‘उ

द्या काय घडणार?. ‘अच्छे दिन येणार की नाही?’! ‘भविष्यात काय घडणार आहे?’ या बद्दलची उत्सुकता नाही असा मनुष्य सापडणार नाही. कोणी हे उघड उघड मान्य करेल तर कोणी करणार नाही इतकाच काय तो फरक. बाहेर ‘अंधश्रद्धा निर्मुलना’ चा झेंडा मिरवणारे सुद्धा मागील दाराने , चोरी छुपे , ‘माझा याला कट्टर विरोध पण काय करु वडीलांनी आग्रह मोडवेना म्हणून आलो तुमच्या कडे..’ असे म्हणत माझ्या कडे येऊन भविष्य बघून गेलेत…

त्यावेळी मला म्हणावेसे वाटले होते:

हमको जो ताने देते हैं, हम खोए हैं इन रंगरलियों में,

हमने उनको भी छुप छुपके, आते देखा इन गलियों में ।

‘उद्या काय घडणार? ही एक नैसर्गिक उत्कंठा आहे, , ती तशी असणे स्वाभाविक आहे, त्यात काहीच चूक नाही आणि अशी उत्सुकता ठेऊन एखाद्या ज्योतिर्विदाला भेटले तर त्यात कोणताही कमीपणा नाही किंवा ते मनाच्या कमकुवत पणाचे लक्षण नाही. हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करणे किंवा पिकनिक चे प्लॅनिंग करताना मोबाईल वरचे व्हेदर अ‍ॅप (Weather) तपासणे हे जर मानसिक कमकुवत पणाचे नसेल तर ज्योतिषाला भेटणे हीच फक्त मानसीक कमकुवतता कसे काय?

हा, इथे एक मात्र खरे आहे , ‘ज्योतिषाला भेटणे’ आणि ‘चांगल्या ज्योतिषाला भेटणे’ यात फरक आहे. डॉक्टरी , वकील, दुकानदारी, ऑनलाईन शॉपी अशा व्यवसायाच्या कोणत्याही क्षेत्रात वाईट लोक असतातच, ज्योतिषात पण आहेतच आणि दुर्दैवाने ज्योतिषात हे प्रमाण खूप जास्त आहे हे पण सत्य आहे. याला कारण म्हणजे , इतर व्यावसायीकांच्या बाबतीत जसे एखादी विहीत अर्हता असावी लागते, सरकारी लायसेन्स/ रजिस्ट्रेशन आवश्यक असते आणि एखाद्या शासकीय/ शासनमान्य नियामक /  रेग्युलेटरी बॉडीचे अशा व्यावसायींकावर कडक नियंत्रण असते तसे काही ज्योतिषात नाही. ज्योतिषशास्त्राला मुळातच  शासनाची मान्यता नाही त्यामुळे ज्योतिष हा व्यवसाय म्हणून करणार्‍याला विहित पातळी वरचे शिक्षण घेतलेले असणे, एखाद्या वरिष्ठ ज्योतिषाकडे सक्तीची उमेदवारी करणे  अशी कोणतीही आवश्यक नाही. पुढे जाऊन ज्योतिष व्यवसायीकांवर कोणाचेच नियंत्रण नाही याचाच परिणाम म्हणून कोणीही ऐरागैरा , नथ्थु , लल्लु पंजु उठतो आणि ज्योतिषी शास्त्री म्हणवून घेऊ लागतो. फेसबुक , व्हॉट्स अ‍ॅप मुळे हे काम अधिकच सोपे झाले आहे.

