मी विज्ञानवादी आहे पण विज्ञानाला आजपर्यंत आकलन न झालेल्या अशा काही गोष्टी या विश्वात आहेत / असू शकतात असे मी मानतो. मी स्वत: अत्यंत शास्त्रशुद्ध (विज्ञाननिष्ठ पद्धतीने) अत्यंत आधुनिक पद्धतीने, फास्ट ट्रॅक ध्यान रोज करतो, अक्षरश: पाचव्या मिनिटाला मी ‘थेटा स्टेज’ गाठतो आणि बर्‍याच वेळा दहा मिनिटाच्या आसपास माझी ‘अर्ली डेल्टा स्टेज’ येत असावी असा माझा अंदाज आहे . मी अंदाज म्हणतो आहे कारण त्या डेल्टा स्टेज वर आल्या नंतर ‘काळाचे’ भान संपते , समय / काळ मोठ्या प्रमाणात डीस्टॉर्ट होतो, 1 मिनिट तासाभरा इतके वाटते तर काही वेळा एक तास दीड मिनिटा इतका वाटतो !

 

 

 

या ध्यानात असताना मी स्वत: काही अतर्क्य अनुभव घेतलेले आहेत. सांगायचे म्हणले तर दिवस पुरणार नाही. .

या अवस्थेत असताना मी अनेक , विविध रंग बघितले आहेत ज्यांचे वर्णन शब्दात करता येणार नाही कारण त्यांच्याशी सांधर्म्य तर सोडाच पण जवळपास जाणारे / तुलना करता येऊ शकेल असे असे काही आपल्या विश्वात नाही. मी अत्यंत वेगळ्या प्रकाराचे संगीत ऐकले आहे जे त्वचेच्या माध्यमातून माझ्या पर्यंत पोहोचले होते (कानाने ऐकले नव्हते), ध्यानात मला चंदनाचा वास नेहमी यायचा,  एकदा मी (मनातल्या मनात!) म्हणालो, साला, सारखे सारखे चंदन काय म्हणून , कंटाळा आला रे दुसरे काही नै काय ? (ध्यानात सुद्धा माझ्या कडून ‘साला’, ‘च्या मारी’ अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया येत असतात , आदत से मजबूर !) , तो वास बंद झाला पण दुसर्‍याच क्षणाला मला असे जाणवले की मग दुसरा कसला वास हवा आहे? असे जणू कोणी विचारते आहे असे वाटले! हा थॉट प्रोजेक्शन Thought Projection चा प्रकार असावा का माझ्या मनाचा खेळ कोण जाणे! आता मी किती आणि कोणत्या पातळीवरचा नटखट (आणि खडूस!)  माणूस आहे  ते आपल्याला माहीतीच आहे , या माझ्या नटखट स्वभावा नुसार माझ्या मनात आले “साला, बर्‍याच दिवसात अंघोळ घालून , डोक्याला वेखंड लावून , दुपट्यात गुरगुटून झोपवललेया तान्हा मुला जवळ गेल्यावर जसा वास येतो ना तो वास मला जाम आवडतो, माझा मुलगा असा तान्हा असताना मी तसा वास रोज घेत असे पण आता माझा मुलगा मोठा झाला आता त्याला काय वेखंड लावणार आणि दुपट्यात गुंडाळणार ! तसला वास पुन्हा आला पाहिजे ! आणि त्याच क्षणी मला त्या वासाची अत्यंत उत्कट अशी अनुभुती मिळालेली आहे.

