मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे काही महिन्यांपूर्वी एका सभासदाने “नोकरी मिळेल का ?” हा प्रश्न विचारला होता , त्याचा परिणाम (result) नुकताच हाती आला आहे. त्याची ही केस स्ट्डी. ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी त्याच बरोबर के.पी. च्या माध्यामातून अशा प्रश्नांची उकल कशी करतात याचे ही एक उदाहरण आपल्या समोर ठेवणे असा त्या मागचा हेतु आहे.

तर हा ०२ जुन २०१५ रोजी जातकीने विचारलेला प्रश्न:

 

brazil post

Hey guys.

Last month I did an exam trying to get a job. The result was that I’m in the second position on the waiting list.

Question: Will I get the job?

Interpretation: the Moon did a good aspect with Venus (10th ruler) and reflected its light upon Saturn (me). But this aspect has already happened, and my question is about the future.

How should I interpret it?

02 June 2015

जातकीने ह्या प्रश्ना साठी  तयार केलेला होरारी  चार्ट.

Brazil Woman Job Horary

चार्ट चा तपशील:

01 Jun 2015 ,  7:15:00 PM ,  BZ2T +03:00:00 ; (Universal Time 22:15:00)

Uba ,  Brazil ,  42w56’00, 21s07’00

Geocentric,  Tropical,  Placidus , True Node\>

जातकीने प्रश्न विचारताना , त्यावेळचा होरारी  चार्ट दिला असल्याने मी परत वेगळा चार्ट तयार केला नाही. जो चार्ट दिला आहे तोच वापरला आहे.

चला , बघुया ,  जातकीला नोकरी मिळायची काही शक्यता आहे का ते..

प्रश्नकर्ता (ह्या उदाहरणात प्रश्नकर्ती) नेहमीच Ascendant लग्न भाव  असतो. ह्या चार्ट मध्ये  ‘मकर लग्न’ आहे म्हणजे ‘शनी’  प्रश्नकर्तीचे प्रतिनिधीत्व करणार. ‘प्लुटो’ हा लग्न भावातच असल्याने तोही एक प्रतिनिधी असेल, त्याशिवाय ‘चंद्र’ हा नेहमीच प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने तोही जातकीचे प्रतिनिधित्व करेल.

प्रश्न ‘नोकरी मिळेल का ?’ असा आहे त्यामुळे दशम भाव (१०) महत्वाचा , दशम स्थानावर तुळ रास असल्याने , दशमेश ‘शुक्र’ जातकीला अपेक्षित असलेल्या नोकरीचे प्रतिनिधित्व करेल.

प्रश्नकुंडलीत जेव्हा मकर लग्न उदीत असते तेव्हा काही संकेत असतात आणि प्रश्नकुंडली रॅडिकल असेल तर बर्‍याच वेळा ते बरोबरही ठरतात असा माझा अनुभव आहे. ते संकेत असे असतात:

(माझ्या बर्‍याच नोट्स इंग्रजीतून लिहलेल्या असतात,  आता त्यांचे आता मायमराठीत भाषांतर करणे हा एक मोठा प्रकल्प बनेल, तेव्हढा वेळ नाही, सबब हा भाग इंग्रजीतून , जसाच्या तसा…)

“When Capricorn rises in the Horary chart, it is possible that the client is in a state of prevarication as s/he tries to make the best possible decision regarding his/her future. If s/he has been involved in any kind of project or enterprise, s.he may feel that further progress is impossible because there are too many obstacles to overcome. S/he may even feel that s/he wants to give up and could easily succumb to depression, yet usually at her/his bleakest moments, just when s/he thinks that things are unlikely to get better, somehow the situation improves. …”

जातकी सध्या कोणत्या परिस्थितीत आहे याचेच हे यथार्थ वर्णन आहे. जातकी ने एक नोकरी मिळवण्यासाठी चाचणी परीक्षा दिली होती, पण त्यात तिचा नंबर लागला नाही, ती वेटिंग लिस्ट वर आहे , म्हणजे नोकरी दुसर्‍या कोणाला दिलेली आहे आणि त्या व्यक्तीने जर ती स्वीकारली नाही किंवा अन्य कारणामुळे ती नोकरीची जागा पुन्हा रिक्त झाली तर जातकीला तीच नोकरी देऊ केली जाईल. जातकीला नोकरी मिळाली  नाही पण हीच नोकरी पुढे मागे मिळू शकेल अशी शक्यता आहे , त्याची जातकीला आशा आहे आणि म्हणुनच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.

