फटुत आहे तो ‘पाटा- वरवंंटा’! आपल्या घरांतून केव्हाच हद्दपार झाला आहे!
आता काही दिवसां नंतर हा देखील म्युझीयम मध्येच बघायची वस्तू होऊन बसेल !.
माझ्या कडे असा एक ‘पाटा- वरवंंटा’ अजुनही जपून ठेवला आहे , त्याच्या जोडीला लोखंडी खलबत्ता आणि एक लहानसे सुबक जाते!
आज जेव्हा जेव्हा या वस्तू पाहातो तेव्हा माझ्या आईची , आजीची आठवण येते . त्या पाटा-करवंट्यावर वाटलेल्या मिरचीच्या ठेच्याची चव जीभ हुळहुळवून टाकते , आणि खलबत्यात कुटून केलेल्या ताज्या लसूण- शेगदाणा चटणीचा दरवळ अजुनही येतो!
“गोखले , आता मी व्हेरिफिकेशन साठी तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या काही घटनां बद्दल विचारतो..”
“पण माझी जन्मवेळ तर अगदी अचूक आहे त्याचे व्हेरीफिकेशन करण्याची आवश्यतकता वाटत नाही!”
“गोखले, केवळ जन्मवेळेची अचुकता ठरवण्या साठीच हे व्हेरीफिकेशन करावे लागते असे नाही, जन्मकुंडली जन्मलग्ना पासुन पाहण्याचा प्रघात आहे पण काही वेळा जन्मराशी किंवा रवी राशी हा बेस धरुनही पत्रिका बघावी लागते , तसेच दशा पद्धती म्हणजे विशोत्तरी दशा असे नाही, काही वेळा त्रिभागी दशा प्रभावी ठरते , काही वेळा नक्षत्र दशे पेक्षा इतर घटकांवर आधारित अशी दशा पद्धती जास्त रिस्पॉनसीव्ह ठरते, हे बरेच कॉम्प्लिकेटेड आहे , नक्की कोणता आधार घ्यायचा याचा खुलासा जातकाच्या आयुष्यात आधीच घडलेल्या घटनांच्या अनुशंगाने ट्रायल अॅन्ड एरर पद्धतीने करुन घ्यावा लागतो. आता तुम्ही म्हणता तशी तुमची जन्मवेळ अचूक असेल तर उत्तमच आपल्यला सगळ्यात अचूक अशी ‘कालचक्र’ दशा पण प्रभावीपणे वापरता येईल , आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या पत्रिकेतले ग्रह कशा अंगाने फळे देत आहेत याचा अंदाज येतो, ग्रहांची म्हणूण एक ‘मोड्स ऑपेरेंडी’ असते , प्रत्येका साठी ती वेगळी असू शकतो, आयुष्यात घडून गेलेल्या घटनांचा ग्रहस्थितिंशी ताळमेळ घातला की ही ‘मोड्स ऑपरेंडी’ समजायला मदत होते मग पुढे काय घडणार आहे यासाठी आपल्याला काही मार्गदर्शक सुत्रे हाताशी येतात! ”
“परफेक्ट ! मानले तुम्हाला , विचारा”
“जास्त नाही , फक्त दोन चार घटना तपासु “
“कितीही तपासा ना , माझी काही हरकत नाही”
“असे बघा , तुम्ही लहान असताना , अगदी वर्ष-दोन वर्षाचे असताना तुमच्या घरा संबंधी काही घटना घडल्या होत्या का?”
“हो, माझ्या मुळ गावी आमचे मोठे घर आहे, मी दोन वर्षाचा असेन त्यावेळी आमच्या जुन्या घराची बरीच दुरुस्ती करण्यात आली होती, एक मजलाच जवळजवळ वाढवण्यात आला होता, बराच खर्च आणि व्याप झाला होता तेव्हा, आमच्या सांगली कडच्या भाषेत बोलायचे तर मोठा ‘खुटाना’ झाला होता तेव्हा .”
