सकाळी बरोबर साडेदहाला मनप्रित श्रीकांत सरांच्या केबिन मध्ये होती, पद्मराजन आला नाही पण त्याने श्रीकांत सरांना त्याबद्दल आधीच कल्पना दिली होती. अर्थात पद्मराजनची उपस्थिती आवश्यक नव्हतीच.

“येस मनप्रित , आज आपण प्रियदर्शनी बद्दल चा डिसीजन घ्यायचा आहे. ..”

या लेख मालिकेतले आधीचे भाग इथे वाचा…

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ४

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ३

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – २

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १

“येस सर.. आपण काय निर्णय घेतला आहे ते जाणून घ्यायची मला कमालीची उत्सुकता आहे “

“आपल्याला चांगली माणसे मिळवून थांबायचे नाही तर त्यांचा चांगला वापर करुन घ्यायचा आहे आणि अशी माणसे ‘लॉन्ग टर्म’ आपल्या बरोबर राहतील असेही बघायचे आहे.. प्रियदर्शनी सारखी टॅलंटेड कॅन्डीडेट आपण गमवायची नाही. “

“सर..”

“असामान्य लोकां कडून असामान्य कामें करवून घ्यायला फारसे कष्ट पडत नाहीत, त्यांच्या कडून अशी असामान्य कामें कशीही होतील.. आपल्याला सामान्यां कडून असामान्य कामें करवून घ्यायची आहेत”
“या साठी आपल्याला काय करावयास पाहीजे ? ”

“…”

“सामान्यात सुद्धा काहीवेळा असामान्य गुण असू शकतात.. आपल्याला त्याचाच शोध घेऊन त्या त्याचा सुयोग्य उपयोग करुन घ्यायचा आहे.. ‘योजकस्तत्र दुर्लभः’ राईट?”
“यस सर , लक्षात आले ..”

“मला मान्य आहे , प्रियदर्शनी च्या ‘त्या’ विषीष्ट बिहेवियरल अस्पेक्ट चा सगळ्यांना त्रास होतो आहे पण आपण तोच बिहेवियरल अस्पेक्ट आपण आपल्या कंपनीच्या फायद्या साठी वापरायचा आहे.”

“मला समजले नाही सर..”

“ लुक.. आपल्याला माहीती आहे , प्रियदर्शनी अत्यंत हुषार आहे, तल्लख आहे, कामाचा जबरदस्त उरक आहे तीच्या कडे.. आणि ती एक उत्तम टीकाकार आहे ! तिच्या कडे बहीरी ससाण्या सारखी दृष्टी आहे , जर आपण तीची क्षमता सकारात्मक रित्या वापरुन घेतली तर?”

“सर”

“आपल्या आर्गनायझेशन मध्ये असे कोणते डिपार्ट्मेट आहे जिथे केवळ चूका आणि चूकाच काढल्या जातात , रादर त्या डिपार्टमेंटच्या लोकांना दुसर्‍याच्या चुका काढण्याचाच पगार मिळतो ?”

“सर असे काही डिपार्ट्मेट आपल्याकडे आहे ?”

“येस , मनप्रित , वुई हॅव ईट ..”

“डिपार्ट्मेट टु फाईंड फॉल्ट्स! सरप्रायझींग ! बट व्हाय वुई नीड सच अ डिपार्ट्मेंट इन द व्हेरी फर्स्ट प्लेस? “

“वी नीड इट, रादर , ते काम करतात म्हणजे आपले फॉल्ट काढतात म्हणून तर आपले पगार होतात.. अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट किडिंग”

“सर”

“मनप्रित, त्या डिपार्ट्मेटला आपण ‘क्वॉलीटी अश्युरन्स’ म्हणतो.”

“गॉश .. रिअली.. माझ्या लक्षातच आले नाही..”

“होते असे कधी कधी , सगळेच काही एम.बी.ए. त शिकवत नाही ना म्हणून..”

“आय अ‍ॅम सॉरी सर..”

“मनप्रित, या ‘क्वॉलीटी अश्युरन्स’ मध्ये आपण काय करतो.. आपल्या सर्व प्रॉडक्ट्ची कसून चाचणी घेतो.. प्रॉडक्ट १००% निर्दोष आहे याची खात्री करुनच ते आपण कस्ट्मर्स कडे पाठवत असतो.. एखादा प्रॉड्क्ट डिफेक्ट आख्ख्या कंपनीचे रेप्युटेशन , मार्केट शेअर धुळीस मिळवू शकतो.. “

“यस सर , आय अ‍ॅम गेटींग ईट..”

“म्हणूनच ‘क्वॉलीटी अश्युरन्स’ मध्ये काम करणारा प्रत्येक जण बहीरी ससाण्या सारखी दृष्टी असलेला पाहीजे.. तसेच तो कमालीचा न्यूट्रल असला पाहीजे.. कोणते प्रॉडक्ट , कोणी डेव्हलप केलेय , कोण मॅनेजर आहे , डिलिव्हरी डेट काय आहे .. याच्याशी त्याला काहीही देणे घेणे नसावे.. इनफॅक्ट काहीसे विनोदाने असे म्हणता येईल की एकही प्रॉडक्ट कंपनीच्या बाहेर जाऊ देणार नाही अशा प्रतिज्ञा करुनच त्याने काम केले पाहीजे. “

“यस सर”

“प्रियदर्शनी या कामा साठी टेलर-मेड आहे !”

