबर महाराजांचे प्रतिनिधित्व करतील.

प्रमुख पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे अभिनेते निश्चित झाले!

आता प्लंबर महाराज जर दर्शन देणार असतील तर प्लंबर महाराजांचे प्रतिनिधी (मंगळ , गुरु ) आणि माझे प्रतिनिधी (बुध , चंद्र ) ) यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा.

प्रथम आपण माझा प्रतिनिधी चंद्र आणि प्लंबर महाराजांचे प्रतिनिधी मंगळ / गुरु यांच्यात काही योग होतात का ते पाहू.

 1. चंद्र सिंहेत १५:५८ अंशावर आहे, मंगळ १९ धनू ४९ वर असल्याने त्यांच्यात ४ अंशात नव-पंचम योग होणार आहे.
 2. चंद्र सिंहेत १५:५८ अंशावर आहे, गुरु २३ वृश्चिक ०५ वर असल्याने त्यांच्यात ८ अंशात केंद्र योग होणार आहे.

आता आपण माझा दुसरा प्रतिनिधी बुध आणि प्लंबर महाराजांचे प्रतिनिधी मंगळ / गुरु यांच्यात काही योग होतात का ते पाहू.

 1. बुध १८ मीन ५४ वर आणि मंगळ १९ धनू ४९ वर आहे , या दोघांत केंद्र योग होणार आहे आणि हे अंतर अवघे १ अंशाचे आहे, बुध हा मंगळा पेक्षा जलद असल्याने तो हे अंतर भरून काढून मंगळाशी केंद्र योग करेल, बुध नजिकच्या काळात वक्री होणार नसल्याने हा केंद्र योग विना अडथळा होणार आहे.
 2. बुध १८ मीन ५४ वर आणि गुरु २३ वृश्चिक ०५ वर आहे , या दोघांत ५ अंशात नव-पंचम योग होणार आहे , बुध हा गुरु पेक्षा जलद असल्याने तो हे अंतर भरून काढून गुरु शी नव – पंचम योग करेल, बुध नजिकच्या काळात वक्री होणार नसल्याने हा  नव – पंचम योग विना अडथळा होणार आहे. पण हा योग होण्यापूर्वी बुध २१ मीने वरच्या शुक्राशी युती करत असल्याने या बुध – गुरु नव-पंचमाचे महत्त्व कमी होते.

माझी आणि प्लंबर महाराजांची भेट होणार या बद्दल आपल्याला तीन (तसे पाहीले तर चार !) टेस्टीमोनीज मिळाल्या आहेत म्हणजे भेट होणारच आणि इतक्या टेस्टीमोनीज असल्याने शिवाय बुध – मंगळ योग इतक्या नजदीक आल्याने ही भेट अगदी लौकर म्हणजे आजच होणार हे पण नक्की!

हुश्श्य !

हे प्लंबर महाराज आज दर्शन देणार पण केव्हा?

होरारीत कालनिर्णया साठी चंद्रा चा वापर करतात.  इथे चंद्र (मी) आणि मंगळ (प्लंबर महाराज) यांच्यात अवघ्या ४ अंशात नव-पंचम होणार आहे , इथे आपले स्केल चार मिनिटे – चार तास – चार दिवस असे असू शकते , चार मिनिटे अशक्यच आणि चार दिवस पण नाही (इतका वेळ कोण थांबेल, दुसर प्लंबर बोलावू ) त्यामुळे चार तास हे स्केल मला योग्य वाटले ,

प्रश्न विचारला आहे १२:२२ दुपार म्हणून प्लंबर महाराज साधारण पणे १६:२२ म्हणजेच दुपारी साडे चार च्या सुमारास दर्शन देतील !

हे सगळे ठीक पण माझी आणि प्लंबर महाराजांची भेट होणार या बद्दल चार टेस्टीमोनी आणि बुधाचे मिथुन लग्न त्यामुळे वाटले प्लंबर ला दुसर्‍यांदा बोलावायची वेळ येणार !

बुध (मी) व हा पहीला प्लंबर तर भेटणार आहोतच पण त्यानंतर बुध ( मी) अष्टम (८) (गटार , मोरी इ.) स्थानातल्या प्लुटो (शेवट , अंत ) शी लाभ योग होत आहे. त्यानंतर बुध (मी) आणि शुक्र (व्ययेश !)  यांच्यात युती , आणि शेवटी बुध (मी) आणि गुरु (दुसरा प्लंबर ?) यांच्यात नव-पंचम होणार आहे !

म्हणजे आता येऊ घातलेले प्लंबर महाराज ४:३० च्या सुमारास येतील , काम करतील पण त्यात लगेचच समस्या मिर्माण झाल्याने पुन्हा एकदा त्याच किंवा दुसर्‍या प्लंबर ला बोलवावे लागणार !!