लग्नेश शनी आहे म्हणजे विलंब आणि अडथळे ठरलेले आहेतच!  पण एक आशा आहे ! शनी लाभात आहे आणि वक्री आहे , म्हणजे त्याचा प्रवास मंद गतीने का होईना दशम स्थाना कडे चालू आहे ! त्यातच शनी धनेश (जातकीचा पैसा , नोकरीतला पगार) म्हणजे जातकीला नोकरी मिळण्याचे अस्पष्ट का होईना संकेत आहेत.

प्लुटो सारखा ग्रह वक्री अवस्थेत लग्नातच आहे. प्लुटो चे कारकत्व म्हणजे “जुने नष्ट करणे आणि नव्याची सुरवात करणे’ या प्लुटो चा जातकीच्या नोकरीशी संबंध असू शकतो तो कदाचित , जातकी एक नोकरी सोडून नविन नोकरी सुरु करेल,  अशा पद्धतीने , पण प्लुटो वक्री असल्याने हे अगदी सहज सुटणारे समीकरण नाही.

राहु दशमातच आहे , पाश्चात्य होरारीत राहुला शुभ ग्रह मानले जाते , तो दशमात असणे हा पण एक शुभ संकेत आहे.

राहु आणि प्लुटो दोघेही  शनी ने दिलेल्या संकेताला काहीशी बळकटी देत आहेत असे म्हणावे लागेल.

जातकीच्या नोकरीचा प्रतिनिधी शुक्र सप्तमात आहे, सप्तमस्थान हे जातकाच्या खुल्या प्रतिस्पर्ध्याचे (Open enemies) आहे, शुक्र सप्तमात असल्याने नोकरी जातकीच्या प्रतिस्पर्ध्याला मिळालेली आहे.जातकीचा ‘फॉर्चुना’ पण सप्तमातच आहे हे विशेष.

नेपच्युन  त्रितिय स्थानात आहे, त्रितिय स्थान हे करार मदार, मुलाखत यांचे स्थान आहे, नोकरीचे ऑफर लेटर हा एक प्रकारे नोकर आणि मालक यांच्यातला एक करारच असतो ना ? आता या स्थानात नेपच्युन सारखा ‘फसवा, भुरळ पाडणारा, गुढ’ ग्रह असल्यावर आणखी काय होणार?  जातकी नोकरी साठीच्या प्रतिक्षा यादी वर आहे म्हणजे नोकरी मिळेल किंवा नाही याबद्दल अनिश्चितता आहे. नेपच्युन ने ही संभ्रमाची स्थिती अगदी अचूक पणे दाखवली आहे!

नोकरीच्या बाबतीतले दुसरे महत्वाचे स्थान म्हणजे षष्ठम स्थान, या स्थानावर मिथुन रास आहे , मिथुनेचा स्वामी बुध जवळ जवळ  षष्ठम स्थानातच आहे ( पष्ठम स्थानारंभा पासून फक्त १ अंश मागे आहे) , पण वक्री असल्याने तो षष्ठम स्थाना पासुन दूर जात आहे, जातकीची नोकरीची संधी हातुन  निसटली त्याचेच हे द्योतक आहे.

ओ मिस्टर .. No beating around the bush ! अहो हे सगळे आधीच माहीती आहे , तेच काय परत सांगताय , जातकीला जाणून घ्यायचे आहे ते ‘नोकरी मिळेल का?’ त्याचे काही तरी बोला ना ? उगाच आपले  त्या पुण्याच्या ‘त्या’ ज्योतिषा सारखे  ‘लग्न कधी होईल ?’  ते विचारायला आलेल्या व्यक्तीला , तुझ्या मामाच्या पाठीवर काळा डाग आहे ..”  असले काही तरी सांगत बसणार का ?  माझ्या मामाच्या पाठीवर डाग असो वा मामा कुबड्या असो , त्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध ? माझे लग्न कधी ते सांगाल का नाही ?

‘ बचेंगे तो और भी लडेंगे’  !

अजुनही आशा आहे …चंद्राने नुकतीच राशी बदलली आहे इतकेच नव्हे तर तो शनीच्या युतीतून बाहेर ही पडला आहे ! हा एक चांगला संकेत आहे, राशी बदल नेहमीच जातकाच्या सभोवतालच्या परिस्थित खास करुन प्रश्ना संदर्भातल्या परिस्थितीत बदल घडवून आणतो, शनी ची युती तुटल्या मुळे जातकीच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले आहेत.

आपण आता जातकीला नोकरी मिळणार का आणि मिळणार असल्यास कधी ते पाहुया !

