“ज्योतिष शिकायचेय एखादे चांगलेसे प्राथमिक पुस्तक सुचवा ना” अशी विचारणा झाली नाही असा दिवस जात नाही. माझा होरारी ( प्रश्नशास्त्र ) चा बर्‍या पैकी अभ्यास असल्याने वरकरणी अशा साधासुध्या वाटणार्‍या प्रश्ना मागे आणखी बरेच प्रश्न असतात हे मी जाणून असतो. ‘प्राथमिक पुस्तक’ म्हणजे स्वारी ज्योतिष प्रांतात अगदी नवखी आहे, ‘एखादे’ हा शब्द सुचवतो की सायबांना फक्त पाय भिजवायचेत , खोल डुबकी मारायला अजून बराच अवकाश आहे, ‘चांगलेसे’ हा शब्द चांगलेच वजन बाळगून येतो, हयात ‘कमी किंमत परवडेबल’, ‘सगळं काही त्या एकाच पुस्तकाच असायला हवे सर्वसमावेशक ’, ‘सहज समजेल अशा सोप्या भाषेत असलेले’ , ‘या एकाच पुस्तकावर काम भागले पाहिजे, उगाच घराची लायब्ररी व्हायला नको ‘ अशा अनेक छुप्या इच्छा असतात.मला  मजा वाटते आणि  काही वेळेला संतापही येतो, ‘दुनियादारी’ चे तिकीट ३०० -४०० रुपये खर्च करून हसत हसत काढले जाते पण एखादं चांगलेसे पुस्तक संग्रहात ठेवताना मात्र बजेट आडवे येते आणि मग कोठे फुकटात म्हणजेच चोरी करून ‘डाऊनलोड’ करता येते का याचा निर्लज्ज शोध चालू होतो. असल्या चोरट्यांना ज्योतिषच काय  इतर कोणतीच विद्या  वश होणार  नाही. जाऊदे…..

दुर्दैवाने या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा एकही ग्रंथ अजून लिहिला गेला नाही. असा ग्रंथ लिहिणे अवघड नाही पण त्याची पृष्ठसंख्या एखाद्या इनसायक्लोपिडीया इतकी असेल व तो ग्रंथ विकत घ्यायला बँकेकडून कर्ज मागायची वेळ येईल!

मराठी / हिंदी / इंग्रजी  भाषेत ज्योतिषशास्त्रावरचे  प्राथमिक  ग्रंथ अक्षरशः शेकड्यांनी आहेत. त्यातले  ‘घर बसल्या ज्योतिषी’ , ‘आपणच हा व्हा आपले ज्योतिषी’ या सारखी ‘झटपट’ पुस्तके जरी वगळली तरी सुद्धा अनेक शिल्लक राहतातच! पण बहुतांश ग्रंथांचा बाज एक सारखाच, ‘अमुक ग्रह -हया घरात म्हणून त्याची ही फळे ,‘तमका ग्रह या राशीत म्हणून ही फळे मिळणार’ ,  हे सारे वाचले की  ‘एक वाटी मैदा, दोन वाट्या बेसन , चिमूट भर सोडा, जीर्‍याची पूड, दोन मोठे चमचे तिखट , मीठ चवी नुसार’  असे ‘साहित्य आणि कृती’’ छापाच्या पाककृतींचे चोपडे वाचतोय का काय असा भास होतो.  कोणतेही लॉजिक नाही, कोणतीही कारण मीमांसा नाही. दिलेली फळे तर एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली, नक्की काय ते त्या लेखकाला तरी समजले असेल का ही शंका!

मराठीत गुरुवर्य श्री वसंतराव भटांनी ह्या विषया वर ‘कुंडली तंत्र व मंत्र भाग १’ हा एक अत्यंत चांगला ग्रंथ लिहला आहे, हा छोटेखानी ग्रंथ, काही गरजा पूर्ण करतो. पण त्यात अनेक अत्यावश्यक विषयांचा समावेशच नाही. पण मग ,वसंतरावांचा हा एक ग्रंथ सोडल्यास बाकी काय? सारा अंधारच आहे.

