मधुमेह बरा होतो का? याचे उत्तर देणे अवघड आहे, एक फार मोठा व्याप्ती असलेला विषय आहे हा , त्या बद्दल नंतर कधीतरी सविस्तर पणे चर्चा करु!

मधुमेह बरा होतो / नाही याचा निकाला लागत नाही तो पर्यंत निदान मधुमेही व्यक्ती आपली रक्त शर्करा नियंत्रणात तर नक्कीच ठेऊ शकते ना?

त्याबद्दलची आजची ही पोष्ट .

ज्याचा मधुमेह नियंत्रणात नाही त्याच्या बाबतीत रक्तशर्करा अशी असू शकते:

( हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे , प्रत्येक मधुमेह्याच्या रक्तशर्करेचा आलेख वेगवेगळा असू शकतो )

‘लाला रंगातला आलेख पहा’

मधुमेह नियंत्रणात नसला की ‘फास्टिंग शुगर’ (सकाळी उठल्या बरोबर लगेचच, किमान आठ तास काही न खाता) असते साधारण १२५ ते १५० च्या दरम्यान !

मग हा मधुमेही नऊ च्या सुमारास नाष्टा करतो, त्या नंतर त्याची शुगर वाढायला सुरवात होते आणि पाहता पाहता , तासाभरातच ती २५० ची पातळी ओलांडते! हे शिखर गाठल्या नंतर रक्तातली साखर हल्लू हल्लू खाली उतरायला सुरवात होते आणि जर नाष्ट्या नंतर काहीही खाल्ले नाही तर (च) ही साखर साधारण तीन – चार तासां नंतर म्हणजे दुपारी १२ – १ च्या सुमारास ती कशीबशी १५० च्या आसपास येते, एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झालेली असल्याने आपला मधुमेही जेवण घेतो. जेवल्या नंतर ही १५० च्या आसपास असलेली साखर पुन्हा उसळी घेते आणि अवघ्या एका तासात ती पुन्हा २५० ला गवसणी घालते!

ही २५० साखर खाली यायला पुन्हा तीन – चार तास लागतातच पण तो पर्यंत चार वाजताचा चहा , बिस्कीट , केक इ होतेच !(हा चहा – केक चा भाग ग्राफ मध्ये दाखवलेला नाही), मग काय , कशीबशी १५०-१६० पर्यंत खाली आलेली साखर पुन्हा २०० च्या वर जाते ! काही मधुमेही त्यानंतर पुन्हा ६ च्या सुमारास काही बाही खातात , आता तर साखर २७५ च्या वर जाते , ती कशीबशी २०० च्या आसपास येते न येते तोच रात्रीच्या जेवणाची वेळ , पुन्हा खाणे , पुन्हा साखर २५० च्या वर !

असा हा मधुमेही रात्री ११-१२ वाजता झोपतो तेव्हा रक्तातली साखर १७५ – २०० अशी असू शकते, झोपेच्या सात – आठ तासात ती थोडी फार कमी होते आणि दुसरे दिवशी सकाळी ती १२५ – १५० अशी असते .

आता नवा दिवस सुरु , आणि कालचेच दुष्ट चक्र पुन्हा नव्या जोमाने फिरायला लागते.

म्हणजे ज्याचा मधुमेह नियंत्रणात नाही त्याची साखर नेहमीच अशी १५० ते २५० या पातळीवर रहात असते . केव्हातरी सहा महिन्यात / वर्ष भरात एकदा फास्टींग आणि पीपी शुगर टेस्ट करणार्‍याला या बेफिकीर मधुमेह्याला हा भाग कसा कळणार ?

*******

आता निळ्या रंगातला आलेख पाहा, हा आलेख जो मधुमेही आपल्या मधुमेहा बाबत सतर्क आहे , योग्य ती काळजी घेत आहे , काही प्रमाणात पथ्य आणि व्यायामाचे तंत्र सांभाळत आहे , रक्त शर्करा चाचणी नियमीत करत आहे, अशा मधुमेही व्यक्तीच्या रक्त शर्करेचा आहे.