प्रश्न ‘नोकरी’ बद्दल आहे , त्यासाठी जातकीचा प्रतिनिधी (शनी / चंद्र) आणि नोकरीचा प्रतिनिधी (शुक्र) यांच्यात कोणता ना कोणता ग्रहयोग व्हायला हवा ( हा योग युती, लाभयोग, केंद्र योग, नवपंचम योग किंवा प्रतियोग यापैकी कोणता तरी असायला हवा).

चंद्र धनेत आणि शुक्र कर्केत असल्याने दोघेही आपापल्या राशीत असताना त्यांच्यात कोणताही योग होणार नाही  ( Inconjunct नामक १५० अंशाचा योग होतो पण होरारीत तो वापरला जात नाही), राहु दशमात असल्याने त्याला नोकरीचा प्रतिनिधी मानला तर ( वेस्टर्न होरारीत राहु ला सहसा प्रतिनिधित्व दिलेले आढळत नाही) चंद्र आणि राहुत ६ अंशात लाभ योग होतो आहे , ठीक  आहे हा एक चांगला संकेत मानता येईल पण  ठोस सांगता येइल असे अजूनी तरी काही नाही.

थांबा, एक दणकेबाज योग होत आहे …

शनी (जातकी) आणि शुक्र (नोकरी) यांच्यात नव-पंचम योग !

शनी धनेत ००:५४ अंशावर तर शुक्र कर्केत २६:२१, नव-पंचम योगा साठी फक्त ४:३० अंश कमी पडत आहेत. शुक्र जलद गतीचा ग्रह असल्याने तो हे अंतर झपाट्याने कापून शनीशी नव-पंचम करेल … पण….. त्यासाठी शुक्राला राशी ओलांडून सिंहेत यावे लागेल, शुक्र सिंहेत ००:५४ अंशावर आला की हा नवपंचम पूर्ण होईल (Perfect). जेव्हा असे आऊट ऑफ साईन योग होतात तेव्हा घटना विलंबाने घडते आणि घटने संदर्भात काही मोठे बदल झाल्या नंतरच घटना घडते. या केस मध्ये जातकीला  नोकरी मिळायची असेल तर ज्या व्यक्तीला सध्या ही नोकरी देण्यात आली आहे त्या व्यक्तीने ती नोकरी नाकारली पाहीजे किंवा नोकरी सोडली पाहीजे. म्हणजे मोठा बदल झाल्या खेरीज जातकीला नोकरी मिळणे अशक्यच , अगदी हेच आपल्याला आऊट ऑफ साईन होणार्‍या नव-पंचम योगाने सुचवले आहे.

आता घटना केव्हा घडणार?  नव-पंचम होण्यासाठी नव-पंचम योगा साठी फक्त ४:३० अंश कमी पडत आहेत. टाइम स्केल वर हे  ४:३० दिवस / आठवडे / महिने / वर्षे असे होऊ शकते, यापैकी वर्षे हा पर्याय फार लांबचा आहे निदान या केस मध्ये तरी याचा विचार करता येणार नाही. शनी चा सहभाग लक्षात घेता , ४:३०  महीने हे स्केल योग्य ठरेल. जातकीला प्रश्न विचारलेल्या वेळे पासुन ४:३० महीन्यात नोकरी मिळेल , प्रश्न ०१ जुन २०१५ तारखेचा म्हणजे हिशेबाने हा कालावधी ऑक्टोबर २०१५ चा दुसरा आठवडा येतो.

वेस्टर्न होरारीत कालनिर्णया साठी चंद्रा चा वापर करतात. या केस मध्ये चंद्र (जातकी) आणि शुक्र (नोकरी) असे समीकरण आहे. जातकीने प्रश्न विचारण्या पुर्वी नोकरी साठी परीक्षा (मुलाखत) इ सोपस्कार पार पाडले (त्यात यश मिळाले नाही हा भाग वेगळा) त्याची तारीख माहीती नाही पण ०२ जुन २०१५ रोजी जातकी ‘last month’ असे म्हणतेय म्हणजे मे – २०१५ कधीतरी ही घटना घडली असावी , नक्की तारीख माहीती नसल्याने आपण ही घटना मे महिन्याच्या मध्यावर म्हणजे १५ मे २०१५ च्या आसपास ही घटना  घडली असावी असे गृहीत धरु.

परीक्षा (मुलाखत) इ  घडले तो  जातकी आणि नोकरी यांच्यातला संपर्क , म्हणजे पूर्वी या दोघांत झालेला नवपंचम योग, त्यानंतर  चंद्र  नव-पंचम योगातून बाहेर पडून आता ५॥ अंश झाले आहेत.

