या लेखमालिकेतले आधीचे भाग इथे वाचा:

पत्रिकेतले ग्रहयोग भाग – २

पत्रिकेतले ग्रहयोग भाग – १

भाग क्रमांक  २ मध्ये आपण योग कसे आणि कोणते ते बघितले,  या योगांची चित्रे (Graphics) पण एकदा डोळ्या खालून घाला.

आपण या आधी बघितले आहे की एकंदर २१४ ग्रह योग महत्वाचे आहेत, त्यातही लाभ आणि नव-पंचम, तसेच केंद्र आणि प्रतियोग एकच धरले तर १३१ योग महत्वाचे होतात.

हे २१४ एका दृष्टीक्षेपात दिसावे म्हणून एक तक्ता केला आहे , तक्ता बनवताना ०, ६०, ९०, १२०, १८० असे ५ प्रमुख योगच विचारात घेतले आहेत.

हा तक्ता वाचताना ह्या बाबींकडे खास लक्ष द्या:

रवी – बुध फक्त युती योग होऊ शकतो (१)

रवी – शुक्र फक्त युती योग होऊ शकतो (१)

बुध – शुक्र फक्त युती आणि लाभ योग होऊ शकतात (२)

बाकी सर्व जोड्यांत  पाचही प्रकारचे योग होतात. (५)

तेव्हा आता कोणी  ‘रवी – शुक्र प्रतियोग’ झालाय किंवा ‘रवी – बुध नव-पंचम योग’ आहे असे म्हणाल्यास ‘मडके कच्चे’  आहे असे समजायला हरकत नाही !

ग्रह योगांचा अभ्यास करताना एक मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे आपल्या सुर्यमालेतल्या ग्रहांची गती एका सारखी नाही (राहु – केतु हे फक्त त्याला अपवाद आहेत) त्यामुळे कोणत्याही ग्रहयोगात तुलनात्मक रित्या एक ग्रह जलद असणार आणि दुसरा मंद गतीचा.

जलद गतीचा ग्रहच दुसर्‍या ग्रहाशी योग करु शकतो.

उदाहरणच द्यायचे तर:

चंद्र हा सुर्यमालेतीला सर्वात जलद गतीचा ग्रह असल्याने तो  सरासरी २८ दिवसात ३६० अंशाचे (सगळ्या राशीं मधून) भ्रमण पूर्ण करतो. साहजीकच तो सर्व ग्रहांशी ( रवी, बुध,शुक्र, मंगळ… प्लुटो) सगळ्या प्रकाराचे (युती, केंद्र, नवपंचम, प्रतियोग) योग करु शकतो. चंद्राचे सगळ्या ग्रहांशी, सगळ्या प्रकाराचे योग प्रत्येक महीन्यात होतातच. त्या हिशेबाने चंद्र शनी युती योग वर्षात १२ वेळा होतोच.

चंद्रा नंतर चे जलद गती ग्रह म्हणजे रवी, बुध आणि शुक्र. या तिघांची गती जवळपास एका सारखीच म्हणजे १ वर्षात सगळ्या राशीं मधून भ्रमण पूर्ण होणारी आहे. हे तिन्ही ग्रह चंद्र सोडला तर इतर सगळ्या ग्रहांशी योग करु शकतात. ( इथे हे तीनही ग्रह चंद्राशी योग करु शकत नाही असा गैर समज करुन घेऊ नका, चंद्रच या तिघांशी योग करत असल्याने यांना काही करावे लागत नाही , !)

या क्रमाने मंगळ  हा गुरु, शनी, युरेनस,नेपच्युन व प्लुटो शी योग करु शकतो, (पुन्हा एकदा लिहतो कारण मागे एकदा काही विद्यार्थ्यांनी गैरसमज करुन घेतला होता.. चंद्र , रवी , बुध आणि शुक्र हे मंगळा पेक्षा जलद असल्याने तेच मंगळाशी योग करत असतात, मंगळाला त्यासाठी काहीच करावे लागत नाही !) शनी फक्त युरेनस , नेपच्युन व प्लुटो शी योग करायला जातो. प्लुटो सगळ्यात मंद गतीचा ग्रह असल्याने त्या ठोंब्याला काहीच करावे लागत नाही, बसल्या जागी बाकी सगळे ग्रह (चंद्र ते नेपच्युन) त्याच्याशी योग करुन जातात.

ग्रहयोग दोन ग्रहांच्या जोडीत होतात. त्यामुळे कोणत्याही ग्रहयोगाचा उल्लेख करताना आपल्याला कमीतकमी तीन घटक सांगावे लागतात:  ग्रह-१ ,  ग्रह -२ आणि कोणता ग्रहयोग आहे त्याचे नाव. उदाहरणार्थ: चंद्र- शनी युती.

हे कसे लिहायचे या बाबतीत एक आंतरराष्ट्रीय संकेत पाळला जातो:

जलद गतीच्या ग्रहाचे नाव प्रथम लिहायचे, जोडीतला दुसरा ग्रह (जो अर्थातच तुलनेत मंद गतीचा असणार आहे) त्यानंतर लिहायचा , शेवटी कोणत्या प्रकारचा योग झाला ते लिहायचे. वरील उदाहरणात चंद्र शनी पेक्षा जलद असल्याने त्याचे नाव प्रथम लिहले आहे.

