माझ्याकडे काहीसे पाहुन काहीसे हसत ज्योतिषीबुवा म्हणाले…

“बोला!”

“हेच ते .. ज्योतिष, दुसरे काय?”

“ते ही खरेय म्हणा , नाहीतर आमच्या कडे कोण येणार इतकी वाकडी वाट करुन”

“हो तर, भलतीच वाकडी वाट करावी लागते”

“जिन्यातल्या आईसाहेब भेटल्या वाटते”

मी नुसताच हसलो.

“अच्छा , काय करता तुम्ही?”

त्यावेळे पर्यंत बर्‍याच ज्योतिषांचा अनुभव (?) गाठीशी असल्यामुळे मी ज्योतिषाला अनाहुत अशी  वैयक्तिक माहीती द्यायची नाही असे पक्के ठरवले होते.

“नोकरी”

“मस्त”

“माझा प्रश्न..”

ज्योतिषीबुवांनी मला थांबायची खुण केली आणि त्यांनी लिहलेला तो कागद माझ्या समोर ठेवला.  मला आश्चर्याचा धक्क बसला ….

त्या कागदावर जे लिहले होते ते माझ्या प्रश्नाकडेच रोख दाखवणारे होते!

“व्वा ! मानले तुम्हाला, मी काही सांगायच्या आतच माझा प्रश्न साधारण काय स्वरुपाचा आहे ते अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही ,  हे मी पहिल्यांदाच बघतोय !”

“यात काही विषेष नाही,  आणि जादु , कर्ण पिशाच्च असले पण काही नाही”

“माझा असा तर्क आहे की तुम्ही आत्ता त्या तबकडी वर एक पत्रिका मांडली आहे ती बघून हा अंदाज केला असावा?”

“बरोबर ओळख़लेत तुम्ही,  तुम्ही काय ज्योतिषाची माहीती राखून असता काय ?”

“थोडे फार वाचलयं ..”

“म्हणजे  माझी परिक्षा घ्यायला आलात ?”

“नाही हो, मी काय आपली परिक्षा घेणार? मी तर एक बच्चा आहे आपल्या समोर”

“मी थट्टेने म्हणालो हो, तुमचा हेतु तसा नसेल पण काही जण असतात असे , ज्योतिषाची परिक्षा घ्यायला आलेले”

“शक्य आहे , तुम्हाला अशा लोकांचे काही अनुभव निश्चितच आले असणार “

“बरेच अनुभव आलेत, पुण्यात अशा खवचट आणि रिकामडेकड्या लोकांची काही कमी नाही! पण गोखले, एक सांगतो, अशी व्यक्ती जर समोर आली तर मला ते लगेच समजते”

“चेहेर्‍यावरुन , देहबोली , बोलण्याची पद्धत यावरुन याचा अंदाज येत असेल”

“हो, ते तर आहेच पण काही वेळा एव्हढ्यावर भागत नाही , पुण्यात ‘नटसम्राट’ बरेच आहेत!”

“मग तेव्हा काय करता?”

“ही काय , ही जी पत्रिका मी बनवलीय ती सांगते मला , किमान तशी हिंट तरी देतेच देते, मग आपण सावध होऊन आणखी काही क्लूज मिळतात ते बारकाईने  पहायचे”

“वंडरफुल! पण ही कसली पत्रिका आहे , माझी जन्मपत्रिका तर निश्चितच नाही कारण मी माझा डेटा अजून आपल्याला दिलाच नाही ”

“तुम्ही जेव्हा माझ्या समोर येऊन बसलात त्या वेळेची ही पत्रिका बनवली आहे “

“म्हणजे ‘प्रश्नकुंडली ‘ का?”

“अरे वा! बरीच माहीती दिसते तुम्हाला”

“नाही हो, ते हसबेंचे ‘कृष्णमुर्ती पद्धती’ वरचे एक पुस्तक वाचतोय सध्या , त्यात असल्या प्रश्नकुंडली बाबत बरेच लिहले आहे”

“उत्तम, पण ही प्रश्नकुंडली नाही‍”  

“मग काय आहे हे?”