आता चंद्रात वा शुक्रात पुढचा योग आहे तो  प्रतियोग. हा योग चंद्र कुंभेत १ अंश व शुक्र (त्याला ही राशी बद्लावी लागणार आहे) सिंहेत १ अंश च्या आसपास असताना होईल. हा योग होण्यासाठी चंद्राला दोन राशी ओलांडायला लागतील. चंद्राला धने चे २८ अंश आणि राशी बदलून मकरेचे  ३० अंश पुन्हा राशी बदलून कुंभेचा ०१ असे ५९ अंश पुढे जायचे आहे .

आधी घडलेल्या योगाचेच टाइम स्केल वापरले तर असे लक्षात येईल:

नवपंचमातून बाहेर पडून झालेत १५ दिवस, या पंधरा दिवसात चंद्राने अंतर काटले आहे ५॥ अंश, म्हणजे  ५.५ /  १५ =  ०.३६६६६ अंश प्रती दिवस.  चंद्राला इथुन  पुढे आणखी ५९ अंश काटायचे आहेत , ०.३६६६६अंश प्रती दिवस या हिशेबाने पाहीले तर ते ५९ / ०.३६६६६ =  १६१  दिवस, म्हणजेच  ५ महीने १० दिवस !

दोन्ही कालावधीं जवळपास एक सारखाच कालनिर्णय देत आहेत-  त्याचा मेळ घालून असे म्हणता येईल :
जातकीला ऑक्टोबरच्या  तिसर्‍या/ चौथ्या  आठवड्यात नोकरी मिळेल!

आता याच प्रश्नाचे उत्तर कृष्णमुर्ती पद्धतीने मिळवायचा प्रयत्न करुयात.

जातकीने प्रश्न विचारते वेळेची कुंडली स्वत:च दिलेली असल्याने परत नविन कुंडली (के.पी. होरारी क्रमांक वापरुन) तयार करायला नको, जातकीने दिलेलीच कुंडली आपण वापरु फक्त ती कुंडली आपण ‘निरयन-कृष्णमुर्ती अयनांश’ मध्ये रुपांतरीत करु. कारण कृष्णमुर्ती पद्धतीत निरयन ग्रहस्थिती व कृष्णमुर्ती अयनांशच लागतात.

अशी रुपांतरीत केलेली कुंडली शेजारीच छापली आहे. दिनांक, वेळ, स्थळ सर्व तेच आहे फक्त अयनांश बदलले आहेत.

हा एक ‘टाइम चार्ट’ असल्याने , होरारी नंबर इ काही नाही. के.पी. ला अशी प्रश्नकुंडली  चालते. काही के.पी. वाले , होरारी नंबर वापरत नाहीत, जातकाने प्रश्न विचारला तीच वेळ घेऊन मिळणारा ‘टाईम चार्ट’ वापरतात. चालते !

वर छापलेला वेस्टर्न अत्यंत अचूक आहे, त्या चार्ट मधल्या ग्रह व कस्प  यांच्या अंशां मधून कृष्णमुर्ती अयनांश २३: ५८: ५६ वजा केलेत तर आपल्याला कृष्णमुर्ती पत्रिका मिळेल.

 

Brazil Woman KP chart

जातकीचा प्रश्न ‘नोकरी मिळेल का?’

नोकरीच्या संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत दशमस्थान (१०) महत्वाचे असते. त्याच बरोबर नोकरीच्या ठिकाणी नियमित उपस्थिती , सेवा- चाकरी यासाठी षष्ठम (६) स्थान ही महत्वाचे असते. बिनपगारी नोकरी कोण करेल ? म्हणजेच नोकरीतून मिळाणारे उत्पन्न (पगार) दर्शवणारे धनस्थान (२) देखील महत्वाचे असते. नोकरी मिळते तेव्हा जातकाची एक इच्छा पूर्ण होते म्हणजे इच्छापूर्तीचे लाभस्थान (११) देखील आवश्यक असते. एकंदर नोकरी मिळेल का प्रश्न असल्यास १०, ६, २, ११ ही स्थाने विचारात घ्यावी लागतात. त्यापैकी प्रमुख स्थान दशमस्थान (१०) मानायचे.

चला, आता जातकीच्या प्रश्ना साठी केलेल्या प्रश्नकुंडली कडे वळूयात.

प्रश्नकुंडलीत चंद्र हा नेहमीच प्रश्न विचारते वेळीं जातकाच्या मनात नेमके काय विचार चालू होते ते दाखवतो, जातकाचा प्रश्न तळमळीचा असेल तर जातकाच्या मनात त्यावेळी ’प्रश्न..प्रश्न आणि प्रश्न’ एव्हढेच असते (किंबहुना असायला हवे) आणि चंद्र ते बरोबर दाखवतो.

