फटुत आहे तो जुना (व्हिटेंज) रेडू (रेडिओ) , वॉल्व्ह वाला ! ‘मॅजीक आय ‘ सहीत !! आता हे असले प्रकार म्युझीयम मध्येच बघायचे ! या ‘व्हॉल्व्ह’  ची एक अजब मोहीनी असते, ‘स्वीट’ !

म्हणूनच मी जेव्हा माझा स्टीरीओ अ‍ॅम्प्लीफायर घेतला तेव्हा अव्वाच्या सवा खर्च करुन व्हॉल्व वाला (२० वॅट्स चा प्युअर क्लास ए)  प्रकारातला घेतला , काय आवाज आहे सायबानु , कान तृप्त होतात !

माझा दुसरा अ‍ॅम्प्लीफायर ‘युनिसन रिसर्च’ या इटालियन कंपनीचा आहे , त्यात पण प्री स्टेजला वॉल्व्ज आहेत आणि पॉवर स्टेजला वॉल्व्हज च्या अगदी जवळ जाणारे मॉसफेट्स ! …

असो ! माझा ऑडिओ सेट-अप (आणि म्युझीक कलेक्शन) हा वेगळाच बोलण्याचा (का ऐकण्याचा ?) विषय आहे!     

मागील भागापासुन पुढे चालू…  साल १९८७, स्थळ पुणे , पात्रं मी आणि ते ज्योतिषीबुवा!

समोरच्या तबकडी कडे पुन्हा एकदा निरखून पहात ज्योतिषीबुवा म्हणाले…  

“बोला , कोणत्या गोष्टी पासुन सुरवात करुया , का एखादी दुखरी नस पहील्यांदा तपासुया ?”

“तसे म्हणाल तर मोठी अशी कोणतीच समस्या किंवा तुम्ही म्हणता तशी दुखरी नस असे काही समोर नाही, तसा मस्त मजेत आहे मी”

“ते पत्रिकेतून दिसतेच आहे , सगळे चांगले चाललेय म्हणता मग इकडे कशी वाट चुकलात?”

“ का? ज्योतिषाकडे प्रॉब्लेम असेल तरच जायचे का?”

“अहो म्हणतात ना ‘सुखी माणुस सोनारा कडे आणि दु:खी माणुस ज्योतिषाकडे ‘ ”

“तसे दिसते खरे,  पण प्रॉब्लेम असेल तरच ज्योतिषाकडे जायचे हे बदलायला हवे” 

“गोखले अगदी बरोबर बोललात , पण त्याचे काय आहे लोकांना आपल्या समस्या सोडावायला  उपाय – तोडगे हवे असतात , नोकरी मिळत नाही कर तोडगा, लग्न जमत नाही कर तोडगा. पैसे नाहीत कर कसला तरी तोडगा . त्यापेक्षा  नोकरी का मिळत नाही , लग्न का जमत नाही याची कारणें अभ्यासून त्यावर उपाय योजना केली पाहीजे ना? पैसा अपुरा पडत असेल तर उत्पनाचे नविन मार्ग शोधायला हवेत , गेलाबाजार खर्चावर  काटेकोर नियंत्रण ठेऊन वायफळ , अनावश्यक खर्च कमी केला तरी परिस्थितीत फरक पडेल”

“सहीं बात, या उपाय तोडग्यां बाबत फार मोठे गैरसमज पसरले आहेत किंवा जाणीवपूर्वक  पसरवून दिले आहेत , प्रत्यक्षात कोणताही उपाय – तोडगा प्रॉब्लेम सोडवू शकत नाही, हे उपाय तोडगे म्हणजे ज्योतिषाच्या नावाखाली लोकांची लूट करण्याची सोय आहे”

“गोखले , ज्योतिषी एकदा पैसे लुबाडून मोकळा होईल हो.  पण समस्या याहुनही गंभीर आहे, या उपाय-तोडग्यांच्या आहारी जाऊन लोक दुसरें काही प्रयत्न करतच नाहीत आणि स्वत:ला लुळे पांगळे करुन ठेवतात”

“मला असे वाटते की मुळात उपाय-तोडगे समस्या सोडवण्या साठी नसावेतच , ते केवळ अडचणीच्या काळात व्यक्तीचा धीर वाढावा म्हणून योजलेली एक सौम्य सायकॉलॉजीकल ट्रीटमेंट असावी.”

“गोखले,  तुमच्या सारखे समजुन घेणारे फार कमी आहेत आणि तशी ती कमी आहेत म्हणूनच ज्योतिषांची दुकानें सुखनैव चालू आहेत”

“आपले सुद्धा?”