“प्रश्नकुंडली ही एखाद्या विषीष्ठ प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बनवलेली असते , पण तुम्ही अजून प्रश्नच विचारलेला नाही, त्यामुळे याला प्रश्नकुंडली म्हणता येणार नाही”

“शक्य आहे तुम्ही दुसरे काहीतरी म्हणत असाल याला पण टेक्नीकली ही आत्ताच्या वेळेची पत्रिका आहे, ते ‘टाईम चार्ट’ असे म्हणतात ती”

“हुष्षार हो तुम्ही..  हा टाईम चार्ट्च आहे,  याला मी ‘कन्सलटेशन  चार्ट’ म्हणतो इतकेच, हा चार्ट मला सांगतो , तुम्ही कशासाठी आला आहात , सध्या तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात , तुमचा आयुष्यात नुकतेच काय घडून गेले आहे आणि नजिकच्या काळात काय घडण्याची शक्यता आहे!”

“बापरे , हे ईतके सारे हा एकटा चार्ट सांगू शकतो?”

“का नाही? त्याचे काय आहे,  व्यक्ति प्रश्न विचारायला येते ती वेळच मुळात नियतीने प्लॅन केलेली वेळ असते आणि त्या प्रश्न विचारायच्या क्षणातच त्या प्रश्नाचे उत्तर असते. फक्त प्रश्न अत्यंत तळमळीने विचारला गेला पाहीजे , उगाच आपले खडा टाकुन पाहाव अशा हेतुने नव्हे”

“माझ्या साठी नविनच आहे हे “

“एक साधा टाईम चार्ट खूप छान माहीती देतो, अर्थात वेळ जुळुन आली तरच”

“पण वेळ जुळून आली नाही तर काय होते?”

“टाइम चार्ट तेही सांगतोच ना!”

“पण हे सगळे कसे काय सांगू शकता म्हणजे याचे काही वेगळे शास्त्र आहे का ? एखादी वेगळी थिअरी , पद्धती ?”

“दोन्ही ही नाही , नेहमी सारखीच साधी पत्रिका आहे ही पण त्याचा अर्थ लावायची पद्धत काहीशी वेगळी आहे “ .

“या चार्ट ने पुरवलेली माहीती किती उपयोगी ठरु शकेल याची कल्पना येतेय मला “

“माझे हे एक महत्वाचे हत्यार आहे असे समजा, पण गोखले दर वेळेला इतकी सारी माहीती मिळेलच असे नाही , काही वेळा बार फुसका ठरतो”

“पण जर तुम्ही म्हणता तसा फुसका बार निघाला तर?”

“सोप्पे आहे ,  बार फुसका निघाला म्हणजेच ‘कन्सलटेशन  चार्ट’ ने दिलेला अंदाज आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत असेल तर याचा अर्थ आलेली व्यक्ति ‘जेन्युईन’ नाही, किंवा त्या व्यक्तिने प्रश्न विचारायला / ज्योतिष जाणायला चुकीची वेळ निवडली , ही वेळ जातकाच्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी योग्य नाही, पुन्हा केव्हातरी प्रयत्न करावा लागेल, अशा  वेळी जातकाला समजाऊन सांगून परत पाठवायचे”

“झालं,  एकदा गेलेले गिर्‍हाईक कसले वापस येतेय.  इथे पुण्यात प्रत्येक गल्लीबोळात ज्योतिषी बसुन राहीलेत!”

“म्हणुनच माझ्या कडे गर्दी नाही आणि तुम्ही बसलाय त्या गादीत ढेकूण नाही !” 

आम्ही दोघेही मनमुराद हसलो.

“मला आपले हे तंत्र शिकायला आवडेल “

“त्याबद्दल बोलू आपण नंतर, पण आत्ता तुम्ही ज्या कामासाठी आला आहात त्याचा विचार आधी करुया”

“बरोबर”

“गोखले , तुम्ही काही बोलायच्या आधीच मी बरेच काही जाणले आहे , पण तुमचे प्रश्न आता जरा सविस्तरपणे सांगा म्हणजे त्यावर काम करणे सोपे जाईल”

