जन्मपत्रिकेच्या अभ्यासावरून एखाद्या व्यक्तीला नोकरी – व्यवसाया बद्दल काही सांगता येते का?

याचे उत्तर म्हणले तर ‘हो ‘ म्हणले तर ‘नाही’ असे आहे ! याचे कारण म्हणजे जन्मपत्रिका एखादी व्यक्ती नेमका कोणाता व्यवसाय करते हे सांगत नाही तर त्या व्यक्तीने कोणत्या प्रकाराचा व्यवसाय करावा हे सुचवते. म्हणजेच त्या व्यक्तीचा नैसर्गीक कल / नैसर्गिक गुणवत्ता , आवड – निवड , रुची दाखवते. पत्रिकेने दाखवलेला  हा ‘नैसर्गिक कल’ जिथे जास्त उपयोगात आणता येईल असा नोकरी -व्यवसाय निवडला तर जातकाला निश्चितच लाभदायक ठरतो. आता इथे ‘लाभदायक’ याचा अर्थ ‘भरपूर पैसा’ असे नाही तर तशा नोकरी – व्यवसाया मधून जातकाला कमालीचे समाधान आणि स्वास्थ्य लाभते,  पैसा कदाचित मनासारखा मिळणार पण  नाही पण सुख , आनंद , समाधान नक्कीच लाभते आणि आपल्याला तेच तर हवे असते ना?

पण बर्‍याच वेळा उलटेच घडते, पत्रिकेतल्या ग्रहमानाने दिलेला कौल एकीकडे आणि जातकाचा नोकरी – व्यवसाय भलताच असे हमखास दिसून येते , आपला नैसर्गिक कल काय आहे याबद्दलचे योग्य ते मार्गदर्शन, योग्य वेळी न मिळाल्याने लोक आपापल्या प्राप्त नोकरी व्यवसायात अक्षरश: खितपत पडलेलेल असतात. तो नोकरी – व्यवसाय त्यांना कधीच आवडलेला नसतो , त्याचे मन आतून बंड करत असते , विविध मार्गाने खुणवत असते की ‘बाबारे , हे तु करत आहेस आहे ते तुला योग्य नाही ‘ पण एव्हाना जातक प्राप्त नोकरी – व्यवसायात असा काही स्थिरावलेला असतो की आता त्यात बदल करणे , नवे शिक्षण घेणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. शिवाय सध्याचा नोकरी – व्यवसाय कितीही नावडता असला तरी त्यातून मिळणारा पैसा म्हणा, अधिकार पद म्हणा, प्रसिद्धी म्हणा याचा मोह सुटणे ही अवघड असतेच. सध्या चालू असलेला नोकरी व्यवसायाचा मार्ग बदलून , धोका पत्करणे हे मोठे धाडस ठरू शकते आणि ते बर्‍याच जणांच्या अंगात नसते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जवळपास ९०% लोक असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आला दिवस ढकलत असतात असेच पाहावयास मिळते.

काही व्यक्ती या बाबतीत नशिबवान असतात त्यांना आपसूकच आपला नैसर्गिक कल कोठे आहे हे लक्षात येते आणि मग ते त्याच नोकरी – व्यवसायाची निवड करतात आणि यशस्वी होतात. काही जणांच्या बाबतीत ते शिक्षण घेतात , त्यानुसार नोकरी – व्यवसाय सुरु पण करतात पण कालांतराने त्यांना ही आपोआपच त्यांचा नैसर्गिक कल कोठे आहे हे लक्षात येते , आपली नाळ कोठे जुळली आहे हे त्यांना असेच कळून जाते आणि त्या व्यक्ती मग हा कल ओळखून नोकरी – व्यव्सायाचे क्षेत्र बदलतात., काही वेळा नियतीची इच्छाच इतकी दांडगी असते की अशा व्यक्ती अपघाताने म्हणा किंवा परिस्थितीच्या रेट्याने म्हणा , कळत नकळत त्यांच्या नैसर्गिक कला नुसारच्या नोकरी – व्यवसायात ओढल्या  जातातच. महात्मा गांधी ( वकिल ते राजकारण)  डॉ श्रीराम लागू,  डॉ काशीनाथ घाणेकर ( वैद्यकीय व्यवसाय  ते अभिनय)  ,  डॉ. नरेंद दाभोळकर ( वैद्यकीय व्यवसाय ते समाजकारण ) ही त्याची काही ठळक (परिचयाची) उदाहरणे!

