मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही  प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे  नुकत्याच  एका सभासदाने  विचारलेल्या प्रश्नाला मी  उत्तर दिले. ही केस स्ट्डी आपल्या समोर ठेवताना ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी हा हेतु  आहे.

तर  हा  तो जातकीने विचारलेला प्रश्न:

Hello all! I went for a job interview this week and I want to know if I got the job. I’m Mars and moon in the MC. But I don’t know which house rules the agency… Any ideas?

जातकीने ह्या प्रश्नासाठी  तयार केलेला होरारी  चार्ट.

 

Caroline Horary

 

चार्ट्चा तपशील:

दिनांक:  ०९ ऑक्टोबर २०१५,  वेळ: १०: १८ सकाळी,   टाइम झोन: PDT -७:००

स्थळ:  Costa Mesa , California , US ; को-ऑर्डिनेट्स ११७W५५ ३३N२८

जातकीने प्रश्न विचारताना , त्यावेळेचा होरारी  चार्ट दिला असल्याने मी परत वेगळा चार्ट तयार केला नाही. जो चार्ट दिला आहे तोच वापरला आहे.

चला , बघुया ,  जातकीला ही नोकरी मिळायची काही शक्यता आहे का ते.

होरारी चार्ट तयार झाल्या झाल्या ताबडतोब पहायचे असे काही घटक आहेत ते असे:

जन्मलग्न किती अंशावर ?
लग्नस्थानात कोणते ग्रह आहेत ?
चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स ‘ आहे का?

जन्मलग्न जर २७ अंशाच्या पलीकडे (Late Degree Ascendant) असेल तर बर्‍याच वेळा असा अनुभव येतो की जातकाने या प्रश्ना संदर्भात आधीच काही निर्णय घेतला आहे आणि आता फक्त ज्योतिषशास्त्रा द्वारे त्याला  समर्थन मिळते का हे जातकाला पाहावयाचे आहे.

काही वेळा अशी शक्यता असते की प्रश्ना संदर्भात परिस्थिती  हाताबाहेर गेली आहे, जातकाचे आता त्यावर कोणतेही नियंत्रण राहीले नाही, जे जे काही होईल ते हताश पणे बघणे एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे.

आणखी एक शक्यता म्हणजे जातक प्रश्नाच्या बाबतीत फारसा गंभीर नाही , उगाच आपला जाता जात  एक खडा टाकून बघावा या हेतुने प्रश्न विचारला आहे किंवा गंमत, चेष्टा किंवा ज्योतिषाची परीक्षा घेण्याच्या हेतुने प्रश्न विचारला आहे.

जन्मलग्न जर ३ अंशाच्या अलीकडे (Early Degree Ascendant) असेल तर बर्‍याच वेळा असा अनुभव येतो की जातकाने प्रश्न उताविळपणाने विचारला आहे, कारण प्रश्न अजून परिपक्व व्हायचा आहे, प्रश्ना संदर्भात अजून बर्‍याच काही घडामोडी होणार आहे, बरीच उलथापालथ होणार आहे , प्रश्न अजून काही काळा नंतर विचारला तर बरोबर उत्तर मिळायची शक्यता जास्त असेल.

लग्नात जर ग्रह असतील  तर ते जातकाचे जादाचे ( लग्नेशा व्यतिरिक्त) प्रतिनिधीत्व करतात , थोडक्यात ही एक ‘बारभाईची  खेती ‘ किंवा ‘एका फूल – दो माली ‘ अशी स्थिती बनते , काही वेळेस कोणाचा मेळ कोणाला नाही अशी स्थिती असते , तर काही वेळा प्रश्ना संदर्भात काही मोठ्ठा झोल आधीच झालेला असतो किंवा होणार आहे. प्रश्ना ला अनेक फाटे फुटण्याची शक्यता असल्या मुळे प्रश्नाची अनेक संभाव्य उत्तरें होऊ शकतात. कदाचित प्रश्ना संदर्भात खुद्द जातकच घूमजाव करण्याची शक्यता असते .

लग्नात जर पापग्रह, खास करुन शनी , युरेनस, प्लुटो असतील तर प्रश्नाच्या बाबतीत ह्या ग्रहाची कारकत्वे जरा जास्तच ठळकपणे अधोरेखीत होतात , त्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते.