काय करणार ‘आलिया भोगासी असावे सादर’

 

आता याच प्रश्नाचे उत्तर नक्षत्र पद्धती नुसार मिळते का ते पाहू.

 

या प्रश्ना साठी केलेली निरयन , प्लॅसीडस पत्रिका शेजारी दिली आहे , कुंडलीचा तपशील ( दिनांक, वेळ, स्थळ) पाश्चात्त्य कुंडली प्रमाणेच आहे.

 

 

नक्षत्र पद्धती नुसार ग्रहांचे कार्येशत्व आणि भवांचे कार्येश ग्रह यांचा तक्ता ( टेबल)

 

 

सर्व प्रथम आपण ठरवूया की घटना घडणार आहे का नाही , इथे आपल्याला प्लंबर महाराजांची प्रतिक्षा आहे आणि हे महाराज सकाळी येणार होते ते अजून आलेले नाहीत, तेव्हा प्लंबर आज येणार का हा खरा प्रश्न आहे , प्लंबर आज येईल , नाही तर उद्या किंवा महाराज येणारही नाहीत, मग दुसरा प्लंबरचे पाय धरावे लागतील.

फार लांबचे न पाहता , आपण आजच्या पुरतेच पाहू , उद्याचे उद्या !

प्रश्न माझा स्वत:चा आहे म्हणुन मी लग्न स्थान (१)  विचारात घेतले,  साधारणत: अशा प्रकाराच्या प्रश्नांसाठी लाभ स्थान विचारात घेण्याचा प्रघात आहे पण इथे ‘इच्छापूर्ती ‘ असे काही भव्य दिव्य , भारदस्त म्हणावे असे काही अपेक्षित नसल्याने मी सरळ माझ्या स्वत:शी निगडीत असलेले प्रथम स्थान (१) विचारात घेतले. आता प्लंबर महाराज कोणत्या स्थाना वरुन पाहावयाचे ? सामान्यत: प्लंबर , इलेक्ट्रीशन , रंगारी अशा सेवा पुरवणार्‍या व्यक्ती धड नोकर नसतात की तिर्‍हाईत व्यक्ती , तसेच अशी लहान सहान कामे करणार्‍या व्यक्ती कंत्राटदार , सल्लागार अशा गटात पण मोडत नाहीत. त्या मुळे यांचा विचार कोणत्या भावा वरून करायचा हा वादाचा मुद्दा आहे. पण बहुतांश ज्योतिर्विद या साठी षष्ठम (६) भाव वापरतात , माझा ही हाच अनुभव असल्याने मी प्लंबर महाराजांना (६) भाव बहाल केला.

इथे आपण एक सरळ साधा तर्क वापरणार आहोत तो म्हणजे प्रश्नकर्त्याच्या भावाचा ‘सब’ हा प्रश्ना संदर्भातल्या व्यक्ती/ वस्तु साठी निश्चित केलेल्या भावाचा कार्येश असेल तर प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असते.

इथे मी म्हणजे लग्न भाव त्याचा सब आहे ‘शुक्र’ , शुक्र मार्गी आहे आणि तो मार्गी गुरु च्या नक्षत्रात आहे ,
शुक्र दशमात (१०) आहे , शुक्राच्या राशी लग्न (१) आणि षष्ठम (६) स्थानावर आहेत , शुक्र गुरु च्या नक्षत्रात , गुरु षष्ठम (६) स्थानात , गुरु च्या राशी अष्टम (८) आणि लाभ (११) स्थानांवर म्हणजे

शुक्र : ६ / १० / ८ , ११ / १ , ६

लग्नाचा सब शुक्र प्लंबर महाराजांच्या षष्ठम (६) स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे , लाभाचा (११) म्हणजेच इच्छापूर्तीचा कार्येश आहे आणि ‘बाथरुम / मोरी ‘ च्या अष्टम () चा ही कार्येश आहे  आणि माझा स्वत: चा () पण कार्येश आहे!

म्हणजे प्लंबर महाराज आज येणार , आजच येणार !

आज येणार हे ठीक पण केव्हा?

प्रश्न विचारला आहे दुपारी १२:२२ वाजता , प्लंबर आला तर संध्याकाळ पर्यंत सहा च्या आत , म्हणजे अवघ्या काही तासांचा मामला , आता इतक्या कमी वेळेतल्या कालनिर्णया साठी काय वापरायचे ?

इतक्या कमी कालावधी साठी दशा विदशांची साक्ष काढणे अव्यवहार्य नव्हे तर हास्यास्पद ठरेल ! मग चंद्राचे भ्रमण ? ते ही वापरता येणार नाही कारण २१ कर्क ५६ वर असलेला चंद्र अजून १६ तास तरी नक्षत्र आणि रास बदलणार नाही. मग आता काय करायचे ?

