हॅ हॅ  हॅ,  खेळा  बद्दल नै काय .. मी एक नवा पी.सी.  अ‍ॅसेंबल केला  त्या बद्दल बोलतोय मी !

बरेच व्हिडीओज तयार करायचेत , त्यासाठी कॅमेर्‍या बरोबरच पोष्ट प्रोसेसिंग करायला तगडा पी.सी. पण पायजेल!

माझा सध्याचा पी.सी. आपला सरळ साधासुधा मध्यमवर्गीय त्याला हे व्हीडीओ प्रोसेसींग काय झेपणार म्हणा !  म्हणून नवाच पी.सी. असेंबल केला झाले…

सग्ळे पार्ट अ‍ॅमेझॉन , लोकल मार्केट आणि आपले नेहमीचे लॅमिंग्टन रोड मार्केट मधून खरेदी केले !

सि.पी.यु.


AMD FX 6-Core Black Edition FX-6300 3.5GHz Processor

या बाबतीत ख्वॉव आसमान वाले होते पण खिशाचा सल्ला घ्यावा लागतो तो घेतला आणि हा AMD चा शीपीयु फायणल केला.
मदरबोर्ड

शिपीयु ठरला की मदरबोर्ड चा चॉईस  करणे सोपे जाते , इथेही खिशाचा अंदाज घेऊन हा गिगाबाईट चा मदरबोर्ड घेतला.

Gigabyte GA-78LMT-USB3 AM3+ AMD DDR3 1333 760G HDMI USB 3.0 Micro ATX Motherboard
रॅम , 8 जी.बी.

RAMCorsair Vengeance 8GB DDR3 Memory Kit (CMZ8GX3M1A1600C10)

पॉवर सप्लाय

Corsair VS Series VS550 – 550 Watt SMPS

जरा बजेट सैल करुन , बर्‍यापैकीच घेतला.  हो, नंतर तरास नको पायजेल.
हार्ड ड्राईव्ह
WD 1TB Blue Desktop Internal Hard Drive  (WD10EZEX)

इथे सिगेट का वेस्टर्न डीजीट्ल हा संभ्रम पडला खरा पण शेवटी मागचे काही अनुभव जमेस धरता , वेस्टर्न डिजीटल चा ब्लू ड्राईव्ह 1 TB चा नक्की केला.

किबोर्ड आणि माऊस

Logitech MK220 Wireless Keyboard and Mouse Combo (Black)

वायरलेसच पायजेल आणि लॉजीटेक च पायजेल, मग पुढचे काम सोपे होते , मी मुद्दाम लहान फूट प्रिंटवाला किबोर्ड घेतला , कारण व्हीड्यो  एडीटींग़ मध्ये टायपिंग पेक्षा माऊस क्लिकचेच काम जास्त ! (टायपिंग जास्त असते तर मी सरळ TVSE चा भारत गोल्ड  किबोर्ड नसता का घेतला !)

डब्बा


Deepcool Tesseract Bf Mid Tower Computer Case (Black)

आता हे स्गळे कोंबायला काहीतरी खोकें हवे ना?  मग त्यातला त्यात बरा असा हा मिडी टॉवर निवडला
डीव्हीडी ड्राईव्ह

मला फारसा लागत नाही, शिवाय माझ्या कडे युएसबी वाला एअक्स्टर्नल ड्राईव्ह हायेच ना , त्ये बेणं कशाला मग !

मॉनीटर


फुल यचडी पायजेल, एचडीएमआई पोर्ट पायजेल, आणि मोठ्ठा पायजे , हे सगळे सस्त्यात पण पायजे … हा बेनक्यू चा मॉनीटर फिट्ट बसला बजेटात ! 24 इंचाचा डिस्प्ले आहे, एकदम घळघळीत , ऐसपैस !
साऊंड रिकॉर्डिंग़

मायक्रोफोन

ATR USB – CopyAudio-Technica ATR2500_USB Cardiod Condenser Mircrophone

इथे बरेच ऑप्शन होते पण ‘ऑडीओ टेक्नीका’ वर माझी श्रद्धा आहे, तेव्हा  मायक्रोफोन घेईन तर ऑडीओ टेक्नीकाचाच  हे वेगळे सांगायला हवे का ?


Robustrion Foldable Desktop Microphone Tripod Stand with Shock Mount Mic Holder and Double-Net Pop Filter

ह्याला पॉप फिल्टर आणि शॉक माऊंट लागणार … ते पण घ्येटलं हाता सरशी !

ह्याच्याच जोडीला  हेड वॉर्न आणि लॅपेल मायक्रो फोन्स सुद्धा  घेतले

हेड वॉर्न

PylePro PMHM2 Omni-directional Head Worn Microphone, Beige
लॅपेल

me52Olympus ME-52W Noise Canceling Microphone

रेकॉर्डिंग युनिट


Sony ICD-PX440 Professional compact voice recorder

सोनी ! चांगली कंपणी आहे …

तर हा अस्सा जमवला सेट अप...

बाकी ऑडीओ – व्हीडिओ पोस्ट प्रोसेसिंग सॉफ्टवेअर इ. बद्दल – नंतर सवडीने लिवतो…

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  नवीन नवीन खरेदी. हार्दिक अभिनंदन !!!

  0
 2. Himanshu

  अभिनंदन….छान सेटप….रॅम १६ जीबी असली तर अजुन मजबुत होईल….अर्थात रॅम नंतरही अपग्रेड करता येईल.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद हिमांशुजी,

   तसा फार ग्रेट सेट अप नाही, ८ जीबी रॅम पुरेल असे वाटते , कमी पडल्यास दुसरे कार्ड बसवता येईल.

   सुहास गोखले

   0
 3. Prashant

  Dear Suhasji,
  Go for 16GB RAM. It will certainly make a difference.
  Kalave lobh asava,
  Aapla,
  Prashant

  0
 4. Anant

  Namaskar Suhasji,

  Welcome back – we missed you.
  Solid shopping !! I personally love AMD processors, so great choice 🙂
  Looks we are going to even better photos and videos now.
  PIctures of Cat are great – Tell him, he has good eye for photography – keep it up !!

  Thanks,
  Anant

  0
  1. सुहास गोखले

   श्री अनंतजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद ,

   क्यामेरा ख़ास विडिओ साठीच घेतला आहे , माझा मुलगा सध्या फोटोग्राफी शिकतो आहे , पण चांगला पिकअप आहे. मी आता ज़रा माझ्या ट्रेनिग प्रोग्राम मधून मोकळा होतोय तेव्हा लिखाण पूर्ववत सुरु होईल अशी आशा आहे .

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.