या मधुमेह्याची ‘फास्टिंग शुगर’ ( सकाळी उठल्या बरोबर लगेचच, किमान आठ तास काही न खाता) असते साधारण १०० ते १२५ च्या दरम्यान ! अशी फास्टींग शुगर असणे काही चांगले आहे असे म्हणता येणार नाही पण हे एक चांगले नियंत्रण आहे !!

हा मधुमेही नऊ च्या सुमारास नाष्टा करतो, त्यानंतर त्याची शुगर वाढायला सुरवात होते पण हा मधुमेही आपले पथ्यपाणी सांभाळत असल्याने , नाष्ट्या नंतर रक्तातली साखर साधारण पणे १७५ च्या आसपास पोहोचते. हे शिखर गाठल्या नंतर रक्तातली साखर हल्लू हल्लू खाली उतरायला सुरवात होते जर नाष्ट्या नंतर काहीही खाल्ले नाही तर (च) ही साखर साधारण तीन – चार तासां नंतर म्हणजे दुपारी १२ – १ च्या सुमारास ती पूर्ववत (फास्टींग शुगर च्या जवळपास) १२५ च्या आसपास येते, पण एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झालेली असल्याने आपला मधुमेही जेवण घेतो. जेवल्या नंतर ही १२५ च्या आसपास असलेली साखर पुन्हा उसळी घेते आणि दुपारच्या जेवणा नंतर अवघ्या एका तासात ती पुन्हा १७५ ला गवसणी घालते!

ही १७५ साखर खाली यायला असेच तीन – चार तास लागतात तो पर्यंत चार वाजताचा चहा , बिस्कीट , केक इ . होतेच (हा चहा – केक चा भाग ग्राफ मध्ये दाखवलेला नाही) , कशीबशी १३० -१४० पर्यंत खाली आलेली साखर पुन्हा २०० च्या जवळपास जाते ! काही मधुमेही त्यानंतर ६ च्या सुमारास काहीबाही खातात , आता तर साखर २०० च्या वर जाते , ती कशीबशी १५० च्या आसपास येते न येते तोच रात्रीच्या जेवणाची वेळ , पुन्हा खाणे , पुन्हा साखर १७५ च्या आसपास !

असा हा मधुमेही रात्री ११-१२ वाजता झोपतो तेव्हा रक्तातली साखर १२५ – १४० अशी असू शकते, झोपेच्या सात – आठ तासात ती थोडी फार कमी होते आणि दुसरे दिवशी सकाळी ती १०० – १२५ अशी असते .

इथे या मधुमेह्याने रक्तशर्करे वर बर्‍यापैकी नियंत्रण ठेवले असले तरी साखर आत्ताही १७५- २०० या पातळीवर धडकत आहे , हे काही चांगले नाही. या पातळी वर देखील ‘मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स ‘ निर्माण होण्यास सुरवात होते. तेव्हा या मधुमेह्याला आपल्या रक्त शर्करे वर अजून चांगले नियंत्रण ठेवायला शिकले पाहीजे!

*******

आता तिसरा , काळ्या रंगातला आलेख पहा हा माझा म्हणजे ‘नब्बे ९० वाले बाबा’ च्या रक्त शर्करेचा आहे. ‘नब्बे वाले बाबा’ ने आपल्या मधुमेहा वर जबरदस्त – पोलादी (हिटलरी पद्धतीचे म्हणले तरी चालेल!) नियंत्रण ठेवले असल्याने त्याच्या रक्तातल्या साखरेचा आलेख हा ‘मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्त शर्करे’ सारखाच आहे! पण ‘बाबा’ माझा मधुमेह बरा झाला आहे असे कधीच म्हणत नाही / म्हण्णार नै.

बाबाची फास्टींग शुगर नेहमीच ७० ते ८५ च्या आसपास असते!