चंद्र  ‘व्हॉईड ऑफ कोर्स ‘ असणे म्हणजे पत्रिकेत चंद्र ज्या राशीत ज्या अंशावर आहे तिथेपासुन ते चंद्र ती राशी ओलांडून पुढच्या राशीत जाई पर्यंत चंद्र कोणत्याही ग्रहाशी कसल्याही प्रकारचा योग (Aspect) करत नाही. (अर्थात होरारीत फक्त युती, लाभ, केंद्र , नवपंचम , प्रतियोग हेच योग विचारात घेतले जातत अगदी अपवादात्मक स्थितीत अर्धकेंद्र आणि षडाष्ट्क हे दोन जादाचे योग बघायला लागतात.)  चंद्र जेव्हा ‘व्हॉईड ऑफ कोर्स ‘ असतो तेव्हाही प्रश्ना संदर्भात परिस्थिती  हाताबाहेर गेली आहे, जातकाचे आता त्यावर कोणतेही नियंत्रण राहीले नाही, जे जे काही होईल ते हताश पणे बघणे एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे असा निष्कर्ष काढता येतो.

चला तर मग जातकीचा चार्ट तपासायला घेऊ.

जन्मलग्न:  २८ वृश्चिक ०२ म्हणजेच Late Degree Ascendant!
लग्नात शनी !
चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स नाही.

होरारीत जेव्हा वृश्चीक लग्न उदीत असते तेव्हा बर्‍याच वेळा असा अनुभव आलेला आहे की  “जातकाला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे , विचारलेल्या प्रश्नाच्या त्या निर्णयाशी प्रत्यक्ष संबंध असेलच असे नाही पण प्रश्नात अपेक्षित असलेली घटना त्या निर्णयात महत्वाची घटक असते. हा निर्णय बर्‍याच वेळा ‘काही जुन्या गोष्टींचा त्याग करुन नव्याचा अवलंब करायचा ‘ अशा प्रकाराचा असतो.

Late Degree Ascendant आपल्याला सांगते आहे की प्रश्ना संदर्भात (नोकरी मिळेल का?)  जातकी आता काहीच करु शकत नाही “जे जे होईल ते पाहावे..’ अशी स्थितीत ती आहे. नाहीतरी एकदा नोकरी साठीची मुलाखत दिल्यानंतर आपण आणखी काय करु शकतो?

लग्नात शनी आहे ! शनी महाराज जेव्हा लग्नात उपस्थित असतात तेव्हा ‘विलंब आणि अडथळे’ ठरलेलेच!

होरारी मध्ये प्रश्नकर्ता (ह्या उदाहरणात प्रश्नकर्ती) नेहमीच Ascendant लग्न भाव  असतो. ह्या चार्ट मध्ये  ‘वृश्चिक लग्न’ आहे म्हणजे ‘मंगळ’  प्रश्नकर्तीचे प्रतिनिधीत्व करणार. शनी हा लग्न भावातच असल्याने तोही एक प्रतिनिधी असेल, त्याशिवाय चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्याला ही गँग मध्ये सामिल करुन घ्यावे लागेल.

जातकीने नोकरी साठी मुलाखत दिली आहे आणि त्याच्या निकालाच्या प्रतिक्षेत ती आहे. त्यामुळे इथे जातकीचा इंटरव्हू घेणारी व्यक्ती विचारत घ्यावी लागेल , ही एक अशी व्यक्ती आहे  ज्याला आपण ‘तिर्‍हाईत’ म्हणतो (ज्या व्यक्ती आपले नातेवाईक, मित्र, शेजारी या गटात मोडत नाहीत अशा, ज्यांच्याशी आपला पूर्व परिचय नाही अशा व्यक्ती इ.) , अशा व्यक्ती पत्रिकेतल्या सप्तम भावा (७) वरुन पाहतात, सप्तमेश त्या व्यक्तिचे प्रतिनिधित्व करणार. या पत्रिकेत सप्तम स्थाना वर वृषभ रास असल्याने ‘शुक्र’ त्या ‘इंटरव्हू’ वाल्याचे / ‘इंटरव्हू’ वालीचे  प्रतिनिधित्व करेल.

प्रश्न नोकरीच्या संदर्भातला असल्याने दशम स्थान (१०) महत्वाचे , या पत्रिकेत दशम भावावर कन्या रास असल्याने ‘बुध’ नोकरीचे प्रतिनिधित्व करेल.