Hart De Fouw and Dr Robert Svoboda या लेखक जोडीने लिहिलेला . ‘Light on Life: An Introduction to the Astrology of India ‘

हा ग्रंथ जेव्हा माझ्या हातात आला, तेव्हा मी तो उघडून बघायला सुद्धा तयार नव्हतो,  हे फिरंगी काय मला ज्योतिष शिकवणार?  यांनी आम्हा भारतीयांना ज्योतिष शिकवायचे  म्हणजे  ‘Carrying coals to New Castle!’ सारखेच! पण केवळ उत्सुकता म्हणा किंवा हे काय दिवे लावणार अशी चेष्टा करण्यासाठी का होईना शेवटी हा ग्रंथ वाचलाच. आणि मग माझ्या लक्षात आले की हा ग्रंथ  वाचायचा नाकारून मी केव्हढी मोठी चूक करत होतो! मला हे मान्यच करायला लागले की  या ४०० पानांच्या ग्रंथाने जे काही मला दिले ते आजपर्यंत मी वाचलेल्या कोणत्याच मराठी / हिंदी / इंग्रजी  भाषेतील प्राथमिक  ग्रंथाने दिलेले नाही.

पाश्चात्त्य अभ्यासकांत अभ्यासाची एक शिस्त नेहमीच जोपासलेली दिसून येते, कोणत्याही गोष्टींचा मुळापासून अभ्यास करायचा, प्रश्नाच्या गाभ्या पर्यंत पोहोचायचे, मूलभूत संकल्पना समजावून घ्यायच्या, प्रत्येक बाब तर्काच्या कसोटीवर घासून घ्यायची, प्रत्येक सूत्रांचा कार्यकारण तपासायचा, साखळ्या तयार करायच्या , गणितात बसवायच्या अशी, त्यामुळे काहीही नवे वाचताना,  लेखकाचा असाच रोख असला तर ते लिखाण मला जास्त आवडते,  पोपटपंची, बाबा वाक्य प्रमाणं; असे काही दिसले की (जे आपल्या भारतीय लेखकांच्या लिखाणात भरपूर आढळते) मी तो ग्रंथ बाजूला ठेवतो, ‘Light on Life: An Introduction to the Astrology of India’  ने माझे हे सवे निकष अतिशय उत्तमरीत्या पूर्णं केलेआहेत.

ज्योतिषच का, इतर कोणत्याही विषया वर  प्राथमिक  ग्रंथ लिहिताना एक  मोठी समस्या असते ती म्हणजे, कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा आणि काय वगळायचे. आणि जे निवडले त्यावरही किती खोलात जाऊन लिहायचे हे ठरवणे अतिशय  अवघड असते. वाचकवर्गाची ग्रहण करण्याची क्षमता. ग्रंथाची पृष्ठसंख्या आणि किंमत या सार्‍यांचा  मेळ घालणे ही एक तारेवरची कसरतच असते. त्यामुळेच अशा प्रकारचे ग्रंथ  लिहिताना काय लिहायचे हे तर महत्त्वाचे आहेच पण त्याही पेक्षा कोठे थांबायचे हे पण ठरवता आले पाहिजे. अशा प्रकाराचा ग्रंथ हा  ‘Ladies’ skirt’ सारखा असावा म्हणजे ‘Short enough to arouse the interest and long enough to cover the subject matter!”. ज्योतिषावरच्या बर्‍याच ग्रंथांत हे पथ्य पाळले जात नाही. सगळ्याच गोष्टींना स्पर्श करण्याच्या नादात ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ अशातली गत होते. सिनेमाचे ट्रेलर बघितल्या सारखे वाटते, हाताला काहीच लागत नाही, वैचारिक गोंधळ मात्र भरपूर होतो.