एक काळ असा आला की मला Out Of Body Travel (याला मराठीत काय म्हणतात हो?) बद्दल कमालीचे आकर्षण वाटू लागले,  बरेच वाचले, माहीती गोळा केली , सराव केला , बरीच खटपट केली , ध्यानाचा इतका उत्तम अनुभव जमेस असताना सुद्धा जंग जंग पछाडले तरी हे Out Of Body Travel   काही केल्या जमत नव्हते म्हणजे सगळे जमून यायचे पण उडान भरायच्या जस्ट आधी काय व्हायचे कळायचे नाही टायरीतली हवा ‘फुस्स्स’ करून निघून जायची ! शेवटी एक फिरंगी मित्र मदतीला धावला,  त्याने मला एक ट्रीक सांगीतली आणि सोबत एक खास ऑडीओ क्लिप पाठवून दिली ! त्याचा वापर सुरु केला आणि एके दिवशी चक्क जमले की हो ! माझे विमान आकाशात उडायला लागले . सुरवातीला मी घरातच छताला चिकटायचो, मग हल्लू हल्लू भिंतीतून आरपार होऊन घराबाहेर येऊ लागलो. या टप्प्यावर मी बराच वेळ घेतला, साला याच्या पलिकडे मात्र मजल मारता येत नव्हती, इकडे माझे (या क्षेत्रातले) फिरंगी मित्र पार 5000 किमी चा राऊंड मारुन येत होते आणि मी घराबाहेरच घुटमळत राहात होतो पण मेहेनत रंग लायी, सरावाने घरापासून दूर जाणे जमू लागले ! पुढे त्याचे व्यसनच लागले म्हणाना!

माझे एक आहे, सगळी कडे भोचकपणा करायचा, मांजरा सारखे सगळ्यात तोंड घालायची मला वाईट्ट सवय आहे पण एक चांगले आहे त्यातून अंग केव्हा आणि कसे काढून घ्यायचे हे मला चटकन समजते! इथेही तसेच  या Out Of Body Travel चे  मी अनेक यशस्वी प्रयोग केले.  हा एक चित्तथरारक अनुभव असला तरी तो कमालीचा धोक्याचा आहे. हे मी नमूद करतो.  मला सुरवातीला मज्जा वाटली पण नंतर त्यातले धोके कळले , काही वेडेवाकडे अनुभव आले , शहाणा झालो आणि हे Out Of Body Travel  थांबवले.

अशाच एका प्रयोगात मी रात्री सुमारे 12:30 – 1:00 ची वेळ असेल, माझ्या शरीरातून बाहेर पडून फिरुन आलो होतो, तेव्हा मी देवळाली कँप भागात रहात होतो, त्या रात्री मी घरा बाहेर पडून लॅम रोड वर आलो. या टप्प्यावर् माझे दिशेचे भान नेहमीच सुटायचे आत्ताही तसेच झाले , असे दिशाहीन , भरकटत मी तसाच पुढे पुढे जात (तरंगत म्हणा/ उडत म्हणा ती एक वजनविरहीत अवस्था असते , काळ – काम – वेग तसेच भौतिकशास्त्राचे कोणतेच नियम त्या अवस्थेत लागू पडत नाही, फक्त शरीराचे तापमान कमालीचे थंड होत जाते हे जाणवत असते) लॅम रोड वरूनच सुमारे एक- दीड किलोमीटर अंतरावरच्या ‘संसारी नाका’ नामक चौका पर्यंत आलो. या चौकात चार रस्ते एकत्र येतात, लॅम रोड जो नाशीक रोड च्या बिटको पॉईंट हून येतो आणि चौक ओलांडून भगूर कडे जातो, दुसर्‍या बाजूने  ‘आनंद रोड’ जो  स्टेट बँक ऑफ इंडिया कडून या चौकात येतो आणि चौक ओलांडून ‘संसारी लेन 2 ‘ असे नाव घेऊन ‘संसारी’ गावाकडे जातो.  चौकात तेव्हा सामसूम होती. अगदी चिटपाखरु देखील नव्हते. नाही म्हणायला त्या चौकातली एक पानटपरी अजून उघडी होती, चौकात दोन रिक्षा होत्या पण त्या रिक्षात / जवळपास कोणी (रिक्षाचालक इ) नव्हते.  मी हे सर्व पाहात होतो, त्या चौकात सायकल ची दोन दुकाने आहेत त्याच्या समोर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला आशीर्वाद (भारत)  गॅस ची एजंसी, अर्थात हे सगळे बंद होते,

 

 

त्यावेळी आता पुढे कोठे जायचे असा प्रश्न मनात आला, तेव्हा माझी थोरली बहीण त्याच संसारी नाक्या जवळ राहत असे ,  तिच्या घरी जावे का असा विचार आला पण इतक्या रात्री ? माझ्या मनात संभ्रम झाला म्हणा किंवा नक्की दिशा कोणती ह्याचे भान सुटले म्हणा मी त्या चौकातच बरोबर रस्त्याच्या मध्ये उभा म्हणजेच तरंगत . अधांतरी अवस्थेत लटकलो होतो.

