महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य राजकारण्याची पत्रिका सध्या तपासत आहे.

या राजकारण्याला मी ‘बलाढ्य’ म्हणतो आहे पण तसे त्या व्यक्तीला मानायचे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, काहींच्या मते ही व्यक्ती कसली बलाढ्य? असे असेल, काही म्हणतील’ ही व्यक्ती एकेकाळी बलाढ्य होती पण सध्या नाही’ !

पण या व्यक्तीची पत्रिका अभ्यासल्या नंतर निदान माझी तरी पक्की खात्री झाली आहे की या व्यक्तीत निश्चितच काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्याची क्षमता आहे , व्यक्ती खरोखरीची ‘बलाढ्य’ आहे ….पण ….

हा ‘पण..’ किती विचित्र असतो नाही?

ह्या ‘पण’ चे उत्तर हुडकण्याचा मी प्रयत्न केला जरूर , काही सापडले देखील , पण ते नक्की काय? हे नाही सांगणार, जर कधी मधी या व्यक्तीशी संवाद साधता आला आणि त्या व्यक्तीने स्वत:हून ते जाणुन घ्यायचा प्रयत्न केला (च) तर सांगेन त्या व्यक्तीला, आपले खासगीत !

सामान्यत: मी सेलेब्रीटीज च्या पत्रिका अभासत नाही, कारण त्यांच्या जन्मतारखाच काय जन्मवेळा देखील नक्की माहिती नसतात, प्रसार माध्यमातून, मासिकां / पुस्तकांतून त्यांचे जे काही जन्मतपशील दिलेले असतात ते बहुतेक वेळा चुकीचे / फॅब्रीकेटेड असतात.

मग मूळात मी या व्यक्तीची पत्रिका तरी का उचलली?

त्याचे असे झाले, गेल्या महीन्यात ,माझ्या कडे एक जातक आले होते आणि त्यांनी सांगीतले की त्यांची जन्मतारीख आणि या ‘बलाढ्य ‘ राजकारण्याची जन्मतारीख एकच आहे, जन्मगाव एकच आहे आणि इतकेच नव्हे तर दोघांच्या जन्मवेळेत अवघे १५ मिनिटांचे अंतर आहे म्हणजे दोघांच्या पत्रिका जवळपास सारख्या , क्षेत्र कुंडलीच्या अंगाने बघायचे तर ‘झेरॉक्स’ कॉपीज !

हे पाहील्यानंत्यर मला नवल वाटले, एकाच दिवशी, एकाच गावात, अगदी थोड्या मिनिटांच्या अंतरानी जन्मलेल्या दोन व्यक्तींत इतका फरक? एक राजकारणी तर दुसरा सहकारी बँकेत क्लार्क, एक आलिशान घर, महागड्या परदेशी गाड्या आणि झेड सिक्युरीटीत फिरणारा तर दुसरा वन बिएचके राहणारा, खुळखुळा झालेली जुनाट मोटारसायकल दामटणारा, एकाचा नुसत्या शब्दा वर लाखो लोक रस्त्यावर उतरतात तर दुसर्‍याला त्याचा ऑफिस मधला प्यून सुद्धा भीक घालत नाही ! एक घणाघाती, अमोघ वक्तृत्वावर लाखोंची सभा जिंकणारा तर दुसर्‍याला चार शब्द सरळ बोलता येत नाहीत!

हे असे का?

हा एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो त्यामुळे आत्ता त्यावर जास्त टिपणी करत नाही.

या जातकच्या पत्रिकेचा अभ्यास करताना कितीही नाही म्हणले तरी माझे लक्ष त्या ‘बलाढ्य ‘ राजकारण्याच्या पत्रिके जातच राहीले.

किती वेळ गप्पा बसणार?

शेवटी या राजकारण्याच्या पत्रिकेचा शेवटी अभ्यास करायचेच ठरवले.

या राजकारण्याची जन्मतारीख व जन्मठिकाण बरोबर असेल यात शंका नाही पण जन्मवेळेचा घोळ असणार हे मात्र गृहीत धरले आहे.

सोबत दिलेली पत्रिका हा ‘युरेनिअन’ पद्धतीची आहे, Modulus 90 फॉरमॅट मध्ये . युरेनियन मध्ये राशी, भाव इ संकल्पना वापरल्या जात नाहीत, फक्त ग्रह आणि त्यांच्या मधली सिमेट्री (Symmetry) विचारत घेतली जाते !

 

 

हे उद्याचे ज्योतिषाशास्त्र आहे मंडळी ! बस मध्ये अजुनही जागा आहे तो पर्यंतच आत शिरून खिडकीची जागा पटकावा, उशीर झाला तर उभे रहायाला सुद्धा जागा सापडणार नाही ! 