आज ज्योतिषी म्हणवणारे ज्योतिष सांगण्या ऐवजी ‘उपाय- तोडगे’ स्पेशॅलिस्ट बनले आहेत , हे प्रकरण आता इतक्या टोकाला गेले आहे की पत्रिका न पाहताच उपाय तोडग्यांचा मारा सुरु करावयाचा असल्याने आता ज्योतिष बनण्या आधी काही अभ्यास करावा लागतच नाही! पण एक लक्षात घ्या मुळात ज्योतिष हे समस्या सोडवण्याचे शास्त्रच नाही. ज्योतिष म्हणजे उपाय तोडगे आणि ज्योतिष म्हणजे राशी भविष्य असे जे समीकरण निर्माण झाले आहे ते भयावह आहे. ज्या दोन बाबीं मुळे ज्योतिषशास्त्राचे कमालीचे नुकसान झाले आहे. ज्योतिषशास्त्राची सगळ्यात जास्त बदनामी या राशी भविष्याने झाली आहे. ‘उपाय- तोडग्यांचा’ बाजर भरायला सुरवात झाली आणि ज्योतिष शास्त्रात चोर, लुच्चे, लुटारु, कसाई आणि लफंग्यांची चलती सुरु झाली आणि बाजार बुणग्यांच्या गर्दीत स्वच्छ, प्रामाणीक आणि सात्विक ज्योतिषी औषधाला सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे.

भारतात ही परिस्थिती असली तरी परदेशात इतकी वाईट वेळ आलेली नाही. आपल्या कडे राशी भविष्या ने ज्योतिषशास्त्राचे जितके नुकसान केले आहे तितकेच नुकसान या वेस्टर्न वाल्यांच्या  ‘सन साईन्स’ने केल आहे. पण तिकडे ‘उपाय – तोडग्यां’ चा बाजार नाही!

आपण भारतीय ‘पारंपरीक ज्योतिषा’ चा अभिमान बाळगतो , ज्योतिष शास्त्र आपल्या इथेच विकसीत झाले आणि नंतर अरब, ग्रीक लोकां मार्फत विदेशात पोहोचले असे ही बोलले जाते. या वादात आपल्याला पडायचे नाही. पण भारतात मानले जाते तसे पाश्चात्य ज्योतिषशास्त्र दुबळे नाही तर काही बाबतीत ते आपल्या ‘पारंपरीक ज्योतिष शास्त्रा’ पेक्षा प्रगत आहे, नुसते प्रगत नाही तर कमालीचे प्रगत आहे!

आपल्या ‘ज्योतिषशास्त्रा’ला हजारों वर्षांची परंपरा आहे, व्यास, गर्ग, वराहमिहीर अशा थोर ऋषीमुनिंचा वारसा आहे. तसा या ‘पाश्चात्य’ ज्योतिषाला लाभलेला नाही. आपण ‘बाबा वाक्यं प्रमाणमं’ करत बसलो पण पाश्चात्यांना असे म्हणायची सोयच नव्हती! एखादा टॉलेमी, विल्यम लीली सोडता त्यांच्या कडे कोणी ‘बाबा’ नाहीच ! त्यामुळे असेल कदाचित पाश्चात्यांना एक कोरी पाटी मिळाली आणि पाश्चात्यां कडे जात्याच भरपुर प्रमाणात असलेल्या जिज्ञासा , संशोधक वृत्ती, शिस्त तर्कनिष्ठता या गुणांचा जास्तीतजास्त चांगला उपयोग करत त्यांनी एक सुंदर , भक्क्म आणि प्रभावी शास्त्र निर्माण केले.

सध्याच्या काळात  ज्योतिषशास्त्रात जे काही नविन संशोधन होते आहे ते बहुतांश या वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्येच हे मान्यच करावे लागेल. खास करुन पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात मानसशास्त्रीय अंगाने पत्रिकेचे अ‍ॅनॅलायसीस केले जाते तो भाग आपण सगळ्यांनी आवर्जुन शिकला पाहीजे. मुळात वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी चा सारा भर हा ‘कॅरेक्टर रिडिंग्ज’ वर असतो , इव्हेंट प्रिडीक्शनला (लग्न कधी होईल , नोकरी कधी लागेल ) ते लोक फारसे महत्व देत नाही. त्यापेक्षा त्यांचे जे ‘SWOT’ (स्टेंग्थ – विकनेस – अ‍ॅपॉर्च्युनिटिज- थ्रेट्स) अ‍ॅनालायसिस असते त्याचा आपल्याला जास्त उपयोग होतो. लग्न कधी हे जाणून घेण्यापेक्षा ते लग्न सुखी असेल का किंबहुना असे लग्न सुखी करण्यासाठी मी काय करु शकतो हा प्रश्न महत्वाचा असावा. नोकरी कधी मिळेल या पेक्षा पत्रिके नुसार मी कोणत्या क्षेत्रात काम केल्यास मला जास्त समाधान लाभेल किंवा माझ्यात असे कोणते टॅलेंट आहे की जे वापरुन मी माझे आयुष्य सुखी करुन घेऊ शकेन हे जाणून घेणे जास्त महत्वाचे असावे.