जातकीचा प्रश्न ‘ही नोकरी मिळेल का?’ इतपतच मर्यादित असल्याने , पगार  काय भेटेल किंवा अपेक्षित प्यॉकेज मिळेल का ? , कामाचे स्वरुप  किंवा आवडीचे काम मिळेल का ?, नोकरी टिकाऊ असेल का ?, नोकरी लाभदायक ठरेल का?  , बॉस / बॉसीण कशी असेल ? , सहकर्मचारी? अशा अनेक संभाव्य उपप्रश्नांचा विचार करायला नको (पण ह्या अशा उपप्रश्नांची उत्तरें ही याच चार्ट मधून मिळतील !)

प्रश्न विचारते वेळी बुध (नोकरी) मार्गी आहे .  जातकीने नोकरी साठी केव्हा मुलाखत दिली होती ही माहीती उपलब्ध नाही पण अगदी नजिकच्या काळात मुलाखत झाली असेल  तर तेव्हा बुध वक्री असण्याची शक्यता आहे. बुध प्रश्न विचारलेल्या  दिवशीच मार्गी झाला आहे ! यावरुन आपल्याला एक अंदाज बांधता येईल की तो असा की  ‘जातकीच्या संदर्भात / उपलब्ध  नोकरीच्या संदर्भात, त्या कंपनीने काही तरी निर्णय घेतला असणार , हा निर्णय कसाही असू शकेल , नोकरी साठी जातकीची निवड, जातकीच्या ऐवजी दुसर्‍या कोणाची निवड,  नोकर भरती  स्थगीत करणे / रद्द करणे  इ. हा निर्णय जातकाच्या बाजुने आहे का नाही हे एकट्या बुधा वरुन सांगता येणार नाही. चार्ट मधल्या इतर घटकांचा अभ्यास  त्यासाठी करायला लागेल.

जातकीचा एक प्रतिनिधी मंगळ दशमात (नोकरी) आहे  याचे दोन अर्थ असू शकतात:

नोकरी जवळजवळ पक्की,  नोकरी जातकीच्या खिशात आहे!
जातकी नोकरी साठी इतकी आतुर (excited)  किंवा वैफल्यग्रस्त (desperate)  आहे की हीच काय पण कोणतीही , कसलीही नोकरी ती स्विकारायला तयार आहे, कशी का असेना नोकरी मिळतेय ना , मीटर डाऊन होतेय ना, मग झाले तर .. अशी काहीशी तीची मन;स्थिती असेल.

बुधाने  (नोकरी) जशी दिशा बदलली आहे तसेच शुक्राने  (मुलाखत घेणारा/घेणारी) पण राशी बदलली आहे ०० : ४९ कन्या. म्हणजे  मुलाखत घेणार्‍याने / घेणारीने पण आपले मत बदलले असावे.

आता मात्र एकंदर निर्णय जातकीच्या विरोधात जाणार अशी लक्षणे दिसायला सुरवात झाली असे  म्हणावे लागेल.

मग जातकीला नोकरी भेटणार का?

त्यासाठी जातकीचा प्रतिनिधी  आणि नोकरीचा प्रतिनिधी यांच्यात कोणता तरी ग्रहयोग व्हायला हवा (युती, लाभ, केंद्र, नवपंचम , प्रतियोग). त्या अंगाने आता आपण ही पत्रिका तपासूया.

जातकीचा प्रतिनिधी मंगळ कन्येत आहे आणि नोकरीचा प्रतिनिधी बुध तुळेत आहे , त्यामुळे दोघेही आपापल्या राशीत असताना त्यांच्यात कोणताही योग होणार नाही. चंद्र हाही जातकीचा प्रतिनिधी आहे , चंद्र पण कन्येत आहे त्यामुळे चंद्राचा वा बुधाचा पण कोणताही योग होणार नाही. जातकीचा तीसरा प्रतिनिधी शनी आहे , शनी धनेत १ :४७ अंशात आहे , बुध (नोकरी) तुळेत १ :४७ अंशात आला की  या दोघांत लाभ योग होईल ! आहे , म्हणजे थोडी फार आशा आहे.

पण शनी सारखा विलंबा करणारा ग्रह आणि बुधा सारखा चंचल , बदल करणारा ग्रह यांच्यातला हा योग तोही ‘लाभ योग’ (जो होरारीत काहीसा कमकुवत मानला जातो) असल्याने घटना घडेल का याबाबत शंका आहेत. कारण बर्‍याचा वेळा ‘लाभ योगात’ घटना घडेल असे वाटत असतानाच संधी हातातून निसटून जाते,  यश  हुलकावणी देऊन जाते असाही अनुभव आहे.

