सेजल तिची तक्रार सांगत होती तेव्हा श्रीकांतजींना पण हसायला आले होते पण त्यांनी मोठ्या कष्टाने ते आवरुन धरले होते ईतकेच !
या लेखमाले तला पहीला भाग इथे वाचा:
निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १
पण सेजल जाताच ते सावध झाले , सेजल आणि त्या ग्रुप मधली ही कुरबुर / असंतोष त्याचे कारण कितीही क्षुल्लक / हास्यास्पद वाटत असले तरी ते तातडीने हाताळायला हवे हे त्यांनी ओळखले. YYY पॉवर मॅनेजमेट प्रोजेक्ट ची माईल स्टोन डिलिव्हरी अगदी तोंडावर आली होती, YYY शी आणखी काही नव्या प्रोजेक्ट्स वर चर्चा चालू होती. असे असताना त्या प्रोजेक्ट वर काम करणार्या ग्रुप मध्ये कोणताही असंतोष किंवा अस्वस्थतता त्यांना नको होती.
त्यांनी पद्मराजनला भेटायला बोलावले पण त्याला ‘सेजल’ च्या तक्रारी बद्दल काही सांगीतले नाही फक्त YYY च्या माईल स्टोन डिलिव्हरी विषयी काही चर्चा करायची आहे असे सांगीतले.
पद्मराजनशी YYY च्या माईल स्टोन डिलिव्हरी विषयी काही चर्चा करुन श्रीकांतजी हलकेच ‘सेजल’च्या तक्रारी बद्दल पद्मराजनला विचारले , प्रकरण श्रीकांत सरां पर्यंत पोहोचले आहे हे कळताच तो चपापला , श्रीकांत सर लक्ष घालताहेत म्हणजे त्यांच्या दृष्टीने मॅटर सिरियस आहे हे त्याने ओळखले. लगेचच स्वत:ला सावरुन घेत त्याने अगदी सफाईदार उत्तर दिले.
“सर , तसे काही खास गंभीर असे काही नाही, रुटीन मॅटर आहे , इन फॅक्ट मामला इतका किरकोळ आहे की तो तुमच्या पर्यंत येऊ द्यावा असे मला वाटले नाही. तरी मी लक्ष ठेऊन आहे, अॅन्ड आय अॅश्युअर यु सर, सिच्येशन इज अंडर कंट्रोल सर ..”
“पद्मराजन , तुला माहीती आहेच की YYY पॉवर मॅनेजमेट प्रोजेक्ट ची माईल स्टोन डिलिव्हरी अगदी तोंडावर आली आहे , त्यातच आपण YYY शी नव्या प्रोजेक्ट्स वर चर्चा पण करत आहोत, जर या माईल स्टोन डिलिव्हरी मध्ये काही इश्शुज आले तर दॅट माईट प्रुव्ह प्रेट्टी कॉस्टली फॉर ऑल ऑफ अस..”
“आय अंडरस्टँड सर..”
“म्हणूनच ‘सेजल’ च्या तक्रारीला किरकोळ समजून त्या कडे दुर्लक्ष करुन चालणार नाही”
“येस सर”
इतक्यात श्रीकांत सरांच्या केबीन च्या दारावर टकटक झाली…
एच. आर. (H.R. ) एक्सेक्युटीव्ह ‘मनप्रित अरोरा’ दारात होती. ती काही अशीच आली नव्हती तर श्रीकांत सरांनीच तिला बोलवून घेतले होते.
“येस , कम ईन मनप्रित , वॉव … व्हॉट अ चार्मींग आऊट्लूक यंग लेडी, यू लुक प्रिट्टी ऑसम इन धिस डिजाईनर ड्रेस. इलेगंट चॉईस मनप्रित .. ”
मनप्रित अंगावरुन मोराचे पीस फिरवल्या सारखी सुखावली. श्रीकांत सरांची हीच तर खासियत होती, कधी कौतुक तर कधी एखादा खुसखुशीत विनोद करुन समोरच्या व्यक्तीला क्षणात आपलेसे करुन घ्यायचे ते.
“मनप्रित, हॅव अ सिट ..”
“थँक्यू सर..”
“मनप्रित , लेट अस गेट ऑन टु द बिझनेस क्विकली ..”
“सर”
“माझी माहीती बरोबर असेल तर … पद्मराजन च्या ग्रुप मधली ‘सेजल’ तुला काही प्रॉब्लेम संदर्भात भेटली होती…अॅम आय करेक्ट ?”
जसा पद्मराजन चपापला होता तशीच मनप्रित पण चपापली… डोळ्याच्या कोपर्यातून तिने पद्मराजन कडे पाहीले… पद्मराजन ने चेहेर्यावर पुसटसे प्रश्नार्थक भाव आणत हलकेच खांदे उडवले..
“सर , यस , मला आठवतेय, ती सेजल व्होरा माझ्या कडे आली होती…तिचे म्हणणे मी काळजीपूर्वक ऐकले होते . मॅटर फारसे गंभीर नव्हते.. आय मीन मला तरी तेव्हा तसे वाटले नाही, म्हणून तिला थोडेफार काउन्सेलिंग केले.. आय बिलिव्ह .. शी लुक्ड क्वाईट रिलिव्ह्ड देन.. तेव्हा प्राब्लेम सुटला असे वाटले मला ”
“मनप्रित, तसे झाले असते तर फार बरे झाले असते पण दुर्दैवाने या वेळी तुझे आणि पद्मराजनचे ही जजमेंट काहीसे चुकले असे दिसतेय”
“सॉरी सर..” मनप्रित आणि पद्मराजन जवळजवळ एकदमच बोलले!
