“मे आय कम ईन सर ?”
सकाळची साडेदहा ची वेळ, स्थळ XYZ IT Company चे व्हाईट फिल्ड्स , बेंगलोर मधले विस्तीर्ण कॅम्पस , सिनियर प्रोग्रॅम मॅनेजर श्रीकांत गुप्तेंची केबीन.. आणि आवाज होता ‘सेहल व्होरा’ चा.
“येस कम ईन… सेजल …. अॅम आय करेक्ट? साडेदहा ला तू भेटणार होतीस.”
“येस सर , मी सेजल व्होरा, आपल्या एंबेडेड सिस्टीम्स ग्रुप मध्ये , YYY पॉवर मॅनेजमेट प्रोजेक्ट वर ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करते..”
“ओ आय सी, म्हणजे पद्मराजन च्या ग्रुप मध्ये .. हॅव अ सिट फर्स्ट ..सेजल”
“थॅक्यू सर..”
“येस , सेजल बोल काय अजेंडा आहे आजच्या आपल्या मिटींगचा..”
मिटींग , अजेंडा शब्द ऐकल्यावर सेजल उगाचच लाजली.
नंतरचा अर्धा तास सेजल बोलत होती आणि श्रीकांत गुप्ते ऐकत होते. शेवटी रडकुंडीला आलेल्या सेजल ला कसेबसे थांबवत गुप्ते म्हणाले –
“पण सेजल , आपल्या कडे मॅनेजमेंट हायरार्की आहे, ही समस्या तू पद्मराजन शी बोलून सोडवलीस तर बरे नाही का होणार, आफ्टर ऑल तू त्याला रिपोर्ट करतेस ना ? मला खात्री आहे पद्मराजन ही समस्या सोडवू शकेल. त्याच्या कार्यक्षेत्रात मी सहसा हस्तक्षेप करत नाही. समजतेय का मी काय म्हणतो आहे ते .”
“येस सर”
“देन ?
“सर ,मी प्रथम पद्मराजन सरांशीच बोलले बट आय अॅम सॉरी टू से , त्यांनी काहीच दखल घेतली नाही, अगदी वारंवार हा इश्शू रेज केला तरी.. इनफ़ॅकट अॅन्ड अगेन सॉरी टू से, पद्मराजन सरांनी ही बाब कायमच हसण्यावारी नेली आहे . सर मी पद्मराजन सरां विरुद्ध तक्रार करते आहे असे नाही पण परिस्थिती खरेच गंभीर आहे.. आता पाणी पार डोक्यावरुन जायला लागलेय .. हा प्राब्लेम केवळ माझा एकटीचाच नाही ग्रुप मधल्या सर्वच मुलींची हीच तक्रार आहे , इतकेच काय मुलें पण वैतागली आहेत. काहीच अॅक्शन घेतली जात नसल्याने शेवटी तुमच्यापर्यंत मॅटॅर एक्सलेट करावा लागला आहे..सॉरी सर.”
“एच आर शी बोललात ?
“हो”
“कोणाशी?”
“मनप्रित मॅम..”
“एनी अॅक्शन फ्रॉम हर?”
“सेम पद्मराजन स्टोरी.”
“मी नेमकी काय मदत करु शकतो.”
“सर हा त्रास बंद व्हावा , एक तर प्रियदर्शनी ला दुसर्या ग्रुप मध्ये शीफ्ट करा किंवा आम्हाला तरी”
“ठीक आहे, बाय द वे .. आणखी कोणा कोणाच्या अशाच तक्रारी आहे..”
“सगळ्यांच्याच म्हणजे आरती, मनाली, ज्योथी, दिपीका, भैरवी, नीता, शाल्मली..”
“बास … बास म्हणजे सगळाच ग्रुप त्रस्त आहे तर..”
“अनफॉरच्युअनेटली, इट इज ट्रू सर..”
“सेजल, रिलॅक्स , मी बघतो या इश्शू कडे.. गिव्ह मी सम टाईम…”
“थँक यू सर”
“ओ के , ये मे गो नाऊ , बट लिसन, आता कोणाशी यावर चर्चा / गॉसिप्स करु नकोस , इज दॅट क्लिअर ?”
“येस सर .. थँक यू सर… गुड डे सर”
“यू आर वेलकम”
काय होता सेजल चा प्रॉब्लेम?
श्रीकांत गुप्ते सरांनी तो कसा सोडवला ?
आणि ह्याचा ज्योतिषाशी काय संबंध ?
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुहास जी हि कथा काल्पनिक आहे कि सत्य घटनेवर आधारित ? असो पण राग मानू नका आपण आपले थरारक व अतींद्रिय शक्ती गूढ विद्या इ . बाबत अनुभव सांगत आहात त्यामुळे अशा कथा वाचण्यात रस वाटत नसून आपले बाबतीत पुढे काय घडले असेल याचीच उत्सुकता वाटते आहे .बाकी हे माझे वैयक्तिक मत आहे . बाकीच्यांना आवडत असेल तर हा भाग अलाहिदा !! धन्यवाद .
स्वप्नील जी,
मी जे लिहतो आहे हे पूर्ण सत्य आहे, मला स्वत:ला आलेले अनुभव आहेत … विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.
सुहास गोखले
सुहास जी आपल्याला आलेल्या अनुभवांचे बाबतीत माझ्या तरी मनात काहीही शंका नाही . तसेच मलाही यासारख्या विषयांची आवड व अभ्यास आहे .धन्यवाद !