गेल्या हजारो वर्षापासून, प्रश्नकुंडली, टॅरो कार्डस,  रमल विद्या , लोलक विद्या, प्लॅंचेट, नेपोलियन प्रश्नावली , बायबल, रामचरीत मानस, ते अगदी कालपरवा ‘पॉल’ या आक्टोपस द्वारा फुटबॉल विश्वकरंडकाची भाकिते जाणून घेण्यासारख्या अनेक मार्गांनी, जातकाच्या तत्कालीन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होत आला आहे. या सर्वप्रकारात प्रश्नकुंडली व टॅरो कार्डस जास्त लोकप्रिय आहेत. आपल्या या लेखमालेत इतर पद्धतींबद्दल न बोलता आपण प्रश्न कुंडली पुरतीच आपली चर्चा मर्यादित ठेवू.

(या विषया वरचा पहिला भाग प्रश्न शास्त्र का आणि कसे – १  आधी वाचल्यास संदर्भ व्यवस्थित लागतील. )

सर्व प्रथम, प्रश्न शास्त्राचे को‌अर , मुख्य  गाभा म्हणजे प्रश्न, आपण जरा या प्रश्नाचाच  जरा  अधिक  विस्ताराने उहापोह करूयात.

बर्‍याच जणांना एक प्रश्न नेहमी पडतो तो असा की जन्मकुंडलीचा त्या व्यक्तीशी काही बादरायण तरी का होईना संबंध असतो पण प्रश्नकुंडलीचे काय? ती तर हवेतून काढल्या सारखी बनवली जाते त्याचा त्या व्यक्तीशी आणि त्याच्या प्रश्नाशी संबंध कसा जोडला जाऊ शकतो? (अगदी खरे सांगतो, हा प्रश्न  मला सुद्धा सुरवातीच्या काळात पडला होता.)

प्रश्नकुंडलीचा  जातकाचा कसा काय संबंध जोडला जातो याचे उत्तर अनाकलनीय आहे. मी जेव्हा  ‘कार्ल जुंग’ यांचे काही लिखाण तसेच  ‘मायकेल टालबोट’ यांचे ‘आवर होलोग्राफीक  युनिव्हर्स’  हा ग्रंथ वाचला, तेव्हा  कोठे या संकल्पनेचा थोडा फार उलगडा झाला, आणि जेव्हा प्रश्नकुंडलीचा वापर करुन आलेली उत्तरे बरोबर यायला सुरवात झाली तेव्हा या संकल्पनेवर माझा पूर्ण विश्वासच  बसला.

‘होलोग्राफ’ ही त्रिमितीय प्रतिमा घेऊन त्याचे दोन तुकडे केले तर दोन्ही तुकड्या ती प्रतिमा संपूर्णच मिळेल , अर्धी नाही, याचे आणखीही बारीक बिंदूवत तुकडे केले तरी त्या प्रत्येक बिंदू मध्ये  ती संपूर्ण प्रतिमाच  सामावलेली असते. असाच अनुभव आपल्याला  लोहचुंबकाच्या बाबतीत येईल, त्याचे कितीही  तुकडे करा , प्रत्येक तुकडा त्याचे स्वतः:चे उत्तर पोल  व दक्षिण पोल असलेला हा एक  स्वतंत्र लोहचुंबकच असतो. तसेच आपण  अनुभवत  असलेला  ‘प्रत्येक क्षण’  ही या विश्वाची एक  लघुतम  प्रतिमा असते. इथे  जेव्हा  ‘विश्वाची प्रतिमा’ असे जेव्हा म्हणाले जाते तेव्हा त्यात ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ समाविष्ट असतेच. (खरे पाहिले तर होलोग्राफीक युनिव्हर्स मध्ये ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ असे आपण घड्याळ्याच्या काट्यांद्वारा वा कॅलेंडरच्या पानांनी केलेले भेद नसतोच ).

कार्ल जुंग म्हणतात  तरी  काय?

“Whatever is born or done in this moment of time has the quality of this moment of time.”

कार्ल जुंग पुढे म्हणतात:

… The puzzling thing is that there is really a curious coincidence between astrological and psychological facts, so that one can isolate time from the characteristics of an individual, and also, one can deduce characteristics from a certain time. Therefore we have to conclude that what we call psychological motives are in a way identical with star positions. Since we cannot demonstrate this, we must form a peculiar hypothesis. This hypothesis says that the dynamics of our psyche is not just identical with the position of the stars, nor has it to do with vibrations – that is an illegitimate hypothesis. It is better to assume that it is a phenomenon of time. … The stars are simply used by man to serve as indicators of time…

… In any case, astrology occupies a unique and special position among the intuitive methods… I have observed many cases where a well-defined psychological phase, or an analogous event, was accompanied by a transit (particularly when Saturn and Uranus were affected).

याचाच अर्थ असा होतो की जेव्हा जातकाला एखाद्या  प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायची आत्यंतिक तळमळ लागते त्यावेळी कोठेतरी जातकाचे (सब्कॉन्शस) मन आणि वैश्विक मन यांची नाळ जोडली जाते. आणि जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हाचा क्षण या विश्वाची एक सूक्ष्म पण संपूर्ण प्रतिमा तिच्यात साठलेल्या  ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ सह  आपल्यासमोर येतो, त्या क्षणातच आगामी घटनांचे उत्तर त्याच्यात असतेच असते, प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून ते उत्तर बाहेर काढायचे काम ज्योतिर्विद करत असतो.

Geoffrey Cornelius, हे प्रख्यात ज्योतिर्विद आपल्या The Moment of Astrology या ग्रंथात म्हणतात:

“The planets and their positions mirror the occult quality of the totality of the macrocosm-microcosm ‘ at that moment'”

या संकल्पनेवर मला आणखी बरेच काही लिहायचे आहे , ते सगळे आत्ता इथे लिहले तर फार क्लिष्ट होईल ,पण जर आपल्याला आणखी वाचावेसे वाट्त असेल ,तर कॉमेंट्सच्या माध्यमातुन मला तसे कळवा,जरुर माहीती दईन.

वारंवार विचारला जाणारा दुसरा एक  प्रश्न  म्हणजे ‘ एकच  प्रश्न  पुन्हा लगेचच वा काही काळानंतर विचारल्यास  तेच उत्तर मिळेल का?

याचा खुलासा पुढच्या भागात बघूया..

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.