परवा दोन दिवसाचा ‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप केला , बरेच शिकायला मिळाले. पहीला दिवस थिअरी सेशन्स होते , दुसर्‍या दिवशी पांडव लेणी परीसरात फोटो वॉक (प्रॅक्टीकल ट्रेनिंग’) होते.

त्या वॉक ची काही प्रकाश चित्रे.

माझा मुलगा चि. यश पण या ट्रेनिंग मध्ये सहभागी होता, त्यामुळे आमचा नवा नायकॉन D5200 त्याच्या हातात होता, त्यामुळे काही प्रकाशचित्रे मी माझ्या नोकिया 730 सेल फोन मधून घेतली आहेत (हा फोन चांगली प्रकाशचित्रे घेतो हे वेगळे सांगायला नको)

माझा  हा फटू  चि.यश ने टिपला आहे,  D5200 वापरुन ,  चांगला आला आहे.


गुर्जी फटू कसे काढायचे याचा गुरु मंत्र देताना (नोकिया 730 )


(वरील फटू त  उजव्या अंगाला यल्लो टी शर्ट मध्ये आहे तो माझा मुलगा चि. यश)पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पे विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन. हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे.

( संदर्भ: मिसळपाव.कॉम )आम्ही गेलो होतो तेव्हा हे १० क्रमांकाचे लेणे कुलुपबंद होते ( नंतर १० च्या सुमारास कुलुप उघडले असे कळले) ,  चि. यश ने टिपलेली या विहारतल्या मध्यवर्ती शिल्पाची प्रतिमा !  …(D5200)

हा एक खूपच चांगला चांगला प्रयत्न म्हणावा लागेल कारण फ्लॅश किंवा कोणताही इतर प्रकाश स्त्रोत न वापरता उपलब्ध असलेल्या उजेडात हे प्रकाशचित्र घेतले आहे.  त्यासाठी बरीच कसरत करावी लागली , कॅमेरा अगदी त्या कुलुपबंद जालीला टेकवून फटु घ्यायला लागला , पण चांगले जमून आलेले प्रकाशचित्र आहे हे

पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेणीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे. “सातवाहन” राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो. यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.
संदर्भ: विकीपेडीया)

ट्रेनिंग  संपले , चला घरी

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   उमेशजी,

   श्री. उमेशजी ,

   ज्योतिषाचे क्लास लौकरच सुरु करत आहे, सध्या या क्लासच्या व्हीडिओचे शुटिंग चालू आहे त्याचे काम पूर्ण होताच त्याबाबत घोषणा करेन. मानधनाचे त्याच वेळी कळवेन.
   धन्यवाद

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.