एखाद्या कॉलेजात शिकणार्‍या किंवा नुकतीच नोकरी – व्यवसायाला सुरवात केलेल्या व्य्क्तीने जर नोकरी – व्यवसाया  बद्दल विचारले तर त्याला पत्रिकेने दिलेल्या कौला नुसार नोकरी – व्यवसायाचे योग्य क्षेत्र निवडणे / बदल करणे खूपच सोपे असते , जमू शकते पण शिक्षण पूर्ण करुन बरीच वर्ष झालेल्या आणि नोकरी – व्यवसायात स्थिरावलेल्या  व्यक्तीला असे मोठे बदल करणे कदाचित शक्य ही होणार नाही.

अर्थात एक ज्योतिष सल्लागार म्हणून मी पत्रिका काय सांगते ते बोलतो, त्या मार्गदर्शनाचा वापर कसा व केव्हा  करायचा हे त्या त्या व्यक्तीनेच ठरवायचे असते नाही का ?


अशाच एका परदेशात अनेक वर्षे स्थायीक असलेल्या जातकाने नोकरी – व्यवसाया बद्दल प्रश्न विचारला होता.Namaskar!

Few days back you had written an article related to choosing the profession based on the horoscope.

I have been working for more than 20 years in IT and have tried various fields within, technical to management in various domains. However I haven’t yet found a job I love and look forward to go to. I had contacted you earlier and you were planning to take a look but it did not materialize.

Just wanted to touch base again to check if you would help me in that regard.


 


 अशा प्रश्नाचे उत्तर देणे कमालीचे अवघड असते , ज्योतिषशास्त्र विषयक सगळ्या ज्ञानाचा इथे कस लागतो , पत्रिकेचा फार बारकाईने अभ्यास करावा लागतो. यात माझा फार वेळ मोडतो त्यामुळे मी अशी ‘असाईनमेंट्स’ फार कमी स्विकारतो आणि अशा स्विकारलेल्या असाईनमेंटस पूर्ण करायला भरपूर वेळ (आणि पैसे पण !) घेतो.   

या जातकाने प्रश्न विचारुन काही महीने झाले होते पण मला त्या पत्रिकेवर काम करण्यासाठी आवश्यक ते ‘इंटेईश्यून’ लागते तेच भेटत नव्हते , अक्षरश: रोज न चुकता ती पत्रिका माझ्या कॉम्पुटरच्या स्क्रिन वर घेत होतो पण काहीच ‘क्लिक’ होत नसल्याने काम सुरुच होत नव्हते ! आणि काल मात्र त’ती’ वेळ आली एकदाची ! पत्रिका पाहताच योग्य त्या संवेदना झाल्या, मेंदूतली विचार चक्रें कमालीच्या वेगाने फिरली , नियतीने मला (आणि त्या जातकाला पण!) साथ दिली म्हणायची आणि मी जातकाला माझे उत्तर पाठवून दिले!


श्री. ——-

सप्रेम नमस्कार,

आपण किती ईमेल्स मला पाठवल्या असतील ! पण या ना त्या कारणांनी आपली पत्रिका तपासायचा योग आला नाही, ही कदाचित नियतीची काही इच्छा असावी असे समजतो.

असो, आज मी आपली पत्रिका पाहिली.

आपण माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहात असे लिहले आहे पण आपली पत्रिका दुसर्‍याच कोणत्या क्षेत्रात काम केल्यास लाभदायक ठरले असते असे सुचवते आहे.
पत्रिकेतल्या ग्रहमानाच्या अंगाने पाहता आपल्या साठी

१) नविन तंत्रज्ञान

२) सतत बदलणार्‍या नाविन्यपूर्ण पद्धती

३) कला, चैनीच्या वस्तू , दागीने , कपडे, सुगंधी द्रव्ये, उच्च दर्जाचे मद्य (एक्साटीक वाईन !) , फॅशन गुडस