वेस्टर्न अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्ये याचाच जास्त वापर होतो आणि तो बरोबर ही आहे.

एखाद्या विषीष्ट घटनेचा बाऊ करुन घेऊन त्याचा कालनिर्णय करत बसणे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ‘उपाय – तोडगे’ शोधत बसणे हा चुकीचा पायंडा आपल्या शास्त्रात पडला आहे. वेस्टर्न मध्ये अशा घटनेला / प्रतिकूलता जशी आहे तशी स्विकारुन त्याला मी तोंड कसे देऊ शकेन याचा जास्त विचार होतो आणि उपाय – तोडग्यां पेक्षा असा केलेला विचारच आपल्याला जास्त मदत करु शकतो

‘पैसा पुरत नाही’, ‘पैसा टिकत नाही’ अशा समस्या घेऊन लोक ज्योतिषाला भेटतात आणि ज्योतिषीही त्याला ‘पत्रिकेत अमुक दोष आहे’, ‘तमुक नक्षत्रशांती केली पाहीजे’, ‘ही पोथी वाच – तो जप कर’ असे सल्ले देतात.  खरेतर अशा प्रश्नांची उत्तरे ज्योतिषशास्त्रा द्वारे मिळणार नाहीत! ‘पैसा पुरत नाही “ म्हणजे नेमके काय होते हो? ………………… मिळकतीपेक्षा खर्च जास्त झाला की ही परिस्थिती निर्माण होणार ना? मग त्याचे अ‍ॅनालायसीस कोण करणार ? सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही हे जातकाला समजाऊन कोण सांगणार?  एक कागद घेऊन जातकाला त्याची महीन्याची मिळकत आणि महीन्यात होणार खर्च लिहायला लावला तर लगेच कळेल की चूक कोठे होत आहे. ‘अंथरुण पाहून पाय पसरले पाहीजेत’ हे जातकाला इथेच सांगता येईल ना? जर सगळे खर्च अपरिहार्य असतील तर उत्पन्न वाढवणे हाच एक पर्याय असेल ना? मग जातक त्या दृष्टीने काय प्रयत्न करत आहे हे तपासायला नको? जातकाला / जातकाच्या घरातल्या व्यक्तीला साईड बिझनेस , पार्ट टाईम जॉब करता येईल का याची चाचपणी कोण करणार? नाहीच करणार कोणी ! त्या पेक्षा ‘उपाय-तोडगे’ सांगणे कित्ती सोपे आहे ! फक्त ग्राहकांची सोय आणि खिसा पाहून ‘उपाय-तोडगे’ सुचवता आले की झाले! जातकाला पण स्वत: काही हातपाय न हलवता असा पैशाचा ओघ वाढवायचा असतो ना? 

मी स्वत: ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ मोठ्या प्रमाणात वापरतो , हेे मान्य ही पद्धती कालनिर्णयाच्या बाबतीत कमकुवत असली तरी प्रश्ना संदर्भात थक्क करून टाकणारी माहिती, तपशील ,बारकावे मिळतात तसे आपल्या पारंपरीक आणि के.पी. द्वारा मिळवता येणे अवघड आहे , किंबहुना इव्हेंट प्रिडिक्शन च्या नादात असा प्रयत्न ही केला जात नाही , आपल्याकडे.