इतक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया बाजूच्या रस्त्या वरुन (आनंद रोड ) दोन व्यक्ती काळ्या बजाज पल्सर मोटारसायकल वरुन त्या चौकात आल्या, मोटारसायकल वाला साधारण तीशीचा होता, मवाली तर दिसतच होता कारण मध्यरात्री डोळ्यावर गॉगल होता ! मागे बसलेली व्यक्ती साधारण पन्नाशीची वाटत होती, पांढरा शर्ट , पायजमा अस वेश होता,  मागे  बसलेल्याच्या हातात एक काळपट रंगाची बॅग होती.

मोटारसायकल त्या पानपट्टी समोर उभी करुन दोन्ही व्यक्ती उतरल्या, त्यांनी पानपट्टी वाल्या कडे काही मागीतले असावे (पान , सिगारेट , गुटखा इ ) , पानपट्टी वाल्याने, (ज्याने चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातला होता , त्याच्या शरीराचा फक्त वरचाच भाग मला दिसत असल्याने पँट / धोतर / विजार काय घातले होते ते कळले नाही.) त्या गॉगलवाल्या तरुणाने जे मागितले ते दिले असावे , काय दिले ते दिसले नाही कारण मी जिथे होतो तिथून मला त्या मोटारसायकल वरच्या दोघांच्या पाठी दिसत होत्या त्या आड हा व्यवहार झाकला जात होता.

त्या मवाल्याने खिशात हात घालून काहीतरी बाहेर काढलेले दिसले. बहुदा तो  पैसे देत असावा पण नंतर काय झाले कोणास ठाउक ते  गिर्‍हाईक आणि पानपट्टीवाल्या मध्ये काहीतरी जोरदार बाचबाची झाली , बहुदा सुट्ट्या पैशांवरुन वाजले असेल. मला ते दिसत होते पण ऐकायला येत नव्हते , पानपट्टी वाल्याने त्या गिर्‍हाईकाची कॉलर पकडल्याचे पण मी बघितले. थोड्या वेळाने वाद मिटला असावा कारण त्या दोन व्यक्ती रागाने मोटारसायकलला किक मारून भगूर च्या दिशेने सुसाटत निघून गेल्या.

एव्हाना माझा Out Of Body Travel  चा ट्रान्स संपत आला असल्याची संवेदना मला झाली, ही एक विषीष्ट प्रकाराची थरथर असते (व्हायब्रेशन्स) आता आपल्याला परतायला पाहिजे अशी मला प्रकर्षाने जाणीव झाली आणि दुसर्‍याच क्षणी विजेच्या गतीने मी परत माझ्या घरी  , माझ्या बिछान्यात दाखल झालो आहे असे मला जाणवले.

Out Of Body Travel चे बरेच अनुभव मी या पूर्वीही घेतले होते पण हा अनुभव जास्त वेळ चाललेला, रंगीत आणि जास्त नाट्यमय होता. दुसरे दिवशी सकाळी मी नेहमी प्रमाणे उठलो तेव्हा मला हा रात्रीचा प्रसंग लख्ख आठवला, मी त्या काळात बहुदा रोज रात्री Out Of Body Travel  चे प्रयोग करत असे , असे असूनही मी आदल्या रात्री जे अनुभवले त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता, मला ते स्वप्नच वाटत होते , खरेच असे काही झाले होते याची खातरजमा करून घेण्यासाठी मी संसारी नाका गाठला, ती पानटपरी उघडी होती आणि मी काल रात्री पाहीलेली (पानवाला) व्यक्तीच त्या पान टपरीत होती.  मी त्याला काल रात्री 12:30 ते 1:00च्या सुमारास असा काही प्रकार घडला का याची चौकशी केली . मी ही अशी चौकशी करतोय म्हणल्यावर तो पानवाला सावध झाला , त्याला बहुदा मी पोलिसांचा माणुस वाटलो की काय कोणास ठाऊक त्याने कमालीची सावध प्रतिक्रिया दिली:

