वारंवार विचारला जाणारा दुसरा एक प्रश्न म्हणजे ‘ एकच प्रश्न पुन्हा लगेचच वा काही काळानंतर विचारल्यास तेच उत्तर मिळेल का?

या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण जातक जेव्हा प्रश्न विचारतो त्या वेळी नेमके काय होत असते? याचा पुन्हा एकदा आढावा घेऊ.

या लेखमालेतील आधीचे दोन भाग इथे वाचा.

प्रश्न शास्त्र का आणि कसे – १

प्रश्न शास्त्र का आणि कसे – २

जेव्हा जातकाला प्रश्न विचारण्याची प्रबळ ऊर्मी येते तेव्हा त्याच्या प्रश्ना बाबतच्या ‘भावना (Emotions)’ अत्यंत प्रखर असतात, प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायची आत्यंतिक तळमळ (Urge) असते, आपल्या प्रश्नाचे काय उत्तर असेल याबाबतचे कमालीचे कुतूहल असते. त्यामुळे होते काय की . कॅमेर्‍यातली लेन्स जशी एखाद्या दृश्याची प्रतिमा फिल्मवर उमटवते तसेच जातकाची आंतरिक तगमग (प्रखर भावना) एखाद्या भिंगा सारखी काम करून आणि जातकाचे अव्यक्त मन (Subconscious mind) आणि वैश्विक मन (Universal Mind) यांना एकरूप करून टाकते. कॅमेर्‍याची लेन्स जितकी उत्तम फोकस होईल तितकी फिल्मवरची प्रतिमा जास्त सुस्पष्ट होत जाईल, अगदी तसेच जातकाची आंतरिक तगमग जितकी प्रखर तितकी अव्यक्त मन आणि वैश्विक मन यांना एकरूप करण्याची क्षमता जास्त बनत जाते. जेव्हा ही आंतरिक तगमग प्रखर असताना जेव्हा जातक प्रश्न विचारतो, बस्स, तो क्षण अगदी असा काही अचूक पकडला जातो ज्याच्यामध्ये विश्वाची एक सूक्ष्म पण संपूर्ण प्रतिमा (होलोग्राफीक इमेज) तिच्यात साठलेल्या ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ सह साठलेली असते इतकेच नव्हे तर ही होलोग्राफीक प्रतिमा पाहण्यासाठीचा योग्य असा कोन (अ‍ॅंगल ऑफ व्हू) ही अचूक साधला जातो. हा अ‍ॅंगल ऑफ व्हू म्हणजेच त्या क्षणी आकाशस्थ ग्रहगोलांची स्थिती, त्यांच्यातले होणारे योग (Aspects) थोडक्यात हा एक प्रकारे ,आपल्याला या क्षणात साठवलेले ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक नकाशाच आपल्या हाती सोपवलेला असतो.
आपण मागच्या भागात पाहिले आहे की ‘त्या क्षणात’ विश्वाची जी एक सूक्ष्म पण संपूर्ण प्रतिमा बंदिस्त असते ती या विश्वाची ‘बिंदूरुप होलोग्राफीक ‘ प्रतिमा असते. ह्या ठिकाणी आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा तर हवीच हवी, जोडीला अशी प्रतिमा पाहण्याचा योग्य असा कोन (अ‍ॅंगल ऑफ व्हू) असणे / मिळणेही तितकेच आवश्यक असते. या दोन्ही मध्ये उणीवां असल्यास काय होईल? एकतर अस्पष्ट प्रतिमेमुळे ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ यांचे ज्ञान पुरेशा स्पष्टपणे होणार नाही किंवा अ‍ॅंगल ऑफ व्हू बरोबर न मिळाल्याने या प्रतिमेत दडलेल्या ‘भविष्या’ तल्या संकेतांचा अर्थ चुकीचा लावला जाईल.

 

A hologram represents a recording of information regarding the light that came from the original scene as scattered in a range of directions rather than from only one direction, as in a photograph. This allows the scene to be viewed from a range of different angles, as if it were still present.

So, you might say that each piece of a hologram stores information about the whole image, but from its own viewing angle. No two pieces will give you a view that is exactly the same.


