फटुत आहे तो जुना (व्हिटेंज) टेलीफोन  , वॉल माऊंटींग स्टॅन्ड सह ! आता हे असले प्रकार म्युझीयम मध्येच बघायचे ! या जुन्या वस्तुंचे एक अजब ‘गारुड’ असते ..

माझ्या कडे या चित्रात दाखवला आहे  तसे दिसत नसले तरी खूप जुने म्हणजे साधारण १९३०/ १९४० च्या काळातले दोन व्हिंन्टेज वर्कीग फोन आहेत ! एक लाकडी आहे आणि दुसरा पितळेचा!

पितळेच्या फोन ला नेहमी सारखा रिसिव्हर नाही,  एक बोंडुक आहे ते कानाला  लावायचे – ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी फोन च्या बॉडी वर एक बोळके बसवलेले आहे त्यात बोलायचे ! मज्जा !!   

“गोखले तुमची जन्मवेळ बरोबर आहे असे समजायचे का?”

“शंकाच नको,  माझ्या जन्म ज्या मॅटर्निटी हॉस्पिटल मध्ये झाला तिथले डॉक्टर स्वत:च एक उत्तम ज्योतिषी होते, इतकेच नव्हे ते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असण्यापेक्षा ज्योतिषी म्हणून जास्त प्रसिद्ध होते, ते त्यांच्या दवाखान्यात जन्मलेल्या प्रत्येक बालकाची वेळ अगदी अचूक टिपण्यात दक्ष होते, तेव्हा जर वेळेत चुक असलीच तर अवघ्या एखाद्या मिनिटाची”

“उत्तम, आपल्याला दोन – तीन मिनिटे इकडे तिकडे चालते, कृष्णमुर्ती पद्धत वापरणार्‍यांना याहुन अचूक वेळ लागते असे ऐकलय , माझा त्या पद्धतीचा अभ्यास नाही, तुम्ही हसबेंचे पुस्तक वाचताय म्हणजे कदाचित माझ्यापेक्षा तुम्हालाच त्या बद्दल जास्त माहिती असेल”

“छे हो, जास्त माहीती कसली सगळे डोक्यावरुन जातेय..”

“सुरवातीला वाटते तसे, पण माझे एक मित्र आहेत मुंबईला ते कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करुन राहीलेत , ते म्हणतात ही पद्धत शिकायला सोपी आहे आणि वापरायला त्याहुन ही सोपी, तेव्हा तुम्ही प्रयत्न सोडू नका…तुमची पत्रिका मला सांगतेय ..आज ना उद्या तुम्ही ज्योतिषी होऊन माझ्या पोटावर पाय देणार!”

“हे तुम्ही चेष्टेने म्हणताय की खरेच..”

“चेष्टा नाही गोखले, अगदी खरे बोलतोय” 

ज्योतिषीबुवांनी मला माझ्या पत्रिकेतली ग्रहस्थिती आणि ग्रहयोग कसे अनुकूल आहेत ते सांगितले. त्यावेळे पर्यंत माझा ज्योतिषाचा थोडा का होईना अभ्यास असल्याने ते काय सांगत होते हे मला कळत तर होतेच त्याच बरोबर त्यांची ‘थॉट प्रोसेस’ कशी आहे हे पण सहज लक्षात येत होते.

मुळात ज्योतिषी बुवांचा भर अंशात्मक ग्रहयोगा वर आहे हे दिसत होते. म्हणजे पारंपरीक पद्धतीत बघतात तसा राश्यात्मक योग ते विचारात घेत नव्हते. हे योग बघताना, योग कोणत्या प्रकाराचा, कोणत्या ग्रहांत, कोणत्या स्थानांतून होत आहे हे तर पाहीले जात होतेच शिवाय ग्रहांना लाभलेले स्थानगत , राशीगत बळ पण सुक्ष्मपणे विचारात घेतले जात होते, ग्रहाच्या भावेशत्वाचा विचार पण आवर्जुन केलेला दिसत होता , आऊटर प्लेनेट्स युरेनस आणि नेपच्युन विचारात घेतले गेले होते. मी त्या वेळे पर्यंत अनेक ज्योतिषांत भेटलो होतो पण युरेनस आणि नेपच्युन विचारात घेणारे हे पहीलेच ज्योतिषी होते.   