४) अ‍ॅबस्ट्रॅक्ट कल्पना , कल्पना विलास , कल्पनेच्या उत्तुंग भरार्‍या , कला आणि तंत्रज्ञान यांचा संगम

५) आर्किटेक्ट , इंटेरियर डिझायनिंग, लँड स्केपींग , टाऊन प्लॅनिंग, मॅथेमेटीकल मॉडेलींग, प्रॉडक्ट इंजिनियरिंग

अशा स्वरूपाचा उद्योग – व्यवसाय लाभदायक ठरला असता. इथे लाभदायक हा शब्द ‘पैसा’ या दृष्टीने नक्कीच वापरला नाही पण या क्षेत्रात काम केल्यास आपल्याला फार मोठे आत्मिक समाधान (जॉब सॅटिस्फॅक्शन) मिळू शकते.

पण आता करियर च्या या टप्प्यावर सध्या असे मोठे बदल शक्य होतील का हे मला सांगता येणार नाही पण आहे त्या कामाच्या स्वरुपात वर दिल्या प्रमाणे काही संधी उपलब्ध होतात का याचा शोध घेता येईल.

आपल्या पत्रिकेतल्या ग्रहमाना नुसार वर्ष २०२४ पर्यंत तरी मोठे बदल होण्याची फारशी शक्यता दिसत नाही. मात्र २०२४ नंतर कामाच्या / व्यवसायाच्या स्वरुपात काही बदल होणे अपेक्षीत आहे त्यात:

१) नोकरी व्यवसाय , कामाची जागा / राहण्याची जागा या मध्ये सतत बदल

२) सततचे प्रवास ( लहान आणि मोठ्या अंतरावरचे)

३) बोलणे जास्त करावे लागणे . काहीसे ब्रोकरेज / टेक्नि कमर्शियल मार्केटींग , मार्केतींग ब्यॅक एंड, कल्पना पटवून देणे, आयडीया सेलिंग , नविन कल्पनांचा व्यवहारात उपयोग आणणे , सल्ला सेवा, शिक्षकी पेशा ( सेमिनार्स , वर्कशॉप, कॉन्फरंसेस )

२०१९ ते २०२३ हा चार वर्षाचा काळ हातात आहे त्याचा लाभ उठवून शिस्तबद्ध प्रयत्न केले ( गॅप अ‍ॅनालायसीस ) तर २०२४ ते २०३१ या चांगल्या कालखंडाचा जास्तीतजास्त लाभ ऊठवता येईल.


त्यावर जातका कडून आलेला प्रतिसाद बोलका आहे!
मी पत्रिकेच्या माध्यमातून जातकाच्या नोकरी – व्यवसाय / नैसर्गिक कल या बद्दल जे काही लिहले होते अगदी तशीच जातकाची अंतर्मनाची साद होती!
मी लिहले आहे तसेच काही करावे असे जातकाचे मन त्याला सांगत होते .

या ज्योतिषशास्त्राच्या प्रचिती साठी आणखी कोणते पुरावे हवेत !

 


Dhanyavad!

Aaj yog julun aala mhanayacha! Me emails pathavat hoto pan vatayacha ki tumachi ichha nahi aani mich apala mage lagaloy ki kay! 🙂 reply kelya baddal parat aabhaar!
Tumhi ji kshetre sangitali na te sagale mala kharech awadatat …  Netflix var pahilelya documentaries chi history pahili tar mostly yach related goshti disatil 🙂
Ya related field madhe kam karayacha yog ajun julun aala nahi .. pan prayatna chalu thevato!
————–
————-
Looking forward to hear back from you! krupaya aapale bank details deun fee kiti te hi sanga. Thanks again!


जातकाला त्याच्या भावी वाटचाली करता मन:पूर्वक शुभेच्छा

 

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Deepak

  करिअर च्या आधी घ्यायला हवं.. पण 40 शी नंतर घेणं किती फायदेशीर होईल हा पण एक प्रश्न आहे. त्या शिवाय आर्थिदृष्टया पण विचार करणं गरजेचे आहे.

  0
 2. Gorakshnath Kale

  kharay niyatichi iccha…
  kadachit aaple bhog bhognyasathi niyati karmachi nivad karat asavi…..

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.