‘धडाम धूम …धाड धाड .. ठण्ण .. ठण्ण .. टण्ण .. ट्ण्ण “

तीला जाग आली, कसला आवाज हा ?

शेजारी बघितले तर ‘तो’ जागेवर नाही !

दिवा लावला , घड्याळात बघितले रात्रीचे अडीच वाजलेत…म्हणजे  हा  एवढ्या रात्री कुठे गेला? लिंक लागली … मघाचा आवाज किचन मधून आला … भांडी पडल्याचा आवाज …म्हणजे स्वारी किचन मध्ये काहीतरी लुडबूड करतेय ..

ती कशीबशी चडफडत किचन मध्ये आली… तो किचन मध्येच होता.. डायनिंग टेबल शी… समोर वाफाळती कॉफी आणि एक डोनट …

“काय रे काय झाले ? कसला आवाज आला..”

“काही नाही जरा कॉफी करुन घेत होतो , हातातून भांडे पडले…”

“झोप येत नाहीये काय ? ”

तो काहीच बोलला नाही..

“का काय झाले , काही अशुभ स्वप्न पडले का?”

जरा वेळाने त्याने तोंड उघडले ..

” डार्लिंग , तुला माहीतेय का , आज चक्क वीस वर्षे पूर्ण झाली…”

“कशाला ?”

“विसरलीस? बरोब्बर वीस वर्षापूर्वी आपण आपल्या पहील्या डेट ला गेलो होतो..”

” अय्या , हो की रे .. मी विसरलेच होते , पण तू  मात्र लक्षात ठेवलेस हो..”

तीला नवर्‍याचे मोठे कौतुक वाटले..

“आणि आठवते का , आपण त्या दिवशी बागेत काय काय गंमती जमती केल्या”

“इश्श !”

ती लाजली…

“आणि मग पुढचे आठवतेय का? ”

“जावा तिकडे , तुमचे आपले काही तरीच..”

“आपण असे रंगात आलो असताना नाही का तुझा तो खडूस बाप अचानक आपल्या समोर आला..”

“ए माझ्या बाबांना नाही काही बोलायचे असे भलते सलते…”

“आठवतेय तुझा बाप तेव्हा काय म्हणाला होता ते?”

“…”

” बागेत येऊन ही असली थेरें करताय काय? माझ्या मुलीला फूस लावतोस ,   उद्याच्या उद्या लग्न कर तिच्याशी , नाहीतर तुला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवून चांगली २० वर्षे खडी फोडायला पाठवीन, वकील आहे मी , काय समजलास..”

“…..”

“आज मी जेल मधून सूटलो असतो गं!”


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. पण ही लेख माला , नवरा- बायको मधले तीन स्वतंत्र विनोद आहेत. मजेदार .. पुढचे दोन लिहून तयार आहेत .

   सुहास गोखले

   0
 1. Prashant

  Dear Sushasji,
  From the photo it seemed like a story of someone who went to jail. But the story turned out to be very hilarious. Lai Bhari.
  -Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रशांतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद… नाही तरी लग्न म्हणजे एक प्रकारची जेलच नाही का? फरक इतकाच की साध्या जेल ला एक निश्चीत मुक्ती दिवस असतो आणि तो केव्हा हे पण माहीती असते..

   सुहास गोखले

   0
 2. Supriya Patil

  Farch sundar. as kahitari vachayla far avdel. Vivahitanchya ayushyatil arthpurn vinod. khara ani gamtidar. ajun lekh apekshit ahet.

  0
  1. सुहास गोखले

   सुप्रियाताई ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.
   ब्लॉग ज्योतिष विषय मुख्य असे धरुन लिहलेले असले तरीही मी वेलेवेळी इतर अनेक विषयावर लिहले आहे आपण ब्लॉग च्या मुख्य पृष्ठावरच्या मेनु पैकी ‘निवडक लिखाण’ क्लिक केलेत तर माझ्या इतर लिखाणाच्या लिंक्स असलेलेले पान दिसेल , तिथुन आपल्याला हव्या त्या लेखा पर्यंत पोहोचता येईल.

   आपण ते सर्व लेख वाचावेत आपल्याला ते आवडतील , असेच अभिप्राय कळवत राहा.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.