थंडा प्रतिसाद ?

या टोपी खाली दडलयं काय ?
एका फुल दो माली
तू औंरों की क्यू हो गयीं
गुंतता हृदय हे
ह्योच नवरा पायजे!
उनसे मिलने की तमन्ना हैं..
जो वादा किया वो निभाना पडेगा
मला सांगा…
अग अग म्हशीं!
आते जाते खुबसुरत आवारा सडकों पे..
जींदगी ईत्तेफाक हैं
डब्बल धमाका
भाऊचा धक्का
संशय का मनी आला
आमच्यावर पन येक इस्टूरी लिवा ना रायटर
नाविलाज को  क्या ईलाज

या अशा अतिशय विस्तृत , सखोल आणि परिपूर्ण अशा २५+ केस-स्ट्डीज आत्ता  ह्या घटकेला माझ्या कडे पूर्ण लिहुन तयार आहेत. माझ्या डेटाबेस मध्ये आणखी १०० च्या आसपास केसेस  अशा निघतील की ज्यावर चांगल्या केस-स्ट्डीज तयार होऊ शकतील. पण इतके चांगले, सकस, नाविण्यपूर्ण, खूप अभ्यास करुन लिहलेले असूनही कोणी वाचायची तसदी घेत नाही असे दिसते.

माझ्या ब्लॉगची वाचन संख्या (Page Views) मी एक फूट-पट्टी म्हणून वापरतो. वर्डप्रेस (ज्यांनी मला ही ब्लॉग ची सुविधा प्रदान केली आहे) कडून मला प्रत्येक पोष्टची वाचन संख्या दिसते त्यावरुन लोकांना जास्त काय वाचायला आवडते हे कळते,  पण यातून मिळालेले संकेत माझ्या दृष्टीने निराशाजनक आहेत. सज्जाद हुसेन सारखा कमालीच्या ताकदीचा ,अवलिया संगीतकार दुर्लक्षीला गेला कारण ‘बाजारु’ संगीत देणे त्याला जमले नाही, माझ्या बाबतीतही असेच काही होत असावे.

पण शेवटी चांगले ते चांगलेच, अस्सल ते अस्सलच ! माझ्या सुदैवाने माझे लिखाण जिथे पोहोचायचे तिथे पोहोचले आहे, ज्योतिषशास्त्रा वर केस-स्ट्डीज चा आधार घेत एक पुस्तक लिहावे अशी विचारणा एका नामांकित प्रकाशन संस्थेकडून झाली आहे आणि मी त्याचा गांभिर्यपूर्वक विचार करत आहे. बाकी योग जुळून आले तर १०१ केस-स्ट्डीज चे  असे एखादे छानसे पुस्तक प्रकाशीत होईल ही, त्यात या सार्‍या केस-स्ट्डीज, त्यांच्या अनुषंगाने विनोदी किस्से , तात्पर्य कथा असे आणखी बरेच काही असेल.

जर माझा त्या प्रकाशन संस्थेशी करार झाला तर मात्र मला या केस-स्ट्डीज माझ्या ब्लॉग लिहिता येणार नाहीत, अर्थात केस-स्ट्डी आणि त्याच्या अनुषंगाने येणारे लिखाण वगळता आणखी बरेच काही शिल्लक आहेच की! अहो इतके वाचतो, अनुभवतो ,रोज इतक्या लोकांना भेटतो, बोलतो,  बरेच  काही ऐकलय, बरेच काही पाहीलेय, बरेच काही स्वत: भोगलेय , हे सगळे शब्दबद्ध करणे सहज शक्य आहे पण ….

असो,  जसा वेळ मिळेल आणि जसा मूड लागेल तसे काही लिहण्याचा प्रयत्न जरुर करेन.

धन्यवाद.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

20 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   वनमालाजी,

   धन्यवाद.
   एव्हढे चांगले लिहून सुद्धा वाचले जात नाही हीच खंत आहे.