युरेनस (हर्षल) , नेपच्युन सारख्या अती ताकदवान ग्रहां कडे आपले ज्योतिषी फार दुर्लक्ष करतात ही एक मोठी चूक होते आहे. पाश्चात्य अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्ये हे दोन ग्रह तर वापरतातच शिवाय अनेक फिक्स्ड स्टार्स, अरेबिक पार्ट, अ‍ॅस्ट्रॉईड शिवाय गणीताने सिद्ध केलेले ट्रांस प्लुटो (प्लुटो च्या कक्षे बाहेर) प्लॅनेट्चा पण खुबीने वापर होतो.

दशा पद्धतीचा अतिरेकी वापर आपल्या कडे होतो पण दशा पद्धती इतक्याच पॉवरफुल कालनिर्णय पद्धती जश्या प्रोग्रेशन्स , रिटर्न्स, डायरेक्शन्स ते लोक वापरतात , आपल्या कडे याची साधी तोंड ओळख सुद्धा नाही. ग्रहयोगांचा (अस्पेक्ट्स) वापर आपल्या कडे सुक्ष्मतेने होत नाही ही आणखी एक चूक होते आहे. ट्रांसिट्स चा सुद्धा विचार फार वर वरचा आणि तो सुद्धा एकांगी विचार केला जातो , (फक्त चंद्र राशी कडून , वस्तुत: लग्नावरुन पाहीलेले गोचर भ्रमण जास्त अचूक माहीती देते).

आपल्या कडे पत्रिकेतले ग्रह बघितले जातात पण पत्रिकेचे मुख्य आधारस्तंभ : लग्न , सप्तम, दशम , चतुर्थ बिंदूं कडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. ग्रहयोगात पण तेच, मुळात राश्यात्मक योग हे परिणामा बाबत प्रभावी नसतात, ग्रहयोग अंशात्मक बघितले जात नाही. जे ग्रहयोग विचारात घेतले जातात त्यात  युती आणि प्रतियोगाच्या पलिकडे मजल जात नाही. योग रिव्हर्स दिशेने सुद्धा होतात हे तर गावीही नाही!

सध्या के.पी. चा फार गवगवा आहे आणि हा गवागवा करण्यात आघाडीवर असतात ते कुवतीच्या बाहेरचे , पोकळ दावे करणारे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले के.पी. तज्ञ (हे फक्त सहा महीन्याचा गल्ली बोळातला फडतूस क्लास लावून , स्वत:ला तज्ञ म्हणवून घ्यायला लागलेले असतात!) के.पी. ही अत्यंत मर्यादीत आणि केवळ इव्हेंट प्रिडीक्शन साठी निर्माण केली आहे, अत्यंत नॅरो फोकस आणि महत्वाच्या अनेक घटकां कडे ( ग्रहयोग, कारकत्वे, बलाबल, वर्ग कुंडल्या) कमालीचे दुर्लक्ष केल्याने के.पी. अत्यंत मर्यादीत झाली आहे. केपी मधल्या इव्हेंट प्रिडीक्शनच्या अतिरेकी अट्टाहासात मुळ ज्योतिष शास्त्राचा मुळ गाभा कोठेतरी हरवला आहे. त्या तुलनेत पाश्चात्यांच्या युरेनियन किंवा तत्सम पद्धती के.पी. पेक्षाही अचूक आणि वर्णनात्मक , विस्तृत आहेत.

भारतीय ज्योतिषांनी थोडा वेळ काढून पाश्चात्य ज्योतिर्विदांनी अथक संशोधानातून निर्माण केलेल्या काही दर्जेदार पद्धतींची निदान तोंड ओळख तरी करुन घ्यावी. त्यामुळे भविष्य कथनात अधिक अचूकता तर येईलच शिवाय वर्णनात्मक भाग अधिक रसभरित होईल. पत्रिकेचे मानसशास्त्रीय अंगाने विश्लेषण करता येईल तो लाभ तर सगळ्यात मोठा.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+8

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

21 प्रतिक्रिया

///////////////
 1. Avinash

  फारच उद्भोदक आहे आणि अशा प्रकारे अभ्यासकरणारे विरळाच!

