मागच्या भागात आपण गोल सेटिंग चे महत्त्वाचे मुद्दे तपासले ,

 

त्यात मी ‘स्वत:चे घर घेईन’ असे गोल असेल तर ते कसे निश्चित करायचे याचे एक उदाहरण मी दिले होते जरा त्या उदाहरणा कडे पुन्हा एकदा पाहू या.

‘येत्या पाच वर्षात किंवा त्या ही आधी, मी स्वत:च्या मालकीच्या दोन बेडरूम + टेरेस अशा किंवा त्या पेक्षा ही चांगल्या आणि शहरातल्या मयूर कॉलनी, मॉडेल कॉलनी, अलंकार / नटराज / सहजानंद सोसायटी , कर्वे पुतळा परिसर, अशा चांगल्या परिसरात किंवा त्याहूनही अधिक प्रतिष्ठित अशा परिसरात, आजच्या बाजारभावा नुसार एक दीड कोटी किंवा अधिक मूल्य असलेल्या घरात रहात असेन, हे घर शक्यतो कोणतेही कर्ज न घेता खरेदी करू शकेन अशी आर्थिक सुस्थिती मी मिळवेन,  कर नियोजन किंवा तत्सम कारणाने मला कर्ज घ्यावेच लागले तर ते  सात वर्षा पेक्षा कमी मुदतीचे असेल आणि कर्जाचा मासिक हप्ता माझ्या त्या वेळेच्या मासिक उत्पन्नाच्या  ३०% पेक्षा जास्त असणार नाही, असे कर्ज घ्यावे लागलेच तर कोणतीही वित्त पुरवठा संस्था असे कर्ज मला फारशी खळखळ न करता उपलब्ध करून देईन अशी बाजारातली ‘पत’ मी निर्माण करेन.”

आता या गोल स्टेटमेंट मध्ये किती महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट झाले आहेत ते पाहा जरा:

  • येत्या पाच वर्षात किंवा त्याही आधी :

 

इथे समय मर्यादा अगदी स्पष्ट केली आहे , नि:संनिग्ध शब्दात , त्याच बरोबर ‘त्या ही आधी’ असा शब्द प्रयोग करून आव्हान आणखी वाढवले आहे . हा ‘त्या आधी’ असा शब्द आपल्या कोणत्याही ‘गोल स्टेटमेंट’ अवश्य समाविष्ट करा , ह्या मागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे ‘आपली अशी सुनिश्चित गोल्स आपल्या अव्यक्त मनावर म्हणजेच सबकॉन्शस मना वर कोरली जातात आणि त्याचा हमखास चांगला परिणाम होतो म्हणून जाणीव पूर्वक आपल्या सबकॉन्शस मनाला बजावा की घर हवे आहे , पाच वर्षे थांबायची तयारी असली तरी त्या आधीच जमवायचे आव्हान स्वीकारत आहे.  असे करा ,  आणि पहा , काय चमत्कार घडतो ते !

 

  • ‘दोन बेडरूम + टेरेस अशा किंवा ह्या पेक्षा ही चांगले’:

 

इथे आपल्याला नेमके कसे घर हवे आहे ते स्पष्ट केले आहे . गोल सेट करणारी व्यक्ती मध्यमर्गीय असल्याने उगाचच ड्युप्लेस, रो हाऊस , बंगला असे गोल सेट केलेले नाही हे महत्त्वाचे , गोल्स ही नेहमी वास्तविक रिअलॅस्टिक असावीत , त्यात थोडेसे आव्हान असावे ( + टेरेस त्या साठीच तर आहे!) पण नुसती दिवास्वप्ने किंवा अशक्यप्राय असे नसावे. इथेही ‘त्याही पेक्षा चांगले’ हा क्लॉज घातला आहेच म्हणजे आव्हान कायम ठेवले आहे आणि सबकॉन्शस मनाला बजावले पण आहे की आत्ता मी दोन बेडरूम + टेरेस घराचे गोल सेट करत आहे पण त्या पेक्षाही चांगले घर मिळण्याची माझी लायकी आहेच !

