या लेखमालिकेतला पहीला भाग इथे वाचा:

पत्रिकेतले ग्रहयोग भाग – १
ग्रहयोग (Aspect)  म्हणजे काय?

 

कोणताही ग्रहयोग म्हणजे त्या दोन ग्रहां मधली एक भौमितिय रचना (Geometrical position) आहे.Aspect Digm 1 शेजारी  दिलेली आकृती पहा , लाल आणि हिरव्या रंगातले दोन ग्रह आपापल्या कक्षांमधुन फिरत असताना त्या दोन्हीं मध्ये १०० अंशाचा कोन तयार झालेला आहे , या कोनालाच ग्रहयोग म्हणतात. आता हे दोन्ही ग्रह आपापल्या कक्षा सोडून कधीही, कोठेही भरकटणार नाहीत त्यामुळे कोणत्याही वेळी या दोन ग्रहांमध्ये कोणता ना कोणता कोन होत राहाणारच. तसेच हे ग्रह सतत फिरत असल्याने या दोघांमध्ये होणारा कोन सतत बदलत राहाणार हे ही उघड आहे.

 

 

 

 

 ग्रहांचा भ्रमण मार्ग चित्रात दाखवला आहे तसा अगदी वर्तुळाकार नसतो, अंडाकृती (Elliptical) असतो पण त्यामुळे दोन ग्रहात कोन होणे व तो बदलत राहाणे या कृतीत काही फरक पडत नाही.

आपल्याला माहीती आहे की वर्तुळ हे ३६० अंशाचे असते, म्हणजे हे ग्रह ३६० अंशात फिरतात. त्यामुळे दोन ग्रहांत ० ते ३५९ अंश असा कोणताही कोन होऊ शकतो. आपल्या सुर्यमालेतल्या ह्या ग्रहांची गती एकसारखी नसल्याने ,जलद गतीने फिरणारा ग्रह (आतल्या कक्षेतला) दुसर्‍या संथ गतीच्या ग्रहाशी (बाहेरच्या कक्षेतला) वेगवेगळे कोन करत उदाहरणार्थ: ०… २५ … ६८ …. ११२…. १६७….१७२…. २३२ … ३१८ …. ३५९ …. परत ० ,  १३ … ४१.. अशी चक्कर लगावत असतो.

 

 

तांत्रीकदृष्ट्या दोन ग्रहांत ० ते ३५९ अंश असा कोणताही कोन होऊ शकत असला तरी एका अर्थाने कोणताही कोन  हा ० ते १८० अंश या मधलाच असतो. शेजारच्या आकृतीत दोन ग्रहां मध्ये एका बाजुने १९० अंशाचा तर दुसर्‍या बाजुने १७० अंशाचा कोन होतो. एका बाजुने २७० अंशाचा कोन होतो त्याच वेळी दुसर्‍या बाजुने ९०अंशाचा कोन होत असतो.  आपण नेहमी जो कोन ० ते १८० अंश या मध्ये आहे तो विचारात घ्यायचा. वरील उदाहरणात १७० अंशाचा कोन विचारत घ्यायचा.

 

 

 

हे ग्रहां मधले कोन आपले भूत-वर्तमान – भविष्य ठरवतात असे म्हणले तर फारसे वावगे ठरणार नाही. तेव्हा दोन ग्रहां मधले होणारे कोन आणि त्यांचा आपल्या वर होणारा परिणाम अभ्यासणे अत्यंत जरुरीचे आहे.

चंद्र, सुर्य , शनी असे ७ , आणि युरेनस, नेपच्युन , प्लुटो धरले तर १० ग्रह आहेत ( ग्रहयोगांच्या बाबतीत राहु – केतु ही जोडगोळी विचारात घेतली जात नाही, त्याची कारणमिमांसा नंतरच्या एका  लेखात देतो)  या सर्व ग्रहांच्यात वेगवेगळे कोन होत असतातच . उदाहरण द्यायचे झाले तर चंद्र- गुरु ४३ अंशाचा कोन आहे त्याच वेळी चंद्र – बुधात ९८ अंशाचा कोन आहे इ.