‘बाबा’ नाष्टा करतच नाय! पण समजा असाच कधी मधी , चुकून माकून बाबा ने नाष्टा केलाच तर त्याची शुगर जास्तीतजास्त १२५ पर्यंत वर जाते आणि दोन तासात ती पूर्ववत म्हणजे ८०-८५ च्या पातळी वर येते ! ( येते कसली ‘बाबा’ ती आणवतो !!)

बाबा दुपारचा / रात्रीचा जेवला तरी ( बाबा आठवड्यात येक दिवस काही खात पीतच नाय !) रक्तातली साखर एक तासा नंतर १३०-१४० च्या आतच असते (बाबा साखरेला त्या हद्दी बाहेर जाऊच देत नाय !) आणि दोन तासानंतर साखर पूर्ववत ८० च्या आत बाहेर येते (बाबा आणतो !)

आणि बाबा रात्री ‘गाई गाई ‘करतो तेव्हा त्याची शुगर ७० – ८० असते आणि अर्थातच दुसरा दिवस असाच छान, हेल्दी ७० ते ८५ या फास्टींग शुगरनेच होते.

 

बाबा खुस असतो !

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
 1. Prashant

  Dear Suhasji,
  What exercise do you do and what kind of diet do you have in general to control the sugar?
  Thanks,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   मधुमेही व्यक्तीला व्यायाम अत्यावश्य्क आहे पण हा व्यायाम जरा वेगळ्या प्रकराचा करावा लागतो याच एकंदर तीन भाग आहेत:

   १) कार्डिओ
   २) रक्तातली साखर जाळणे
   ३) फॅट बर्निंग

   या तीन ही प्रकाराचा व्यायाम आलटून पालटून करावा लागतो.

   कार्डिओ शरीरातले रक्ताभिसरण चांगले ठेवते, फॅट बर्निग व्यायाम हेच खरे मधुमेहा वरचे औषध आहे , त्या साठी HIIT ( High Intensity Interval Training) पद्धतीचा व्यायाम करावा लागतो. फॅट ही शरीरात आत मध्ये असते 99% मधुमेही मध्ये आतल्या सर्व अवयवांवर खास करून लिव्हर ( फॅटी लिव्हर – Non Alcoholic Fatty Liver Disease) आणि पॅन्क्रियाज वर जबरी फॅट जमलेली असते , ही व्यक्टि तशी जाड दिसत नाही , यालाच TOFI ( Thin outside Fat inside) म्हणतात , ह्या फॅटी लिव्हर / पॅनक्रियाज मुळेच मधुमेह होतो, ही फॅट उतरवा , मधुमेह नियंत्रणात आलाच म्हणून समजा ! पण आपले डॉक्टर हे सांगत नाही , ते फक्त गोळ्या / इंकेक्शंस चा मारा करत राहतात !

   मी घरी स्वत:ची लहानशी जीम्च तयार केली आहे , फ्री वेट्स ( बार बेल , डंबेल्स( बरोबरच मी Isometric पद्धतीचा व्यायाम करतो त्या साठी खास उपकरणे आहेत ( रेझिस्ट्न्स बँड्स , स्प्रिंग्ज इ).
   अर्थात या मधुमेहाने माझ्या डोल्यांवर हल्ला केला आहे , रेटीना डीटॅचमेंट्चा मोठ्ठा धोका आहे त्यामुळे काही व्यायाम प्रकार मी करु शकत नाही (करायचे नाहीत) >

   या व्यायाम विषयावर मी काही लेख नक्की लिहेन.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0
   1. सुहास गोखले

    श्री प्रशांतजी

    मी डायट या विषयावर पण सविस्तर लिहणार आहे पण माझ्या फेसबुक वॉल वर मी माझ्या जेवणाच्या ताटाचे फोटो नेहमी टाकत असतो , ते पाहीलेत तर मी काय खातो त्याचा चांगला अंदाज येईल, मला वाटते आपण माझ्या फेंड लिस्ट मध्ये नाही, फेंड रिक्वेस्ट पाठवा.

    शुभेच्छा

    सुहास गोखले

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.