याला एक अपवाद आहे, तो म्हणजे रवी. रवी आपल्या ग्रहमालेचा प्रमुख असल्याने त्याचा योग्य तो मान ठेवला पाहीजे म्हणुन रवी शी होणारे योग लिहताना रवी प्रथम लिहायचा. उदाहरणार्थ चंद्र आणि रवी मधला योग चंद्र- रवी प्रतियोग असा न लिहता रवी –चंद्र प्रतियोग असा लिहायचा.

आता असेच लिहले पाहीजे का ? समजा नाही लिहले तर काय फरक पडतो ? काहीही नाही तरीही असे संकेत पाळल्याने अभ्यासाची, लिखाणाची, अभिव्यक्तीची एक शिस्त निर्माण होते.

सर्वसंमत (आंतरराष्ट्रीय ) संकेत कोणते हे सांगायचे काम माझे , ते पाळायचे का नाही ते तुम्हीं ठरवा !

आधी लिहल्या प्रमाणे कोणत्याही ग्रहयोगाचा उल्लेख करताना आपल्याला ग्रह-१ ,  ग्रह -२ आणि कोणता ग्रहयोग हे कमीतकमी तीन घटक सांगावे लागतात, हे तीन घटक तर अत्यावश्यक (necessary) असतात पण ते पुरेसे (sufficient) नाहीत. मग आणखी कोणती जादा माहीती आवश्यक आहे ?

कितीही विरक्तीचा आव आणला तरी प्रत्येक संन्याशाकडे ‘कुबडी, छाटी आणि कमंडलू’ अशा तीन वस्तू असतातच ( नागा साधु असेल तर अपवाद म्हणून ‘छाटी’ च्या ऐवजी ‘दाढी’/ जटां’ चालू शकतील !) तसे कुंडलीतल्या प्रत्येक ग्रहाकडे राशी, अंश आणि भाव (घर) असा बायोडेटा असतोच (आधार कार्ड, ईमेल आयडी आणि फेसबुक अकौंट अजुन तरी नाही). योग करणारे ग्रह कोणत्या राशींत आहेत, किती अंशावर आहेत आणि कोणत्या घरा / भावा/ स्थाना तून हा योग होत आहे , त्यातला कोणी वक्री / स्तंभी / अस्तंगत आहे का हे कळणे ही तितकेच महत्वाचे आहे.

जेव्हा एखाद्या ग्रहयोगाचे काय फळ मिळणार हे आपल्याला पहावयाचे असते तेव्हा ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार केला पाहीजे

काही (नवशिक्या) ज्योतिषांना एकाद्या पत्रिकेत चंद्र – गुरु योग दिसला रे दिसला की ‘गजकेसरी  – गजकेसरी’ असा हर्षवायू  होतो पण सगळीच नुडल्स मॅगी नसतात तसे सगळेच चंद्र – गुरु योग ‘गजकेसरी’ नसतात , काही ‘गजकर्ण’  ही शाबित होतात !!  तो योग ‘तसा’ आहे का हे त्या दोघांच्या राशी, भाव इ. बाबीं तपासल्या शिवाय सांगता येणार नाही.

एकाद्या योगाचे वर्णन (Description) करताना वर लिहलेले सर्व घटक दिले असतील तर माहीती संपूर्ण आहे असा शिक्का मारायला हरकत नाही. तरीही अजुन दोन गोष्टी दिल्या असत्या तर बरे झाले असते नै का , असे विचारले जातेच!

म्हणजे अजुन काही राहीलेय का?  नाही हो , सगळी माहीती मिळालेली आहे , काहीही राहीले नाही तरी पण लोक विचारताच! लोक्स आताशा जरा जास्तीच आळशी झालेत, जर्रा म्हणून हातपाय हलवायला नको! डॉमीनोज च्या पिझ्झ्या सारखे सगळे घरपोच पायजे.

या (आळशी!) लोकांना आणखी काय जाणून घ्यायचेय:

ग्रहयोग अगदी अंशात्मक आहे का ? आणि ग्रहयोग होऊन गेलाय की होणारा आहे ?

आता हे काय नविन खुळ ? या आधी असा काही उल्लेख झालेला दिसत नाही?

सांगतो, सगळे बैजवार सांगतो , पण पुढच्या भागात !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+8

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

11 प्रतिक्रिया

///////////////
 1. viraj thale

  काही (नवशिक्या) ज्योतिषांना एकाद्या
  पत्रिकेत गुरु- चंद्र योग दिसला रे दिसला की
  ‘गजकेसरी – गजकेसरी’ असा हर्षवायू होतो .
  हा हा हा

  0
 2. Santosh

  नमस्कार सुहासजी,

  फारच छान माहिती अगदी लहान लहान गोष्टी सहज समझतील ह्या लेखातून.