तेव्हा जातकाला नोकरी मिळण्याची काहीशी शक्यता आहे  (बदल होतील , विलंब होईल ) पण तसे ठोसपणे सांगण्या सारखी परिस्थिती नाही असा काहीसा निष्कर्ष आपल्याला काढता येईल.

पत्रिकेकडे जरा लक्षपूर्वक पाहीले तर आपल्या हे लक्षात येईल की , शुक्र (मुलाखत वाला / वाली)   मंगळाशी  (जातकी) युती करणार आहे , दोघे ही सध्या कन्येत आहेत शुक्र ००: ४९  आणि मंगळ ०९: ०६, दोघांत अंतर ९ अंशाचे असले तरी त्यांची युती प्रत्यक्षात दोघेही  २४ कन्या या अंशात आल्यावर  होणार आहे. (या साठी नेहमीच एफेमेरिज बघायच्या असतात , त्या बघितल्या नाही तर चूक होते) .  याचा अर्थ असा होतो की जातकी आणखी एका इंटरव्हू ला सामोरी जाणार, पुन्हा एकदा जातकीचा आणि त्या  मुलाखत वाला / वाली शी संपर्क येणार. पण त्यासाठी  शुक्र  कन्येत २४  अंशावर येण्याची वाट पाहवी लागणार थोडक्यात याला भरपूर वेळ लागणार , आज उद्या असे काही होण्याची शक्यता नाही.

काय योगायोग आहेत पाहा:  शुक्र  (मुलाखत) – मंगळ (जातकी) युती होईल त्याच्या पाठोपाठ  बुध (नोकरी )  आपल्या गतीने प्रवास करत शनी (जातकी) शी धनेत युती करेल ,  चंद्र (जातकी) ही राशी बदलल्या नंतर बुधाशी (नोकरी) युती करेल.

चंद्र – बुध  तसेच बुध – शनी  योग बळकट आहेत कारण ते युती योग आहेत , पण अडचण अशी  आहे की या युत्या होण्यासाठी चंद्र व  बुधाला आपापल्या राशी बदलाव्या लागणार आहेत. होरारीत योग बघताना राशी बदलणे म्हणजे ‘तौबा तौबा !” ,  चालत नाही. राशी बाहेरचे  (Out of sign aspects) योग घटना घडवून आणत नाहीत. पण इथे एक नाही दोन नाही तर चक्क तीन योगांनी निर्वाळा दिला असल्याने घटना घडणारच नाही असे तरी कसे म्हणायचे?

मग नेमके काय होईल?

उत्तर सरळ  आहे, जेव्हा असे राशी बाहेरचे बळकट योग असतात तेव्हा घटना घडते पण वेगळ्या पद्धतीने. योग होण्यासाठी राशी बदल आवश्यक आहेत म्हणजे:

जातकीच्या सध्याच्या परिस्थिती मोठे काही बदल झाल्यावर किंवा कहानी में कुछ ट्वीस्ट आने के बाद किंवा बर्‍याच विलंबाने घटना घडु शकते.

जातकीला  नुकत्याच दिलेल्या इंटर्व्हू च्या जोरावर नोकरी मिळण्याची शक्यता जवळ जवळ नाही.
कदाचित भविष्यात तिला ती कंपनी इंटरव्हू च्या दुसर्‍या राऊंडला बोलवेल किंवा दुसर्‍या एखाद्या जागे साठी तिचा इंटरव्हू  होईल आणि त्यावेळी तीची निवड होऊन तीला नोकरी मिळेल.
कदाचित आगामी काळात तिला त्याच कंपनी कडुन नोकरीचा प्रस्ताव येईल पण ती नोकरी वेगळी असेल ( ज्या नोकरी साठी जातकीने  इंटरव्हू दिला आहे ती नोकरी नसेल).
कदाचित आत्ता लगेच नसले तरी आगामी काळात जातकीला दुसरी कडे कोठे नोकरी मिळेल.

पण हे होणार केव्हा ? काही अंदाज?

चंद्राने आपल्याला हा अंदाज दिला आहेच. पहा चंद्र १० अंशात विधाशी (Out of sign) युती करणार आहे , म्हणजे ही घटना १० आठवडे  किंवा १० महीन्या नंतर घडण्याची शक्यता आहे, शनीचा परिणाम पाहता १० महीन्याच्या आसपास हे जास्त संयुक्तीक वाटते.