“काय सांगायचे साहेब, पानपट्टी’ वर गिर्‍हाईकांशी वादावादी काय नेहमीचीच, त्यात अशा मध्यरात्री दारुडे जास्त , झाले असेल असे काही “

पण मी त्याला पुन्हा पुन्हा विचारले, मी पोलिस नाही असे समजावले , काल मी पाहीला तो प्रसंग त्याचे वर्णन केले, ज्या दोन व्यक्ती पाहील्या होत्या त्याचे वर्णन केले त्यांच्या ‘पल्सर’ मोटार्सायकल बद्दल सांगीतले इतकेच नव्हे तर त्या पानपट्टी वाल्याने काल घातलेल्या कपड्यां बद्दल सांगीतले , वादावादी ,  मानगूट पकडणे सगळे सगळे तपशीलवार सांगीतले तेव्हा कोठे त्याने कबूल केले की  असा प्रसंग घडला होता. त्याला ही आश्चर्य वाटले की हे घडले तेव्हा त्या चौकात एक चिटपाखरु सुद्धा नसताना मी  हे  कधी , कसे आणि कोठून पाहीले ? ,

“साहेब, चुकी झाली, माफी मागतो, प्रकरण वाढवू नका , “ अशी उलट माझ्याकडे गयावया करू लागला!

हा माझा सर्वाधिक यशस्वी म्हणता येईल असा  Out Of Body Travel ! त्यानंतर ही मी असले प्रयोग चालू ठेवले पण नंतर असे काही अनुभव यायला लागले की मला नाईलाजाने असले प्रयोग करणे थांबवावे लागले ! ते काय अनुभव आले ते नंतर कधीतरी सांगेन !!

Out Of Body Travel   चे प्रयोग नसले तरी ध्यानधारणेचे प्रयोग / सराव मात्र आजही , अगदी आजच्या तारखेला चालू आहेत , ते सात्विक आहेत , सुरक्षीत आहे म्हणूनच !

ध्यानधारण असो की Out Of Body Travel  माझ्या कडे असे अनेक अतर्क्य अनुभव जमा झाले आहेत , मी  क्वांटम फिजिक्स / क्वांटम मेकॅनिक्स या विषयावर बरेच काही वाचले आहे त्यामुळेच असेल कदाचित ‘देवा’ बद्दलच्या माझ्या कल्पना फार वेगळ्या आहेत. ‘गुरुत्वाकर्षण शक्ती’ , इल्क्ट्रोमॅगनेटीक फोर्स’ . अ‍ॅटॉमीक रॅडीएशन’ ‘अल्ट्रा साऊंड’ अशा अंगाने ते काहीतरी असावे असा माझा कयास आहे.

लांबी , रुंदी, उंची या त्रिमीतीतले आपले हे जग आहे (Three dimensional reality) डॉ आईंनस्टाईन यांनी ‘समय Time’ ही चौथी मिती आहे हे सिद्ध केले ते धरले तर आपले जग हे चार मितींचे बनले आहे असे आपण अनुभवतो पण त्याच्या पलीकडे अजून किमान तीन मिती आहेत (fifth, sixth and seventh dimensions) असे मानायला बराच वाव आहे, मी स्वत: पाचव्या मितीचा अनुभव घेतलेला आहे तो मी माझ्या ब्लॉग वर ‘काहीसे अमानवी’ ह्या लेखमाले द्वारे आपल्याला कथन केला आहेच.

काहीसे अमानवी – भाग १

बरेच लिहण्या सारखे आहे ….पण आज इथेच थांबतो

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

15 प्रतिक्रिया

///////////////
 1. Vilas Pote

  I am interested to know about your methods of meditation . As you write its being simple yet effective .