“अहो , ते मी विनोदाने म्हणालो हो, पण मला तुमचा माईंड सेट एकदम आवडला”

“मलाही तुमचे  शास्त्राशी प्रामाणिक रहाणे आवडले”

”ठीक आहे, आता आपण डायरेक्ट विषयाला हात  घालूया, प्रथम मी तुमची जन्मपत्रिकाच तयार करतो, थोडा वेळ लागेल त्याला..” 

“पत्रिका तयार आहे समजा, मी तुम्हाला सांगतो ग्रहस्थिती”

“अरे वा , पत्रिका पाठ आहे म्हणायची , ज्योतिषाचा अभ्यास आहे का ? का बर्‍याच ज्योतिषांकडे जाऊन जाऊन पाठ झाली पत्रिका”

“दोन्ही”

“तुमची पत्रिका तयारच आहे म्हणता म्हणजे बराच वेळ वाचला म्हणायचा”

ज्योतिषीबुवांनी समोरचे नोटपॅड माझ्या कडे सरकवले, मी भराभरा सर्व  ग्रहांच्या अंशात्मक स्थिती आणि सर्व बाराही भावांचे आरंभबिंदू लिहून दिले”

“वा, अक्षर फारच सुरेख आहे हो तुमचे , आजकाल असे चांगले हस्ताक्षर फार कमी जणांचे बघायला मिळते”

“धन्यवाद!”

ज्योतिषीबुवांनी लगेच त्या तबकडीवर माझी जन्मपत्रिका तयार केली.

“साधारण आगामी तीन वर्षाचा काळ डोळ्यासमोर ठेऊ आणि त्यातही आगामी एक वर्ष जरा जास्त खोलात जाऊन पाहूया , कसे?”

“चालेल”

ज्योतिषीबुवांनी समोरच्या पॅड वरचे पान उलटले , डोळ्यावरचा चष्मा नाकावर ओढत , माझ्याकडे पाहीले.

“मला नोकरीतल्या बदला संदर्भात आपल्या कडून  मार्गदर्शन हवे आहे,  आमच्या कंपनीच्या काही क्लायंट कडून मला वारंवार जॉब ऑफर्स येत असतात पण मी त्यात कधी इंटरेस्ट दाखवला नव्हता कारण सध्याच्या नोकरीत वाईट असे काहीच नाही.  पण गेल्या महीन्यात आलेल्या दोन ऑफर्स खरेच तगड्या वाटत आहेत , त्यांचा विचार करावासा वाटतो पण मला निर्णय घेता येत नाही”

“गोखले तुमची पत्रिका ‘नोकरी वाल्या’ ची नाही, मी खात्रीने सांगतो”

ज्योतिषीबुवांचे हे विधान शब्दश: खरे ठरेले आहे, आजपर्यंत (२०१६) च्या ३० वर्षाच्या करीयर मध्ये मी अवघी ११ वर्षे पे-रोल वरची म्हणता येईल अशी नोकरी केली आहे , बाकी १९ वर्षे भागीदारीतला व्यवसाय, स्वतंत्र प्रोप्रायटरी व्यवसाय, सल्लागार अशी गेली आहेत ! नोकरी तशी मला मानवलीच नाही.   

“मला पण कोठुनतरी आतुन तसेच वाटत असते, पण नोकरी सोडून व्यवसाय करायचा विचार सध्या तरी करु शकणार नाही, त्यामुळे अजून काही वर्षे तरी नोकरी पेशातच राहाणे भाग आहे”

“तुमच्या बोलण्यावरुन असे दिसते की   ‘दुसरी नोकरी मिळेल का हा तुमचा प्रश्न नाही’ तर ‘नोकरी बदलू का?’ असा तुमच्या समोरचा प्रश्न आहे , बरोबर?”

“हो, स्थूल मानाने तसेच म्हणता येईल, पण केवळ बदला साठी बदल म्हणून मला नोकरी बदलायची नाही, नोकरीत बदल मला केव्हाही करता येईल , अगदी आज म्हणले तर आज सुद्धा , पण या झाडावरुन त्या झाडावर लटकत बसण्यापेक्षा चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण  ‘जास्त समाधान ‘ वाटेल अशा क्षेत्रात मला काम करायला आवडेल”

“असे जर असेल तर तुम्हाला ‘ समाधान’ या शब्दाची तुमची व्याख्या काय ते ठरवता आले पाहीजे , ती तयार असेल तरच ‘जास्त समाधान’ म्हणजे नेमके काय ते ठरवता येईल , बरोबर  ना?”

“नक्कीच, मी गेले कित्येक महीने याच्याच मागे आहे, नेमके काय मिळाले म्हणजे ‘समाधान’ वाटेल ते  ठरवणे अवघड असले तरी मी काही आडाखे बांधले आहेत..”

