या लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा:
तर मागच्या भागात काही लोकांनी विचारले होते:
- ग्रहयोग अगदी अंशात्मक आहे का?
- ग्रहयोग होऊन गेलाय की होणार आहे?
आता हे जे काही नविन खुळ उभे केलेय त्याबद्दल या भागात थोडी माहीती घेऊ.
भाग २ मध्ये आपण पाहीले आहे की जेव्हा दोन ग्रहांत ‘०’ अंशाचा कोन होतो तेव्हा त्यांच्यात ‘युती योग’ झाला आहे असे आपण म्हणतो किंवा ह्या दोन ग्रहांची युती झाली आहे असे म्हणले जाते . ‘०’ अंशाचा कोन होणे याचा अर्थ असा होतो की युती योगात असण्या साठी दोन्ही ग्रहांची राशी आणि अंश एकच पाहीजेत.
आकृती ०१
आकृती ०१ मध्ये जे दोन ग्रह दाखवेल आहेत त्यांच्यात युती योग आहे. चित्रात ते अगदी स्पष्ट दिसतेच आहे, ‘हिरवा’ ग्रह मेष राशीत १० अंशावर आहे तर ‘लाल’ ग्रह ही मेष राशीतच त्याच म्हणजे १० अंशा वर आहे. हाच तो युतीयोग (किंवा ग्रहाची युती) .
पण झाला अगदी काटेकोर नियम ! व्यवहारात असे कुठे चालते का ? थोडे फार इकडे तिकडे झाले तर काय बिघडते?
आकृती ०२
आकृती ०२ मध्ये, ‘हिरवा’ ग्रह मेष राशीत ५ अंशावर आहे तर ‘लाल’ ग्रह ही मेष राशीतच पण १० अंशा वर आहे. आपल्या ‘युती’ च्या व्याख्ये नुसार ह्या दोघात ‘युती’ योग नाही , कारण त्यांच्यात आता -५ अंशाचे अंतर आहे. जलद ग्रह मंद ग्रहाच्या ५ अंश मागे आहे. म्हणून उणे (Negative) अंतर लिहले आहे.
आकृती ०३
आकृती ०३ मध्ये, ‘हिरवा’ ग्रह मेष राशीत १० अंशावर आहे तर ‘लाल’ ग्रह ही मेष राशीतच पण ५ अंशा वर आहे. आपल्या ‘युती’च्या व्याख्ये नुसार ह्या दोघात ‘युती’ योग नाही कारण त्यांच्यात आता +५ अंशाचे अंतर आहे. जलद ग्रह मंद ग्रहाच्या ५ अंश पुढे आहे. म्हणून अधिक (Positive) अंतर लिहले आहे.
युतीसाठी अगदी ‘०’अंशाचेच अंतर हवे काय?
लक्षात घ्या, युती योगा साठी ‘०’ अंशांचे अंतर हे ‘आदर्श – Ideal’ अंतर आहे.
दोन ग्रहांत ‘०’ अंशांचे अंतर असले तर खात्रीने युती आहे पण तसे अंतर नसले तरी युती होऊ शकते , थोडेफार कमी-जास्त अंतर चालू शकते!
या फरकाला ‘दीप्तांश’ म्हणतात इंग्रजीत याला ‘orb’ असे म्हणतात . म्हणजे दोन ग्रहांत अगदीच ‘०’ अंशांचे अंतर नसले तरी ‘०+ दीप्तांश’ किंवा ‘०- दीप्तांश’ असे अंतर असले तरी युती झाली असे आपण म्हणू शकतो.
आकृती ०२ मध्ये हिरवा ग्रह (जलद गती) , लाल ग्रहाच्या (मंद गती) ५ अंश मागे आहे तर व आकृती ०३ मध्ये हिरवा ग्रह , लाल ग्रहाच्या ५ अंश पुढे आहे. युतीयोगाच्या शास्त्रशुद्ध व्याख्ये नुसार दोन्ही चित्रांत या दोन ग्रहांत युती योग नाही पण ८ अंश इतके दिप्तांश गृहीत धरले तर दोन्ही चित्रांत या दोन ग्रहांतले अंतर अनुक्रमे तरी ‘ -८ ते +८’ या मर्यादेत बसत असल्याने दोन्ही स्थितींत युतीयोग आहे असे म्हणावे लागेल.
