श्रीकांत सर आता काय सांगणार याची पद्मराजन आणि मनप्रित यांना कमालीची उत्सुकता लागून राहीली होती. काही क्षण शांततेत गेले…

या लेख मालिकेतले पहीले भाग इथे वाचा…

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ३

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – २

निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १

“पद्मराजन आणि मनप्रित ,   एखाद्या व्यक्तीला कामा वरुन काढून टाकणे हा काहीसा अप्रिय निर्णय आहे . एक व्यक्ती आपल्या पे-रोल वर आहे असे दिसत असले तरी त्याचे कुटुंब किंवा त्याच्यावर अवलंबून असलेले पण अप्रत्यक्षात आपल्या पे-रोल वर असतात हे विसरता कामा नये. जेव्हा एखाद्याला आपण कामावरुन काढून टाकतो तेव्हा त्याच्या बरोबर त्याच्या कुटुंबाला ही आपण उघड्यावर पाडत असतो. तेव्हा एखाद्याला कामा वरुन काढून टाकणे हा आपला अगदी शेवटचा पर्याय असला पाहीजे, ते पाऊल उचलण्या पूर्वी आपण उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार हा केलाच पाहीजे. मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येत आहे का? ”

“येस सर..”

“या प्रश्नाला आणखी एक बाजू आहे… तुम्हा दोघांनाही माहीती आहे की चांगले टॅलंट मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो ते मिळवणे हे किती अवघड आहे आणि त्याच बरोबर असे मिळालेले चांगले टॅलेंट टिकवून ठेवणे त्याहुन ही अवघड आहे…”

“यस सर ..”

“पण यापेक्षा ही मोठी अवघड गोष्ट कोणती असेल ती सांगता येईल का?”

“….”

“नुसती चांगली टॅलंटेड , कॅप्याबल माणसें पे-रोल वर असून चालणार नाही तर त्या टॅलंटचा आपल्याला योग्य तो उपयोग ही करुन घेता आला पाहीजे….. ‘Right person, Right place, Right time ‘  ही  त्रिसुत्री आपण लक्षात घेतली पाहीजे .”

” दॅट्स व्हेरी ट्रू सर”

“तुम्ही दोघे ही नंदीबैला सारखे माना हलवताय … पण हे मी का सांगतोय ते तुमच्या लक्षात येते आहे का ?”

“……..”

“लेट अस लूक अ‍ॅट प्रियदर्शनी.. “

“सर”

“मनप्रित, तुझे तिच्या बद्दलचे अ‍ॅसेसमेंट स्पॉट-ऑन आहे. शी इज हायली इंटीलिजंट, हायली एफीशीयंट आहे.. या ट्रेनीज चे बेसीक इंडक्शन ट्रेनिंग संपले तेव्हा त्यांचे रिपोर्टस माझ्याकडे आले होते त्यात ही गोष्ट स्पेसीफीकली हाय लाईट करण्यात आली होती.. प्रियदर्शनी च्या बाबतीत तर ‘पर्सन टू वॉच अ‍ॅन्ड ग्रुम’  असा खास रिमार्क होता ..”

“पद्मराजन , यू माईट बी नॉट नोईंग इट बट प्रियदर्शनी सारखी यंग स्टार आपल्या ग्रुपमध्ये असावी अशी काही प्रोजेक्ट मॅनेजर्सची मागणी होती. “

“… “

“मनप्रित,  आय डोंट नो व्हेदर यु नोटिस्ड इट ऑर नॉट बट सेजल आणि ग्रुप ने जी उदाहरणें दिली त्यावरुन एक मात्र लक्षात येते , ते म्हणजे प्रियदर्शनी चे ऑब्जर्व्हेशन एकदम मायन्युट तर आहेच शिवाय बर्‍याच बाबतीत तिच्या कॉमेंट्स अचूक असतात … हिटींग द बुल्स आय.”

“येस सर , इनफ़ॅक्ट , सेजल आणि इतर ग्रुप मेंबर्स नी हे मान्य केले आहे , दो रादर रिलक्टंटली..”