आपल्या कडे १० ग्रह आहेत , मग यांच्यात अशा किती जोड्या जमू शकतात ?

चंद्र – रवी, चंद्र – बुध, चंद्र – शुक्र ,चंद्र – मंगळ , चंद्र- गुरु, चंद्र – शनी, चंद्र – युरेनस,चंद्र – नेपच्युन ,  चंद्र – प्लुटो  अशा ९ जोड्या होतील. याच प्रमाणे  रवी- बुध , रवी – शुक्र …. रवी – प्लुटो अशा ८ जोड्या होतील. बुध – शुक्र , बुध – मंगळ … बुध – प्लुटो अशा ७ जोड्या . अशा तर्‍हेने नेपचुन – प्लुटो अशी शेवट्ची जोडी मिळेल. अशा  ४५ जोड्या होतील . आता ४५  जोड्या म्हणजे  कुठल्याही पत्रिकेत एकूण ४५ ग्रहयोग असणार! एखाद्या पत्रिकेचा अभ्यास करताना या सार्‍या ग्रहयोगांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो!!

आता हा अभ्यास म्हणजे काय ?  रवी – चंद्र योग असला तर काय फळ मिळेल,  शनी- नेपच्युन योग असला तर काय फळ मिळेल अशा स्वरुपाचा तो अभ्यास असतो.

कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी दोन ग्रहांत ० ते १८० अंश या पैकी कोणता ना कोणता कोन होणारच. आता सोयी साठी १ अंश हा न्युनतम घटक (least count) घेतला तर कोणत्याही दोन ग्रहांत ० ते १८० अंश अशा एकूण १८१ कोन स्थितीं (angular positions) शक्य  शकतात.

मग समजा आपल्याला चंद्र – रवी  या जोडी मधल्या कोनांचा (ग्रहयोगांचा) अभ्यास करायचा असेल तर ?

रवी – चंद्र ०     अंश  =  फलित ‘क्ष’

………

रवी – चंद्र ५२   अंश  = फलित ‘ट’

………

रवी – चंद्र १८० अंश =  फलित ‘भ’

अशी एका ग्रह जोडी साठी १८१ फलितें लक्षात ठेवायला लागतील , आपल्या कडे अशा ४५ जोड्या असल्याने ४५ x १८१  = ८१४५ इतकी फलितें लक्षात ठेवायला लागतील !!

बापरे ,  हे तर  स्मरणशक्तीला भलतेच मोठे आव्हान होऊन बसेल!

पण सुदैवाने सर्वच १८१ कोन स्थितीं (angular positions) चा अभ्यास करावा लागत नाही. शेकडो – हजारों वर्षांच्या निरीक्षणां नंतर असे लक्षात आले आहे की  या १८१ कोन स्थितीं पैकी अगदी मोजकेच कोन परिणाम कारक असतात, बाकीच्या कोन स्थितीं चा आपल्यावर फारसा प्रभाव पडत नाही.

सर्वमान्य असे  ५ कोन आहेत: ० , ६० , ९० , १२० , १८०

म्हणजे आता आपल्याला ४५ जोड्यांसाठी ४५  x ५ = २२५ इतकीचे फलितें लक्षात ठेवायला लागतील.

खरे तर फलितें लक्षात ठेवायला लागतच नाहीत,  एखाद्या ग्रहयोगात कोणते दोन ग्रह आहेत, त्यांच्यात कोणता कोन आहे हे कळले की फलित तुमच्या डोळ्या समोर साकार होते (नव्हे साकार व्हायला हवे !).  ते कसे काय?  त्याचीही एक युक्ती आहे , नंतर सांगतो!!

हा २२५ आकडा आणखी कमी होतो.