पण मग हे दीप्तांश नेमके किती धरायचे ? हा एका वादाचा / चर्चेचा विषय आहे , वेगवेगळी मतें आहेत, नक्की, ठोस असा आकडा अजूनही ठरला नाही. प्रत्येक ज्योतिष्याने स्वत:च्या अनुभवा नुसार ते ठरवावेत अशी मांडवली झाली आहे.
दीप्तांश किती धरायचे याबाबत तीन मार्गदर्शक तत्वे आहेत:
१) कोणत्या ग्रहांत योग होत आहे?
योग करणारे ग्रह कोणते आहेत, रवी किंवा चंद्र (चंदा मामा / रवी अंकल !) या सारखी ‘खास आपली माणसं’ (पर्सनल प्लॅनेट्स) आहेत की शनी , नेपच्युन सारखे दूर के रिश्तेदार. (आमच्या ह्यांच्या आतेबहीणीच्या ,मामे नणंदेच्या मावशीच्या दिराचा मेव्हणा !)
०२) कोणता योग होत आहे ?
सर्व ग्रह योगात युती योग जास्त दणकेबाज प्रभावी असल्याने दीप्तांशा च्या बाबतीत जरा जास्तच सढळ हात ठेवला जातो, तुलनात्मक दृष्ट्या लाभ, केंद्र या प्रकारच्या योगांच्या बाबतीत हात काहीसा आखडला जातो.
०३) योग होत आहे की होऊन गेला आहे?
या आधी आपण आकृती ०२ व आकृती ०३ मध्ये पाहीले की दिप्तांश गृहीत धरले तर युती योग तीन प्रकारचा असू शकतो.
होणारा योग (Applying Aspect): जलद ग्रह मंद ग्रहाच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे (दीप्तांशाच्या टप्प्यात आलेला आहे) पण तंतोतंत योग अजून व्हावयाचा आहे.
तंतोतंत योग (Exact / Partile Aspect) : दोन्ही ग्रह अगदी एकाच अंशावर आहेत. (एकाच राशीत ते वेगळे सांगावयास नको), तंतोतंत युती!
होऊन गेलेला योग (Separating Aspect): जलद ग्रह मंद ग्रहाचा चुम्मा घेऊन थोडासा पुढे सरकला आहे पण अजून ही तो दीप्तांशाच्या टप्प्यात आहे. युती तुटली आहे पण ‘प्यार’ अभीभी बरकरार है !
तंतोतंत योग सगळ्यात जोरदार! Number One!
त्यानंतर ‘होणारा योग’ महत्वाचा. Second Position!
‘होऊन गेलेला योग’ तुलनात्मक दृष्या कमी महत्वाचा !Also ran Category!
त्यामुळे ‘होणार्या योगाला’ जरा जास्त दीप्तांश देतात तर होऊन गेलेल्या योगाला कमी दीप्तांश मिळतात. (तंतोतंत योगाला दीप्तांश लागू नाहीत)
आता या तीनही प्रकारात काही फरक आहे ? आहे ना, जरुर फरक आहे!
पण त्याबद्दल मी नंतर सविस्तर याच लेखमालेत लिहणार आहे , तेव्हा थोडी कळ काढा. पण तत्पूर्वी एकच मासलेवाईक उदाहरण देतो म्हणजे ही कल्पना डोक्यात फिट्ट बसेल !
लग्ना आधीचे दिवस कित्ती छान होते नै, ती ‘ती’ होती आणि ‘मी’ मी होतो …
लग्नाच्या दिवशी ती ‘चि. सौ. का’ होती , आणि मी – ‘बळीचा बकरा’…
लग्ना नंतर ती आता ‘बायको’ आहे आणि मी ? मी आता कोणीच नाही…
कविवर्य सुहास गोखले
होणार्या योगाला जरा जास्त आणि होऊन गेलेल्या योगाला कमी दीप्तांश का दिले जातात याचे कारण आता आपल्याला चांगलेच (?) कळले असेल नै का !
व्यवहारात देखील नाही का मालाची विक्री होण्या पूर्वी व्यापारी नै का किती गोड गोड बोलतात ! आणि एकदा का विक्री झाली की मग? तुम्हाला माहीती आहेच!