आपण आता सरळ रुलिंग प्लॅनेट्स वापरुया !!!!

“सुहास बाबु , आप और ‘रुलिंंग प्लॅनेट्स, ये मै क्या सुन रहाँ हूँ ?”

“जानी , हम जिस प्लॅनेट की तरफ ऊंगली उठाते है वही रुलिंग प्लॅनेट बन जाता है

हमको मिटा सके ये रुलिंग प्लॅनेट में दम नहीं
हमसे रुलिंग प्लॅनेट ख़ुद है , रुलिंग प्लॅनेटसे हम नहीं “

 

असो.

प्रश्नवेळचे रुलिंग प्लॅनेट्स असे आहेत:

लग्न नक्षत्र स्वामी : चंद्र
लग्न राशी स्वामी : शुक्र
चंद्र नक्षत्र स्वामी : बुध
चंद्र राशी स्वामी : चंद्र
दिन स्वामी: बुध
कर्क राशीत असल्याने: राहू

प्लंबर आजच येणार असा संकेत असल्याने , जन्मलग्नाचे ट्रांसिट तपासायला हवे.

प्रश्न विचारते वेळी वृषभ लग्न 20 अंशावर आहे, घटना घडण्याचे वेळचे लग्न शुक्र- चंद्र – शुक्र म्हणजे शुक्राच्या सब मध्ये आहे, रुलिंग प्लॅनेटस मध्ये चंद्र , शुक्र आहेत पण शुक्र दोन वेळा आलेला चालणार नाही.

या वृषभ लग्नातले पुढचा एकमेव सब ‘रवी’ चा शिल्लक आहे . शुक्र – चंद्र – रवी असे ही चालणार नाही कारण रवी रुलिंग प्लॅनेटस मध्ये नाही. या नंतर वृषभ लग्नातले मंगळाचे नक्षत्र सुरु होते मंगळ रुलिंग प्लॅनेटस मध्ये नाही. त्या मुळे वृषभ लग्न चालू असे तो पर्यंत प्लंबर महाराज प्रकटणार नाहीत.

पुढचे लग्न ‘मिथुन’ . मिथुनेचा बुध आपल्या रुलिंग प्लॅनेटस मध्ये आहेच, मिथुनेत एकूण तीन नक्षत्रें मंगळ , राहू , गुरु आहेत, या पैकी मंगळ , गुरु रुलिंग प्लॅनेटस मध्ये नाहीत . म्हणजे मिथुन लग्नातले फक्त राहू नक्षत्र आपल्या उपयोगाचे आहे. ‘बुध – राहू – शुक्र’ असे त्रिकूट जमवता येईल , हा कालावधी 14:07:05 ते 14:16:59 असा येतो. (इथे बुधाच्या राशीत , राहू च्या नक्षत्रातला शुक्राचा सब निवडला कारण शुक्र हा लग्ननक्षत्र स्वामी म्हणून चंद्रा पेक्षा वरच्या दर्जाचा आहे)

रुलिंग प्लॅनेट्स मध्ये बुध दोनदा आल्याने , बुधाचे वर्चस्व दिसते. बुधा चे कारकत्व पाहीले तर ‘सगळे दोन दोन वेळा’ असा प्रकार नेहमी असतो त्यामुळे मी पुढचा एखादा कालावधी मिळतो का ते पहायचे ठरवले.

पुढचे लग्न ‘कर्क’ . कर्केत गुरु , शनी आणि बुधा ची नक्षत्रे आहेत , गुरु आणि शनी रुलिंग प्लॅनेटस मध्ये नाहीत. बुधाचे नक्षत्र चालू शकेल. यातला शुक्राचा सब निवडता येईल.
कर्केत म्हणजेच चंद्र – बुध – शुक्र असे ही त्रिकुट जमेल हा कालावधी 16:40:11 ते 16:50:04 असा येतो.

म्हणजे आपल्याला 14:07:05 ते 14:16:59 आणि 16:40:11 ते 16:50:04 असे दोन कालावधी मिळाले आहेत.

फार खोलात जायला नको, प्रश्न वेळी वृषभ हे स्थिर लग्न असल्याने मी सरळ दुसरा म्हणजे 16:40:11 ते 16:50:04 हा कालावधी निश्चित केला.

माझे अनुमान:

प्लंबर महाराज आजच कृपा करणार आहेत
साधारण 4:४५ च्या सुमारास त्यांचे चरकमल माझ्या घराला लागणार आहेत !

पडताळा:

बरोबर 14:14 ला ( बुध – राहू- शुक्र – बुध) प्लंबर महाराजांनी फोन करुन “आज नक्की येणार , जरासा उशीर होईल पण आजच येणार’ असे कळवले !