मी जातकीला माझे निष्कर्ष कळवले ते असे:

Late degree Ascendant (28 Degrees): By attending a job interview, you have already done your part, now it is that (prospective) employer to decide where to hire you or not. You as such have no control over the outcome. This situation is what exactly shown by the late degree Ascendant.

Scorpio rising has many peculiarities, one that fits your situation is that: “There is usually a big decision to be made, whether to stay tied to the past or to move forward into uncharted territories”

Saturn in first house! When this guy appears in Ascendant, (in most cases) it is a signal for delays and obstacles.

It is Scorpio rising so Mars would represent you, along with Saturn (occupant of 1st) and the Moon (natural significator of querent).

Taurus on 7th brings in Venus as the representative of the other party.

10th house usually denotes job/profession, so 10L Mercury would represent the job (to come).

Mercury (job) just changed direction (I believe you attended that interview while Mercury was retrograde), this tells as that something has happened at employer’s end in connection with your application; probably some decision is made, not necessarily in your favor. We will check how it turns out to be.

Mars (you) is already in 10th, in fact just entered in that house. This is a positive sign. This doesn’t mean that you already pocketed the job (well, many times this is the case but not always), this could mean that you are damn serious about getting that job (either too excited or  rather desperate that you would pick up any job that comes to you).

Venus (interviewer / decision maker) , has just changed sign, from Leo to Virgo, this could mean many things, either it is a change of mind, change in the situation, decision, all this may or may not be in your favor.

Now will they hire you?

If at all there is a possibility of you being hired, there must be an aspect between you and the job.

Mars is in Virgo and Mercury is in Libra so there is no possibility of any aspect while both are in their respective signs. Same can be said about your other representative the Moon. Moon is in Virgo and Mercury is in Libra so again there is no possibility of any aspect while both are in their respective signs.

However Venus is touching Mars when both will be around 24 Virgo. So 24 degrees to go! We can take this as a positive indication. The third party will be in contact with you then. This could suggest that a job offer after much delay or a second round of interview for the same job position or a different job position.

Incidentally after Venus touching Mars, Mercury (job) will also be in conjunction with Saturn (you) (after Mercury has changed the signs). Similarly the Moon (you) will touch Mercury (job) in 10 degrees but after the Moon has changed sign.

In view of this future developments, what I conclude is:

There is a possibility of you getting a job, but not necessarily the one you applied (and got interviewed) for. Most probably you will be offered some different kind of job , this job will come to you after some delay.

There will be some change in the situation before this could happen. This is substantiated by sign changes by Mercury and the Moon. The Moon needs 10 degrees to go , given the other indications such a delays (Saturn effect) , this 10 degrees would mean 10 weeks  /  10  months  from now.

Please provide feedback on the outcome, that helps us in improving our chart interpretation skills.

Hope this helps.
Wishing you all the best.

 

जातकी कडून आलेला फिडबॅक…

 

yes

Thank you so much for the interpretation!
Yes, I think you’re right. They changed their opinion about me. Hope I can still get another agency though… Is that what you mean about getting another job? Or you mean a job in a entirely different area?

ही पोष्ट प्रकाशीत झाली आणि दहाव्या मिनीटाला तीन वाचकांनी “के.पी. वाले अ‍ॅनॅलायसीस दिसत नाही” अशी तक्रार केली !
दिसत नाही नव्हे दिसणारच नव्हते . कारण के.पी. वाले अ‍ॅनॅलायसिस वट्टात छापलेच नव्हते ना!
ही केस के.पी. ने पण सोडवली होती , पण आता ते सग्ळे लिहून काढायचा लै कट्टाळ्ळा आला पाव्हणं!

बरे , सग्ळ अ‍ॅनॅलायसिस नै तर नै,  क्रिकेट म्यॅच चे दाखवतात तसे ‘हायलाईट्स’ दाखवतो, मग तर खुष!

 

Caroline KP chart

Caroline KPSig

 

 

 

चार्ट रॅडिकल आहे. चंद्र  स्वत:च्या बळावर दशम (१०) आणि युतीतल्या ग्रहांच्या माध्यमातून ६, २ चा कार्येश.
नोकरीचा प्रश्न म्हणजे दशमस्थान , दशमाचा सब शुक्र , वक्री नाही, वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नाही,. शुक्र स्वत:च्या बळावर नाही पण युतीतल्या ग्रहांच्या (चंद्र , मंगळ, गुरु) माध्यमातून १०, २,  ६ चा कार्येश. प्रश्न संबधित प्रमुख भावाच्या सब चा कुरकुरत हा होईना होकार !