 

  • ‘मयूर कॉलनी ….. अशा चांगल्या परिसरात किंवा त्याहूनही अधिक प्रतिष्ठित अशा परिसरात’

 

इथे आपल्या घरा बद्दलच्या अपेक्षा अधिक स्पष्ट केल्या आहेत , आपली गोल्स जितक्या नेमक्या पणाने स्पष्ट कराल तितक्या चांगले. अशी सुस्पष्ट गोल्स पूर्ण व्हायची शक्यता दहा पटीने वाढते. आता  हा ‘मयूर कॉलनी..’ हा भाग साधारणत: मध्यमवर्गीय / उच्च मध्यमवर्गीय रहिवासी विभाग मानला जातो हे देखील जातकाच्या सध्याच्या क्रयशक्तीला सुसंगत आहे. अर्थात सिंध / नॅशनल / अभिमान श्री / कोरेगाव पार्क हा भाग तर गर्भ श्रीमंताचा तिथे का घर होऊ नये? म्हणून “या हून ही चांगल्या ‘ असा क्लॉज जाणीव पूर्वक वापरलेला आहे हे आता आपल्या लक्षात आले असेलच.

 

  • ‘आजच्या बाजारभावा नुसार एक दीड कोटी किंवा अधिक मूल्य असलेल्या.’

इथे गोल स्टेटमेंट अधिक सुस्पष्ट केले आहे , घराची किंमत आज चालू असलेल्या किमतींत लिहिली आहे , पाच वर्षा नंतरच्या किमतींत नाही हे लक्षात घ्या. म्हणजेच असे गोल सेट करताना जरा प्रापर्टी रेट्स चा अभ्यास करून घरांच्या सध्या काय किंमती चालल्या आहेत याचा अंदाज घेणे आवश्यक आहे . इथेही ‘अधिक मूल्य’ हा क्लॉज आहेच , म्हणजे घरांच्या किंमती वाढल्या तरीही मी ते घेणार आहे किंवा दीड कोटी पेक्षाही महागडे घर घेण्याचा माझा प्रयत्न असेल असे आपण आपल्या सबकॉन्शस मनाला बजावत आहोत.

 

  • ‘शक्यतो कोणतेही कर्ज न घेता खरेदी करू शकेन अशी आर्थिक सुस्थिती मी मिळवेन’

इथे आपण गोल स्टेटमेंट अधिक समृद्ध करत आहोत, कर्ज काढून घर घेणे काही चांगले नाही, घराचा अवाच्यासवा हप्ता दर महिन्याला भरायला लागतो आणि हे ओझे पंधरा / वीस वर्षे डोक्यावर राहणार असते, आपल्याला ते नको आहे , स्वत:चे घर आणि डोक्यावर कर्ज नाही अशी आदर्श स्थिती आपण निर्माण करणार आहोत हेच या स्टेटमेंट मध्ये अधोरेखित होत आहे.   इथे आपण आपल्या सबकॉन्शस मनाला मला कर्ज आवडत नाही हे बजावत आहोत, कर्ज घ्यायची वेळच येऊ नये अशी व्यवस्था करायला आपण आपल्या सबकॉन्शस मनाला आज्ञा करत आहोत.

 

  • “कर्ज घ्यावेच लागले तर ते सात वर्षा पेक्षा कमी मुदतीचे ..हप्ता माझ्या त्या वेळेच्या मासिक उत्पन्नाच्या  ३०% पेक्षा कमी’

असे लिहिताना आपण पुरेशी लवचिकता ठेवली आहे , आणि  त्याच  बरोबर या कर्जाचा परतफेडीचा कालावधी पण निश्चित केला आहे , कर्जाचा मासिक हप्ता पण अगदी स्पष्ट शब्दात त्या वेळेच्या मासिक उत्पन्नाच्या प्रमाणात किती असेल हे पण लिहिले आहे. म्हणजे कर्जाचा हप्ता भरण्यात कंबरडे मोडू नये अशी दक्षता आपण घेणार आहोत. इथेही ‘पेक्षा कमी’ अशी  शब्द योजना करून आपण आव्हान कायम ठेवले आहे.