   कळावे

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   सुरेशजी,

   धन्यवाद,

   आहेत काही वाचक जरुर आहेत पण असे वाटते की जे मी लिहतो ते एकतर लोकांना आवडत नसावे किंवा ते जरा जास्त तांत्रीक असल्याने काहींना ते समजणे अवघड जात असेल. एखादी केसस्ट्डी किंवा तसाच एखादा अभ्यासपूर्ण लेखा लिहायाला बरीच तयारी करावी लागते, वेळ ही फार लागतो, एव्हढी मेहेनत करुन जर ते कोणी वाचणार नसेल लिहायचे कशाला हा प्रश्न पडतो. एकतर लिहणे कमी करणे किंवा लिखाणाचे स्वरुप (ढाचा ) बदलणे असे उपाय असू शकतात. लिखाणाचे स्वरुप बदलायचे म्हणजे परत अभ्यास आला तेव्हढा वेळ मला मिळेल असे वाटत नाही तेव्हा पहीला उपाय जो सहज शक्य आहे तो अंमलात आणावा हे बरे असे वाटले. अर्थात ब्लॉग बंदच करणार आहे असे मात्र नाही, पोष्ट मध्ये लिहले आहे त्या प्रमाणे जसा वेळ होईल आणि मूड लागेल त्याप्रमाणे काही बाही लिहित राहीन. आता विषय निघालाचा आहे म्हणून विचारतो : ‘आपल्या ब्लॉग बद्दल च्या काही खास अपेक्षा असल्यास मला कळवा, मला शक्य झाले तर मी त्या नुसार काही लेखन करण्याचा प्रयत्न करेन.

   अभिप्रया बद्दल पुन्हा एकदा आभार

   आपला
   सुहास गोखले

   0
  2. Suresh

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मला वाटते एक कारण म्हणजे आपल्या ब्लोग वर २-३ महिने काहीच पोस्टनसल्यामुळे web traffic थोडा कमी झाला असावा. असो.

   माझ्या मते आपण एक प्रतिष्ठित, यशस्वी लोकांच्या पत्रिकेची उकल करून समजावणारी मालिका सुरु केली तर? यात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊ शकतील. उदाहरण देऊन सुरुवातच करायची झाली तर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, सावरकर, अगदी अलीकडच्या काळातील काही यशस्वी लोक म्हणजे जमशेदजी टाटा , रतन टाटा , नारायण मूर्ती , सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर यांचे देत येईल.
   या सर्वांनी अथक संघर्ष करून यश मिळवले आहे परंतु ग्रहांचे पाठबळ देखील हवेच! जर त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना पत्रीकेद्वारा समजून सांगता आल्या तर पत्रिका पाहण्याविषयी थोडी माहितीही मिळेल आणि वाचकांची उत्सुकता पण कायम राहील असे मला वाटते.
   यावर आपले मत वाचायला जरूर आवडेल.

   0
   1. सुहास गोखले

    श्री.सुरेशजी,
    आपली सुचना निश्चीतच विचारात घेण्यासारखी आहे. पण यात एक मुख्य अडचण अशी येते की या सेलेब्रिटींच्या निश्चीत जन्मतारखां, जन्मवेळा मिळत नाहीत.म.गांधी ,नेहरु, इंदीरा गांधी, ओशो यांच्या किमान चार-पाच जन्मवेळेच्या पत्रीका विविध ग्रथांतून ,मासीकांतून दिलेल्या आढळतात. बर्‍याच वेळा हे सेलेब्रीटी खासकरुन राजकारणातले आपल्या वेगवेगळ्य जन्मवेळा सांगून जन्मवेळे बद्दल गोंधळ होईल असेच बघतात जेणे करुन त्यांच्याबद्दल भाकितें करणे लोकांना अवघड जाईल.काहीवेळा एखाद्याची जन्मवेळ माहीती नसते मग त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या घटनांचा जुळेल अशी एक पत्रिका चक्क बनवली जाते. तरीही मी जरुर यावर काम करुन प्रयत्न करेन.

    0
  1. सुहास गोखले

   श्री.भगवानजी,

   आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसत आहे. आपण सर्वप्रथम 19 जानेवारी 2015 ला एक प्रश्न ईमेल द्वारा विचारला होतात, त्याला मी 20जानेवारी 2015 रोजी ईमेल द्वारा उत्तर दिले होते. होते.त्या उत्तरात मी माझे मानधन किती कसेल,ते कसे भरायचे ,प्रश्नकुंडली व होरारी नंबर कसा सांगायचा याबाबत सविस्तर लिहले होते. आपण त्याला उत्तर म्हणून प्रत्यक्षा भेट मागीतली होती,पण मी प्रत्यक्षा भेटीत सल्लमसलतीचा प्रस्ताव वेळेअभावी अगदि कमी वेळा स्विकारतो. काही खास / खासगी / जोखमीचे प्रश्न असतील तरच मी प्रत्यक्ष भेटीत मार्गदर्शन करतो, आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर फोन/ ईमेल मार्फत सह्जा देता येण्यासारखे आहे. 20 जानेवारी 2015 नंतर आपण संपर्क साधलेला नाही आणि माझ्या माहीती प्रमाणे आपण माझे मानधन ही जमा केलेल नाही. मानधन जमा झाल्या खेरिज मी आपल्या प्रश्ना वर काम करु शकत नाही. जर आपण पैसे भरले असतील पण मला कळवले नसेल तर आपण पैसे केव्हा भरले ,कसे भरले याचा तपशील ताबदतोब कळवा मी माझे बँक अकौंट तपासून पाहीन आणि जर खरोखरीचआपण मानधन जमा केले असेल तर आपल्या प्रश्नावर ताबडतोब काम करुन 24 तासाच्या आता आपला रिपोर्ट पाठवेन.

