व्यवसायाचा एक भाग म्हणून मला रोज बरेच टायपिंग करावे लागते , त्यामुळे चांगला किबोर्ड हाताशी (की बोटांशी !) असणे अत्यावश्यक आहे हे माझ्या लक्षातच आले नाही !
मी ज्यांना ‘चांगले किबोर्ड समजत होतो ते चांगले नव्हते हे लक्षात यायला वेळ लागला (या बाबतीत मी काहीसा डोक्यावर पडलेला आहे हे मान्य !) ..
मायक्रोसॉफ्ट , लेनेवो, एच-पी अशा तीन दिग्गजांनी बनवलेल्या कि-बोर्ड नी एका पाठोपाठ अंग टाकले आणि जाताना जखमेवर मीठ चोळल्या सारखे कमालीची बोटे दुखी ( हा डोकेदुखी , पोट दुखी , पाठदुखी, अंगदुखी सारखाच प्रकार आहे !) सप्रेम भेट देऊन गेले. तेव्हा धेनात आलं जी ! (पण हे तिनही कि-बोर्ड काय देखणे होते म्हणून सांगू , त्यातल्या पांढरा लेनेवो कि-बोर्ड तर डोळ्यांचे पारणे फेडील असा होता , पण कामाचे काय ? )
पण आता ‘देरी से आये दुरुस्त आहे’ प्रमाणे चूक सुधारण्यात आली आहे.
‘टी.व्ही.एस’ चा ‘ई- भारत गोल्ड’ (कै च्या कै नाव ठेवलेय नै ) फुल्ल मेकॅनिकल , चेरी ब्लू कीज असलेला, (बोले तो ) झक्कास कि-बोर्ड चक्क २००० रुपये मोजून विकत घेण्यात आला आहे!
क्काय , २००० रुपये किबोर्ड ला ? ते सुद्धा १९८० चे डिझाईन , साध्या वायर वाल्या कि बोर्डला ? डोक्यावर पडलास ते दिसतच आहे रे भाया , पण इतके पडायचे ? अरे . २००-४०० मध्ये काम भागत असताना २००० रुपये … काय येडा होऊन रायला का बे? …
बस्स का राव , असे उगाचच २००० उडवायला मी काय अलिबाग हून आलेलो नाय … !
येक डाव हा किबोर्ड आला, म्हंजे अॅमेझॉण वाल्यांनी पाठवला की , टेस्टुन बैजवार सांगतो..!
(सोबतचा फटू ना.? अवो तो चक्क इंटरनेट वरुन ढापलेला आहे, हॅ हॅ हॅ )
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020