पत्रिकेचा अभ्यास करताना मी विविध तंत्रे वापरतो. माझ्या पूर्वीच्या लेखांतून अशा काही तंत्रांचा मी वापर करुन दाखवला आहे.

या अभ्यासात ‘युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ या तंत्राने काही भाग अभ्यासला फक्त तेवढ्या पुरती ही लेख माला आहे असे समजा. सगळे कसे काय लिहू हो, क्या बच्चे की जान लोगे कया?

या व्यक्तीची पत्रिका केली आणि शांतपणे एकेक घटक तपासत होतो आणि एक घटक बघताच मला हसायला आहे !

ज्योतिषशास्त्रात देखील विनोद असतात!

मला दिसले की या व्यक्तीच्या ‘शनी ‘ आणि ‘झिअस’ च्या मिडपॉईंट वर ‘एरीस पॉईंट’ आहे, आणि विट्टेच्या ‘रुल्स बुक RPP’ मध्ये चक्क लिहले आहे:

SA/ZE = AR (Saturn + Zeus = Aries Point शनी + झिअस = एरिस पॉईंट)

General damages through steam power, and losses through fire.

आता तुम्ही म्हणाला शनी तर माहिती आहे आम्हाला पण हा ‘झिअस’ काय आहे? कोणता ग्रह आहे?

‘झिअस’ हा पण एक ग्रह आहे असे युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी मध्ये मानले जाते, हा प्लुटोच्याही पलीकडे आहे असे ठरवण्यात आले आहे. तो अजून दुर्बिणीतूण दिसलेला नाही पण त्याची सूर्या भोवती फिरण्याची गती इ भाग गणीताने ठरवलेला आहे! आणि या ग्र्हाचा प्रभाव निश्चितच जाणवतो.

(हे मला पण मान्य आहे बुवा!)

युरेनियन मध्ये असे एकंदर आठ (सध्यातरी काल्पनिक म्हणता येतील असे) ग्रह आहेत! त्यांना TNP Trans Neptunian Planets म्हणतात, अर्थात हे सर्व आठही ग्रह प्लुटोच्याही पलीकडे असल्याने त्यांना Trans Pluto Planets म्हणयाला हवे पण हे आठ ग्रह शोधले गेले तेव्हा प्लुटोचा शोध लागायचा होता त्यामुळे तेव्हा नेपच्युन हा सुर्यमालेतला सगळ्यात शेवटच्या ग्रह होता त्या हिशेबाने या आठ ग्रहांना TNP Trans Neptunian Planets म्हणले जाऊ लागले आणि मग ती प्रथाच पडली!

असो, तर या ‘झिअस’ चे काय सांगत होतो?

Zeus: Shows fire, leadership and creativity ……………… . while Saturn/Zeus suggests blocks and obstacles that could cause anxiety and require great perseverance

(तशी या ‘झिअस’ बद्दल माहिती बरीच आहे पण किती लिहणार इथे? )

असो, तर बुकात काय लिहलेय?

SA/ZE = AR (Saturn + Zeus = Aries Point शनी + झिअस = एरिस पॉईंट)

General damages through steam power, and losses through fire.

 

पत्रिकेकडे नीट बघितले तर लक्षात येईल ही हे ‘झिअस’ महाशय चक्क मिड-हेवन (दशमबिंदू) च्या पूर्ण अंशात्मक युतीत आहे! झीअस ०८ कन्या ०९ आणि मिड हेवन ०८ कन्या ३३ !

या योगा बद्दल असे म्हणता येईल:

To successfully assert oneself. Leadership. Firebrand (a person who stirs up trouble). Consciously controlled energy. One’s own creative ability. The thirst for action. The urge to work. Passion for work. The urge to accomplish great feats. Urge to activity. Wanting to do business.”

हे या राजकारणी व्यक्तीला बरोबर लागू पडते की नाही तुम्हीच ठरवा !

आता ‘स्टीम पॉवर’ मुळे कोणते नुकसान होणार या व्यक्तीचे? राजकारण एके राजकारण करणारी ही व्यक्ती , थोडीच जिथे वाफेची शक्ती वापरली जाते अशा ठिकाणी काम करायला जाणार? पण बुकात लिहलेय म्हणजे कोठेतरी त्याचा पडताळा आलाच पाहीजे ना? जरासा…थोडासा…किंचितसा….शास्त्रा पुरता तरी !

आणि दुसर्‍याच क्षणी मला या व्यक्तीने स्थापन केलेल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आठवले! ‘वाफेचे रेल्वे इंजिन’, स्टीम पॉवर वर चालणार्‍या या रेल्वे इंजिनाने या व्यक्तीच्या पक्षाचे आणि पर्यायाने या व्यक्तीचे नुकसान केले आहेच, इतीहास साक्ष आहे!

‘निशाणी बदला… भाग्य बदला’

 

क्रमश:


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.