 

  • “कर्ज मला फारशी खळखळ न करता उपलब्ध होईल”

असे लिहिताना आपण आपली तेव्हाची आर्थिक सुस्थिती ठरवत आहोत. कर्ज मागायला जाताना ‘मला कर्जाची काही गरज नाही’ अशा अविर्भावात जावे म्हणतात , काम होते! केविलवाण्या , कंगाल , लाजिरवाण्या अवस्थेत कर्ज मागायला गेलात तर दारातूनच हाकलून देतील. समोरची व्यक्ती कर्ज फेड करू शकते हा विश्वास ऋणकोच्या मनात पहिल्या मुलाखतीच निर्माण होणे आवश्यक आहे,  असा प्रभाव पडला नाही तर कर्ज देताना अनेक अडचणी येऊ शकतात. आपल्याला असे होऊ द्यायचे नाही, कर्ज मागताना आपली प्रतिष्ठा मजबूत असली पाहिजे हे आपण ठरवत आहोत आणि तसे आपण आपल्या सबकॉन्शस मनाला बजावत आहोत.

 

बघितलेत “ येत्या पाच वर्षात मी माझ्या स्वत:च्या घरात रहात असेन’ या साध्या गोल स्टेटमेंट  पेक्षा आपण लिहिलेले गोल स्टेटमेंट किती सुस्पष्ट आणि प्रभावी आहे ते !

 

इथे एक महत्वाच्या मुद्द्या कडे आपले लक्ष वेधून घेतो आहे.

मी वारंवार सबकॉन्शस मनाला बजावले . आज्ञा दिली असे शब्द प्रयोग केले आहेत ते उगाचच नाही ! त्या मागे बरेच विज्ञान दडले आहे, ते काय हे सांगणे विस्तारभयास्तव लिहित नाही पण ‘सबकॉन्शस ‘ मनाला प्रोग्रॅम करणे अत्यावश्यक आहे इतकेच सांगतो.

पण सबकॉन्शस मन जरा लहान मुला सारखे वागते , त्याला शंका घेता येत नाही (ज्याला इंग्रजीत क्रीटीकल फॅकल्टी  म्हणतात) त्यामुळे आपण जे सांगाल (चांगले / वाईट) त्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवते आणि त्याचे पालन करते , याचाच फायदा आपण उठवायचा असतो. थोडी मखलाशी , थोडे चिटींग करायचे आते , चालते !

आता हे चिटींग कसे करायचे ? सबकॉन्शस मनाच्या  ‘डोळे झाकून विश्वास ठेवते’ या दुबळे पणाचा लाभ घ्यायचा. वर दिलेल्या गोल स्टेटमेंट मध्ये तो घेतला आहे !  लक्षात आले का? नाही ? मग तो कसा घेतला आहे ते पहा जरा, मी लिहिले आहे:

आजच्या बाजारभावा …………असलेल्या घरात रहात असेन”

म्हणजे ठरवत असलेले गोल्स पूर्ण झालेले आहेच , त्या घरात मी राहातच आहे ! गोल साध्य झाले आहे !

हा भाग सबकॉन्शस मना पर्यंत पोहोचतो ,  घर झाले नसताना हा माणूस त्या घरात राहात आहे असे का म्हणतो असले प्रश्न आपले सबकॉन्शस मनाला पडत नाही , असे प्रश्न ते विचारू शकत नाही कारण आधी सांगितले तसे या सबकॉन्शस मनाला शंका घेता येत नाही ! आणि मग जेव्हा सबकॉन्शस मनाला वस्तुस्थितीतला विरोधाभास दिसतो तेव्हा तो दूर करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला ते घर मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. हे कसे ते सांगायचे  तर तो एका भला मोठा लेख होईल.

थोडक्यात काय तर गोल स्टेटमेंट लिहिताना जे साध्य करायचे आहे ते साध्य झालेलेच आहे अशी वाक्य रचना करायची. वाक्ये भविष्य काळातली (फ्यूचर टेन्स मधली) नाही तर नजिकच्या भूतकाळातली (इमीजिएट पास्ट टेन्स) असावी.