आता चंद्र प्रश्न बरोबर दाखवतो म्हणजे नेमके काय ? तर प्रश्नकुंडलीतला चंद्र प्रश्नाच्या संदर्भातल्या एका –दोन भावांचा तरी कार्येश असतो. विचारलेल्या प्रश्ना ला सुसंगत असे या चंद्राचे कार्येशत्व असते.

 

Brazil Woman KP Significators

आता जरा प्रश्नकुंडलीतल्या चंद्राकडे पहा:

चंद्र लाभात  (११ ) आहे, चंद्र अष्टमेश आहे (८) आहे, चंद्र शनीच्या नक्षत्रात आहे. शनी लाभातच (११) असून धनेश (२) व त्रितीयेश (३) आहे, म्हणजे चंद्राचे कार्येशत्व:

चंद्र : ११ / ११ / २ , ३  / ८

चंद्र प्रश्ना संदर्भातल्या दोन ११ व २ या भावांचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे, ३ रे स्थान ‘बदल’ सुचित करते  तर ८ वे स्थान ‘मन:स्ताप’ ! चंद्राने जातकाच्या मनातले विचार आणि प्रश्नाचा रोख अगदी अचूक दाखवला आहे , प्रश्नकुंडली ‘रॅडीकल’ आहे , अशा कुंडली मार्फत प्रश्नाचे उत्तर मिळते व ते अचूक ठरते असा अनुभव नेहमीच येतो.

चला आता पुढचा टपा: प्रश्ना संदर्भातल्या प्रमुखा भावाचा ‘सब लॉर्ड’!

या प्रश्नासाठीचा प्रमुख भाव आहे दशम (१०). दशमाचा सब आहे ‘बुध’. या बुधाचे कार्येशत्व काय ते पाहुया. बुध पंचमात (५) आहे, बुध सप्तमेश (७) व दशमेश (१०) आहे, बुध प्रश्न विचारते वेळी जरी वक्री असला तरी तो चंद्राच्या नक्षत्रात आहे आणि चंद्र कधीच वक्री असत नाही.  बुधाचा नक्षत्रस्वामी चंद्र लाभात (११) असून अष्टमेश (८) आहे. बुधाचे कार्येशत्व असे:

बुध: ११ / ५ / ८  / ७ ,  १०

दशमाचा सब बुध प्रश्ना संदर्भातल्या ११ व १० या भावांचा कार्येश होत असल्याने जातकीला नोकरी मिळण्याची मोठी शक्यता आहे . पण त्याच बरोबर जातकीला नोकरी मिळणे हे तितकेसे सोपे नाही.  हे कसे काय?

दशमाचा सब बुध हा, ५ व  ८ या भावांचाही कार्येश आहे.
प्रश्नकुंडलीत चंद्र – शनी युती आहे आणि त्यातही शनी वक्री आहे म्हणजे खात्रीने विलंब!

दशमाचा ‘सब’ चा कौल  अनुकूल मिळाला असला तरी त्यावरुन  ‘नोकरी मिळणार’ असा निष्कर्ष लगेचच काढता येणार नाही. प्रत्यक्षात काय घडणार आहे हे कळण्यासाठी आपल्याला आगामी काळात येणार्‍या दशा – अंतर्दशा – विदशा तपासल्या पाहीजेत.

Brazil Woman KP DBAS

प्रश्न करते वेळी शनीची महादशा चालू आहे आणि ती २६ आक्टोबर २०२७ पर्यंत चालणार आहे. या शनीचे कार्येशत्व असे आहे. शनी लाभात (११) आहे, शनी धनेश (२) आणि त्रितियेश (३) आहे, शनी  स्वत:च्याच नक्षत्रात आहे.

शनी : ११ / ११ / २, ३ / २ , ३

शनी प्रश्ना संदर्भात लाभाचा आणि धनस्थानाचा कार्येश होतो आहे ,  महादशा स्वामी शनीचा सब आहे बुध, बुधाचे कार्येशत्व आपण बघितले आहे.  बुध: ११ / ५ / ८  / ७ ,  १०.  म्हणजे महादशा स्वामी शनीचा सब देखील अनुकूल आहे.