रवी, बुध व शुक्र यांची आकाशातली स्थिती, भ्रमण कक्षां व गती अशा आहेत की  रवी – शुक्र  या जोडीत ०  ते ४८ अंश एव्हढाच कोन होऊ शकतो आणि रवी – बुध या जोडीत  ० ते  २८  अंश एव्हढाच कोन होऊ शकतो. त्यामुळे रवी – बुध आणि रवी – शुक्र या जोड्यांत  फक्त ० अंशाचा उपयुक्त कोन होऊ शकतो ( या दोन्ही जोड्यांत ६०, ९०, १२० , १८० चे कोन होणे कदापीही शक्य होणार नाही) .  बुध- शुक्र या जोडीतही ० ते  ७६ अंश एव्हढाच कोन होऊ शकतो या पेक्षा जास्त कोन कधीच होणार नाही. त्यामुळे या जोडीत फक्त  ० , ६० हे दोनच उपयुक्त कोन होऊ शकतात.

म्हणजे एकंदर २१४ ग्रहयोगांच्या फलिताचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे.

“सर, तरी पण  एव्हढी  सगळी ‘२१४’ फलितें लक्षात ठेवायची म्हणजे …..”

(कसलीही मेहेनत घ्यायला नको , सग्ळे सोप्पे पायजे नै !)

ठीक आहे आपले काम आणखी हलके करतो!

९० ,  १८० अंशाच्या कोनांची फलितें जवळपास सारखीच असतात, किंवा या कोना मुळे मिळणार्‍या फलितांचा पोत (रोख) सारखाच असतो. त्याच प्रमाणे  ६० , १२०  अंशाच्या कोनांच्या फळांच्यातही असेच बरेचसे साम्य असते. थोडक्यात फलिताच्या दृष्टीने ० , १२०, १८० असे तीनच मुख्य कोन होतील.  आता एकंदर फलितें किती होणार ? १३१!

(कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हां सांगील काय…)

या कोनांना विषीष्ठ नावें दिलेली आहेत.

 1. ० युती योग Conjunction
 2. ६० लाभ योग Sextile
 3. ९० केंद्र योग Square
 4. १२० नव-पंचम योग Trine
 5. १८० प्रति योग Opposition

काही ज्योतीषी आणखीही काही कोन स्थितीं विचारत घेतात त्या अशा:

 • ३० अर्ध लाभयोग Semi-Sextile
 • ४५ अर्ध केंद्र योग Semi-Square
 • १३५ सेस्क्वी क्वॉड्रेट Sesquiquadrate
 • १५० इनकंजक्ट / क्विनकंक्स / षडाष्ट्क

काहीजण क्वींटाईल Quintile ७२, बाय -क्वींटाईल Bi- Quintile १४४, असे ७२ च्या पटीत होणारे कोन ही महत्वाचे मानतात.

या योगांना आंतरराष्ट्रीय चिन्हें  दिली आहेत ती अशी आहेत:

ही चिन्हे तोंडपाठच पाहीजेत. काहीजणांना ग्रह आणि राशीं साठीची आंतरराष्ट्रीय चिन्हें माहिती नसतात असे पाहण्यात आले आहे म्हणून लगे हाथ ती ही चिन्हे पाहून घ्या:

राशीं साठीची आंतरराष्ट्रीय चिन्हें

ग्रहां साठीची आंतरराष्ट्रीय चिन्हें

थोडक्यात ३६० अंशाला  १,२, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३ .. अशा आकड्यांनी भागले तर जे कोन मिळतात ते बघितले जातात.