“म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल की प्रियदर्शनी चे ऑब्जर्व्हेशन बरोबर आहे , परहॅप्स तिचे इंटेशन सुद्धा जेन्युईन असेल… ती चुकत आहे ते तीच्या डिलिव्हरी मेथड मध्ये..”

“राईट सर ..”

“सध्याच्या रिसोर्स क्रंच च्या जमान्यात, प्रियदर्शनी सारखे टॅलंट आपण वाया घालवायचे?”

“आय अ‍ॅग्री सर , पण एंटायर ग्रुप इज सफरींग बिकॉज ऑफ हर अ‍ॅटीट्यूड प्रॉब्लेम ”

“पण म्हणून तिला फायर करायचे हे सोल्यूशन मला पटत नाही..”

“सॉरी सर , बट आय अ‍ॅम क्लू लेस.. “

“असे पाहा, प्रियदर्शनी अत्यंत हुषार आहे, तल्लख आहे, कामाचा जबरदस्त उरक आहे आणि ती एक उत्तम टीकाकार आहे ! तिने केलेल्या टीका-टीप्प्णी , कॉमेंट्स जरी समोरच्या व्यक्तीला बोचर्‍या वाटल्या तरी, प्रियदर्शनी एक ज्याला आपण ‘नेकेड ट्रूथ’ किंवा ‘आय ओपनर ‘  म्हणतो तेच तर सांगत असते..”

“तिच्या कॉमेंट्स कडे बघितले तर लक्षात येईल की तिने जे काही ताशेरे ओढलेत, ज्या चूकां दाखवून दिल्यात त्या आपल्या कधी लक्षातच आल्या नाहीत .. . त्याबाबतीत प्रियदर्शनी कडे बहीरी ससाण्या सारखी दृष्टी आहे , जर आपण तीने केलेली टीका सकारात्मक रित्या घेतली तर आपल्याला आपल्यातले बरेच डीफेक्ट्स दूर करायला किंवा कमी करायला निश्चीत मदतच होणार आहे..”

“सर ही बाब आमच्या लक्षातच आली नाही..”

“डोंट फिल गिल्टी, काही गोष्टी अनुभवातूच येतात.. तजुर्बा म्हणतात त्याला..”

“सर..”

“तुम्हाला ते संस्कृत सुभाषित माहीती असेलच ना …

अमंत्रम्‌ अक्षरं नास्ति , नास्ति मूल मनौषध‍म्‌ ।
अयोग्यः पुरुषः नास्ति , योजकस्तत्र दुर्लभः॥

मंत्रात ज्याचा उपयोग करता येत नाही असे एकही अक्षर नाही. ज्याच्यात औषधी गुणधर्म नाहीत अशी एकही मूळी नाही. सर्वथः अयोग्य असा कोणीही पुरुष (स्त्री) नाही पण ह्या सगळ्यांचा योग्य उपयोग करुन घेणारी व्यक्ती मात्र दुर्लभ आहे. “

“नाइस सर”

“लुक, बंद पडलेले घड्याळ सुद्धा दिवसातले दोन क्षण का होईना बरोबर वेळ दाखवतच असते ना?”

“येस सर..”

“टन भर माती उपसल्या नंतर कणभर सोने मिळते… आपल्याला सोने महत्वाचे असते , माती नाही… म्हणुनच या प्रियदर्शनी चा आपल्याला योग्य तो उपयोग करुन घ्यायचाय!”

“लक्षात आले नाही, सर “

“मनप्रित, आय हॅव अ प्लॅन.. तू असे कर ..आज लेट इव्हिनिंग.. ओ नो, आज नाही जमणार… लेट अस डु वन थिंग .. उद्या सकाळी १०:३० ला आपण परत एकदा भेटू.. पद्मराजन यु टू कॅन जॉईन अस बट नॉट मॅंडेटोरी.. इज दॅट राईट?”

“शुअर सर , वुईल डू सर…थँक्यू सर”

काय घोळतयं श्रीकांत सरांच्या मनात ? काय होणार पियदर्शीनी चे ? ..

पुढच्या भागात वाचा ..

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply to सुहास गोखले Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.