  0
 2. Himanshu

  Agree completely. This all ties back to culture and society. In our culture, boys are pampered so much that they don’t mature until late 30’s and don’t know how to handle failures. And we always see work getting done by bribes (100% success). So when someone tells that your problem will be solved by giving money, we believe. This is changing though but will take some time. And with regards to real truth, I don’t think anyone knows for sure. I have read/heard a lot from these self realized people. They contradict with each other. One person says earth is flat (you know who), other says our dna is because of earth’s wobble and so on. To me this is beyond our comprehension.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   भारतीय समाज आळशी , निकम्मा आणि पलायनवादी बनला आहे. याला काही प्रमाणात हिंदु धर्माच्या तत्वज्ञानाचा अर्थ लावण्यात झालेल्या चुका जबाबदार आहेत. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु ..’ चा अर्थ ‘फळाची अपेक्षा न धरता काम कर फळ काय द्यायचे , केव्हा द्यायचे हे मी ठरवतो ‘ पण झाले उलटेच ह्यातला ‘ कर्म कर ‘ हा भाग सोयिस्कर रित्या वगळला आणि सगळेच (त्यात कर्म पण !) देवावरच सोडून माणसे जपजाप्य करत बसली , परकिय आक्रमकां शी दोन हात करण्यापेक्षा जप , अनुष्ठाने मांडली गेली !

   आजच्या काळातल्या सगळ्या तरुणांना ‘सरकारी नोकरीच’ का हवी असते याचा तपास घेतला तर बरेच काही बाहेर पडेल!

   “नोकरीत पगारवाढ झाली नाही’ यासाठी ज्योतिषाचे उंबरठे झिजवले जातात , उपाय – तोडग्यांवर हजारों रुपये आणी मौल्यवान वेळ वाया घालवला जातो पण मुळात आपल्याला पगारवाढ का डावलली गेली याचा विचार / शोध का घेतला जात नाही हे कोडेच आहे? खरेतर पगारवाढ ठरवणार्‍या साहेबालाच विचारले असते तर पगारवाढ का दिली नाही याचे उत्तर मिळाले असते आणि मग अशी वेळ येऊ नये म्हणून काय करता येईल हे पण लक्षात आले असते ना? मी माझ्याकडे आलेल्या जातकांना असे सांगत असतो पण त्यांना ते आवड्त नाही, हे असले लेक्चर देण्यापेक्षा सरळ पगार वाढ होण्यासाठी उपाय सांगा अशी मागणी केली जाते !

   सुहास गोखले

   +2
 3. Rakesh Vadekar

  खूप छान, सुहास जी, तुमचे वेस्टर्न ऍस्ट्रोलॉजि वरील लेख खूपच वाचनीय असतात.
  मला primary direction व Birth time rectification वर काही western पुस्तके सुचवू शकाल का?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री राकेशजी ,

   प्रायमरी डायरेक्शन साठी फार थोडी पुस्तके उपलब्ध आहेत , मला जी माहीती आहेत त्यांची यादी देत आहे.
   PRIMARY DIRECTIONS: A Definitive Study – Sepharial, $17.95
   PRIMARY DIRECTIONS: Astrology’s Old Master Technique – Martin Gansten, $22.00
   William Lilly and His Method of Primary Directions–Rumen Kolev $25.00
   Zoller and ‘the Alcabitius Primary Direction method’ … Rumen Kolev $20.00

   बर्थ टाईम रेक्टिफिकेशन साठी मी पुर्वी एका अ‍ॅस्टॉलॉजी ग्रुप वर लिहलेली पोष्ट:

   There are very few books on birth time rectification. There are some 20 odd methods in Vedic Astrology itself while in Western Astrology there are methods that use Age Harmonic and Pre Natal Epoch.