होलोग्राफीक प्रतिमा पाहण्याच्या कोनात अगदी किंचितसा जरी बदल झाला तरी काय फरक पडतो ते पहा:

(चित्र व माहिती विकिपीडिया तसेच इतर अनेक वेबसाइट्स वरून साभार)

आता जेव्हा तोच प्रश्न दुसर्‍यांदा विचारला जातो तेव्हा काय घडते ते पहा:

आपण एखादा रहस्यमय (सस्पेन्स) चित्रपट जेव्हा पहिल्यांदा पाहतो तेव्हा आपली उत्कंठा शेवट पर्यंत टिकून असते, चित्रपटच्या अगदी शेवटी रहस्याचा उलगडा होतो आणि आपली उत्कंठा संपते. आता कल्पना करा की हाच चित्रपट आपल्याला पुन्हा बघायला लागला तर काय होईल ? रहस्याचा उलगडा आधीच झालेला असल्याने त्या चित्रपट पाहण्यातली सारी मजाच निघून जाईल नाही का?

कदाचित आपल्याला हा चित्रपट शेवट पर्यंत पाहवणार सुद्धा नाही. आता कोणी हा चित्रपट दुसर्‍यांदा बघितलाच तो बघताना त्याचा उद्देश (व्हू पॉइंट) पूर्णपणे वेगळाच असेल, तो कदाचित त्या चित्रपटातले स्पेशल इफेक्ट्स, संगीत, लोकेशन्स वा कलाकारांचा अभिनय अशा इतर गोष्टी असा असू शकतो, त्यातला मूळच्या रहस्याचा थरार अनुभण्यासाठी नक्कीच नाही. पहिल्यांदा हा चित्रपट पाहताना आपण त्याच्याशी जितके एकरूप झालेलो असतो तितके एकरूप होणे दुसर्‍यांदा होणे शक्यच नाही.

प्रश्नाच्या बाबतीत देखिल अगदी असेच काहीसे होते,जातक तोच प्रश्न दुसर्‍यांदा विचारतो त्यामागचे मुख्य कारण हेच असते की पहिल्यांदा मिळालेले उत्तर त्याला पसंत पडलेले नसते, त्या उत्तरावर त्याचा विश्वास नसतो, त्याला हवे असलेले उत्तर न मिळाल्यानेच हा अविश्वास निर्माण झालेला असतो, हा अविश्वास म्हणजेच ‘शंका’, ही शंकाच जातकाच्या अव्यक्त मन व व्यक्त मत यांना जोडणार्‍या मार्गातला अडथळा बनते. पहिल्यांदा प्रश्न विचारताना जातकाच्या मनात ‘शंका’ नसते , जातकाने आपल्या मनाची ‘क्रिटीकल फॅकल्टी’ जाणीवपूर्वक दूर ठेवलेली असते. आता मात्र ही ‘क्रिटीकल फॅकल्टी’ जातकासाठी एक मोठा अडथळा बनते. हा अडथळा मोठा होतो तो आणखी एका घटकाने तो म्हणजे ‘भावनांची काहीशी झालेली बोथटता’, प्रश्न जेव्हा पहिल्यांदा विचारला होता त्यावेळच्या ‘भावनांची तीव्रता/उत्सुकता/ तगमग ’ आता दुसर्‍यांदा तोच प्रश्न विचारताना नसते (चित्रपटाच्या उदाहरणातला ‘रहस्याचा थरार’), त्यामुळे ह्या वेळेला तयार झालेली ‘विश्वाची एक सूक्ष्म पण संपूर्ण प्रतिमा’ जिच्यात या वेळेलाही ‘भूत भविष्य आणि वर्तमान’ साठलेले असतेच (त्यात कधीच चूक होत नाही), काहीशी धूसर ,अस्पष्ट असल्याने ‘भूत भविष्य आणि वर्तमान ‘ अचूकपणे वाचणे काहीसे अवघड तर होतेच त्याच बरोबर पाहण्याचा योग्य  असा कोन (अ‍ॅंगल ऑफ व्हू) बदललेला / चुकलेला असल्याने उत्तर चुकीचे मिळण्याची शक्यता जास्त असते.

आपल्या आयुष्यात देखिल ‘पहिले प्रेम, पहिल्या नोकरीला पहिला दिवस, पहिली सिगारेट, पहिले चुंबन, शाळा-कॉलेजातला पहिला दिवस,पहिली कार / बाइक ’ अशा अनेक पहिलेपणाच्या स्मृती आपण जिवापाड जपलेल्या असतात , कारण सांगता येईल? पहा जरा स्वत:लाच विचारून !

म्हणून ‘प्रश्न शास्त्र /होरारी’ मध्ये ‘ एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यास मनाई आहे. याचा अर्थ असा नाही की एखादा प्रश्न आयुष्यात फक्त एकदाच विचारता येईल. तो प्रश्न नक्की दुसर्‍यांदा विचारता येईल पण तो केव्हा (आणि कसा) ते आपण पुढच्या भागात पाहू.

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.