  +1
  1. सुहास गोखले

   धनयवाद श्री विलासजी

   माझै अशी खास मेथड नाही हो , मी विपस्साना शिकलो आहे त्यातच किरकोळ बदल करत असतो

   सुहास गोखले

   +1
 2. ज्योती देशमुख

  सर आपण धन्य आहात..काय काय नवीन नवीन गोष्टी करत असता…वेगवेगळे उपक्रम राबवत असता ..🙏🙏🙏🙏🙏गणपती बद्दल काय आपल्याला उमगले ते जरूर जरूर सांगा. नवीन नवीन दृष्टीकोण समजून घेणे आवश्यक आहे

  +2
 3. sandip

  ज्योतिष, वैद्यकीय(डायाबेटिस).अंधश्रध्दा उच्चाटन धन्य

  0
 4. सुहास गोखले

  धन्यवाद श्री संदीपजी

  थोडे फार वाचले आहे , अनुभवले आहे ते मी लोकां समोर मांडत असतो

  सुहास गोखले

  0
 5. Gauri Kulkarni

  खरंच अतिशय चित्त थरारक असा अनुभव तुम्ही वर्णन केला आहे आणि तुमच्या खास लेखनशैलीमुळे अगदी तसाच वाचताना मलाही डोळ्यांसमोर उभा राहिला..तुम्ही ध्यानात असताना आलेल्या सुगंध आणि हवा असलेला वास येण्याचे जे अनुभव सांगितले तो law of attraction चा प्रकार असावा का? संदर्भ : “The Secret” , a book by Rhonda Byrne

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद सुश्री गौरीजी ,

   लॉ ऑफ अ‍ॅट्रक्शन आणि मला आलेला अनुभव यात बराच फरक आहे पण त्या अनुभवा मागचे मूलतत्व समान आहे .

   सुहास गोखले

   +1
 6. Prashant

  Dear Suhasji,
  Very interesting article. I would also request to continue writing on Diabetes. Also I am not finding the article that you posted on some Swamis and Maharaj a couple days ago.
  Thanks and Regards,
  Prashant

  0
 7. Prashant

  Dear Suhasji,
  I am curious to know what was the state of your body when you had an out of body experience? Could anybody from your family get a chance to observe you when you went in that state?
  Thanks,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्रशांतजी,

   जेव्हा असा Out of Body Travel होतो तेव्हा आपले सबकॉन्शस माईंड म्हणा किंवा अन्य काहीतरी शरीराच्या बाहेर पडते , त्या अवस्थेत असताना जर कोणी मला बघितले असते तर मी शांतपणे अगदी गाढ झोपलो आहे असेच दिसले असते , जर तेव्हा कोणी मला उठवले असते तर मी त्याक्षणी जागा झालो असतो, म्हणजे शरीरा पासून दूर झालेले जे काही असते ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने मूळ शरीराशी संपर्क ठेऊन असतेच. या अवस्थेत मला उठवले असते तर मी काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत जागा झालो असतो , मी कोठे आहे हे पटकन लक्षात आले नसते. आपण बर्‍याच वेळा गाढ झोपेतून असेच जागे झालेलो असतो , जाग येते त्यावेळा आपण अक्षरश: क्लू लेस असतो. तेव्हाही आपण आपल्या नकळत का होईना Out OF Body Travel करत असतो . आपल्याला पडलेल्या बर्‍याच स्वप्नांचे रहस्य हेच आहे !

   एक प्रयोग म्हणून हे Out Of Body Travel ठीक आहे पण त्याचा अतिरेक नको, यात घोके आहेत अगदी जीवावर बेतू शकेल किंवा मानसीक संतुलन बिघडण्याचा पण धोका असतो तेव्हा शक्यतो ह्या प्रयोगाच्या नादाला लागू नये (आणि म्हणूनच हे कसे करायचे हे सांगणार नाही !) हे करण्यापूर्वी माझै ध्यानधारणे त चांगली प्रगती झालेली असल्याने हा प्रकार मी सुरक्षीत हाताळू शकलो पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही.

   धन्यवाद

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.