“माय गॉड .. हे माझ्या लक्षातच आले नाही.. इनडीड .. प्रियदर्शनी सिम्स टु बी द फिटेस्ट कॅन्डिडेट फॉर सच अ जाब..”

“देअर यू आर, मनप्रित… लेट अस मूव्ह प्रियदर्शनी टु ‘क्वॉलीटी अश्युरन्स’.. दी मोस्ट नॅचरल हॅबीटॅट फॉर हर !”

“येस सर”

“मी ‘क्वॉलीटी अश्युरन्स’ चा हेड जॉय बॅनर्जी शी आज सकाळीच बोललोय.. ही इज मोअर दॅन हॅपी टू अकॉमोडेट प्रियदर्शनी, पद्मराजन सुद्धा खुष होईल त्याच्या ग्रुपचा प्रॉब्लेम सुटला म्हणून..”

“एक्सलंट आयडिया सर.. आय वुईल टेक केअर ऑफ दी प्रोसिजर सर..”

“डोंट गेट एक्सायटेड मनप्रित..”

“सर ?”

मौसी तैयार असून काय उपयोग ? बसंती पण तैयार असायला हवी ना?  व्हॉट अबाऊट प्रियदर्शनी ?”

“सर , आय गाट ईट .. आपला ‘क्वॉलीटी अश्युरन्स’ ग्रुप म्हणजे ‘सॉफ्टवेअर टेस्टींग.. आणि इथे काम करायला कोणीच तयार नसते … दॅट जाब इज परहॅप्स द लास्ट चॉईस फॉर एवरबडी..”

“येस मनप्रित , ‘सॉफ्टवेअर टेस्टींग’ असाईनमेंट कोणालाच नको असते , जबरदस्तीने ते काम करवून घ्यायला लागते.. काहीसे विनोदाने म्हणता येईल की आपले सॉफ्ट्वेअर इंजिनियर्स एकवेळ टॉयलेट क्लिन करायला तयार होतील पण सॉफ्टवेअर टेस्टिंग़ कर म्हणालो तर करणार नाहीत! इतका हा जाब लोकांना नकोसा असतो.. .प्रियदर्शनी देखील याला तयार होणार नाही.. बट ईट ईज नाऊ युअर जाब टू कन्व्हीन्स हर..”

“डोंट वरी सर , आय कॅन हँडल हर..”

“दॅट्स लाईक अ गुड गर्ल ..बाय द वे .. हे तुझे इयरिंग खूप छान आहे … व्हेअर डिड यु परसेस ईट.. आय वुड लाईक टू प्रेझेंट समथिंग सिमिलर टू माय बेटर हाफ !”

………

………

………

मनप्रित ने आपले काम चोख पार पाडले.. अंदाज केल्या प्रमाणे प्रियदर्शनी ‘सॉफ्टवेअर टेस्टींग’गुप मध्ये जायला तयार नव्हतीच पण मनप्रित ने बरेच समजाऊन तिला तयार केले.

प्रियदर्शनी ‘सॉफ्टवेअर टेस्टींग’ ला जॉईन झाली, सुरवातीला थोडी नाराज असलेली प्रियदर्शनी नंतर मात्र झपाट्याने काम करु लागली. एखाद्या क्रिकेट खेळाडूने होम पीच वर आरामात खेळावे तसे तीचे झाले.. तीच्या ‘फॉल्ट फायंडिंग’ या नैसर्गीक गुणधर्माला अत्यंत अनुकूल आणि पोषक असे काम आणि वातावरण मिळताच अक्षरश: सुरवंटाचे फुलपाखरू झाले!

प्रियदर्शनी जात्याच हुषार होती , त्यात आता तीला मनाजोगे काम मिळाल्याने तीने झपाट्याने प्रगती केली, तिचा दोन वर्षाचा ट्रेनींग पिरियड कमी करुन एका वर्षाचा केला गेला . इतकेच नव्हे तर ते वर्ष पूर्ण होताच तीला एक प्रमोशन देतच नोकरीत कन्फर्म केले गेले…

सेजल आता तिला ‘प्रियदर्शनी मॅम’ म्हणते !

एका सत्यघटने वर आधारीत !

क्रमश:

“भाऊ , स्टूरी फसकलास हुती पर मला येक समजले नाय .. या समद्याचा जोतिष शी काय संबंध ? “

“सद्या, मर्दा  शेनका बरी काढून रायलास बे..”

“भाऊ आता तुमच्या संगटीत राऊन यवडे बी कळनां का काय आमाला..”

“सांगतू ….  या स्टूरी चे ज्योतिषाशी काय कणेक्शन हाये ते समदे बैजवार सांगतो.. पण म्होरल्या भागात … पयला एक ‘चा’ सांग कड्ड्क पायजेलाय म्हणावं आनी आपले त्ये नेहमीचे काय ?”

“तर भाऊ.. ‘चा’ कदीचा सांगीटलाय , गन्या  चा घेऊन येतच आसल.. आनी पुडि चे म्हनाल तर ती काय टेबला वर डाव्या अंगाला ..चुणा बी हाय संगट..”

“लई गुणाचा तू , आता कसा शाण्या सारखा वागलास , मग मधेच काय अंगात येत अस्ते रे बेन्या  ?”

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.