वेळ सकाळचे सहा साडेसहा , नवरा ‘जिम’  ला जायची तैयारी करुन मोठ्या प्रेमाने बायकोला उठवायला जातो, आज पासुन तीही ‘जिम’ ला येणार असते आणि मग सुरु झाला हा प्रेमळ (?) संवाद!

“ डार्लिंग, चल उठतेस ना , आपल्याला जिम ला जायचयं ”

“असे आडवळणाने सुचवण्यापेक्षा सरळ सरळ म्हण ना ‘लठ्ठ झालीस तू ”

“पण व्यायाम आरोग्याला चांगलाच असतो ना?”

“म्हणजे मी रोगी आहे, बाई गं , आज रोगी म्हणालास , उद्या वेडी ठरवून मोकळा होशील?”

“अगं तसे नाही.. जाऊ दे, नसेल तुला उठायचं तर राहु दे. झोप तु .”

“म्हणजे मी आळशी आहे , लोळत पडलेले असते असेच ना?”

“अग मला तसे काही म्हणायचे नव्हते , तुला समजले नाही”

“ मला समजत नाही ? म्हण, म्हण मला बुद्दू म्हण , मुर्ख म्हण..”

“पण मी तुला असे म्हणालो का?”

“मग मी काय खोटे बोलतेय?”

“माझे आई, उगाच ताणू नकोस.”

“झालं म्हणजे नेहमी प्रमाणे मलाच भांडकुदळ ठरवून मोकळा झालास”

“ओक्के, नको येऊस , मी एकटाच जातो जिमला..”

“ एकटाच जा , कुठ्ठे कुठ्ठे नेऊ नकोस मला . एकटाच मज्जा मार , मी गरीब बिच्चारी बायको राबत्ये आपली घरात ..”

“जाऊ दे , आता माझा ही मुड गेला, मी पण जात नाही जिम ला”

“तुलाच मुळात जायच नव्हते , न जायला काही तरी निमित्त पाहातच होतास , माझ्यावर खापर फोडून मोकळा झालास”

“माझे डोके गरगरायला लागलं..”

“कळतात बरे का ही नाटकं, म्हणे डोके गरगरते , जरा कुठे काही झालं की लागलं याचे डोके गरगरायला, इकडे मी मेले तरी तुला काय त्याचे काही नाही?”

“माझे आई आता गप्प बसायला काय घेशील?”

“बाई बाई बाई , काय हा कांगावा , आपण खोडी काढायची आणि वर मलाच गप्प बस म्हणायचे”

“बरं , मी गप्प बसतो..”

“ वा रे वा आधी आपण भांडण उकरुन काढायचे आणि अंगाशी आले की गप्प बसायचे नाटक !”

“बरं बाई , माझे चुकले मग तर झालं….”

“बघा बघा , कसा साळसुद पणाने माझी समजुत काढतोय , जसे काही मीच याला त्रास दिला”

”………”

” का का  आता का दातखिळ बसली, बोल की  आता , मी गरीब गाय सापडलेय ना तुझ्या तावडीत , घे बोलून वाट्टेल ते ”

…………….

(फार पूर्वी हा किस्सा मला ईमेल फॉरवर्ड मधून प्राप्त झाला होता , मूळ किस्सा इंग्रजीतुन होता मी त्याचे सुबोध मराठीत भाषांतर केले आहे. मूळ लेखक कोण आहे ते माहीती नाही पण त्या अज्ञात लेखाकाचे मन:पूर्वक आभार!)

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.