“सौभाग्यवती, आज रात्री जेवायला काय आहे”
“तुम्ही सांगाल ते करुन वाढते त्यात काय..”
” जास्त काही करु नकोस, मस्त दाल तडका – जीरा भात .. पापड लोणचं बस्स एव्हढे चालेल”
“इश्श, आज सकाळीच तर दाल केली होती ना , विसरलात वाटते , आताशा फार विस्मरण होतेय हो तुम्हाला, डॉक्टरांना दाखवले पाहीजे..”
“राहीलं , मग करा आपली नेहमीची पोळी – भाजी ..”
“मुलं खाणार नाहीत , त्यांच्या साठी परत वेगळे काहीतरी करायला लागेल, त्यापेक्षा एकच काहीतरी ठरवा ना.”
“ए मग छोले कर ना, पुर्या पण तळ, बर्याच दिवसात खाल्ले नाहीत ”
“कोलेस्टेरॉल कोणाचे वाढलयं ? तळलेले पदार्थ एकदम बंद”
“मग थालीपिठं लाव खमंग, मख्खन मारके..”
“भाजणी संपलेय..”
“मग फ्रिज मध्ये अंडी असतील ना? अंडा बुर्जी बनवा की फ्स्क्लास पैकी, मी ब्रेड आणतो..”
“अहो काय हे , पुन्हा विसरलात , आज गुरुवार आहे म्हणलं , आज अंडे खाल्ले तर खड्डु महाराजांचा कोप होईल ना, वेंधळे कुठचे ..”
“मग मुळ्याचे पराठे ?”
“रात्री पराठे ? गॅसेस चा त्रास कोणाला होतोय, निस्तरायला लागते मला, तुमचे काय.”
“मग मस्त गट्टेवाली कढी बनव, आज फक्त कढी भात हाणू च्या मायला ”
“अहो राजे, कढी बनवायला दही लागते , ते सकाळीच संपलय, आत्ता रात्री कुठून आणू दही..”
“हे पण नाही ? मग काहीतरी ‘साऊथ’ चा बेत जमव, डोसे , इडली , उथ्थप्पा चालवून घेऊ त्यावरच”
“अहो ते काय लगेच होतात का , वेळ लागतो त्याला, आधी नाही का सांगायचे.?”
“माझे आई , मग निदान मॅगी तरी करुन घाल..”
“मॅगी वर बंदी आलेय , पेपर वाचता ना?”
“जाऊ दे , असे करु आज रुचिरा हॉटेल मधून मागवू काही तरी”
“सारखे हॉटेलचे खाणे बरे असते का ? घरचे चांगले सुग्रास खायचे सोडून हॉटेलचे कशाला खायचे म्हणते मी..”
“मग निदान लिंबू सरबत तरी दे करुन ”
” लिंबू नाही घरात”
“मग काय घालणार जेवायला आज?”
“तुम्ही सांगाल ते करुन वाढते त्यात काय..”
(हे पण एका ईमेल फॉरवर्ड आहे, कोणी लिहले आहे ते माहीती नाही, मूळ किस्सा हिंदीत होता , मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे आणि थोडे पाणी घालून वाढवले आहे, त्या अज्ञात लेखकाचे मनापासुन आभार)
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020