“तसे मी काही प्रश्न विचारायचे असे ठरवून आलो होतो पण तुमची स्टाईल ,  अ‍ॅप्रोच पाहता जरा वेगळ्या अंगाने  म्हणजे ज्याला आपण ‘ओव्हर व्हू’ म्हणतो त्या पद्धतीने चर्चा केली तर चालेल ? कारण मला ‘अमुक कधी होईल ,  तमुक योग आहेत का’ असे मायोपिक व्हिजन वाले प्रश्न विचारणे बरोबर वाटत नाही.. “

Myopia, also known as near-nearsightedness and short-nearsightedness, is a condition of the eye where the light that comes in does not directly focus on the retina but in front of it, causing the image that one sees when looking at a distant object to be out of focus. It does not affect focus when looking at a close object}

“आवडले आपल्याला , गोखले , असे  ज्योतिषशास्त्राचा   खरा आणि चांगला उपयोग करुन घेणारे जातक  मला आवडतात.. पण यात एक अडचण आहे”

“काय?”

“फार मोठा कॅनव्हॉस पण नको ठेवायला. उगाच माझ्या पुढच्या १०-२० वर्षाचे सगळे सांगा असे असू नये.”

“कारण?”

“दोन कारणें , एक म्हणजे असे डीट्टेलवार असे काही सांंगताच येत नाही आणि  जरी सांगता आले तरी सांगू नयेच कारण उद्या काय होणार आहे हे जर आधीच कळले तर आयुष्यातली सगळी रंजकताच नाहीशी होईल ना?”

“बरोबर, म्हणतात ना

कब तलक हमसें ये तकदीर भला रुठेंगी  ।

इन अंधेरोंंसे उजाले की किरण फुटेंगी  ।

गम के दामन में कही चैन छुपां हैं यारों ….  

कल की उम्मीद में इंसान जिया है यारों..”

“माशाल्ला , क्या सहीं बात की आपने !  सगळे आधीच समजल तर नुसती रंगतच जाणार नाही तर जीवन भयाण होईल,   मग तुम्हीच म्हणाल –

काश वो दिन लौट आये जब नींद बड़ी बेफिक्र आती थी, 

आँखें खुलती थी रोज नयी दुनिया नजर आती थीं। 

“जी बिल्कुल,  आपल्याला जे योग्य वाटते ते आणि तेव्हढे सांगा, चालेल मला”

“तो शुरु करेंगे?”

“हम बस्स आपकी बात सुनने के लिये बेताब है ।“

ज्योतिषीबुवा दिलखुलास हसले. मी काही बोलणार इतक्यात त्यांनी खुणेनेच मला ‘थांबा थोडी कळ काढा’ अशा अर्थाची खुण केली.

ज्योतिषीबुवांच्या हालचाली एकदम निवांत होत्या , कोणतीही घाई नाही की गडबड नाही ,  एखाद्या कुशल कारागिर जसा  एकाग्र चित्ताने काम करतो तसे तब्बेतीत काम होते , प्रत्येक हालचाल , प्रत्येक क्रिया अगदी तोलून मापून होत होती, अचूक होती कोठेही वायफळ पणा नव्हता.

ज्योतिषीबुवांनी त्यांच्या समोरच्या टेबलाच्या ड्रॉवर मध्ये हात घालून एक नाजुक कलाबुतीचे डिझाईन असलेली  रेशमी चंची  बाहेर काढली, चंचीची दोरी सैल करताना दोरीला बांधलेले नाजुकसे पितळेचे घुंगरु मस्त पैकी रुणझुणले , काय रसिकता म्हणायची!

चंचीत अलगत हात घालून अगदी निगुतीने एक सुबक , चिमुट्भर गायछाप (त्यांच्या) तळहातावर पडली, अगदी चिमूटभर , जास्त नाही की कमी नाही, मग चंचीतून बाहेर आली चुन्याची डब्बी, मर्लिन मनरो स्टाइल नाजुक कमनिय कटवर्क केलेली , मस्त पॅटीना मिरवणारी चांदीची डब्बी !

एखाद्याला मधाचे बोट लावावे ना तश्शी एक चुन्याची कणी गाय छापच्या नेटक्या चिमटीवर अलगद विसावली. आता ज्योतिषी बुवांनी ती चिमुट न्याहाळली, उगाचच टोक बाहेर काढून वाकुल्या दाखवणारी एखाद दुसरी चुकार काडी दूर केली गेली.  आता पुढचे एक मिनिटभर  अगदी एखाद्या लखनवी नवाबाच्या तोर्‍याला साजेशा मुघली नजाकतीने ते मिश्रण मळले गेले , अगदी तल्लीनतेने!

