मी फिरंगी ज्योतिष समुहातच जास्त रमतो ! बाटगा म्हणा किंवा नास्तीक म्हणा, पण मी ‘देव देव’ करत नाही, कोणत्या ‘बुवा ,म्हाराज, स्वामी, बाप्पू’ इत्यादींना मानत नाही म्हणून असेल ! या फिरंगी ज्योतिषांचा निखळ बुद्धीवाद, भक्कम गणीत आणि तर्कशास्त्राचा आधार माझ्या स्वत:च्या विचारसरणीत फिट्ट बसत असेल म्हणून कदाचित, फिरंगी म्हणावा आपुला !

असो.

अशाच एका फिरंग ज्योतिष ग्रुप वर एकाने आज एक प्रश्नकुंडली दिली आणि त्याचे उत्तर काय असेल असे विचारले,

“A woman asks: “When will my grandchild be born?”

म्हणजे मराठीत: “एका स्त्रीने विचारले आहे, तिच्या नातवंडाचा जन्म कधी होईल?”

आता हा काय प्रश्न आहे का? किती मोठा लॉग शॉट आहे हा. या असल्या प्रश्नांची उत्तरे मी पूर्वी दिली आहेत नाही असे नाही पण त्यासाठी फार मोठी मगजमारी करावी लागते , किति म्हणून आणि काय म्हणून बघायला लागते, छे , बोलूच नका.

आणि त्यातही हा प्रश्न प्रश्नकुंडली वरुन बघायचा म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! बोलून चालून प्रश्नकुंडली ती, क्या बच्चे की जान लोगे काय? ही प्रश्नकुंडली रुपी बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल थोडाच होणार!

खरे तर मला असली आव्हाने आवडतात आणि मी ती अंगावर घेतो पण, पण सध्या इतक्या ठिकाणी हात घालून बसलोय ना की कितिही मनात असले तरी या असल्या मजबूत वेळ घेणार्‍या प्रश्नाकडे बघण्याची उसंतच नाही, द्या सोडून असे म्हणत मी पुढच्या पोष्ट्स बघायला सुरवात केली इतक्यात डोक्यात काहीतरी चमकले !

प्रश्नकुंडली चक्क कालच्या तारखेची म्हणजे 19 डिसेंबर 2019 , आणि लिहले होते की प्रश्नाचा निकाला लागला आहे !

Here’s a resolved horary if anyone is interested….

मी चमकलोच! असेच्च्या, काल प्रश्न विचारला गेला ( त्या स्त्री ने विचारला) , आणि अवघ्या 24 तासाच्या त्याचा नतिजा पण प्राप्त झाला आहे!

आता हा प्रश्न सोडवणे कमालीचे सोपे आहे. त्या बालकाचा जन्म गेल्या 24 तासांत झाला आहे पण तो केव्हा हेच फक्त हुडकायचे आहे !

सोप्पे आहे !

चला , सोडवूयाच ही केस ! हाय काय आन नाय काय !

मी नव्याने पत्रिका बनवत बसलो नाही, त्या फिरंगी मित्राने जी पत्रिका पोष्ट केली होती तीच वापरली.

दिनांंक: १९ डिसेंबर २०१९  वेळ: सकाळी १०:३३:२१ ईस्टर्न युरोपियन टाईम 
सायन भावचलित , रेजिओमोन्टानस हाउस  

 

त्या स्त्रीने प्रश्न विचारला होता 19 डिसेंबर 2019 रोजी (म्हणजे कालच) सकाळी 10:33 Eastern European Time (EET), म्हणजेच दुपारी 2:03 भारतीय प्रमाण वेळ, फिरंगी मित्राने ग्रुप वर पोष्ट टाकली आहे आज, 20 डिसेंबर 2019 , वेळ अंदाजे 13:00 भारतीय प्रमाण वेळ म्हणजेच 9:30 AM Eastern European Time (EET), म्हणजे प्रश्न विचारल्या पासून अवघ्या 23 तासां पेक्षा कमी कालावधीत त्या बालकाचा जन्म झाला आहे

इतकी माहीती हाताशी असताना हा प्रश्न सोडवणे आणि त्या बालकाचा जन्म नेमका केव्हा झाला असावा हे हुडकणे सोपे आहे !