दारावरची बेल वाजली 14:43 ! ‘ सॉरी , सर जरा लेट झाला ” प्लंबर महाराज ! (चंद्र – बुध – शुक्र – राहू )

पाश्चात्य होरारी अ‍ॅनालायसीस मार्फत आपल्याला 4 तासांचा कालावधी म्हणजेच 12:22 + 4 = 16:22 असा कालावधी मिळाला होताच !
आणि आपण जो दुसरा तर्क केला होता ना अगदी तस्सेच झाले, या प्लंबर माहाराजांनी केलेले काम तकलुपी निघाले, समस्या पुन्हा उत्पन्न झाली, अवध्या चार दिवसात मला दुसरा प्लंबर ( हा लगेच आला , गुरु इफेक्ट!) बोलवायला लागला !

 

शुभं भवतु 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. santosh

  सुहासजी परत एकदा चांगली अभ्यासनीय प्रश्न कुंडली आहे. तुमच्या केस स्टडीच्या निमित्ताने वेस्टर्न होरारी बद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
  तुमच्या केस स्टडी खूपच descriptive असतात त्यामुळे बरेच गोष्टी समजतात धन्यवाद. 🙂

  संतोष सुसवीरकर

  0
 2. sushant

  श्री सुहास गोखले जी,

  मी सध्या ज्योतिष शिकत आहे,तुमचे लेख मी वाचले. हजारो नियम सांगण्यापेक्षा एक केस स्टडी सोडवून दाखवलेली उपयोगी पडते. त्यामुळे तुमचे आभार.
  तुमच्या लेखावरून मी एक प्रश्न सोडवला व तो अचूक आला. मी कसा सोडवला हे सांगतो त्यात अजून काही मार्गदर्शन केले तर आभारी राहीन.
  माझ्या मित्राने नवी कार घेतली व मला म्हणाला मी शनिवारी दत्त दर्शनासाठी औदुंबरला जाणार आहे तू येणार का. मला शनिवारी एक काम होत त्यामुळे मी त्याला नाही म्हंटल. पण माझं शनिवारीच काम पुढे ढकलल तर चालणार होत हे मला नंतर कळालं. म्हणून मी माझ्या मित्राला फोन करून विचारलं कि कधी निघायचं आहे. तर तो म्हणाला गाडीचा इन्शुरन्स नाही मिळाला. मी तुम्हाला निघायचं असेल तर फोन करतो.
  आता याचा फोन नाही आला तर माझं काम उगीच पुढं ढकललं जाईल म्हणून आमची भेट होईल का हा प्रश्न मला पडला व मी मोबाइलला अँप मध्ये कुंडली काढली दिनांक २१सेप्टम्बर २०१८ सकाळी ११वाजून ८ मिनिटे पुणे.
  त्यानुसार मी म्हणजे लग्न वृश्चिक त्यात ग्रह नाहीत म्हणून माझे प्रतिनिधित्व मंगळ करेल व चंद्र नैसर्गिक कारक.
  मित्र म्हणजे लाभ स्थान त्यात रवी बुध , लाभेश बुध.
  मंगळ व चंद्र तृतीयात मंगळ ८अंश तर चंद्र २० अंश आणि रवी बुध लाभात दोघे ४ अंश. म्हणजे रवी किंव्हा बुध हे अजून ४ अंश गेल्याशिवाय त्यांच्यात व मंगळात नवपंचम नाही होणार. आणि ते या शनिवारी शक्य नव्हते अजून मला एक वाटले कि इच्छापूर्ती चा म्हणजे लाभाचा स्वामी बुध अस्त म्हणून त्याची माझी भेट नाही होणार. व तसेच घडले..हे सर्व तुमच्या मुळे सोडवू शकलो .. कृपया यात अजून काही मार्गदर्शन करू शकलात तर आभारी राहीन.
  आपला
  सुशांत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुशांतजी,
   आपण एक प्रयत्न केलात याचे मी कौतुक करतो.

   आपण हा प्रश्न पाश्चात्त्य होरारी तंत्राने सोडवला आहे असे एकंदर वर्णना वरुन वाटते. तसेच आपण ‘होल साईन ‘ राशी = भाव (आपल्या पारंपरीक प्रमाणे) हाउस पद्धतीचे भावसाधन केले आहे असे दिसते कारण आपण बुध व रवी लाभात मांडले आहेत .
   होरारी साठी आपण जर पाश्चात्त्य होरारी तंत्र वापरणार असाल तर झोडीअ‍ॅक ट्रॉपीकल म्हणजेच ‘सायन’ असावे आणि पत्रिका प्लॅसिडस (भावचलित) पद्धतीच्या भावसाधनाचा वापर करुन बनवावी लागेल.
   सायन , प्लॅसिडस, मीन नोडस पत्रिका वापरा.

   काही शंका असल्यास विचारु शकता.
   शुभेच्छा
   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.