असे हे  तयार ‘चैतन्यचूर्ण’ मोठ्या समाधानाने दाढे खाली सरकावले गेले, काही क्षण डोळे मिटून घेतले गेले,  “ऐसा झटका लगे जियासे , पुनर जनम हुई जाय .. “ असेच काहीसे होत असणार!

काही क्षणानंतर, एखादे खाँसाहेब मोठी पल्लेदार तान संपवून समेवर येतात तसे ज्योतिषीबुवा पण समेवर आले..

“त्याचे काय आहे  गोखले , तंबोरा सुरात जुळवल्या शिवाय गवयाचे गाणे खुलत नाही !”

“व्वा , क्या बात है ।“

क्रमश:

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

15 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  सुहास जी तुम्हाला कन्सल्टेशन चार्ट चे महत्व/ माहिती त्यावेळी कळली काय ? आणि तुम्ही चार्ट जो वापरता तो भारतीय पद्धतीचा की पाश्चिमात्य पद्धतीचा ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्निलजी ,
   हो, त्या ज्योतिषाकडूनच माला ‘कंसलटेशन चार्ट ‘ ची प्रेरणा मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
   माझा ‘कंसलटेशन चार्ट ‘ पाश्चात्य पद्धतिचा असतो.

   सुहास गोखले

   0
 2. स्वप्नील

  …..आणि त्यावेळेची कुंडली बनवली तिला जर कॉन्सलटेशन चार्ट म्हंटले मग प्रश्न कुंडली कोणत्या वेळे नुसार बनवली किंवा कसे ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्निलजी ,
   ‘कंसलटेशन चार्ट ‘ आणि ‘प्रश्न कुंडली’ मध्ये काही फरक नसतो . वेळेत काहीसा फरक असतो , ‘कंसलटेशन चार्ट ज्योतिषी आणि जातक प्रथम भेटतात त्या वेळेचा असतो तर ‘प्रश्न कुंडली’ जातक जेव्हा प्रश्न विचारतो आणि ज्योतिषाला तो प्रश्न पूर्ण समजतो त्यावेळेची असतो, यात अपंधरा मिनिटे ते अर्धा तास (किंवा जास्त) असा वेळेचा फरक असू शकतो. दोन्ही चार्ट हाताळण्याची पद्धत मात्र वेगळी असते.

   सुहास गोखले

   0
 3. Santosh

  सुहासजी,

  वाह काय लेखणी आहे, तबियत खुश झाली.
  ज्योतिष लेखाबरोबर, रसिकता आवडली.

  त्या अभ्यासू आणि त्यावेळेच्या काळाचाही (आधुनिक) पुढे विचार करणाऱ्या ज्योतिषबुवांच सांगितलत तर आवडेल.

  पुढील लेखाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

  संतोष

  0
 4. स्वप्नील

  कन्सल्टेशन चार्ट आणि प्रश्न कुंडली मध्ये काय फरक आहे मग ? त्या जोतिषांनी तुमचा प्रश्न जर प्रश्न कुंडली वरून सोडवला तर मग तो चार्ट आणि ती कुंडली एकाच ना ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्निलजी ,
   ‘कंसलटेशन चार्ट ‘ आणि ‘प्रश्न कुंडली’ मध्ये काही फरक नसतो . वेळेत काहीसा फरक असतो , ‘कंसलटेशन चार्ट ज्योतिषी आणि जातक प्रथम भेटतात त्या वेळेचा असतो तर ‘प्रश्न कुंडली’ जातक जेव्हा प्रश्न विचारतो आणि ज्योतिषाला तो प्रश्न पूर्ण समजतो त्यावेळेची असतो, यात अपंधरा मिनिटे ते अर्धा तास (किंवा जास्त) असा वेळेचा फरक असू शकतो. दोन्ही चार्ट हाताळण्याची पद्धत मात्र वेगळी असते.