   Here are some titles that might help:

   1. Rectification of Birth Time: An Analytical Approach by P. S. Sastri
   2. Your True Horoscope: Birth Time Rectification by S P Skullar
   3. Secrets of Birth Time Rectification by Sreenadh OG
   4. Study Guides in Astrology: Birth Time Rectification by Lauren Delsack
   5. The Complete Book of Chart Rectification by Carol Tebbs
   6. The Protocol for Correction of Birth Time: A Practical Method to Correct Your Birth Time by Ciro Discepolo
   7. Your Sun’s Return : the Technique of Computing a Solar Revolution Chart with 13 Chart Illustrations Together with The Noon Date Method of Finding an Unknown Birth-time and an Accurate Method of Rectification By Arcs of Events by Alfa lindange

   Hope this helps

   +3
   1. Rakesh Vadekar

    खूप खूप आभारी आहे , सुहास जी.
    तुमचा तो लेख किंवा तुमच्या लेखाची लिंक मिळू शकेल का ?

    0
    1. सुहास गोखले

     श्री राकेशजी,

     धन्यवाद. आपण उल्लेख केला आहे तो लेख वगैरे नाही, फेसबुक चा उदय होण्याच्या किति तरी आधी मी अनेक बेव बेस्ड ग्रुप्स वर होतो तेव्हा एका चर्चेच्या दरम्यान केलेली एक पोष्ट होती ती, जी मी दिली आहे , संपुर्णच आहे.

     जन्मवेळ कोणत्याही मेथड ने रेक्टीफाय करा पण अशी रेक्तीफाय केलेली वेळच बरोबर याचा ताळा – पडताळा घेऊन दाखवता आला पाहीजे. उगाच हवेतुन एक वेळ काढूण हीच खरी जन्मवेळ असे सांगून चालणार नाही (बहुतेक केपी वाले असे करताना दिसताना) तर ते सिद्ध करुन दाखवता आले पाहीजे.

     हे इतके सोपे नाही, पुन्हा एकदा लिहतो .. हे इतके सोपे नाही !

     सुहास गोखले

     +1
     1. Rakesh Vadekar

      हो, सोपे मुळीच नाही. पण करायचीच असेल (आणि पडताळा घ्यायचाच झाला तर ) तर कोणती पुस्तके वाचावीत असे मी तुम्हाला विचारले, तुमचे लेख वाचल्यावर साधारणतः असे जाणवते की तुम्हाला हे समजले आहे. के पी मधील R P method हा शास्त्रीय दृष्ट्या मनाला पटत नाही. म्हणून वेस्टर्न मध्ये काही मिळते का ते पाहायचे होत. धन्यवाद .

      0
      1. सुहास गोखले

       श्री राकेशजी

       अभिप्राया बद्दल धन्यवाद

       मी दिलेल्या पुस्तकांच्या यादीचा आपल्याला चांगला उपयोग होईल असे वाटते.

       शुभेच्छा

       सुहास गोखले

       0
 4. निनाद फाटक

  सुहासजी,
  उत्तम लेख आहे. उपाय सांगा या अपेक्षेमुळे ज्योतिष विषयाचा वास्तववादी अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला फार त्रास होतो. आपण या विषयाकडे बघण्याच्या भारतीय आणि पाश्चिमात्य दृष्टिकोनाचे फार उत्तम वर्णन केले आहे.
  एक शंका आहे. तुम्ही उल्लेख केलेले reverse aspect म्हणजे काय याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल?

  0
  1. सुहास गोखले

   श्री निनादजी अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   भारतीय ज्योतिषशास्त्रात एक ग्रह दुसर्‍या ग्र्हावर दृष्टी टाकतो ही दृष्टी फॉरवर्ड असते, मागे वळून पाहणे हा प्रकार नसतो. म्हणजे चंद्र शनी च्या मागे दोन घरे असताना (६० अंशांचे अंतर) तो शनी कडे फॉरवर्ड नजरेने पाहतो आणि लाभयोग होतो .. चंद्र नंतर शनीला ओलांडून पुढे जातो , आता तो शनीच्या पुढे दोन घरे (६० अंशांचे अंतर) आला पण चंद्र शनी कडे मागे वळून बघत नाही त्यामुळे दोघांत पुन्हा ६० अंशाचा कोन होऊनही तो लाभयोग झाला असे मानत नाहीत

   पाश्चात्य ज्योतिर्विद चंद्र शनीच्या मागे असताना आणि पुढे असताना झालेले कोन (फॉरवर्ड आणि रिव्हर्स) दोन्ही पाहतात आणि तेच सयुक्तिक आहे .