   आपण गेल्या महीन्यात एका कॉमेंट मार्फत प्रश्न विचारला होतात्यालामी कॉमेंत मार्फतचा उत्तर दिले होते तेअसे:

   श्री भगवानजी,

   ‘मेडिकल समस्या’ च्या बाबतीत ज्योतिषशास्त्र कमालीचे तोकडे आहे.आपल्या मुलाच्या समस्यां ज्योतिषशास्त्रा द्वारे काही फारसे करता येणार नाही असे मला वाटते. उपाय तोडग्यांनी कोणत्याही समस्या दूर होणार नाहीत,मेडिकलच्या तर नाहीच नाही,तेव्हा त्यात वेळ आणि पैसा वाया घालवू नका, हे असले उपाय तोडगे करण्यात तुम्ही वेळ घालवत बसला तर असलेला आजार आणखी बळावेल आणि मग एक वेळ अशी येईल की ईतर वैद्यकिय उपचारही अवघड होऊन बसतील. तेव्हा आपल्या मुलाच्या समस्या योग्य त्या डोक्टरांच्या सल्ल्याने सोडवा,कोणत्याही ज्योतिषाच्या नादाला लागू नका ही कळकळीची विनंती आहे.

   आपला
   सुहास गोखले

   मला वाटते आता खुलासा झाला असेल.

   कळावे

   आपला

   सुहास गोखले

   0
 1. Anant

  श्री. सुहासजी,

  कृपया ब्लॉगवरील लेखन चालू ठेवा. आमच्या सारखे तुमच्या लेखनाचे चाहते रोज ब्लॉगवर चक्कर मारतात नवीन लेखाच्या आशेने.
  तुमचे लेख खूप अभ्यासपूर्ण असतात. तुमची लेखनशैली सुंदर आहे त्यामुळे वाचण्यास मजा येते.

  धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   श्री.अनंतजी,

   धन्यवाद,

   ब्लॉग बंदच करणार आहे असे नाही, पोष्ट मध्ये लिहले आहे त्या प्रमाणे जसा वेळ होईल आणि मूड लागेल त्याप्रमाणे काही बाही लिहित राहीन. आता विषय निघालाचा आहे म्हणून विचारतो : ‘आपल्या ब्लॉग बद्दल च्या काही खास अपेक्षा असल्यास मला कळवा, मला शक्य झाले तर मी त्या नुसार काही लेखन करण्याचा प्रयत्न करेन. पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत , एकवार लिखाण बंद करेन पण चटकदार (लोकप्रिय) लिखाणाच्या नादात शिवराळ, गलिच्छ भाषेत (जे काही मराठी ज्योतिष ब्लॉगज वर वाचावयास मिळते) असे काही लिहणार नाही,राशी भविष्य देणार नाही,भाकड उपाय तोडगे लिहणार नाही. माझा ब्लॉग ही एक घरंदाज सराफी पेढी आहे उद्या लोकांची मागणी आहे / खप आहे म्हणून तिथे दारु, गुटखा विकायाला ठेवणार नाही!

   अभिप्रया बद्दल पुन्हा एकदा आभार

   आपला
   सुहास गोखले

   0
   1. Anant

    धन्यवाद श्री. सुहासजी.

    आमची अशी अपेक्षा पण नाही की तुम्ही चटकदार (लोकप्रिय) लिखाण करावे. तुमच्या लेखांचा जो दर्जा आहे केवळ त्यासाठी माझ्यासारखे अनेक जण तुमचा ब्लॉग वाचतात. त्यामुळे तुम्ही हा विचार मनात आणू पण नका. तुम्ही अगदी योग्य उपमा वापरली आहे – घरंदाज सराफी पेढी, या पेढीचे ग्राहक दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत, तसेच त्यांना तुम्ही तिथे निकृष्ट दर्जाचा कोणताही माल विकणार नाही याची खात्री आहे.

    आपल्या ब्लॉगवर जमल्यास – compare and contrast अश्या पद्धतीच्या काही केसेस असतील तर त्यांचे विश्लेषण व तुमची त्यावरील टिपणी वाचायला आवडेल.
    पुढील लिखाणास शुभेच्छा.