“एक्सलंट , गोखले अहो फार मोठा पल्ला गाठलात म्हणायचा तुम्ही. कौतुक आहे तुमचे!”

“मी सांगतो तुम्हाला माझी ‘समाधाना’ ची व्याख्या , अर्थात ही व्याख्या माझ्या आजच्या स्थिती नुसार आणि आजच्या विचार सरणीं वर , अनुभवावर आधारीत आहे, कदाचीत यात पुढेमागे बदल होऊ शकेल”

“असु द्या, आज , आत्ताचा काय विचार आहे ते तरी सांगा, पुढचे पुढे बघू”

“हो”

मी थोडक्यात माझे विचार  सांगीतले, ज्योतिषीबुवा लक्ष पूर्वक ऐकत होते.  

“गुड , चांगले थिंकिंग आहे”

“आता, माझी सध्याची नोकरी यातले काही निकष पूर्ण करते आहे तर काही नाही, दुसरी नोकरी किती निकष पूर्ण करेल किती नाही याचा काय भरोसा? त्यापेक्षा आहे ही नोकरी काय वाईट आहे ?”

“म्हणतात ना ‘If it ain’t broke, don’t fix it’ !”

”माझ्या बाबतीत अनुभव असा आहे , की मला फिक्स करायला आवडते आणि फिक्स करायला काही नसले म्हणजे ‘ain’t broke’ स्थिती असली की मला काहीतरी मोडावेसे वाटते , म्हणजे ते फिक्स करायचा मौका मिळेल !आता नोकरी बदलाचे जे विचार डोक्यात घोळत आहेत ते याच मुळे असतील कदाचित!”

“इंटरेस्टींग  ! पण गोखले हे असे का होत असावे याचे उत्तर तुमच्या पत्रिकतच सापडणार आहे !”

“मला ते समजुन घ्यायला आवडेल” 

“तेच सांगायला तर बसलोय इथे, आणि असे विचारणारा कोणी फिरकत नाही हीच तरी माझी खंत आहे!”

“मी आलोय ना”

“देअर यु आर , आपण ह्या अंगाने तुमची पत्रिका तपासुया”

ज्योतिषबुवांनी समोरच्या तबकडी कडे बारकाईने बघायाला सुरवात केली, मी जरासा सावरुन बसलो.

भिंतीवरच्या त्या ‘साईकोशा’ घड्याळ्याची टीक-टीक सोडता बाकी कोणताच आवाज त्या खोलीत नव्हता..

क्रमश:

या लेख मालिकेतले पहिले भाग इथे वाचा…

 

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

13 प्रतिक्रिया

///////////////
 1. sandip

  केवढा तो वाचकाला ताण.
  सस्पेन्स स्टोरी वाटतात.
  गोखले एकच प्रकार सातत्यानी लिखाणात आला तर तबियतदार वाचक काही भाग टाऴतो.
  साभांऴा

  0
 2. mandar joshi

  sushas kaka… kitti kitii waat pahila lawli ho…. chatak panyachi waat pahun pahun thakun gela , sakshat warun raja prassana zala pan he vachanachi trusha purna karu shakal nahi
  nehmi sarkhach khup chan pan jara lawkar lawkar taka ho dheer nahi nighat ajibat

  0
  1. सुहास गोखले

   श्री. मंंदारजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद, सध्या इतर अनेक महत्वाच्या कामात मग्न आहे , ब्लॉग लिहायचे मनात असून सुद्धा शक्य होत नाही, तरीही आपल्या सारख्या चाहत्यांची मागणी लक्षात घेता जरा जास्त वेळ या ब्लॉग लेखनासाठी द्यायचा प्रयत्न करेन. आपल्या अशा सुचनांचे स्वागत आहे.

   सुहास गोखले

   0
 3. स्वप्नील

  सुहासजी संवाद छान दोघांच्या मधील ! यावरून एक विचारावेसे / सांगावेसे वाटते मागे तुम्ही एक मुद्दा मांडला होता विशिष्ट जन्मवेळी त्याच ठिकाणी / शहरात बरेच जण जन्म घेतात त्या सर्वांची पत्रिका सारखीच असणार,पण भविष्य किंवा जीवनक्रम नाही मग एकंदरीत पत्रिकेवरून मार्गदर्शन करताना नक्की काय करायचे ? कोणते तंत्र वापरायचे ? याबद्दल काही लेख लिहा ना .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्निलजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   आपण विचारली आहे ती शंका बर्‍याच जणांना पडते. याला एकच एक सरळ सोपे आणि संक्षिप्त असे उत्तर नाही. आपण म्हणता आहात तसे हा एक वेगळ्या आणि मोठ्या लेखाचा (लेखमालेचा) विषय होऊ शकतो.