 

 

CarolineDBASjpg

 

 

 •  दशा स्वामी शुक्राची महादशा  २०३० पर्यंत. शुक्र  युतीतल्या ग्रहांच्या माध्यमातून १०, २,  ६ चा कार्येश, शुक्राचा सब राहु १० , ११ चा कार्येश. दशा अनुकूल.
 • शुक्राच्या महादशेत चंद्राची अंतर्दशा ऑक्टोबर २०१६ पर्यंत. चंद्र तसा अनुकूल वाटतो पण चंद्र विषेषाधिकाराने पंचमाचा (५) प्रथमदर्जाचा कार्येश आहे , हे पंचम स्थान नोकरीच्या विरोधातले स्थान आहे हे लक्षात घेतले पाहीजे. ,
 • चंद्राचा सब , स्वत: चंद्र , चंद्र अंतर्दशा काहीशी अनुकूल.
 • महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी दोघेही नोकरी साठीच्या प्रमुख षष्ठम (६) भावाचे प्रथम दर्जाचे कार्येश नाहीत, मग निदान विदशा स्वामी  तरी असा असावा.
 • चंद्राच्या अंतर्दशेत , गुरु विदशा १६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत गुरु युतीतल्या ग्रहांच्या माध्यमातून १०, २,  ६ चा कार्येश होत असला तरी तो ९, ५ , १२ चा ‘अ’ दर्जाचा कार्येश त्यामुळे गुरुच्या विदशेत नोकरी इल्लें !
 • पुढची शनी विदशा चालणार नाही कारण शनी नोकरीसाठीच्या एकही स्थानाचा कार्येश नाही उलट तो विषेषाधिकाराने पंचमाचा (५) प्रथमदर्जाचा कार्येश आहे.
 • पुढची बुधाची विदशा १६ मे २०१६. , बुध १०, ११ चा कार्येश , स्वत:च्याच सब मध्ये . बुधाच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नाही म्हणजे बुध ज्या ज्या भावांचा सब असेल त्या त्या भावांचा तो अत्यंत बलवान कार्येश होणार या नियमाप्रमाणे बुध
 • षष्ठमाचा सब असल्याने षष्ठम स्थानाचा कार्येश होणार .बुधाची विदशा आपल्याला चालू शकेल . पण या बुधाच्या विदशेच्या कालखंडात म्हणजे  २०  फेब्रुवारी २०१६ ते १६ मे २०१६ या कालखंडात शुक्र – चंद्र किंवा चंद्र – शुक्र किंवा चंद्र – बुध किंवा बुध – चंद्र  असे  कोणतेही रवी भ्रमण नाही सबब बुधाची विदशा नोकरी देणार नाही.
 • केतु, शुक्र वा रवी या पैकी कोणीही नोकरीच्या महत्वाच्या षष्ठम  (६) स्थानाचा बलवान कार्येश नाही. त्यामुळे त्यांच्या विदशा  विचारात घेण्यासारख्या नाहीत.आता चंद्र अंतर्दशा पण संपली. नाहीतरी चंद्र विषेषाधिकाराने पंचमाचा (५)
 • प्रथमदर्जाचा कार्येश आहे त्यामुळे या अंतर्दशेत नोकरी मिळणे काहीसे अवघडच!
 • पुढची अंतर्दशा मंगळाची . १ नोव्हेंबर २०१६ ते  ३१ डिसेंबर २०१७. मंगळ षष्ठाचा बलाढ्य कार्येश आहे. मंगळ शुक्राच्या सब मध्ये आहे , शुक्र युतीतील  ग्रहांच्या माध्यमातून १०, २,  ६ चा कार्येश. मंगळाच्या अंतर्दशेत मंगळाचीच
 • विदशा लाभदायक ठरु शकते.  पण १ नोव्हेंबर २०१६ ते  २४ नोव्हेंबर २०१६  या काळातील ट्रांसीट्स अनुकूल नाहीत त्यामुळे आपल्याला मंगळाच्या विदशे ऐवजी त्याच्या पुढच्या राहुच्या विदशेचा विचार करावा लागेल  राहु  १० चा ‘ड’ दर्जाचा तर  ११ चा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे. राहुचा सब बुध आहे .
 • राहुच्या विदशेचा कालखंड आहे २४  नोव्हेंबर २०१६  ते २७ जानेवारी २०१७. आपली साखळी शुक्र मंगळ राहु अशी आहे.  पण या काळातही शुक्र – मंगळ किंवा मंगळ – शुक्र ही साखळी जुळत नाही,  मंगळ – राहु  अशी साखळी जुळते का ते पाहीले तर लक्षात येईल की मंगळ ची रास आणि राहुचे नक्षत्र असे कॉम्बीनेशन राशीचक्रात उपलब्ध नाही. आता शेवट्चा पर्याय म्हणजे राहु बुधाच्या राशीत असल्याने राहु ऐवजी बुध वापरता येईल.
 • २४  नोव्हेंबर २०१६  ते २७ जानेवारी २०१७ या काळात मंगळाच्या वृश्चिकेत बुधाचे नक्षत्र असे कॉम्बीनेशन  मिळते ,  कालावधी येतो  ३  डिसेंबर २०१६ ते  १५ डिसेंबर २०१६ .