या ग्रंथाची मांडणी अगदी विचारपूर्वक केलेली दिसते. सुरवातीच्या प्रकरणांतून ज्योतिषशास्त्राची पूर्वपीठिका विशद केली आहे. अगदी साध्यासुध्या उदाहरणांतून त्यांनी ज्योतिषशास्त्राची नाळ आपल्या रोजच्या जीवनाशी कशी जोडली गेली आहे ते सांगितले आहे, उदा:

“ One of the Sanskrit names for Sukr is Shukra, which means ‘white’, and Sukr is indeed a bright, white orb, the brightest object in the night sky after Chandrama. Sukr is so bright that you can see it even during daylight, if you know exactly where to look. Another meaning of Shukra is ‘semen’; just as Sukr is the brightest ( = most potent) Graha, semen is the most potent (the ‘brightest’) substance in the male body. People tend to be at their most amorous when Sukr is shining brightly in the sky, either in the early part of the night, just after going to bed, or early in the morning, just after waking up (a man’s testosterone being at its highest daily level around 4 a.m.). “

या प्रकारणात ज्योतिषशास्त्राची विविध अंगे व पध्दतींचा एक धावता आढावा अत्यंत मनोरंजक पद्धतीने घेतला आहे, दुसर्‍या प्रकरणातला ‘कर्म आणि ज्योतिष ‘ हा भाग वाचण्यासारखाच आहे, हा भाग जरी फारसा विस्ताराने नसला तरी कर्माचा सिद्धांत (लॉ ऑफ कर्मा) आणि ज्योतिषशास्त्राशी संबंध कसा आहे हे लेखकांनी चांगल्या रितीने स्पष्ट केले आहे, अर्थात मी याहून चांगले लिखाण इतरत्र वाचले असले तरी ज्योतिषावरच्या प्राथमिक ग्रंथात यांचा समावेश माझ्या दृष्टीने एक सुखद धक्का होता.

याच प्रकरणातले एक सुंदर वाक्य वानगी दाखल देतो:

“Jyotish assumes that the human condition always arises from adynamic interaction between fate and free will. Fate is fundamentally an expression of the Sanchita and Prarabdha Karmas, and free will the result of Kriyamana and Agama Karmas. Agama and Kriyamana Karmas eternally evolve into Sanchita and Prarabdha Karmas with the passage of time, the axle that turns the great wheel of Karma. What was done by free will today acts as the cause of what is experienced as fate tomorrow”

हे आणखी एक:

“A good Jyotishi makes predictions about configurations in the natal horoscope which indicate the presence of fixed Karmas in one or many areas of life. One fundamental error that fledgeling Jyotishis commonly make is to predict dire or wonderful results from a single bad or good influence in a horoscope. Fixed Karmas exist only in those areas of life in which the several different astrological factors which signify those areas all confluently suggest the same sorts of results. Since Dridha Karma is very difficult to transform, such predictions will usually be correct. Natal astrology can also indicate how long such Dridha Karma will last, when it will be most and when least active, and whether it will yield pleasurable or painful results ”

तिसर्‍या प्रकरणात थोडा गणिताचा भाग, ग्रहांची माहिती, कुंडलीतल्या १२ भावांची माहिती असा उपयुक्त भाग आहे.चौथ्या प्रकरणात ‘ज्योतिष शास्त्राची भाषा’ हा भाग विस्ताराने समजावून सांगितला आहे. ज्योतिष ही एक संकेत चिन्हांची (Symbols) भाषा आहे, प्रत्येक ग्रह, पत्रिकेतली १२ ही घरे, ग्रहांमधले होणारे योग ही सर्व काही संकेत चिन्हे आहेत, प्रत्येकाला शेकडो अर्थ देण्यात आले आहेत, प्रसंगोपात्त त्यातला नेमका अर्थ विचारात घ्यायचा हे मोठे कौशल्याचे व अभ्यासाचे काम आहे, बरेचसे ज्योतिर्विद कमी पडतात ते इथेच. अर्थातच कोणत्याही एका ग्रंथात अशा सर्वच संकेत समजावून सांगणे शक्य नाही. या प्रकरणात ग्रह व त्यांची कारकत्वे, त्यांचे परस्परांतले संबंध, ग्रहांचे बलाबल , अवस्था चांगल्या पद्धतीने दिले आहे.

ज्योतिषशास्त्राचे पायाभूत घटक (बिल्डिंग ब्लॉक्स) ग्रह, राशी, भाव आणि नक्षत्रे इ. थोडक्यात पण चपखलपणे समजावून सांगितले आहेत.  ही नुसती वर्णनात्मक जंत्री नाही तर प्रत्येक घटकाचा अन्वयार्थ कसा लावायचा आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रत्येक घटकाचा कुंडलीचा अभ्यास करताना कसा वापर करायचा हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. हे असे फार  थोड्या ग्रंथांत आढळेल.