११ , २ प्रथम दर्जाने म्हणजे ही शनी महादशा जातकीला पैसे मिळवून देणारी ठरेल , पण दशा स्वामी शनी नोकरीच्या १० व ६ या प्रमुख स्थानांचा कार्येश होत नसल्याने , हा पैसा नोकरीतूनच मिळेल असे मात्र नाही, इतरही मार्गाने जातकीला पैसे मिळू शकतील ,  याचा अर्थ जर जातकीला मिळणारा हा पैसा नोकरीतूनच मिळायचा असेल तर या शनीच्या महादशेत नोकरी साठीच्या १० व ६ या प्रमुख भावांचा प्रथम दर्जाचा कार्येश असलेल्या ग्रहाची अंतर्दशा यायला हवी. ती येत नसेल तर जातकीला पैसे मिळतील पण नोकरीतून न मिळता अन्य मार्गाने.

प्रश्न विचारते वेळी शनी वक्री असून स्वत:च्याच नक्षत्रात आहे पण म्हणून शनीची महादशा सोडून द्यायची का ?  नाही,  कारण शनी काय असा कायमचा वक्री थोडाच राहणार आहे, अजून १२  वर्षे शिल्लक असलेली महादशा चालू आहे तेव्हा ही दशा आपल्याला  चालेल.

आपल्याला या शनीच्या महादशेतल्या अंतर्दशा तपासल्या पाहीजेत.

शनी महादशेत सध्या केतु ची अंतर्दशा चालू असून ती १७ ऑगष्ट २०१५ पर्यंत असणार आहे. या केतु चे कार्येशत्व पाहुया.

केतु सुख स्थानात (४), केतु कडे कोणत्याही राशीचे स्वामीत्व नसते, केतु शनीच्या नक्षत्रात आहे शनी लाभात, धनेश आणि त्रितीयेश, केतु गुरुच्या मीनेत आहे, गुरु अष्टमात (८ ) , लग्नेश (१) आणि सुखेश (४), गुरु बुधाच्या नक्षत्रात , बुध पंचमात (५) आहे, बुध सप्तमेश (७) व दशमेश (१०) आहे. केतु वर गुरु ची नववी दृष्टी.

म्हणजे केतु चे एकंदर कार्येशत्व असे असेल.

केतु:  ११ / ४  / २ , ३ / —  , राशी स्वामी बुध: ११ / ५ / ८  / ७ ,  १०, दृष्टी गुरु ५ /  ८  / ७ ,१० / ४ , १.

एकंदर पाहाता केतु अंतर्दशा  १० व ६ या प्रमुखा भावांची प्रथम दर्जाची कार्येश होत नाही. शिवाय ५ ,  ८ प्राबल्य पाहाता या अंतर्दशेत जातकीला बराच मन:स्ताप होणार असल्याची चिन्हे आहेत, नोकरी तर फार लांबची गोष्ट!

केतु नंतर येणारी अंतर्दशा असेल शुक्राची,  १६ ऑक्टोबर २०१८ पर्यंत चालणार आहे, हा साधारण पणे साडेतीन वर्षाचा कालावधी आहे, नोकरी मिळणे – न मिळणे याचा निकाल याच अंतर्दशेत लागायला हवा.

शुक्राचे कार्येशत्व पाहूया.  शुक्र सप्तमात (७)  आहे, षष्ठेश (६) आणि लाभेश (११) आहे, शुक्र गुरु च्या नक्षत्रात आहे , गुरु  अष्टमात (८ ) , लग्नेश (१) आणि सुखेश (४), म्हणजे शुक्राचे कार्येशत्व असे असेल:

शुक्र: ८ / ७ / १, ४ / ६ , ११

म्हणजे अंतर्दशा स्वामी शुक्र (काहीसा) अनुकूल आहे, शुक्र राहुच्या सब मध्ये आहे.

राहु दशमात  ( १० ) आहे, राहु कडे कोणत्याही राशीचे स्वामीत्व नसते, राहु  चंद्राच्या नक्षत्रात आहे , चंद्र लाभात (११ ) आहे, चंद्र अष्टमेश आहे (८) , राहु बुधाच्या राशीत आहे , बुधाचे कार्येशत्व ११ / ५ / ८  / ७ ,  १०.

राहु: ११ / १०  / ८  / – , राशी स्वामी बुध ११ / ५ / ८  / ७ ,  १०.

म्हणजे अंतर्दशा स्वामी शुक्राचा सब राहु नोकरी साठी अनुकूल आहे.

पण शुक्र काही १० व ६ या प्रमुख भावांचा प्रथम दर्जाचा कार्येश नाही.

पुढची अंतर्दशा पाहावी का? पण त्यासाठी ही शुक्राची अंतर्दशा संपण्याची , म्हणजेच  साडेतीन वर्ष वाट पहावी लागेल , हे चालेल का?