या आधी लिहल्या प्रमाणे युती योग सगळ्यात जास्त प्रभावी असल्याने युती योगासाठी जरा जास्त दीप्तांश म्हणजे +/- ८ अंश चालतील. इतर योगांसाठी हेच दीप्तांश +/- ६ इतके घेता येतील. रवी , चंद्र योगात असतील नेहमीच्या दीप्तांशात १- २ अंशाची भर घालता येते.
दीप्तांशाच्या बाबतीत ते नेमके किती आणि कसे घ्यायचे याबाबत नियम असे काहीही नाही, ज्याने त्याने आपापल्या अनुभवा अंती ते ठरवावेत ! पण नविन शिकणार्यांना असा अनुभव यायला बराच काळ जाईल तो पर्यंत काय?
त्यासाठी हा मार्गदर्शक तक्ता ! बिनधास्त वापरा , फारशा चुका नाही होणार !
गुरु , शनी , युरेनस , नेपच्युन , प्लुटो या मोठ्या ग्रहांची गती अगदी संथ असल्याने ह्या ग्रहांमध्ये होणारे योग बराच काळ टिकून राहतात. म्हणून त्यांना तुलनात्मक कमी दीप्तांश द्यावेत.
एक उदाहरणच देतो म्हणजे हा मुद्दा जरा अधिक स्पष्ट होईल.
गुरु – शनी युती योग.
शनी हा गुरु पेक्षा मंद असल्याने गुरु च शनी शी युती करेल आणि पुढे निघून जाईल. गुरु साधारण पणे एका राशीत (३० अंश) १ वर्ष असतो म्हणजे १ अंशाचे अंतर कापायला गुरु ला १२ दिवस लागतात.
आता समजा शनी मकरेत २१ अंशात आहे, गुरु जेव्हा मकरेत २१ अंशावर येईल तेव्हा ह्या दोन्ही ग्रहांत ‘०’ अंशाचे अंतर असेल , अगदी पूर्ण अंशात्मक (Partile) युती होईल.
गुरु पुढे सरकून मकरेत २२ अंशावर आला की हेच अंतर वाढून आता १ अंशाचे होईल आणि युती संपुष्टात येईल,
अलीकडच्या काळात अशी गुरु- शनी पूर्ण अंशात्मक (Partile) युती दिनांक मे २००० मध्ये झाली होती. २८ मे २००० रोजी १४:०० (GMT) गुरु २२ वृषभ ४२ अंशावर तर शनी २२ वृषभ ४२ अंशावर होता. ही अगदी पूर्ण अंशात्मक अशी युती सुमारे दोन तास टिकली.
आता १ अंशाचा दीप्तांश धरला तर , १९ मे २००० रोजी ०७:०० (GMT) गुरु २० वृषभ ३१ अंशावर तर शनी २१ वृषभ ३१ अंशावर होता. ०७ जुन २००० रोजी ०७:०० (GMT) गुरु २४ वृषभ ५२ अंशावर तर शनी २३ वृषभ ५२ अंशावर होता. +/- १ अंशा च्या दीप्तांशातली युती तब्बल २० दिवस आकाशात दिसत होती ! ( या पुढची गुरु – शनी युती २०२० मध्ये होणार आहे !)
आता या योगासाठी एखाद्याने ८ अंश दीप्तांश म्हणून घ्यायचे ठरवले तर काय होईल?
शनी मकरेत २१ अंशात आहे, गुरु जेव्हा मकरेत १३ अंशावर येईल तेव्हा त्यांच्यात – ८ अंशाचे अंतर होइल युती योग सुरु झाला, त्यानंतर गुरु पुढे सरकून मकरेत २९ अंशावर आला की हेच अंतर +८ अंशाचे होईल आणि युती योग संपुष्टात येईल.
याचा अर्थ गुरु मकरेत १३ ते २९ अंशात असताना तो मकरेत २१ अंशात असलेल्या शनी शी युती योग करेल. हे १६ अंश पार करायला गुरु ला तब्बल ६ महीने लागतील. म्हणजेच त्या ६ महीन्यांत जगभरात जन्मलेल्या सर्वच्या सर्व बालकांच्या पत्रिकेत गुरु – शनी युती असेल!
हे काही फारसे पटत नाही म्हणून मंदगती ग्रहां मधल्या ग्रहयोगां साठी दीप्तांश वापरुच नयेत, वाटल्यास अगदी कमी म्हणजे ३ अंशांपर्यंत दीप्तांश घ्यायला हरकत नाही, पण शेवटी हे प्रत्येकाने आपापल्या अनुभवा अंती निश्चीत करावे हेच खरे.