“सहा महिन्यात माझे वजन पाच किलो ने कमी झाले आहे, मला हलके वाटत आहे, माझा उत्साह वाढला आहे, आरशात बघताना माझा मलाच अभिमान वाटत आहे “

आले लक्षात ?

असे सुस्पष्ट आणि प्रभावी गोल स्टेटमेंट लिहिणे ही गोल्स सेटिंग मधली अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. इथे स्पष्टपणा , नेमकेपणा नसेल तर गोल पूर्ण होण्यात आपण अडथळे निर्माण करत आहोत असे समजा.

आपण जर हा लेख लक्ष पूर्वक वाचत असाल तर एव्हाना आपल्या लक्षात आले असेल की मी वारंवार ‘गोल्स लिहिले’ अशा अर्थाची वाक्य रचना वापरली आहे. याला कारण आहे..

तुम्ही जी काही गोल्स ठरवा ती लिहून ठेवायची , हो, चक्क कागदा वर , पांढर्‍या वर काळे करून ! आपली गोल्स ही नुसती स्टेटमेंट्स नाहीत तर तुम्ही तुमच्याशी केलेला एक करार आहे असे समजा आणि करार हा कागदोपत्री असला तर आणि तरच त्याला किंमत असते, नाहीतर अशी गोल्स स्टेटमेंट्स या वार्‍या वरच्या गप्पा ठरतील तेव्हा गोल्स कागदा वर लिहून काढणे ही दुसरी कृती आपण करणार आहात.

आपली गोल्स नुसती लिहून काढून बाजूला ठेवायची नाही तर लिहिलेली गोल्स स्टेटमेंट्स आपण रोज एकदा तरी वाचणार आहोत.

आणि हे ‘गोल्स वाचन’ दिवसभरात केव्हाही करायचे नाही, त्याची पण एक वेळ आहे , केव्हा ? तर रात्री झोपण्याच्या आधी आपण आपली अशी लिखित स्वरूपातली गोल्स वाचणार आहोत. त्यातही झोप अगदी डोळ्यावर आलेली असताना म्हणजेच जागेपणा आणि झोप याच्या सीमारेषेवर असताना ती वाचायची आहेत.

हीच वेळ गोल्स वाचायला निवडायची याच्या मागे एक कारण आहे , ही वेळ अशी असते की आपण झोपायच्या अगदी बेतात असतो ,  नेमक्या ह्याच कालावधीतल्या  मोजक्या क्षणात आपल्याला आपल्या आपल्या सबकॉन्शस मनाशी डायरेक्ट संवाद साधता येतो, सबकॉन्शस मन फक्त या वेळेसच आपले म्हणणे लक्ष पूर्वक ऐकत  असते. हीच संधी , हाच क्षण साधून आपल्या सबकॉन्शस मनाला प्रोग्रॅम करायचे आहे. इतर वेळेला , जागृत अवस्थेत सबकॉन्शस मनाला असे प्रोग्रॅमिंग करता येत नाही.

अशीच आणखी एक टाइम स्लॉट आपल्या कडे आहे ती म्हणजे सकाळी अगदी उठल्या उठल्या (आपण केव्हा उठता हे फारसे महत्त्वाचे नाही) पहिले मिनिट! ही वेळ देखील ही झोप आणि जागृती यांच्या सीमारेषे वरची  असते .  ह्या वेळी सुद्धा आपण गोल्स वाचू शकता पण रात्रीच्या वेळेला गोल्स वाचल्या नंतर जो परिणाम होतो तो या सकाळच्या वेळेला गोल्स वाचल्या नंतर मिळत नाही तसेच सकाळी चे प्रोग्रॅमिंग अवघ्या एका मिनिटात उरकावे लागते , आपल्या कडे दहा बारा गोल्स असतील तर ती सर्व वाचणे या एका मिनिटात शक्य होणार नाही. तुलनेत रात्री प्रोग्रॅमिंग केले तर आपल्याला थोडा जास्त वेळ मिळतो.