५ डिसेंबर २०१६ हा दिवस एकदम फिट्ट ! 

या दिवशी:
रवी :  मंगळाच्या राशीत बुधाच्या नक्षत्रात शुक्राच्या सब आणि  राहुच्या सब-सब मध्ये. आपली  साखळी अगदी हीच आहे ना?  बघा:
दशा स्वामी : शुक्र  अंतर्दशा स्वामी : मंगळ  विदशा : राहु (बुध).
दशास्वामी शुक्र : रवी च्या नक्षत्रात , रवी नोकरीस अनुकूल आहे.
अंतर्दशा स्वामी मंगळ:  मंगळाच्या नक्षत्रात, राहुच्या सब मध्ये.
विदशा स्वामी राहु: रवीच्या राशीत, शुक्राच्या नक्षत्रात , शुक्राच्या सब मध्ये , शुक्राच्याच सब- सब मध्ये !  (हयगय माड ब्याडा !)
डिसेंबर २०१६ च्या पहिल्या आठवड्यता जातकीला नोकरी मिळेल.
हा कालवधी प्रश्न विचारल्यानंतर सुमारे १४ महिन्या नंतरचा आहे. वेस्टर्न होरारीने आपल्याला १०+ महिन्याचा अंदाज दिला आहेच !

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. सुहास गोखले

  श्री. सुरेशजी,

  आपण या ब्लॉग वरच्या संपर्क फॉर्म मध्ये (जो पानाच्या अगदी तळात आहे) माहीती भरुन पाठवल्यास आपल्याशी संपर्क साधणे सोपे जाईल

  धन्यवाद.
  सुहास गोखले

  0
 2. Gaurav Borade

  मस्त लेख….
  पण एक doubt होता सर ” प्रश्नशास्त्रात प्रश्न विचारला ती वेळ जन्मवेळ व ‘ ज्योतिषी जिथे आहे ‘ ते स्थळ धरून एक कुंडली मांडतात .” जर असे असेल तर वरील (जातकीने स्वतः दिलेला ) चार्ट ग्राह्य धरणे/ त्याच उपयोग करणे कितपत योग्य ठरेल ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,

   जातक जेव्हा एखाद्या ज्योतिषाला प्रश्न विचारतो त्या वेळेची प्रश्नकुंड्ली मांडतात पण जेव्हा जातक स्वत:च स्वत:च्या प्रश्ना साठी प्रश्नकुंडली मांडतो तेव्हा तीच कुंडली खरी मानून त्याचा अभ्यास करुन उत्तर देतात. एकदा एका प्रश्नासाठी प्रश्न कुंडली मांडली गेली की पुन्हा त्याच प्रश्नासाठी दुसरी एक कुंडली मांडणे (दुसर्‍या वेळी , दुसर्‍या ठिकाणी) म्हणजे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्या सारखे आहे, असे करणे प्रश्नशास्त्राच्या तत्वांच्या विरुद्ध आहे.