“अंदाज बरोबर आला म्हणायचा , आता सांगा त्याच सुमारास म्हणजे तुम्ही दोन – तीन वर्षाचे असताना घरात एका वृद्ध अशा व्यक्तीचा जी बराच काळ अंथरुणाला खिळून होती, तिचा मृत्यू झाला असेल..”
“माझे आजोबा ! दम्याच्या विकाराने दीर्घकाळ आजारीच होते”
“ठिक आहे, अजून एका घटने बद्दल विचारतो.. तुम्ही पाच-सहा वर्षे असताना तुमच्या वडिलांच्या नोकरी – व्यवसायात काही घटनां / मन:स्ताप ? ”
“हो , माझे वडील बँकेत होते, ती बँक १९६९ मध्ये नॅशनलाईज्ड झाली, कमी शिकलेल्या लोकांना काढून टाकणार , वेड्यावाकड्या बदल्या करणार अशा जोरदार अफवा त्यावेळी पसरल्या होत्या, तेव्हा माझे वडील खूपच टेंशन मध्ये होते”
“तुमच्या वडिलांना तसे बरेच मन:स्ताप झाले असतील , खास करुन त्यांच्या भावाच्या , म्हणजे तुमच्या काका च्या वागण्या मुळे..”
“मन:स्ताप ? अहो बरबादी व्हायचीच बाकी होती!”
“गुड, आता सांगा , तुम्ही साधारण ९-१० वर्षाचे असताना दोन आनंदाच्या घटनां अगदी पाठोपाठ घडल्या होत्या का?”
“भारताने बांगलादेशचे युद्ध जिंकले!”
“अहो, ती सार्या देशा साठी आनंदाची घटना होती, तुमच्या वैयक्तीक जीवनातली आनंदाची घटना असेल तर सांगा”
“हो नक्कीच , दोन तशा घटना घडल्या होत्या, पहीली घटना , त्या सुमारास माझ्या वडीलांना प्रमोशन मिळाले होते, जबाबदारीचे पद मिळाले होते..
“गुड , आणि दुसरी घटना?”
“१९७२ जुन मध्ये मी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत मेरीट लिस्ट मध्ये आलो होतो, पेपर मध्ये नाव- फोटो छापून आला होता, शाळेत सत्कार झाला होता , तेव्हा पासुन ‘स्कॉलर’ असा जो शिक्का माझ्या कपाळावर बसला तो अजून मला पुसता आला नाही !”
“गुड जोक, पण असे शिक्के कपाळावर मिरवायला चांगलेच असतात ना?”
“हो, पण मग लोकांच्या अपेक्षा पण वाढतात आणि काही वेळा ते ओझे असह्य होते ..”
“हो, सेलेब्रिटींची दु:खे वेगळीच असतात”
“अहो, मी कसला सेलेब्रिटी ?”
“म्यॅट्रीक च्या परिक्षेत एक नाही दोन नाही चक्क तीन वेळा गटांगळ्या खालेल्या समोर अशी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरीट लिस्ट मध्ये आलेली व्यक्ती म्हणजे सेलेब्रीटीच नाही का ?”
“हॅ हॅ हॅ .. कसचे कसचे”
ज्योतिषीबुवांनी आणखी काही व्हेरीफिकेशन चे प्रश्न विचारले त्या सगळ्या घटना पण बर्यापैकी अचूक निघाल्या, त्या घटनां फार खासगी असल्याने ते सगळे इथे लिहीत नाही !
“असो, आपले व्हेरिफिकेशन पूर्ण.”
“कमाल आहे, इतके अचुक कसे काय सांगू शकलात!”
“अजून कितीतरी घटनां बद्दल आता सांगता येईल”
“काय सांगता !”