“पण मी जन्माला आलो त्याच्या आसपास अनेक बालके जन्मली असतील, त्यांच्याही पत्रिकेत अगदी असेच योग असणार,  मग ती सगळी  बालके पण ज्योतिषी होणार का ? “

“हा ज्योतिषांना हमखास विचारला जाणारा घिसापीटा सवाल आहे, याचे खूप  मोठे उत्तर आहे , ते द्यायचे तर काही तास खर्च होतील, पण तुमच्या समाधाना साठी सांगतो, पत्रिकेतले योग बीज रुपाने असतात , त्या बिजाचा चा वृक्ष होणे इतर अनेक बाबीं वर अवलंबून असते.  व्यक्तीने घेतलेले प्रयत्न, त्याला लाभलेली कौटूंबिक, सामाजीक, आर्थिक , वैचारीक पार्श्वभुमी असे अनेक घटक आहेत.  “

“लक्षात येतेय थोडे फार..”

“आय .ए. एस. परिक्षेसाठी प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला आय.ए.एस. बनण्या साठीची समान संधी असते , पण सगळेच आय.ए..एस होत नाहीत,  त्याला जशी अनेक कारणे असू शकतात तसेच ज्योतिषी बनण्याचे योग असणे म्हणजे ती व्यक्ती ज्योतिषी होणे असे सरळ समीकरण नाही”

“बरोबर आहे, नुसती संधी मिळून चालणार  नाही तर त्या संधीचा लाभ ऊठवता येण्या साठी बाकीची परिस्थिती पण तितकीच अनुकूल लाभावी लागेल”

“बरोबर  बोललात गोखले, नुसते लोखंड गरम असून चालणार नाही , त्यावर घाव घालायला हातोडाही लागतो आणि तो लोखंड गरम असतानाच हाताशी असायला हवा, एकदा का लोखंड गार झाले की त्या हातोड्याचा काय उपयोग?”

“आपण म्हणता ते बरोबर आहे , काही जणांच्या बाबतीत असे झालेले बघावयास मिळते”

“आणि गोखले, मी जे ज्योतिषाचे चे म्हणून जे योग सांगीतले ते मुळात व्यक्तीला काही बाबी चांगल्या जमतील असे सांगणारे आहेत, उदाहरणार्थ गणित , तर्क शास्त्र, इन्टूशन, संवाद कौशल्य, अ‍ॅनालायटीकल माईंड , गुढ विषयाची आवड, स्वत:ची निश्चीत अशी ठाम मते असणे आणि ती निर्भिड्पणे इतरां समोर मांडायचे धाडस इ.   आता हे गुण आवश्यक असलेले अनेक व्यवसाय / छंद आहेत,   त्यामुळे असे योग असलेली व्यक्ती तशा एखाद्या व्यवसायात / छंदात प्रावीण्य मिळवेल , ज्योतिषीच होईल असे नाही. पण बाकी अनुकूलता , जी तुम्हाला आहे , तशी लाभल्यास ती व्यक्ती या शास्त्रा कडे आकर्षीत  होण्याची खूप मोठी शक्यता असते”

“समजले”

“ग्रहांचे संकेत असेच असतात त्याचा अर्थ व्यक्ती, स्थल ,  काल,  परिस्थिती सापेक्ष असा तारतम्यानेच लावायाचा असतो, पुस्तकातले नियम म्हणूनच जसेच्या तसे लावायला  गेलात तर लाखाचे बारा हजार ठरलेले”

आज त्या ज्योतिषाचे भाकित सत्यात उतरले असे मानायला काहीच हरकत नाही पण माझी ज्योतिषाची प्रॅक्टीस कोणाच्या पोटावर पाय येईल इतकी दणकेबाज नाही हा भाग वेगळा.