   सुहास गोखले

   0
 3. अजेय

  यापण कुंडली कोणत्या प्रकारे काढली आहे लग्नी वृश्चिक रास असेल तर दशमात सिंह रास यायला हवी पण आपल्या वर्णनात तर दशमात कन्या रास येते तिचा स्वामी तुम्ही बुध हा नोकरीचा प्रतिनिधी समजला आहे, कृपया स्पष्ट करावे

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अजेयजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   आपण बहुदा क्षेत्रकुंडलीच्या म्हणजे राशी = भाव (प्रत्येक भाव ३० अंशाचा , लग्नी जी राशी उदीत असते ती राशी = प्रथम भाव) अशा प्रकारच्या कुंडलीच्या हिशेबाने लिहले आहे, कारण त्यात वृश्चिक लग्न असेल तर संपूर्ण दशम स्थानात सिंह रास येते. पण मी मांडलेली कुंंडली प्लॅसीडस (भावसाधन पद्द्ती ) भावचलित आहे, ह्या प्रकरच्या कुंडलीत राशी = भाव असे समीकरण नसते तसेच भाव हा ३० अंशाचा असेलच असे नाही, आपण जर बघितले तर या कुंडलीत प्रथ्म भाव वृश्चिकेत २८ अंशावर सुरु होतो . दशम भाव सिहेत (पारंपरीक च्या हिशेबा नुसार) चालू न होता तो कन्या राशीत ६ अंशावर चालू होत आहे, म्हणूनकन्येचा मालक बुध दशम भावाचा स्वामी होतो.

   सुहास गोखले

   0
   1. अजेय

    उत्तराबद्दल आभारी आहे! अजून एक शंका आहे, प्रश्न कुंडली मांडताना दरवेळी भावारंभ पद्धतीने भावचलित कुंडलीच मांडली पाहिजे का? कारण त्यामुळे राशींची संख्या कमी होऊन स्वामींची मालकी हि वाढते, म्हणजे अशा प्रकारे समजा बुधाची किवा गुरूची राशी अनुक्रमे ५ व ६ तसेच ९ व १० भावात येती व मालकांची संख्या कमी होते. इथे आपण स्वामींना जरा जास्तच मोकळा हात सोडल्यासारखे वाटते. उत्तराची वाट पाहतोय.

    0
    1. सुहास गोखले

     श्री.अजयजी,

     कुंडली कोणत्या पद्धती ने मांडायची याचा नियम असा नाही, सध्या जगात सुमारे ३० भावसाधन पद्धती प्रचलित आहेत त्यापैकी ५-६ पद्धती जरा जास्त लोकप्रिय आहेत. कोणती भावसाधन पद्धती वापरायची किंवा कोणति भावसाधन पद्धती चांगली यावर ज्योतिषांत तुंबळ युद्ध चालू असते आणि अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, शेवटी कोणती भावसाधन पद्धती वापरायची हे ज्याने त्याने स्वत:च्या अनुभवानुसार ठरवावे हे उत्तम.

     भावसाधनात काही वेळा एखादी राशी लुप्त होते , आपण जसे जसे उत्तर ध्रुव / दक्षिण द्रुवा कडेचे लॅटीट्युट्स घेऊ तसे तसे एका भावात दोन पेक्षाही जास्त राशी येऊ शकतात त्यात नविन किंंवा वेगळे असे काही नाही , अशा लुप्त राशी व यांचे मालक उलट प्रश्ना संदर्भात बरीच जादाची आणि मोलाची माहीती पुरवतात,

     बाकी आपल्या इतर शंकांबद्दल बोलायचे तर त्या अगदी सुरवातीच्या अभ्यासात येतात तशा प्रकारच्या आहेत , त्यात काही नाही, केवळ अभ्यास / सराव यांच्या अभावातून जे गैरसमज होतात त्याचाच भाग आहे. काळजी करु नका , अगदी सुरवातीलाच फार खोलात जाऊन उगाचच किस पाडत बसु नका , सध्यातरी हे असेच असते असे समजुन जे समोर आहे त्याचा चिकाटीने अभ्यास चालू ठेवा, आपला अभ्यास जरा वाढला आणि सराव झाला की त्या शंका आपोआपच दूर होतील.

     शुभेच्छा

     सुहास गोखले

     0
 4. अजेय

  हो पुढे हे सांगायचे राहिलेच कि मालकांची संख्या कमी झाली कि त्यांच्या योगांची संख्या वाढते. पण प्रत्यक्षात योग वाढलेले नसतात. त्यापेक्षा ज्या राशीचे ज्या भावात जास्त अंश ती त्या भावाची राशी असे चालू शकते का? फार जास्त मतांतरे आहेत म्हणून गोंधळ उडतो सगळा!!

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.