   सुहास गोखले

   0
 5. अण्णासाहेब गलांडे

  अस बघा,सर्व संगीत रागदारीवर आधारलेल,पण सव्वाशे कोटी पैकी सव्वा लाख लोकांना ते कळत नाही.तेच जर “झुमका गिरा रे”लागल तर शंभर कोटी लोक नाचतील!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अणासाहेबजी

   आपले निरिक्षण बरोबर आहे. या विषयावर मी एक – दोन लेख पण लिहले आहेत.

   सुहास गोखले

   0
 6. Deepak

  छान लेख, पाश्चात्य जोतिष विषयी अजून वाचायला आवडेल. धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   श्री . दीपकजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद . जसा वेळ मिळेल तसे काही लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करेन.

   सुहास गोखले

   0
 7. संतोष

  सुहासजी,

  पाश्चात्य ज्योतिषाबद्दल फारच कमी माहिती भारतीय किंबहुना मला आहे, तुमच्या लेखांमधून बरीच माहिती वाचायला मिळते.

  पण त्याहूनही पुढे ते कसे शिकावे ह्याची काही माहिती दिलीत तर फायदा होईल, जसे कि पुस्तके / इंटरनेट वरील माहिती जे नवीन अभ्यासकांना उपयोगी पडतील.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संतोषजी,

   मुळात पाश्चात्य ज्योतिषशास्त्र म्हणजे फार वेगळे असे काही नाही. ग्रह , रासी, भाव हे सगळे त्यांचे आणि आपले अगदी सेम आहे ! आपण अयनांश वापरतो , ते वापरत नाही. फरक आहे तो पत्रिके कडे , जातका कडे बघण्यातल्या दृष्टीकोनातला. त्यामुळे ज्याचा भारतीय ज्योतिषाचा (कृष्णमुर्ती पद्धती नव्हे!) अभ्यास आहे त्याला पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात नविन असे फारसे शिकवे लागणार नाही, फक्त उपाय तोडगे , नक्षत्र शांती, पितृदोष असल्या विळख्यातून बाहेर पडता आले पाहीजे!

   पुस्तकां बद्दल बोलयचे तर खाली दिलेली लिंक क्लिक करा , एक पीडीएफ फाईल ओपन होईल त्यात पाश्चात्य ज्योतिषशास्त्रा वरच्या बेस्ट ऑफदी बेस्ट पुस्तकांची पुस्तकांची यादी आहे , यातली पुस्तके जमतील तितकी वाचल्यास चांगला अभ्यास होईल

   http://www.astroamerica.com/topten.html

   ( या वेब साईट चा मालक डेव्ह Dave Roell माझा चांगला मित्र होता , गेल्या वर्षी त्याचे निधन झाले, ही वेबसाईट चालू आहे पण पुस्तकांची विक्रि आता डेव्ह नसल्याने होत नाही, )

   सुहास गोखले

   +1
 8. प्रदिप कुलकर्णी

  लेख खूपच चांगला आहे. आपण लिहिल्या प्रमाणे आपण हर्षल,नेपच्युन प्लुटो विषयी विचार करत नाही. तोडगे जप यांचा उतारा सुचवताना तो स्वत; केला की नाही हे कोणीच लिहित नाही. गायत्री पुरचर्णाचा उपाय सुचवतान तो किती अवघड आहे याचा कोणीही विचार करत नाही. उपाय तोडगे सुचवताना ते प्रत्यक्ष अनुभवले आहे किवा नाही याचा उलेख नसतो. मानसशास्त्राचा उपयोग ज्योतिष्य शास्त्रात योग्यरीतीने करण्याची गरज आहे. आपल्याविचाराशी सहमत आहे.
  धन्यवाद.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.