३६०/ १  :  ०   (Conjunction)

३६० /  २:   १८० (Opposition)

३६० / ३ :  १२० (Trine)

३६० / ४:  ९० (Square)

३६०/ ५:  ७२ (Quintile)

३६०/ ६:  ६० (Sextile)

३६०/ ७: ५१.४२ (Septiles, Biseptiles, and Tri-septiles)

३६०/ ८:  ( Octile :  Semi-square (45º) and sesqui-quadrate (135º))

३६० / ९:   ४० (Novile)

३६०/ १०:  ३६ ( Decile )

३६०/ १२:  ३० (Semi-sextile)

हे जे ३६० ला एका विशीष्ठ संख्येने भागून मिळालेले कोन असतात त्यांना हार्मॉनिक्स Harmonics असे म्हणतात. ज्या आकड्याने भागले  ते त्या हार्मोनिक्स चे नाव! सेकंड हार्मोनिक्स, थर्ड हार्मोनिक्स, फोर्थ हार्मोनिक्स, फिफ्थ हार्मोनिक्स, नाइंथ हार्मोनिक्स, ट्वेल्थ हार्मोनिक्स इ.

आपल्या कडे ज्या वर्ग कुंड्ल्या वापरतात ( सप्तमांश , नवमांश, दशांश  इ.) या वस्तुत: हार्मोनिक्स कुंडल्याच आहेत!

नवमांश कुंडली दुसरी तिसरी काही नसुन ४० (३६० / ९ = ४०) अंशाच्या पटीत होणारे योग दाखवणारी एक स्पेश्यल कुंडलीच आहे, ३६० अंशाला  ९ ने भागले जाते म्हणून नवमांश  !  एरव्हीच्या साध्या कुंडलीत ग्रहां मधले हे ४० अंशाचे कोन सहजासहजी (Graphically) दिसणे अशक्य असते म्हणून ही कुंडली मांडली जाते यात जे ग्रह ४० अंशाच्या कोनात असतात ते ० अंशाचा कोन बनुन जवळजवळ येतात , चटकन नजरेत भरतात (Graphics Friendly ).

नवमांश काय किंवा इतर कोणत्याही ‘xxमांश’ कुंडल्या काय त्यांचा खरा उपयोग अत्यंत मर्यादीत आहे ,  व्यक्तीच्या आयुष्यातला एखादाच विषिष्ठ पैलू  तपासण्यासाठीच काय तो त्याचा उपयोग. उगाच ह्या वर्ग कुंडल्यांचा खास करुन नवमांश कुंडलीचा उदोउदो करत ढोल पिटण्याची गरज नाही ! ‘ आम्ही ‘नवमांश’ कुंडली बघतो…’ असा उगाचच तोरा मिरवणार्‍यांना हे ४० अंशाचे गणित माहीती नसते आणि त्याचा खरा उपयोग काय आहे हे पण माहीती नसते.  उगाचच ‘नवमांश – नवमांश ‘ करत नाचायचे आणि काहीतरी शुष्क पोपट्पंची करत बसायचे  !

आपल्याला आश्चर्य वाटेल पण  ३६ वे हार्मोनिक्स सुद्धा खास प्रसंगी वापरले जाते . ३६ हार्मोनिक्स  म्हणजे ३६० / ३६ = १० अंशाचा कोन ! आहात कुठे? पण ह्याचा काय  उपयोग ?

“Using the 36th harmonic chart, one can immediately see which planets form 10°-angles (360 : 36 = 10), since all of these planets will stand in conjunction. One could for example take the number 36 as indicative of an ability of fine problem solving: 36=(2×2)x(3×3), as a tension between opposites and the striving for solution multiplied many times. In that case, the 36th harmonic would tell us about someone’s approach to problem-solving and of the difficulties to be reckoned with. Within the 36th harmonic one can use major aspects, one can compare the harmonic and the natal charts, one can relate transits to the harmonic positions to events, etc. Finally, the 36th harmonic can be related to the 36th year of life – since it is the 36th time one has completed the journey around the sun, the person will be sensitive to this frequency.  …”

“Harmonic charts are based on principles of resonance, like overtones, which are present in every chart. The whole zodiac (360°) is taken as the basic tone, representing the number one (1). By using a higher vibration, we can ’cause’ the circle to oscillate more quickly, so to speak, and investigate which planets work together in this particular pattern. For example, the fourth harmonic would involve all those planets which share square aspects (90° – division of the circle by four). In the harmonic chart, these planets form conjunctions. The number corresponding to each ‘vibration’ influences the interpretation.At the risk over oversimplifying, one can say that the study of harmonics greatly extends and differentiates the theory of aspects.”