रात्री गोल्स वाचण्याचा एक महत्त्वाचा लाभ असा की आपण गोल्स वाचतो आणि काही क्षणात  झोपतो. आता झोपेत आपले बाह्य मन म्हणजेच कॉन्शस मन पण झोपलेले असते कारण त्याला काहीच काम नसते (ऐकणे, बोलणे , पाहणे, विचार करणे ) पण आपले सबकॉन्शस मन मात्र टक्क जागे असते आणि कार्यरत असते त्याचा लाभ उठवायचा. पहाटे गोल्स वाचले तर ते सबकॉन्शस मनापर्यंत पोहोचले तरी दिवसाचा काळ सबकॉन्शस मनाचा झोपण्याचा (आणि व्यक्त मनाचा कामाचा) त्यामुळे आपल्या प्रोग्रॅम वर काम करायला सबकॉन्शस मनाला वेळच मिळत नाही, आपली फाइल अशीच धूळ खात पडणार आहे !

तेव्हा शक्यतो रात्रीचीच वेळ निवडा , फायदा तिथेच आहे.

जे लोक नियमित ध्यानधारणा करतात त्यांना (अर्थात काही वर्षाच्या सरावा नंतर) ध्यानस्थ अवस्थेत आपल्याला सबकॉन्शस मनाला असे प्रोग्रॅम करता येते , त्यांनी त्याचा वापर करायला हरकत नाही.

सबकॉन्शस मनाला प्रोग्रॅम करायचा आणखी एक मार्ग आहे ,  तो म्हणजे Orgasm !  

Orgasm: (sexual climax) is the sudden discharge of accumulated sexual excitement during the sexual response cycle, resulting in rhythmic muscular contractions in the pelvic region characterized by sexual pleasure. Experienced by males and females, orgasms are controlled by the involuntary or autonomic nervous system.

लग्न न झालेल्यांचे काय ?  त्यांना हस्त मैथुनाचा पर्याय उपलब्ध आहे!

Orgasm हा क्षण असा असतो की त्या मोजक्या काही सेकंदा पुरतेच आपल्या शरीरातले ‘मूलाधार चक्र’ कार्यान्वित होते , शरीरात एक अनामिक शक्ती वाहते , शब्दात वर्णन करता येणार नाही असा आनंद / तृप्ती लाभते! आणि हाच मोका साधून आपण आपल्या सबकॉन्शस मनाला सूचना देऊ शकतो !

पण कसाही साधला तरी हा क्लायमॅक्स एखादा दुसरा सेकंद जास्तीत जास्त  इतकाच टिकतो आणि त्या एक/दोन  सेकंदात आपण कागदा वर लिहिलेली गोल्स वाचू शकणार नाही , जास्तीतजास्त गोल्स आठवू शकाल पण त्यालाही मर्यादा आहेत अशी किती गोल स्टेटमेंट्स त्या दोन सेकंदात आपण आठवू शकाल ? तेव्हा काही इमर्जंसी गोल्स  किंवा अती महत्त्वाच्या गोल्स साठी हा मार्ग वापरता येईल. त्यासाठी या खास मार्गा साठी म्हणून संक्षिप्त स्वरूपात गोल स्टेटमेंट तयार करा . पूर्वी टेलेग्राम (तार) पाठवताना आपण  “xxxx expired start immediately  तात्या वारले ताबडतोब निघा  “ अशा प्रकारची वाक्य रचना करत होतो अगदी तशीच मोजकेच शब्द असलेली वाक्य रचना करा

“पाच वर्षात पॉश एरियातले दीड कोटीचे कर्जमुक्त घर ‘  दोन सेकंदात आठवून होईल !

बघा प्रयत्न करून !!!

आता केवळ गोल्स लिहिली / ठरवली  म्हणजे ती आपोआप थोडीच पूर्ण होणार ? त्यासाठी तुम्हाला बूड हालवावे लागणार आहे त्या शिवाय काहीही होणार नाही , बरोबर ना?

ठीक आहे , आज आपण इथेच थांबू,  लेखमालेच्या पुढच्या भागात आपण या गोल्स बद्दल आणखी काही बोलू.

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.