उदा:

“A person who has Mangal in a strong relationship with Lagna in his horoscope will consistently vary his wardrobe, while someone with Sani similarly placed tends to be sartorially conservative. If such a Sani is also badly placed, the affected individual may dress shabbily. Because these rulerships are usually more suggestive than they are specific, ‘old’ for a strong Sani may mean by extension fashionably ultra-conservative, while for a weak Sani it may suggest army surplus wear from World War II.”

हे एकच प्रकरण इतके चांगले  लिहिले गेले आहे की हा ग्रंथ केवळ या प्रकरणासाठी विकत घ्यावा (अगदी बाजारू भाषेत बोलायचे म्हणाल्यास ‘पैसा वसूल”)

“SURYA and MANGAL rule punishment (Danda)

BUDH and SANI rule diplomacy (Bheda)

CHANDRAMA rules temptation (Dana)

GURU and SUKR rule good counsel (Sama).

Surya and Mangal resort to punishment or threat of punishment and are very forceful, compelling and insistent in their method of persuasion; they also respond best to these tactics. Budh and Sani most readily accept or use artfulness, including secret, behind-the-scenes maneuvers and the employment of spies and hearsay, and are potentially capable of unethical negotiations, like blackmail. Guru and Sukr spontaneously  work through and naturally accept appeals to reason, mild and polite but direct and honest requests, and good advice.”

पुढील दोन्ही प्रकरणे राशी व भाव तसेच सर्व १२ ही जन्मलग्ने या बद्दल विस्ताराने सांगतात , हा भाग ही अत्यंत चांगला , चपखलपणे  लिहीला गेला आहे, खरेच इतकी माहिती, मोजक्याच शब्दांत, सांगणारा दुसरा कोणताही ग्रंथ माझ्या वाचनात नाही. (डब्बल पैसा वसूल !)

“Many desirable meanings associated with elevated things apply to 9th, 10th and 11th Bhava of the horoscope, the highest points in Heavens as seen at the moment of birth. They represent crowning achievement, the acme of perfection. 9th Bhava is generally associated with good luck and fortune, an association which is compounded by its being a Bhava of Dharma. 9th Bhava yields elegant and rightful prosperity and success that seem aptly bestowed awards for previous efforts. The rare meaning of loss of or change in career seems to arise from its position as 12th from 10th Bhava, and should be assumed to be likely only when 9th is severely afflicted.”

पुढच्या प्रकरणात ‘पंचांग’  व ‘नक्षत्रे’ हा भाग चांगल्या प्रकाराने समजावून सांगितला आहे, मोजकीच पण जेव्हढी आवश्यक आहे तेवढीच माहिती दिली आहे, उगाचच याचे ‘सोमणशास्त्री कृत सुलभ(?) ज्योतिष शास्त्र’ केले नाही! नक्षत्रांची माहिती पुरेशा विस्ताराने नाही हे मान्य ,पण त्यासाठी दुसरे ‘प्राश त्रिवेदी’ ,’संजय रथ’ अशांचे चांगले ग्रंथ आहेतच.

“Because Chandrama is by nature a nurturing Graha, Chandrama in Pushya may indicate very strong tendencies to nurture, physically, emotionally or mentally. Other Grahas in Pushya often indicate a sense of nourishing or being nurtured in the matters they activate in that horoscope by Bhava rulership. Natural benefics here find their positive supportive meanings enhanced; natural malefics in Pushya are softened so that, though their exteriors may still be hard, their interiors become nurturing. When Lord of 7th Bhava tenants Pushya, it may indicate a nurturing spouse; 5th Lord there may indicate nurturing children, and so on.”

ज्योतिषशास्त्राच्या पायाभूत घटकांची उभारणी झाल्यावर , लेखकद्वय वाचकांना फलज्योतिषा कडे म्हणजेच कुंडलीच्या विश्लेषणाच्या प्रातांत घेऊन जातात. अगदी सुरवातीलाच  लेखकद्वयांनी आपल्या भारतीय ज्योतिषाशात्राच्या दुखर्‍या  नसेवर अचूक बोट ठेवले आहे.