“कूल… प्रॉब्लेम गंभीर नाही पण ट्रीकी आहे”
“…”
“मनप्रित टेल मी तुझे नेमके असेसमेंट काय होते.. डु यू किप एनी नोटस ?”
“यस सर “
“देन टेल मी ..”
“ सर , या ग्रुप मध्ये पन्नास ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर्स आहेत , वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ..पॅन इंडिया… वेगवेगळी भाषा, वेगवेगळे प्रांत , वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्स . त्यात सगळ्यांचा हा पहिलाच जॉब , बरेचसे आपल्या घरा पासून / आई वडीलां पासून प्रथमच दूर राहात आहेत , काही चक्क होम सीक झाले आहेत, राहाण्याची जागा, रुम मेट्स, मेस , ट्रान्स्पोर्ट एक ना दोन , अनेक पर्सनल प्रोब्लेम्स सोडवत आहेत सगळे. काही जण मना सारखा प्रोजेक्ट मिळाला नाही म्हणून नाराज आहेत , एक दोघांना तर ए.सी. चा त्रास होतोय !… ही सगळी फस्ट्रेशन्स आता बाहेर पडत आहेत. यांना थोडा अवधी मिळाला की रुळतील सर्वजण असे मला वाटले म्हणून मी ही तक्रार फारशी गांभिर्याने घेतली नाही… न्यू जॉईनीजचा टीपीकल प्रॉब्लेम आहे हा… आमची एक स्टॅडर्ड काउन्सेलिंग स्क्रिप्ट आहे … “
“आय गाट ईट..”
मनप्रितला मध्येच थांबवत श्रीकांत सर म्हणाले..
“व्हेरी लॉजीकल, व्हेरी थॉटफुल मनप्रित, गुड ऑबजर्वेशन ..पण तु म्हणतेस तशी कारणे असली तरी आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही..”
“येस सर..”
“एक लक्षात घ्या, ही सेजल’ ची एकटीची तक्रार नाही… सेजल सारखीच तक्रार असलेले बरेच जण , इन फॅक्ट अलमोष्ट एव्हरी बडी इन द ग्रुप इज कम्प्लेनिंग..”
“….”
“मनप्रित याचा ग्रुप च्या युनिटी वर , morale वर आणि फायनली ग्रुपच्या प्रॉडक्टीव्हीटी वर परिणाम होऊ शकतो … आर यू गेटींग माय पॉईंट ?”
“यस सर , गॉश … माय ग्रॉस ओव्हरसाईट … सॉरी सर..”
“ठीक आहे, मनप्रित , आता हा प्रॉब्लेम कसा काय सोडवता येईल आपल्याला..पद्मराजन यु टु कॅन पिच ईन … टु हेडस आर बेटर…”
इतक्या वेळ गप्प बसलेल्या पद्मराजन ने तोंड उघडले …
“सर , ते म्हणतात ना, एक सडलेला आंबा आख्खी आढी नासवतो ..आपण हा ‘सडा आम’ च बाहेर काढू..”
“येस , ते एक सोल्युशन असू शकते… “
’एक ‘ या शब्दावर जोर देत श्रीकांत सर म्हणाले आणि थांबले….
पद्मराजन आणि मनप्रित दोघेही गेले तीन वर्षे श्रीकांत सरांच्या हाताखाली काम करत असल्याने सरांच्या बोलण्यातली खोच लक्षात यायला त्यांना वेळ लागला नाही. हे सरळ होते की पद्मराजन ने सुचवलेले सोल्युशन श्रीकांत सरांना फारसे रुचले नव्हते , त्यांना दुसरे कोणते तरी सोल्युशन अपेक्षित होते…
मनप्रित आणि पद्मराजन एकमेका कडे बघायला लागले..
“ओके गाईज , मला दुसरी एक मिटींग आहे, सो लेट अस ब्रेक फॉर नाऊ… तुम्ही दोघे जरा विचार करा , आपण पुन्हा भेटू… डे आफ्टर टूमारो.. सेम टाइम, सेम प्लेस.. अॅन्ड वन थिंग, ग्रुप मधल्या कोणाशीही काही बोलू नका.. इज दॅट क्लियर ..”
“यस सर..”
“थँक्यू बोथ अॅन्ड हॅव अ गुड डे..”
“यु टू सर..”
मिटींग तर संपली पण श्रीकांत सरांना अपेक्षित असलेले दुसरे सोल्युशन कोणते असेल ? … आणि मुळात ‘सेजल’ आणि ग्रुपची नेमकी तक्रार काय होती?
ते पुढच्या भागात वाचा…
क्रमश:
(ह्यो गण्या कुटे गेला म्हनायचा … ‘चा’ आनायला म्हनूंशा धाडलाता.. कवाचान गेलंय … इस्टुरी संपली तरी पत्त्या नाय… या बेन्याला यकदा पोकल बांबूचे फटकेच देयाला पायजे… आता ‘चा’ कदी येनार कोन जानं , तवर येक बार भरतो ..सद्या दे ती गाय छाप ची पुडी.. आरं लेका चुना बी देयाचा असतो संगट … तू बी लेका त्या गन्या सारखाच की रं ऑ..)
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020