नाही !  प्रश्नकुंडलीचा साधारण आवाका वर्ष -दीड वर्षा पेक्षा जास्त ठेवता येत नसल्याने , एक तर घट्ना या शुक्राच्या अंतर्दशेत घडेल अन्यथा नाही.

दशमाच्या सब ने दिलेला कौल पाहता, आपण एक प्रयत्न करु , शुक्राची अंतर्दशा घेऊ आणि त्यातली अनुकूल विदशा निवडता येईल का ते पाहू.

ती विदशा कोणती असेल? महादशा स्वामी शनी आणि आपण निवडलेल्या अंतर्दशेचा स्वामी शुक्र हे दोघेही षष्ठ्म (६) चे बळकट कार्येश नाहीत, म्हणून आपण अशी विदशा निवडू की जी षष्ठ्म (६) भावाची ‘अ’ दर्जाची कार्येश असेल. वर दिलेला तक्ता पाहीलात तर आपल्या लक्षात येईल की रवी आणि मंगळ असे दोनच ग्रह आहेत जे षष्ठ्म (६) चे ‘अ’ दर्जाचे कार्येश .

शुक्राच्या अंतर्दशेत रवी ची विदशा येणार ती २६ फेब्रुवारी २०१६ पासुन तर मंगळाची विदशा सुरु होईल २९ जुलै २०१६ पासुन. अर्थात हे दोन्ही कालावधी फार लांबचे आहेत (प्रश्न विचारला आहे जुन २०१५ मध्ये) तेव्हा ह्या विदशा प्रश्नकुंडलीचा आवाका पाहता योग्य वाटत नाहीत.

आता काय करायचे?

शुक्राच्या अंतर्दशेत शुक्राचीच विदशा घ्यायची आणि त्या विदशेत रवी किंवा मंगळाची सुक्ष्मदशा निवडायची , जर ट्रांसीटस अनुकूल असतील तर घटना घडेल अन्यथा नाही ,  केस क्लोज्ड !!

शुक्राच्या अंतर्दशेत शुक्राचीच विदशा १७ ऑगष्ट २०१५ ते २६ फेब्रुवारी २०१६ अशी आहे. या कालावधीत रवीची सुक्ष्मदशा १८ सप्टेंबर २०१५  ते २८ सप्टेंबर  २०१५ या कालावधीत आहे तर मंगळाची सुक्ष्मदशा १४ ऑक्टोबर २०१५ ते २५ ऑक्टोबर २०१५ अशी आहे. म्हणजे घटना घडली तर याच दोन कालखंडांत घडू शकते.

आता या काळातली ट्रान्सीट्स तपासायचे.

आपली  साखळी शनी- शुक्र –  शुक्र –  रवी  किंवा शनी- शुक्र –  शुक्र –  मंगळ अशी होऊ शकते.  अपेक्षित कालवधी आहे १८ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर , २०१५ . हा कालावधी प्रश्न विचारलेल्या वेळे पासून वर्षाच्या आत असल्याने रवी चे राशी-नक्षत्रातले भ्रमण तपासावे लागेल.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात रवी बुधाच्या कन्येत असेल, बुध आपल्या साखळीत नाही. साधारण १८ ऑक्टोबर ला रवी शुक्राच्या तुळेत जाईल. तुळेत पहिलेच नक्षत्र मंगळाचे आहे , आपली शुक्र – मंगळ  अशी साखळी जुळते. रवी तुळेत मंगळाच्या नक्षत्रात ६  दिवस असेल ह्या सहा दिवसात म्हणजे १८ऑक्टोबर ते  २४ ऑक्टोबर या कालावधीत जातकीला नोकरी मिळेल.

मंगळाची सुक्ष्मदशा चालू होते १४ ऑक्टोबर २०१५ रोजी, त्या आधी चंद्राची सुक्ष्म दशा चालू असणार,  चंद्र त्रितीय (३) स्थानाचा प्रथमदर्जाचा कार्येश आहे (वर दिलेला तक्ता पहावा) , त्रितिय स्थान म्हणजे करार , बोलणी , दस्तऐवज. जातकीला याच चंद्र सुक्ष्मदशेच्या काळात नोकरीची ऑफर देण्याचे नक्की होईल.