त्या तबकडी वरच्या आतल्या वर्तुळात माझी जन्मपत्रिका मांडली होती, आता बाहेरच्या वर्तुळात त्यांनी आणखी एक पत्रिका मांडायला सुरवात केली.

“हे काय”

“पत्रिकेच्या अभ्यासात दोन भाग असतात एक स्टॅटीक अ‍ॅनॅलायसिस , जे साधारण तुमच्या आयुष्यातल्या घटनांबद्द्ल, स्वभाव, आरोग्य, विवाह, संतती, मान सन्मान,  पैसा इ बाबीं बद्दल स्थूल मानाने भाष्य करणारे असते इथे घटना कोणत्या घडणार याच अंदाज असतो पण घटना नेमकी कधी घडणार आणि कशा पद्धतीने घडणार हे मात्र कळत नाही, म्हणजे स्टॅटीक अ‍ॅनॅलायसिस ने अपघात होणार हे सांगता येते पण केव्हा , कसला, किती गंभीर हे सांगता येणार नाही , त्या साठी आपल्याला डायनॅमिक अ‍ॅनालायसिसच वापरावे लागते , त्यात तुमच्या जन्माच्या वेळेच्या ग्रहस्थितिशी त्या त्या वेळेच्या आकाशातल्या ग्रहांच्या स्थितीशी सांगड घालून घटना केव्हा, कशी याचा अंदाज बांधता येतो”

“म्हणजे तुम्ही ट्रांसिट किंवा मराठीत गोचर म्हणतात त्या बद्दल म्हणता आहात का?”

”गोचर  हे डायनॅमिक अ‍ॅनालायसिस आहे यात शंकाच नाही पण त्याचा दर्जा तसा दुय्यम आहे , डायनॅमिक अ‍ॅनालायसिस साठी फक्त गोचरीवर अवलंबून  राहता येणार नाही”

”मग दुसरे काय”

“अनेक मार्ग आहेत , दशा पद्धती हा  एक  मार्ग बराच प्रभावी आहे , तसे पहीले तर गोचरी  किंवा दशा स्वतंत्रपणे वापरता येणारच नाही , ह्या दोन्ही जोडीनेच वापरल्या तरच त्यांचा उपयोग करुन कालनिर्णय करता येणे शक्य आहे.”

“मला समजले नाही”

“गोखले , कालनिर्णयाचा विचार तीन गोष्टींं वरुन होतो,  सर्वप्रथम जन्मपत्रिकेत घटना घडू शकेल असे संकेत असावेत लागतात , ज्याला आपण ‘नाताल प्रॉमीस’ म्हणतो, हे प्रॉमीस नसेल तर तशी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडूच शकणार नाही..”

“सही , बात,  ‘आडात नसेल तर पोहोर्‍यात कोठून येणार?”

“बरोबर, पण नुसते ‘नाताल प्रॉमिस असूनही चालणार नाही त्यासाठी स्थळ , काल, परिस्थिति जन्य सापेक्षता असलेला अनुकूल काल पण यावा लागतो, हा काळ कोणता ते डायनॅमीक अ‍ॅनालायसीस सांगू शकते त्यासाठी आपण ‘प्रोग्रेशन्स’ वापरतो”

“म्हणजे तुम्हाला ‘सेकंंडरी प्रोग्रेशन्स’ म्हणायचे आहे का?”

“अनेक प्रकाराने प्रोग्रेशन्स पाहता येतात ‘सेकंंडरी प्रोग्रेशन्स’ हे त्यातलेच एक आहे पण गोखले, आपण ज्या दशा- विदशा वापरतो ना त्या सुद्धा एक प्रकाराच्या ‘प्रोग्रेशन्स’ च आहेत”

“मला हे माहीती नव्हते”

” होईल, अभ्यास वाढला की बराच भाग समजेल हळू हळू”

“हो”

“‘प्रोग्रेशन्स च्या साह्याने  घटना घडण्याची मोठी  शक्यता असलेला कालखंड समजला तरी प्रत्यक्षात त्या कालखंडात घटना घडेलच असे नाही, त्या साठी आणखी एका घटकाची अत्यंत आवश्यकता असते.”