   जन्मवेळ (आणि जन्मदिवस) एकच असली तरी काही फरक निश्चितच असतात, सर्व ग्रह एकाच जागी असतात पण जन्मलग्नाचा अंश पुढे / मागे असू शकतो, पण हा फरक अगदी सुक्ष्म आहे , हा फरक टिपण्याचा प्रयत्न कृष्णमुर्तींनी ‘सब लॉर्ड (किंवा सब-सब लॉर्ड्स) ‘ च्या माध्यमातून केला आहे, त्या द्वारे साधारण दोन मिनिटांचा फरक असल्यास पत्रिका वेगळी होते आणि त्यामुळे व्यक्तीच्या भविष्यात फरक पडतो. ‘सब-सब लॉर्डस’ वापरल्यास दोन – चार सेकंदच्या फरकातल्या जन्माच्या परिकेतले फरक नोंदता येतात आणि त्याचा वापर करता येतो. पारंपरिक ज्योतिषशास्त्रात / D-60 (४ सेकंद) , D-120 ( २ सेकंद) इतका सुक्ष्म फरक नोंदवता येतो. युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्येही असाच सुक्ष्म फरक विचारत घेऊन भविष्य बघता येते. त्यामुळे पद्धती आहेत पण त्याचा वापर करणारे फार कमी आहेत , मुळात जन्मवेळ इतकी अचूक नोंदवली जात नाही हाच एक मोठा अडसर आहे!

   जरी जन्म अगदी एकाच वेळी झाला तरी इतर बाबीं मध्ये फरक असतातच. उदाहरणार्थ:

   १) मागच्या जन्मातले संचित कर्म
   २) कौटूंबिक आणी सामाजिक पार्श्वभूमी. (आर्थिक स्थिती, संंस्कृती , धर्म, प्रांत , जात-पात इ.)

   एखाद्या कोट्याधीश श्रीमंत घरात,किरकीट वाडीतल्या एखाद्या शेतमजुराच्या घरात आणि उत्तर कोरियात सारख्या हुकुमशाही , कम्यिनिष्ट देशात जन्मलेली तीनही मुले अगदी एकाच वेळी जन्मलेली असली तरी प्रत्यकेला अत्यंत भिन्न कौटुंबिक आणि सामाजीक पार्श्वभूमी लाभली आहे , त्याचा फरक त्यांच्या भाकितांवर पडणारच. पत्रिकेनुसार त्यांचे विधीलिखीत एक सारखे असेलही पण पुर्वजन्मातल्या संचित कर्मा नुसार आणि उपलब्ध कौटुंबिक आणि सामाजीक पार्श्वभूमी नुसार ते मुल ह्यातले किती पदरात पाडून घेणार हे ठरेल. त्यामुळे पत्रिकेने दाखवलेले इव्हेंट एखाद्याच्या बाबतीत अगदी खरे ठरतील , एखाद्याच्या बाबतीत ते फारसे प्रत्ययास येणार नाहीत. काही वेळा संचित कर्मा नुसार आणि या जन्मातल्या कर्मा नुसार भोग कमी जास्त होऊ शकतात किंवा त्यांचे मायने बदलतात.

   एकच अभ्यासक्रम , एकाच वर्गात बसून , एकाच शिक्षका कडुन शिकवला गेला असला तरी परिक्षेत मिळणारे मार्क हे ज्याच्या त्याचा बुद्धीमत्तेनुसार , घेतलेल्या मेहेनती नुसार बदलत जातात , इथे बुद्धीमत्ता म्हणजे पूर्वसंचित, कौटुंबिक आणि सामाजीक पार्श्वभूमी आणि मेहेनत म्हणजे त्या व्यक्तीने केलेल प्रयत्न आणि वापरलेले फ्री विल असे समीकरण घेतल्यास , आपल्या लक्षात येईल.

   असो, विषय खूप मोठा आहे , यावर कधीतरी लिहेन , तशी नोंद मी करुन ठेवत आहे.

   सुहास गोखले

   0
 4. profbnk

  फारच सोप्या आणि interesting पद्धतीने आपण अति प्राचीन ज्ञान उलगडत आहात सर ! धन्यवाद .
  भावचलित वर आपला लेख वाचला . गोचर व क्षेत्र यांवर कृपया लिहावे .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संदीपजी,

   अहो, नेहमीचेच , काही ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये बिझी आहे , त्यातुन मोकळा होताच लेखन चालू !

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   श्री. दीपकजी,

   ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये बिझी आहे , त्यातुन मोकळा होताच लेखन चालू !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.