   सुहास गोखले

   0
   1. स्वप्नील

    सुहास जी पाश्चिमात्यांचे पंचांग वगरे कसे असते किंवा तुम्ही पाश्चिमात्य पद्धती वापरता त्यात आणि आपल्यात खूप फरक आहे का ? आणि मुळात ही भारतातली विद्या मग खरोखर त्यांचा कंसल्टेशन चार्ट ची पद्धत किंवा तंत्र आपल्यापेक्षा सरस आहे का ? अर्थात त्यांचे संशोधन चांगले असते हा भाग अलाहिदा !!

    0
    1. सुहास गोखले

     श्री स्वप्निलजी,

     आपल्या कडच्या ‘पंचांगात’ ग्रहस्थिती दिलेली असते शिवाय इतर बरीच माहिती अगदी महिन्याचे राशी भविष्य , पावसाचे , शेतीचे ,संक्रांतीचे वर्णन , सण वार, तिथी मार्गदर्शन असे बरेच काही असते, तसे पाहीले तर आपल्या कडच्या पंचांगातून ग्रहस्थिती रोजची दिलेली नसतेच दर पंधरा दिवशीची असते.

     पाश्चात्यांचे पंचाग (त्याला पंचाग म्हणायचे का?) हे फक्त रोजची (सायन) ग्रह्स्थिती (बहुदा दुपारी बारा वाजताची) दिलेली असते , यालाच एफेमेरीज म्हणतात.

     मुळात भारतात देखिल ह्याच एफेमेरीज वापरुन सायन ग्रहस्थिती घेतात , त्यावर अयनांशाचे संस्कार करुन निरयन ग्रहस्थिती मिळवली जाते. राफेल च्या एफेमेरीज पूर्वी खूप प्रसिद्ध होत्या , सगळे जण (अगदी कृष्णमुर्ती सुद्धा!) याच एफेमेरीज वापरत होते.

     अमेरिकेच्या ‘नासा’ ने अगदी अचूल एफेमेरीज तयार केल्या आहेत (याहुन अधीक अचूक दुसरे काहीच असू शकत नाही !‌ ) त्या ‘जेट प्रोपुलश्न लॅब एफेमेरीज म्हणतात. या नासा च्या एफेमेरीज चे लायसेंस खूप महाग असल्याने सगळे जण तुलनात्नक स्वस्त अशा स्विस एफेमेरीज वापरतात. हल्लीची जवळजवळ सर्वच सॉफ्ट्वेअर्स ‘स्विस एफेमेरीज’ वापरतात ,

     मुळ ज्योतिष्शास्ता कोणाचे होते याबद्दल वाद विवाद आहेत. काही कल्पना भारतात निर्माण झाल्या उदा: नक्षत्रें, दशा पद्धती, वर्ग कुंडल्या इ. राशी ही कल्पना भारतीय नाही ! राशी या इजिप्स्गियन / खालडियन संस्कृतीतून अरबां कडे तिथुन ग्रीकांकडे व नंतर भारतात पोहोचल्या (आणी भारतीयांनी त्या बेमालूम आपल्या नक्षत्र पद्धतीं मध्ये घुसडून दिल्या !) , प्रोग्रेशन्स, डायरेक्शन्स पूर्णत: ग्रीकांचे आहे .

     तंत्र सरस का निरस हे ते वापरण्या व्यक्तीच्या कौशल्यावर ठरते. प्रत्येक पद्धतीत चांगले असे काही आहे , त्याचा वापर करुन घ्यायचा. हे माझे आम्ही शोढ लावला, हे आमचे शास्त्र आहे (तुम्ही उचलेगीरी केली!) असा वाद न घालता , जे चांगले आहे , वापरता येण्या जोगे आहे, याचा पडताळा येतो ते स्विकारायचे!

     सुहास गोखले

     0
 5. pramod bhelose

  sir,
  aapan OBE आऊट ऑफ बॉडी एक्स्पीरीयन्स बद्दल काहीच लिहले नाही…..
  sahaj athavale kahitari vicharyache rahin gele mhanun…
  Pramod

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रमोदजी,

   OBE बद्दल लिहण्यासारखे बरेच आहे , मी स्वत: यात बरेच प्रयोग केले आहेत , स्वत: त्याचा अनुभव घेतला पण आहे , वेळ मिळालातर काहीतरी लिहेन नक्की. आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद .

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.