१८ऑक्टोबर रोजी रवीवार असल्याने , १९ ऑक्टोबर हा दिवस घेतला तर त्या दिवशीचे दशा – अंतर्दशा – विदशा आणि सुक्ष्मदशा  स्वामींचे ट्रान्सीट पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

त्या दिवशी:

महादशा स्वामी – शनी: मंगळाच्या राशीत, शनीच्या नक्षत्रात , शुक्राच्या सब मध्ये
अंतर्दशा आणि विदशा स्वामी शुक्र – रवीच्या राशीत , शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्राच्याच सब मध्ये !
सुक्ष्मदशा स्वामी मंगळ – रवीच्या राशीत , शुक्राच्या नक्षत्रात आणि गुरुच्या सब मध्ये,
खुद्द रवी – शुक्राच्या राशीत , मंगळाच्या नक्षत्रात आणि बुधाच्या सब मध्ये.

१८ऑक्टोबर ते  २४ ऑक्टोबर या कालावधीत जातकीला नोकरी मिळेल.

वेस्टर्न होरारी चार्ट ने आपल्याला हाच कालवधी दिलेला आहे!

इतका सारा खणखणीत कौल असताना जातकीला नोकरी न मिळती तरच नवल !

आणि  सांगायला अतिशय आनंद होतो की जातकीला नोकरी मिळालेली  आहे ,

अगदी आपण सांगीतलेल्या कालावधीतच !

हा पहा जातकीचा प्रतिसाद:

Brazil Job feedack

 yesUPDATE:

I received a letter today. They called me for the job. I have 30 days to decide and I’m not sure if I still want it. There was a strike, and the activities restarted recently. But the first choice has probably quit or didn’t accept the job. I thought more about it and I’ll give it a try. Next week I’m going to the first meeting.Yes, Ema the job is mine!

(कोणी म्हणेल तुम्ही १८ऑक्टोबर ते  २४ ऑक्टोबर म्हणाला होता , पण जातकीचा रिप्लाय १४ ऑक्टोबर चा! जातकीला जॉब ऑफर लेटर , १४ ऑक्टोबर ला मिळाले आहे (चंद्र सुक्ष्मदशा !) , आता जातकीला त्या कंपनीत जाउन बाकीची औपचारिकता पूर्ण करायची आहे , ती पूर्ण झाल्यावर तीची नोकरी सुरु होईल , ते सर्व येत्या आठवड्याभरात २४ ऑक्टोबर च्या आत होणार नाही का ? )

 

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. Bhagwan Suryawanshi

  Dear sir,
  Waiting yours reply for my old home issue

  Yours Followers
  Bhagwan Suryawanshi

  0
  1. सुहास गोखले

   श्री. भगवानजी,

   आपण पैसे भरलेत पण आपली माहीती , जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मगाव इ काहीही दिलेली नाही या माहीती शिवाय आपली पत्रिका बनवता येणार नाही, तेव्हा ही सर्व माहीती ईमेल द्वारा पाठवून द्या.

   आपला

   सुहास गोखले

   0
 2. Suresh

  Hi Suhasji,

  Ek prashna padla ahe…kadachit agadich basic asel pan tarihi vicharato: KP chart madhye Chandra 12th madhye disat ahe (XII 14 20′ 50″- MON 7 57′ 50″) mug apan manacha kaul tapastana Chandra LAbh sthanat (11th) madhye ka ghetlaat?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुरेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण विचारलेल्या शंके बाबतीत:चंद्र जरी वृश्चिकेत असला तरी चंद्राचे अंश -७:५७:५० हे XII भावाच्या प्रारंभापेक्षा १४:२९:५० कमी असल्याने चंद्र XI भावातच (लाभ स्थानातच) आहे. ही भावचलित कुंडली आहे.

   कळावे

   आपला

   सुहास गोखले

   0
   1. Suresh

    Thanks Suhasji,

    prashnakundali pahatana KP janmalagna kundali pahayachi ki Bhaavchalit? Ani donhimadhye kay farak ahe? Ani online classes kadhi suru karnaar ahaat?

    0
    1. सुहास गोखले

     श्री. सुरेशजी,

     के.पी. मध्ये फक्त एकाच प्रकारची कुंडली वापरली जाते ती म्हणजे निरयन भावचलित कुंडली याख्रेरीज इतर कोणत्याही प्रकारची कुंड्ली के.पी. मध्ये वापरली जात नाही. साधी क्षेत्र कुंडली पारंपरीक ज्योतिषी वापरतात. दोन्हीत फरक बराच आहे पण तो असा इथे स्पष्ट करुन सांगता येणार नाही , फार मोठा आणि तितकाच मोठ्या वादविवादाचा विषय आहे हा, क्षमस्व. माझे ऑनम लाईन क्लासेस अद्यापा सुरु केले नाहीत पण मी आपल्याला तसे कळावेन,

     अभिप्राया बद्दल धन्यवाद

     आपला

     सुहास गोखले

     0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.