  पुढील लेखासाठी शुभेछ्या आणि उत्सुकता अजुन वाढली आहे.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   अजून बरेच ‘भाग ‘ प्रकाशीत करणार आहे , कामाच्या व्यापातून लिहायचा फारसा वेळ मिळत नाही. बघूया कसे काय जमते ते!

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. Gaurav Borade

  नेहमीप्रमाणे सुंदर लेख सर ….
  पुढील भागाच्या जरा जास्त प्रतीक्षेत … .. 🙂

  0
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,
   धन्यवाद.
   पुढचा भाग लौकरच ! ग्रहयोग भाग – ४ मेकअप करुन विंगेत तयार आहे , पण आमच्या शेक्रेट्रीने (म्हणजे मीच कि हो , दुसरे कोण ?) तारखांचा घोट्टाळा करुन ठेवल्यामुळे एक केस स्ट्डी , दिवाळी शुभेच्छांचे ब्यॅनर (फ्लेक्स !) लायनीत उभे आहेत त्यांना जरा चानस द्यायला पाहीजे नै तर..

   आपला
   सुहास गोखले

   0
 4. Himanshu

  सुंदर लेख. काही ज्योतीशी नवमाँश कुंडली मध्ये सुद्धा योग बघतात. स्वतः मराठी टाइप करायला लागल की कळत किती वेळ लागतो ते 🙂
  धन्यवाद!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   नवमांश कुंडली ग्रहयोग पाहणे चुकीचे आहे. मुळात नवमांशा ही 40 अंशाच्या ग्रहयोगांची एक कुंडली आहे. मुळ पत्रिकेत जे ग्रह 40, 80, 120, 160, 200 अशा 40 च्या पटीतल्या अंतरात असतात ते नवमांशात 0 अंश बनून युतीत येतात.
   नवमांश पत्रिका बनवायची पद्दत: प्रत्येक ग्रहाच्या अंशाला 9 ने गुणायचे जर गुणाकार 360 पेक्षा जास्त आला तर त्यातून 360 वजा करायचे जौ पर्यंत वजाबाकी 360 च्या आत येत नाही तो पर्यंत 360 वजा करत जायचे. उदा. 0 x 9 = 0, 40 x 9 = 360 = 0, 80 x 9 = 720 = 720-360-360 = 0 , 120 * 9 = 1080 – 360 -360 -360 = 0 . या प्र्माणे 3 , 43 , 83 अंशावर असलेले ग्रह गणिता नंतर सगळेच 3 अंशावर येतात. थोडक्यात 0 – 360 हे 0-40 मध्ये (कॉम्प्रेस्ड ) रुपांतरीत करायचे . नवमांश कुंड्ली फक्त 40 अंशातल्या कोनांचा अभ्यास करण्यासाठी असल्याने हे गणिती व्याप केल्याने 40 अंशाचे कोन वा त्याची डेरिव्हीटीव्हज नजरेच्या एका कटाक्षात दिसतात. ग्राफीक फ्रेंडली ! बाकी खास काही नाही. नवमांशात परत योग बघायचे नाही ते याच मुळे. नवमांशाचा उपयोग फक्त विवाह या एकाच बाबी साठी जास्त उपयुक्त आहे , असे जरी असले त्याला वाजवी पेक्षा जादा महत्व मिळत गेले आहे. किंवा ‘नवमांश कुंडली म्हणजे काही तरी स्पेश्यल आहे ‘ असा उगाचाच माज केला जातो. ह्या सर्व वर्ग कुंडल्यांचा अभ्यास हे अति स्पेशलाइज्ड फिल्ड आहे, साध्या कुडल्यांच्या अभ्यासावर पूर्ण प्रभुत्व आल्याखेरिज या वर्गकुंडल्यांच्या नादाला लागू नये हे बरे, उगाच वैचारीक गुंता वाढतो आणि एक ना धड भराभर चिंध्या असे होते.

   आपला

   सुहास गोखले

   0
 5. sandip

  पत्रिकेतले ग्रहयोग अप्रतिम सोप्पी व्यासंगपूर्ण भाषा
  धन्यवाद

  0
 6. अंकुश

  सर येथे राहु केतुचे योग कसे असतील . त्याचा विचार कसा करावा. म्हणजे ते कोनाशी युती करतात किंवा त्याच्याशी युती कोनते ग्रह करतात.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अंकुशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद,

   राहु – केतु हे प्रत्यक्षातले ग्रह नाहीत , ते गणीताने सिद्ध केलेले बिंदू आहेत त्यांना वस्तुमान – आकार मान नाही त्यामुळे त्यांना दृष्टी नाही . राहु – केतु कोणत्याही ग्रहावर दृष्टी टाकू शकत नाही, तसेच इतर ग्रहांच्या दृष्टी ( लाभ, केंड्र, नव-पंचम, षडाष्टक , प्रतियोग) राहु – केतु वर घरायच्या नाहीत, राहु (केतु) एखाद्या ग्र्हाच्या अगदी अंशात्मक युतीत (ग्रहण योग) असेल, राहु (केतु) च्या प्रभावाने (मॅग्नेटीक फिल्ड) युतीतल्या ग्र्हाच्या कारकत्वात मोठे वैगुण्य येते.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.