दोन मंदगती ग्रहां मधल्या साठी मी स्वत: ३ अंशांपर्यंत दीप्तांश घेतो, बाकीच्यांचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल (YMMV).
आता मघाच्याच उदाहरणात गुरु ऐवजी चंद्र असेल तर काय होईल?
चंद्र – शनी युती:
शनी मकरेत २१ अंशात आहे, चंद्र जेव्हा मकरेत २१ अंशावर येईल तेव्हा त्यांच्यात ० अंशाचे अंतर होइल , अगदी अंशात्मक युती होईल . चंद्र पुढे सरकून मकरेत २२ अंशावर आला की हेच अंतर +१ अंशाचे होईल आणि युती योग संपुष्टात येईल.
आता चंद्राची सरासरी गती १३ अंश प्रति दिवस असल्याने १ अंश पार करायला चंद्राला फक्त २ तास लागतील ! म्हणजेच त्या २ तासात जन्मलेल्या सर्व बालकांच्या पत्रिकेत चंद्र – शनी युती योग असेल.
आता या योगासाठी एखाद्याने ८ अंश दीप्तांश म्हणून घ्यायचे ठरवले तर काय होईल? युतीयोगा साठी आता – ८ ते +८ अंशापर्यंतचे अंतर असले तरी चालेल.
शनी मकरेत २१ अंशात आहे, चंद्र जेव्हा मकरेत १३ अंशावर येईल तेव्हा त्यांच्यात – ८ अंशाचे अंतर होइल युती योग सुरु झाला, त्यानंतर चंद्र पुढे सरकून मकरेत २९ अंशावर आला की हेच अंतर + ८ अंशाचे होईल आणि युती योग संपुष्टात येईल. याचा अर्थ चंद्र मकरेत १३ ते २९ अंशात असताना तो मकरेत २१ अंशात असलेल्या शनीशी युती योग करेल. हे १६ अंश पार करायला चंद्राला २६ तास लागतील, म्हणजेच त्या २६ तासात जन्मलेल्या सर्व बालकांच्या पत्रिकेत चंद्र – शनी युती योग असेल. हे काहीसे चालण्या सारखे आहे.
असाच अनुभव बुध, शुक्र , मंगळ या शीघ्रगती ग्रहां बाबत येईल, म्हणून दोन शीघ्रगती ग्रहां मधल्या ग्रहयोगां साठी किंवा एका शीघ्रगती- एक मंदगती ग्रहा मधल्या योगां साठी जरा जास्त म्हणजे ६ ते ८ अंशांपर्यंत दीप्तांश घ्यायला हरकत नाही , पण शेवटी हे प्रत्यकाने आपापल्या अनुभवा अंती निश्चीत करावे हेच खरे. मी स्वत: ६ अंशांपर्यंत दीप्तांश घेतो, बाकीच्यांचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल (YMMV).
आत्तापर्यंत आपण ग्रहां मधल्या योगांचा अंशात्मक अंतराच्या दृष्टीने विचार केला, पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात ग्रह योग हे असेच काटेकोर अंशात्मक बघितले जातात .
पण हे झाले भूमीती (Geometry) च्या अंगाने, पण आपल्या भारतीय पारंपरीक ज्योतिषशास्त्रात आणि के.पी. नामक ‘ज्योतिष खिचडीत’ ( ‘ज्योतिष खिचडी’ हा नवा शब्द प्रयोग मी ज्योतिष शास्त्राला बहाल केला आहे. याचे पेटंट माझ्या कडे आहे बर्का !) ग्रहयोग जरा वेगळ्या पद्धतीने पाहीले जातात, ते कसे ते आपण पुढच्या भागात पाहू.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Thank you for very informative post.
धन्यवाद हिमांशुजी
सुहास गोखले
अरे व्वा … खूपच सुंदर लेख हा पण.. ” दीप्तांश ” हि नवी concept समजली..
एक शंका आहे… ‘आदर्श – Ideal’ युतीयोग सोडून दीप्तांश मध्ये पण दोन ग्रह एकाच राशीत असावे लागतात का ?