“तो कोणता घटक?”

“असे पहा गोखले, आग लागायला तीन घटक आवश्यक असतात ते तीन घटक एकत्रित आले की आग लागते”

“हो मला माहीती आहे – इंधन , हवा (ऑक्सीजन) आणि विषीष्ठ तापमान (ज्वलनबिंदू तापमान)”

“बरोबर , यातला एखादा जरी घटक कमी पडला किंवा पर्याप्त नसेल तर आग पेटणार नाही आणि याचाच उपयोग करुन आग विझवता येते”

“हो, आगीवर पाणी ओतणे म्हणजे विषीष्ठ तापमान (ज्वलनबिंदू तापमान)  कमी करणे. आणि जाळायला काही  (इंधन) शिल्लक उरले नाही की आग आपोआपच विझते!”

“बरोबर तसेच ‘नाताल प्रॉमिस, ‘अनुकूल कालखंड’ ह्या दोन घटकां बरोबरच घट्ना घडण्यासाठी एक ‘ट्रीग्रर’ लागतो , तो ट्रीगर नसेल तर घटना घडणार नाही, आणि हा ट्रीगर मिळणार आहे का नाही आणि मिळणार असल्यास केव्हा ते ‘ट्रंसिट्स’ सांगतात . हे तिन ही जेव्हा जुळून येते तेव्हा घटना घडतेच घडते, तीला कोणीही रोखू शकत नाही, आणि यातला एक जरि घटक कमी पडला तरी घटना घडत नाही, नुसती हुलकावणी..” 

“एक्सलंंट! हे असे मला आत्तापर्यंत कोणी समजाऊनच दिले नाही”

“मी असे समजाऊन देत बसतो ना सगळ्यांना म्हणूनच माझ्या कडे गर्दी नाही, गर्दी जमते ती त्या उपाय – तोडगे वाल्यांंकडे, खरे ना”

“होय , दुर्दैवाने तेच खरे आहे असे दिसते..”

“ये हुई ना बात !”

“पण आता तुम्ही जी पत्रिका मांडली आहे ती गोचरीची नाही, रवी आत्ता ह्या राशीत नाही”

“नाहीच, ही दुसरी पत्रिका गोचर भ्रमणाची नाहीच”

“मग काय आहे ते ?”

इथे ज्योतिषीबुवा क्षणभर थांबले , मग मिश्किलपणे डोळे मिचकावत म्हणाले-

“गोखले तुम्ही हुषार आहात , पण आत्ता या क्षणी तरी ते मी तुम्हाला सांग़णार नाही, अहो ते माझे प्रोफेशनल शिक्रेट आहे”

“ठीक आहे , नका सांगू , मला काय मार्गदर्शन मिळाल्याशी मतलब, तुम्ही कोणती पद्धत वापरता हे महत्वाचे नाही, मी विचारले ते केवळ उत्सुकता म्हणून इतकेच”

“ठीक आहे , आता मला जरा थोडा वेळ द्या, मी जरा याचा अभ्यास करतो , मग बोलू आपण , कसे?”

”येस सर”

पुढचे काही क्षण पुन्हा शांततेत गेले.

क्रमश:

या लेख मालिकेतले पहिले भाग इथे वाचा…

 

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. pramod bhelose

  mastach…..utuskta ……
  tumhi ratris khel baddal ji shakyata mandali ahe ti sudha cha ahe pan ka kunas thauk satya paraistila/anubhavala dharun naslyamule vachtana tevdhi maja yet nahi…..
  raag manu naye

  apla
  pramod bhelose

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   तो दुसरा चार्ट प्रोग्रेशन्स चार्ट होता, पण त्याचे तंत्र अगदी आज २०१६ मध्ये काहीसे अपरिचित आहे, त्या ज्योतिषीबुवांनी ते मला सांगीतले नाही , पुढे अनेक वर्षानंतर मला त्याचा अचानक शोध लागला. आज मी ते तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरतो, त्यत काहि मिसिंग लिंक्स आहेत , त्याही एके दिवशी कळून चुकतील.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.