मी अवघ्या दोन मिनिटात याचा निकाल दिला .. फक्त 2 मिनिटात ! कसे ते पहा…

प्रश्नकर्ता नेहमीच प्रथम (लग्न) (1) स्थानावरुन पाहतात आणि लग्नेश आणि लग्नातले ग्रह प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करतात.

इथे मीन लग्न आहे, त्यामुळे मीनेचा स्वामी गुरु प्रश्नकर्त्याचे (इथे प्रश्नकर्ती – आज्जी!) प्रतिनिधीत्व करेल. लग्नात कोणताही ग्रह नसल्याने एकटा गुरूच आजीबाईंचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

प्रश्न नातवंडाचा जन्म केव्हा होईल असा आहे! आता नातवंड म्हणजे मुलाचे / मुलीचे अपत्य , मुलगा/ मुलगी पंचम स्थानावरुन (5) आणि त्याचे अपत्य त्याच्या पंचमा पासून म्हणजे नातवंड हे पंचमाचे पंचम म्हणजे नवम (9) स्थान !

नवमेश आणि नवमातले ग्रह नातवंडाचे प्रतिनिधीत्व करतील.

इथे नवमावर मंगळाची वृश्चिक रास आहे म्हणजे नवमेश मंगळ नातवंडाचे प्रतिनिधीत्व करेल. नवमात स्वत: मंगळ आहे आणि इतर कोणताही ग्रह नाही म्हणजे एकटा मंगळ नातवंडाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

प्रश्न किती अचूक वेळेवर विचारला गेला आहे पहा, नवम भावारंभ आहे 18 वृश्चिक 49 वर तर मंगळ आहे 19 वृश्चिक 54 वर म्हणजे मंगळ अगदी नवम भावारंभा वरच आहे.

आता आजींना नातवंडाची प्राप्ती होणार असेल तर आजींचा प्रतिनिधी आणि नातवंडाचा प्रतिनिधी यांच्यात कोणतातरी योग व्हायला पाहीजे. पण हा झाला नेहमीचा विचार , इथे प्रश्न विचारल्याच्या 23 तासात घटना घडून गेली असल्याने अशा परिस्थितीत ( म्हणजेच जेव्हा एखादी घटना अगदी नजिकच्या दिवस- दोन दिवस इतक्याच कालावधीत होण्याची मोठी शक्यता असते) तेव्हा मी ग्रहयोगां पेक्षा ‘कस्प – भावारंभ बिंदू’ चे कॉन्टॅक्ट्स विचारत घेतो कारण कस्प आरंभ बिंदू च काय तो 24 तासात सगळ्या 12 च्या 12 राशी ओलांडून एक वर्तुळ पूर्ण करत असतो !

इथे आपण नवम स्थानारंभ (नातवंड) आणि गुरु (आजी ) असा संबंध जोडू !

नवम स्थानारंभ बिंदू सध्या 18 वृश्चिक 49 आहे , तो दर चार मिनिटाला 1 अंश या गतीने पुढे सरकत राहील, असा पुढे पुढे सरकत हा नवम स्थानारंभ बिंदू गुरु च्या अंशा पर्यंत पोहोचेल , गुरु सध्या 3 मकर 45 वर आहे , म्हणजे नवम भावारंभ बिंदू प्रथम 11 अंश 11 अंतर कापून सध्याची वृश्चिक रास ओलांडेल, त्या नंतर धनेचे सगळे 30 अंश त्याला ओलांडावे लागतील त्यानंतर तो मकरेत येईल आणि तिथे 3 अंश प्रवास करुन हा नवम स्थानारंभ बिंदू 3 मकर 45 वर येईल, आजी आणि नातवंड भेट !

आता हे होण्यासाठी नवम भावारंभ बिंदू ला 11:11 + 30:00 + 03:45 असे एकंदर 44:56 असे अंशात्मक अंतर प्रवास करावा लागेल.