“Literally thousands of such statements pack the authoritative texts on Jyotish in Sanskrit. Their number and complexity require a phenomenal memory, and colossal awareness, for their effective implementation. Because any given horoscope commonly has but a few of these elaborate combinations, it is neither practical nor productive echanically to catalogue and literally interpret them; when ontradictory combinations which are not reconciled by the texts also exist in the same horoscope, Jyotishi may be in a dilemma over which interpretation to apply.”

पण त्यावर त्यांनी उपाय ही सांगितला आहे!  भारतीय ज्योतिषाशात्राच्या क्लासिक्स मधून मोजकीच १८  सूत्रे घेउन त्यांनी त्याचे लॉजीक  सोडवले आहे,अगदी टप्प्याटप्प्याने! वाचताना क्षणोक्षणी असे वाटत राहील ” अरेच्या, हे असे आहे होय, आत्ता आले माझ्या लक्षात, सोप्पे आहे हे लक्षात ठेवायला.ही किल्ली हातात असेल तर अशी सूत्रे तर मीही तयार करुन वापरेन!”

ज्योतिष शास्त्र हे एका महासागरासारखे आहे, त्यातून अशी फक्त १८  सूत्रे घेउन एखादी यादी करणे जरासे धाडसाचे आहे, पण या इथेच लेखकद्वयाचा अभ्यास दिसून येतो, ही यादी पूर्ण नाही पण या यादीच्या मदतीने नवीन अभ्यासकाला जो एक मोठा आत्मविश्वास मिळेल तो महत्त्वाचा.  यादी वापरून अभ्यासक स्वतःच नियम तयार करू शकतो आणि त्यांचा पडताळाही घेऊ शकतो. हा या ग्रंथातला सर्वात उल्लेखनीय भाग आहे. म्हणतात ना : “Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime”

या नंतरचा भाग आहे तो म्हणजे या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करण्याचा (Applied Astrology), त्यातला महत्वाचा भाग म्हणजे कालनिर्णय!  कालनिर्णया खेरीज ज्योतिष शास्त्र अपूर्ण आहे. पण काही ज्योतिषी , “तुमच्या मामाच्या पाठीवर काळा डाग आहे” किंवा “तुमच्या बायकोच्या भावाचे पोटाचे ऑपरेशन झाले असेल” अशा गोष्टी सांगून जातका कडून  “वा, काय अचूक सांगताहेत, पटलं” अशी प्रतिक्रिया मिळवू शकतीलही  पण त्याचा जातकाला कितपत उपयोग? मुळातच हे भविष्यकथन नाहीच, हे तर भूतकथन झाले! इथे मला हे मान्य आहे की इतके अचूक भूतकथन करणे हे सुद्धा अभ्यासाचे,अत्यंत कौशल्याचे काम आहे पण जातक भविष्यातल्या घटना जाणण्यासाठी आलेला असताना त्याला अशा भूत काळातल्या घटना सांगून काय उपयोग ? कालनिर्णया  च्या असंख्य पद्धती आहेत आणि ज्योतिर्विदाला त्यातल्या किमान दोन –तीन तरी माहिती असायला हव्यात. प्राथमिक ग्रंथांतून अशा पद्धती विस्ताराने , सोदाहरण समजावून सांगणे हे अशा ग्रंथांच्या मर्यादा लक्षात घेता शक्य होणार्‍यातले नाही. प्रस्तुतचा ग्रंथ ही त्याला अपवाद कसे असेल. तरीही लेखकद्वयाने ‘विशोत्तरी दशा’ व ‘ग्रहगोचर’ या कालनिर्णयासाठी  वापरल्या जाणार्‍या दोन प्रमुख  पद्धतींचा  परिचय चांगल्या पद्धतीने करून दिला आहे. एवढ्या अपुर्‍या माहितीवर कालनिर्णयाचे शिवधनुष्य पेलणे अवघडच पण  लेखकद्वयाने सुरवात तरी चांगली करून दिली आहे हे ही नसे थोडके.