“अहो, तुमच्या पत्रिकेवरुन जर भविष्य सांगता येत असेल तर भूतकाळ पण तसाच सांगता आला पाहीजे, किंबहुना तसा भूतकाळ सांगता आला तर आणि तरच तुमची जन्मवेळ बरोबर आहे आणि ज्योतिषी पण चांगल्या तयारीचा आहे हे सिद्ध होऊ शकते. भविष्यातल्या घटनांचा पडताळा अजून यायचा असतो , त्याबद्दल आपण अंदाजच व्यक्त करु शकतो, त्याचा ताळापडताळा यायला बराच काळ द्यावा लागतो, पण पुर्वी घडून गेलेल्या घटनां नक्की असतात , त्या बद्दल कोणताही संदेह / शक्याशक्यतेला जागाच नसते. तेव्हा जे घडून गेले त्याचा आधार घेत केलेले हे काहीसे रिव्हर्स इंजिनियरिंग पद्धतीचे अॅनॅलायसिस आहे.”
“वा, मी इतक्या ज्योतिषांना भेटलो पण पत्रिकेचा अशा अंगाने अभ्यास करणारे तुम्ही पहीलेच!”
“शिवाय , मघाशी म्हणालो तसे घटनांचा असा ताळा घेतल्याने कोणता ग्रह कशा पद्धतीने तुम्हाला फळे देणार आहे ते लक्षात येते, ग्रहांची ‘मोड्स ऑपरेंडी’ लक्षात येते.”
“मला हे सगळे नविन आहे , आणि तुम्ही हे सांगु शकलात हे जाणून घ्यायला आवडेल “
“प्रोफेशनल शिक्रेट!”
“हे जिथेतिथे आडवे येतेय!”
“हॅ हॅ हॅ, काय करणार ? पापी पेट का सवाल है ना? ”
“तुमचेही बरोबर आहे”
“खरे सांगू का गोखले ?”
“बोला”
“हे मी कसे केले ते हुडकून काढणे फारसे अवघड नाही, त्याचा वापर करणे पण तितकेसे कॉम्प्लीकेटेड नाही, पण इतक्या खोलात कशाला जायचे असे म्हणत बरेचसे ज्योतिषी चटावरची श्राद्धे उरकत असतात , त्यांना हा व्याप करायचाच नसतो , कशाला करतील म्हणा , फक्त ‘शनीचा जप करा’, ‘गणपतीला दर मंगळवारी तांबडे फुल वाहा’, “अक्षता . कवड्या फिरकवा ” यंव करा त्यंव करा असले फालतुकचे तोडगे सांगून सहज दक्षिणा उकळता येत असेल तर ही इतकी मगजमारी कशाला करत बसायची , बरोबर ना?
“हो, तसे दिसते खरे”
“म्हणून माझ्याकडे गर्दी नाही..”
“आणि इथल्या बैठकीत ढेकूण नाहीत !”
“अरे हो, हे मी मघाशीच बोललो होते नाही का!”
भिंतीवरच्या ‘सईकोशा’ ने मस्त ठोके दिले.. साला काय घड्याळ होते ते!
ज्योतिषीबुवांनी डोळ्यावरच्या चष्मा खाली सरकवत पुन्हा एकदा त्या तबकडीत डोके खुपसले ..
पुन्हा काही क्षण असेच शांततेत गेले …
क्रमश:
या लेख मालिकेतले पहिले भाग इथे वाचा..
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
mast….
धन्यवाद प्रमोदजी
सुहास गोखले
किती तरसवले ओ तुम्ही काका, भाग संपला पण तहान नाही
Awaiting for next episode
Lekh apratim
Sir class chi survat kadhi prayant honar ahe.
श्री. उमेशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद . क्लासेस सुरु होत आहेत , सध्या त्याचे रेकोर्डीग चालू आहे. ते पूर्ण होताच क्लास सुरु करत आहे.
सुहास गोखले
Best….!! waiting for next part……!!
धन्यवाद स्वप्निलजी
सुहास गोखले