सामान्यत: भावारंभ बिंदूला 1 अंशाचा प्रवास करायला 4 घड्याळी मिनिटे लागतात (ही सरासरी फिगर आहे, काही वेळा ती कमी / जास्त असू शकते, 4 मिनिटे / अंश हा ढोबळ अंदाज आहे)

ह्या हिशेबाने हे एकंदर 44:56 अंशात्मक अंतर पार पाडायला 4 (मिनिटे) x 44:56 = 3 तास लागतील (3 तासाला 16 सेकंद कमी !)

आता प्रश्न विचारला होता सकाळी 10:33 Eastern European Time (EET), यात आपले हे तीन तास मिळवले तर उत्तर येते 13:33 !

अर्थात इथे आपण 1 अंश = 4 घड्याळी मिनिटे असा ढोबळ हिशेब घेतला आहे, प्रत्यक्षात पत्रिका तयार करुन , ती अ‍ॅनीमेट करून नक्की किती वाजता नवम बिंदू गुरु ला स्पर्श करेल हे अगदी अचूक पणे ठरवता येईल. पण इतके सारे करायला मला वेळ नव्हता!

त्यामुळे अवघ्या दोन मिनिटात ही गणिते करुन मी उत्तर पोष्ट केले ते असे:

Around 13:30 PM (EET -2:00:00) on the very same day the question was asked that is 19 Dec 2019

Did some simple calculations assuming that it takes 2 clock hours to cover one Ascendant sign.

This may not be as per the books.

I just moved the 9th cusp, that is 18 Scorpio in such a way that it hits Jupiter (representative of Querent) , 11 degrees balance in Scorpio + 30 degrees of Sagittarius + 3 degrees of Jupiter in Capricorn, total 44 degrees , assuming 2 clock hours per sign , it becomes 3 hours from the moment the question is asked.

Constructing the chart and animating it further can give precise time.

 

आणि पप्पू पास हो गया !

प्रश्न पोष्ट करणार्‍या फिरंग मित्राने मेसेंजर वरुन मला कळवले :

The official time of birth is 1:34 PM same day. Well done, sir !
Can you tell the baby’s gender?

मी म्हणालो होतो 01:30 प्रत्यक्षात नातवंड जन्माला आले ते 01:34 ! उत्तम !
आता तो उपप्रश्न … Can you tell the baby’s gender?

हे असले प्रश्न जरासे अवघड असतात, बालकाच्या जन्मा आधी त्याचे लिंग ठरवणे हा गर्भलिंग निदान कायद्या अंतर्गत गुन्हा आहे पण इथे बालकाचा जन्म झालाच आहे तेव्हा मुलगा का मुलगी सांगण्यात काही गुन्हा नाही.

मी पुन्हा पत्रिके कडे बघितले..

नवमावर वृश्चिक राशी होती आणि बालकाचा जन्मकाळ ठरवण्या साठी आपण नवम बिंदूच हलवला होता त्यामुळे वृश्चिक रास महत्त्वाची / निर्णायक ठरली , ही रास स्त्री लिंगी असल्याने — “मुलगी झाली हो !”

कळवून टाकले !

उत्तर आले:

It is a baby girl.

हे पण उत्तर बरोबर आले !

 

नंतर मी सवडीने  दिलेल्या माहीती वरून पत्रिका तैयार केली , ती अ‍ॅनीमेट केली (वेळ पुढे पुढे  नेत तपासले) आणि पहा..

 

जेव्हा नवम बिंदू आणि गुरु चे अंश- कला – विकला एक्च होतील ती वेळ निश्चित केली .. गुरु 03 मकर 47 आणि नवम बिंदू पण 03 मकर 47 .

ही वेळ होती दुपारी 13:34:56 !

नातवंडाची जन्मवेळ नोंदवली गेली आहे ” 13:34 ! (The official time of birth is 1:34 PM same day‌‌)

इथे अगदी किंचीतसा फरक काही सेकंदाचा पडला आहे याचे कारण म्हणजे

1) मी फक्त अंश – क्ला बघितल्या आहेत , विकलांचा हिसाब ठेवलेला नाही
2) प्रश्न विचारल्या त्या टिकाणाचे को ऑर्डीनेट्स आणि माझे यात थोडासा फरक आहे
3) डॉक्टरांनी राऊंड फिगर वापरली !

म्हणजे पप्पू पास झाला म्हणायचा !

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.