बा भौ  !  ह्या हार्मोनिक्स चे आणि हार्मोनिक्स कुंडल्यांचे एक शास्त्र आहे !
(त्याबद्दल नंतर कधी वेळ  मिळाला तर विस्ताराने लिहीन.)

पण सध्यातरी आपल्याला इतके खोलात जायची आवश्यकता नाही. ० , ६० , ९० , १२० , १८० हे एव्हढे कोन आवश्यक आहेत, पुरेसे आहेत. बाकीच्या कोनांची काही खासीयत जरुर आहे पण तो अभ्यास विशेष प्रावीण्य (Specialization) या ‘बा भौ ! ‘ गटात मोडतो. आधी M.B.B.S डॉक्टर झाल्या शिवाय M.D (Gynecology) स्पेशॅलीस्ट कसे काय बनता येईल ?

तेव्हा आपली लेखमाला तूर्तास तरी या ० , ६० , ९० , १२० , १८० कोनां पर्यंतच मर्यादित ठेवू !

पुढच्या भागात आपण या योगां बद्दल आणखी माहीती घेऊ.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

20 प्रतिक्रिया

///////////////
 1. ashok kulkarni,Indore.

  me mage 2 prashna vicharle hote tya baddal apan kahi sangitale nahi. tyach mandhan vegale jama karayache aslyas kalwawe

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अशोकजी,

   आपण जे दोन प्रश्न विचारलेआहेत त्या प्रश्नांची उत्तरें देणे ‘नैतिकतेच्या’ दृष्टीने कितपत योग्य ठरेल का याचा विचार करत आहे. जर उत्तर द्यायचे असे ठरवले तर आपल्याला कळवेन.

   आपला

   सुहास गोखले

   0
 2. viraj thale

  अत्यंत महत्त्वाची माहिती.पण राहू केतू चा यामध्ये समावेश का नाही.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. विराज जी.

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. राहु केतुं का नाहीत हे मी पुढच्या काही लेखां मधून लिहेन.

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. Himanshu

  Thanks Mr. Suhas for writing on this very important topic. We don’t generally get to read much about any aspects apart from 7th aspect for planets other than Jupiter (5,9) and Saturn (3, 10). Good to know there are other aspects too.

  0
 4. Gaurav Borade

  ‘बा भौ !’ 🙂 लई भारी …!
  सर, खरच खूपच छान लेख .. ! खूप Basic पासून सांगितल त्यामुळे समजायला सोप गेलं.. त्यासाठी धन्यवाद ..

  बाकी सहज मनात आल म्हणून विचारतो तुमच्या अभ्यासात एखादा (किवा अनेक ) स्पेशल ग्रहयोग आले आहेत का कि जे कुठेच लिहिलेले नाहीत ?

  & waiting for 3rd part.. 🙂

  0
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   माझ्या मागच्या एका केस स्ट्डी मध्ये गुरु – प्लुटो चा छप्पर फाडके वाल्या योगाचा उल्लेख केला आहे असे आणखी बरेच योग आहेत पण केवळ तो एक योग आहे असे बघून चालत नाही तर संपूर्ण पत्रिका आणि गोचर असा एकत्रित विचार व्हावा लागतो. योग कोणत्या ग्रहांत होत आहे हे पाहतानाच तो कोणत्या भावांतुन , राशींतुन होतो आहे हे पाहणे तितकेच महत्वाचे असते , त्यात व्यक्ती , स्थळ , काल, समाज, स्वभाव आणि कार्मिक सापेक्षता ही तपासायला लागते , ह्याचेच उदाहरण देताना (धनलाभ , सैनिक – अतिरेकी इ.) ‘श्रीकृष्णाचे भविष्य ‘ या लेखात लिहले आहे तसा संदर्भ / कॉन्टेक्स्ट ही महत्वाचा असतोच.