ग्रंथाच्या अखेरच्या भागात लेखकद्वयाने काही कुंडल्यांचे विश्लेषण करून दाखवले, अशा प्रकारच्या पुस्तकांतून हमखास आढळणार्‍या कुंडल्या इथेही दिसतात , उदा: मरलिन मन्रो, इंदिरा गांधी, हिटलर इ. (महात्म गांधी, जॉन एफ केनेडी, राणी इलिझाबेथ ही नेहमीची यशवंत , गुणवंत  मंडळी  मात्र दिसली नाहीत, असू दे काही हरकत नाही , म्होरल्या टायमाला तेव्हढे यांच्यापण कुंडल्या टाकल्या पायजेत बरका!), या विश्लेषणात खास काही नाही, मी याही पेक्षा चांगले विश्लेषण अभ्यासले आहे, पण सुरवातीच्या काळात तरी इथे जे काही दिले आहे, त्यांवरून नवीनं अभ्यासकाला साधारण कल्पना करता येईल आणि जेव्हा एखादी कुंडली अभ्यासा साठी समोर आली तर गोंधळून जायला होणार नाही एव्हढा  आत्मविश्वास वाचकाच्या मनात निर्माण करण्यात लेखकद्वय यशस्वी झाले आहे.

पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा पाया भक्कम करतानाच लेखकद्वयाने वाचकांसाठी एक विचार करण्याची शैली (Thought Process) विकसीत करुन दिली आहे.अशा प्रकाराच्या ग्रथांमध्ये ‘स्पून फीडिंग’ हा प्रकार टाळता येणे जवळजवळ अशक्यच ,  पण इथे  हा प्रकार  एका मर्यादेतच ठेवण्याता लेखकद्वयाला चांगलेच  यश मिळाले  आहे हे उल्लेखनीय. हा ग्रंथ वाचताना आपण हे ज्ञान साक्षात गुरुमुखातून घेतो आहे  असे सतत वाटत राहते यातच या ग्रंथा चे यश सामावले असे म्हणाल्यास वावगे  ठरणार नाही.

मी ज्योतिषावरचे अनेक ग्रंथ वाचले आहेत, कित्येक माझ्या संग्रहातही आहेत , हा ग्रंथ त्यात त्याच्या वेगळे पणाने उठून दिसतो. ग्रंथाच्या नावात ‘An Introduction to the Astrology’ असे जरी असले तरी हा ग्रंथ बराच मोठा आवाका बाळगून आहे. माझ्या स्वत:च्या ग्रंथ संग्रहात आजमितीला ज्योतिषशास्त्र आणि तदनुषंगिक विषयांवरचेच सुमारे ४०० ग्रंथ  आहे, त्यात हा ग्रंथ माझ्या अत्यंत आवडीचा आहे, आज माझा अभ्यास या अशा प्राथमिक ग्रंथा च्या कक्षे बाहेर पोहोचला असला तरी एखादी शंका असो वा चटकन एखादा संर्दभ हवा असेल तेव्हा इतर कोणत्याही ग्रंथा पेक्षा या ग्रंथाकडे  माझा हात चटकन वळतो आणि या ग्रंथाने मला कधीच निराश केले नाही. ज्योतिषशास्त्रावरच्या माझ्या आवडीच्या ग्रंथात याचा समावेश नक्कीच होईल यात शंकाच नाही.

मानांकन: *****  (पाच  चांदण्या)

पृष्ठसंख्या: ४००
बांधणी- कागद (सॉफ्ट)
प्रकाशन वर्ष: २००४
प्रकाशक: लोटस, पेग्वीन

Language English
ISBN-10: 0940985691
ISBN-13: 978-0940985698
Product Dimensions: 20.3 x 12.8 x 2.4 cm

किँमत :रु  249 (ईबुक), रु349 किंवा रु499

उपलब्धता:

सप्तर्षीज अ‍ॅस्ट्रोलॉजी

फ्लिपकार्ट

लेखकांचा अल्प परिचय:

Hart de FouwHart de Fouw: For over 15 years,Hart de Fouw got trained in Vedic philosophy form K.L. Mantri.

 

Robert Svoboda is B.S( Chemistry), He is the first Westerner ever to graduate from a college of Ayurveda (University of Pune, in 1980) and be licensed to practice Ayurveda in India. He lived in India 1973-80 and 1982-86. Both Hart de Fouw & Robert Svoboda are among the handful of Westerners who have both absorbed the fundamentals of Indian society.

Robert_E._SvobodaRobert Svoboda:

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.