( म्हणजे जर एक ग्रह मेषेच्या शेवटच्या अंशात आणि दुसरा वृशभेच्या पहिल्या … असे … )
जर असतील तर त्या युती चा प्रभाव हा एका राशी मध्ये होणाऱ्या प्रभावाप्रमाणेच असेल का ?
आणि ‘ज्योतिष खिचडी’ याबद्दल पण एखादा लेख वाचायला आवडेल… 😉
आणखी एक .. आपल्या पुस्तकाचा विषय आणि भाषा ठरली का ?
धन्यवाद गौरवजी , आपल्या शंकेचे उत्तर पुढच्या लेखात मिळेल. ओपिनियन पोल चे नतीजे लौकरच प्रसिद्ध करत आहे.
आपला
सुहास गोखले
धन्यवाद सर .. ओपिनियन पोल बद्दल जरा शंका होती.. कि मी जेव्हापण आपले पेज उघडायचो तेव्हा दर वेळेस ओपिनियन देऊ शकायचो.. जर असे असेल तर खर ओपिनियन समजेल का ?
sorry … पण मला हे लक्षात आल म्हणून सांगितल..
बाकी ओपिनियन पोल च्या नातीजांची वाट बघतोय.. 🙂
ते आय.पी. अॅड्रेस वर अवलंबून असते जर प्रत्येक व्हीजीट्ला आय.पी. अॅड्रेस बदलला असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी मत नोंदवता येईल. एक व्यक्ती एक मत असे पाहीजे असेल तर ईमेल पासवर्ड इ . मार्गाने ते अंमलात आणता येईल. मी इतक्या खोलात जात बसलो नाही. वर्ड्प्रेस ची स्ट्न्डर्ड सुविधा वापरली.
सुहास गोखले
Jsbardat ….. Mahiti
Sopya shabdat mahiti milali dhanywad .
Yek shanka hoto ?grahancya Anshatmak yuti yogat grahancya avasta na kiti mahatva dyayache. Mhanje bal yuva Kumar ityandi.
Aapalya pustakachi aamhi pratiksha karat aahot.
श्री. उमेशजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. ग्रहांच्या अवस्था वा त्याचा ग्रहयोगात कसा , काय आणि किती विचार करायचा याबद्दल मी नंतर सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो.
आपला
सुहास गोखले
दर भागा नंतर धन्यवाद देण्या पेक्षा आधिच देउ की नंतर एकदम देउ (धन्यवाद )
श्री. संदीपजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
आपला
सुहास गोखले
नमस्कार सुहासजी,
नेहमी प्रमाणे छान लेख आणि अभ्यासपूर्ण.
आणि पुस्तकाच्या मत निकालाची उत्सुकता वाढली आहे, कारण माझ पण मत त्यामध्ये आहे 🙂
आपला,
संतोष सुसवीरकर
श्री. संतोषजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद..
आपला
सुहास गोखले
ग्रहयाेगावरचे तुमचे लिखाण आवडले. ग्रहयाेगावर आणखी वाचायला आवडेल.
सौ. तनुजा जी,
अभिप्रया बद्दल धन्यवाद .
ग्रहयोगा वर एक पुस्तक लिहायचे ठरवल्या मुळे आता तोच मजकूर ब्लॉग़ च्या माध्यामातून देणे काहीसे अव्यवहार्य ठरेल म्हणून लेखमाला स्थगीत केली आहे.
सुहास गोखले
ग्रहयाेगावरचे तुमचे लिखाण आवडले. ग्रहयाेगावर आणखी वाचायला आवडेल.
ग्रहयोग जरा वेगळ्या पद्धतीने पाहीले जातात, ते कसे ते आपण पुढच्या भागात पाहू
असा उल्लेख भाग 4 च्या शेवटी आपण केला आहे , लवकरच पुढील भाग अपेक्षित आहे.
श्री. अविनाशजी ,
धन्यवाद
ह्या लेखमाले वर आधारीत एक पुस्तक प्रकाशन करण्याची योजना असल्याने ह्या मालिकेतले पुढचे लेख प्रकाशीत करता येणार नाहीत.
सुहास गोखले
तुमचे ग्रहयोग वरिल article खूप आवडले . धन्यवाद.
आगामी प्रकाशित होनारे पुस्तकहि वाचायला आवडेल.
धन्यवाद श्री सुशांतजी
सुहास गोखले