   आपला

   सुहास गोखले

   0
 5. Chaitanya

  Suhasji,
  Chaan mahiti dilit. Lekhmala awadali…jyotishmadhye basucs samajaun ghene faar mahatvache..jyotishshastracha aawaaka khup motha ahe pan ashich mahatvachi mahitipoorvak lekh lihine suru theva..

  0
 6. Prashant

  Dear Suhasji,
  Saprem Namaskar,
  Very useful information! I however have a question: Even though you always factor in the effects of Uranus, Netune and Pluto, you never show the positions of the same whenever you prepare a birth chart. Why is that so?
  Kalave lobh asava,
  Aapla,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांताजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण लिहले आहे “Uranus, Netune and Pluto, you never show the positions of the same” हे वाचून मला आश्चर्य वाटले करण मी ज्या काही के.पी. पत्रिका केसा स्ट्डीज च्या निमित्ताने या ब्लॉग वर प्रसिद्धा केल्या आहेत त्या सर्वच्या सर्व पत्रिकां मध्ये युरेनस, नेपच्युन व प्लुटॉ हे ग्रह मांडलेले आहेत.मला लक्षात येत नाही की अशी कोणती पत्रिका आपण बघितलीआहे ज्यात हे ग्रह मांडलेले नाहीत , आपण तो लेख कोणता हे सांगू शकल्यास बरे होईल, चूक असल्यास दुरुस्त करता येईल. . पत्रिकांचे अ‍ॅनॅलायसिस जेव्हा के.पी. ने केलेले असते तेव्हा हे तीनही ग्रह वापरले नाहीत कारण के.पी. थिअरी मध्ये हे ग्रह वापरले जात नाहीत. मी जेव्हा वेस्टर्न पद्धतीचे चार्ट (गोल आकारातले) वापरले आहेत तिथे ह्या तीनही ग्रहांचा वापर केला आहेच.

   आपला

   सुहास गोखले

   0
   1. Prashant

    Dear Suhasji,
    Saprem Namaskar,
    I was talking about the janma lagna kundali (parmparic paddhati). Again please don’t get me wrong. I am trying to understand which method considers the effect and which does not.
    Kalave lobh asava,
    Aapla,
    Prashant

    0
    1. सुहास गोखले

     श्री. प्रशांतजी,

     अभिप्राया बद्दल धन्यवाद.

     पारंपरीक पद्धतीत युरेनस (हर्षल) , नेपच्युन व प्लुटॉ हे ग्रह विचारात घेत नाहित त्यामुळे बहुतेक पारंपरिक पत्रिकांत ते दाखवत पण नाहीत. के.पी. मध्ये ही हीच स्थिती आहे. पण पारंपरिक आणि के.पी, वाले ह्या तिनही ग्रहांना ‘फाट्या वर मारुन’ फार मोठी घोड्चूक करत आहेत.

     आपला

     सुहास गोखले

     0
 7. Santosh

  नमस्कार सुहासजी,

  फारच छान माहिती, बेसिक पासून माहिती दिल्याबद्धल धन्यवाद.

  आणि पुढील भागासाठी शुभेछ्या.

  संतोष सुसवीरकर

  0
 8. Anant

  श्री. सुहासजी,

  लेख नेहमीप्रमाणे उत्तम !
  तुमचा वेस्टर्न आणि केपी चा अभ्यास जबरदस्त आहे. ज्या सहजपणे तुम्ही या दोन्ही पद्धतीचा उहापोह करत त्याला तोड नाही.
  पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

  धन्यवाद,
  अनंत

  0
 9. Avinash

  सुहासजी पत्रिकेतले ग्रहयोग मधेआपण बेसिक पासूनची माहिती अतिशय छान समजावली आहे .ती वाचून मला अभ्यास करावासा वाटायला लागला .धन्यवाद पुढील भागाची वाट पहातोय .

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.