    -अनंत

    0
    1. सुहास गोखले

     श्री.अनंतजी,

     धन्यवाद,

     आपण म्हणता ते ‘ compare and contrast ‘ म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे? आपली कल्पना स्पष्ट करा ,लिहायचा प्रयत्न करेन. मात्र जन्मकुंड्ल्यांवर आधारित असे काही लिहणे ‘गोपनियतेच्या’ संकेता मुळे शक्य होईलच असे नाही.

     अभिप्राया बद्दल धन्यवाद.

     आपला

     सुहास गोखले

     0
 2. Anant

  Shri Suhasji,

  What I meant with ‘compare and contrast’, is to compare Indian and Western methodology which you follow. Ofcourse we respect personal and professional confidentiality of the data. Sometimes it will help to understand where two methodologies provide similar or different conclusions. In the end which was more accurate and why.

  Thanks,
  Anant

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   माझ्या २०१५ मधल्या केस स्ट्डीज पाहील्यात तर हे लक्षात येईल की मी स्वत: के.पी.आणि पाश्चात्य होरारी या दोन्ही पद्धतींचा वापर करतो. भारतातली पारंपरीक ज्योतीष पद्धती ही फार सखोल , तपशील वार आणि कार्मीक / मानसशास्त्रा च्या अंगाने विचार करणारी आहे. के.पी. फक्त ‘इव्हेंट प्रेडिक्शन’ वर (चुकीचा ) भर देते. पाश्चात्य पद्धती क्षमता असूनही इव्हेंट प्रिडीक्शन जरत नाही कारण तिथले कायदे – कानू ! कोणतीही पद्धती परिपूर्ण नाही. सातत्य नसणे , संशोधनाचा अभाव आणि काळाच्या ओघात नष्ट झालेले ज्ञान यामुळे या शास्त्रात बर्‍याच उणीवा आहेत. चांगले लोक या क्षेत्रात येत नाहीत आणि आलेले टीकत नाहीत ही व्यथा आहे. असो , आपल्या सुचने नुसार काही लिहता आले तर मी जरुर प्रयत्न करेन.
   धन्यवाद

   सुहास गोखले

   0
 3. Gaurav Borade

  सर , जमल्यास काढाच एखादे छानसे पुस्तक… आवडेल वाचायला.. कारण तुमची लिहिण्याची शैली खूप चांगली आहे…
  आणि इतर ज्योतिष विषयक site वर पण पोस्त केले तर पण इतरांना समजेल (ज्यांना हा ब्लोग माहित नाही )… कारण मी पण via मायबोली आलो आहे… ( हे माझ suggestion आहे )

  0
  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,

   मी पूर्वी ‘मनोगत’ आणि ‘मायबोली’ वर लिहले आहे. पण या दोन्ही साईटस वरती ज्योतीषाच्या विरोधी लोकांची संख्या फार मोठी आहे. आपण इतकी मेहेनत घेऊन लिहायचे आणि कुणीही उठावे त्यावर एखादि गलिच्छ पिचकारी मारावी हे बरोबर वाटत नाही. हे शास्त्र ईतके आलतु फालतु नाही पण या सगळ्याच्या तोंडाला कोण लागणार? म्हणुन मी अशा साईट्स वर लिहणे बंद केले, शिवाय बर्‍याच वेबसाईट्स , ग्रुप्स, फोरम्स वर स्वत:च्या ब्लॉग / वेबसाईट ची लिंक (यु आर एल) टाकू देता नाहीत त्यामुळे काही लोकांना लेख आवडला तरी त्यांना माझ्या पर्यंत पोहोचता येत नाही.

   त्यापेक्षा एखादे पुस्तक लिहले तर जास्त चांगले असा विचार आहे.

   सुचने बद्दल धन्यवाद.

   आपला

   सुहास गोखले

   0
 4. Abhijit Mane

  Sir tumche Likhan mi jivacpad aavdine vachto, mala jyotish ha vishay shastrshuddha kalayala lagla yaat tumcha sinhacha vaata ahe. Mi tumche likhan vachun jyotish shikayla suruvaat keli ani tumche likhan vaachunch shiktoy. tumchi samjavun saanganyachi paddhat itki surekh ahe ki Kharokhar tarkshuddha ani shastriy vichar karnarya mansala te lagech samjel ani patel. Mi tumhala pratyaksh pahile nasale tari dekhil tumche likhan vachtana tumhi svata mala shikvata ani margadarshan karta ase mala vatat rahte. Mi svatala kamnashibi samjato ki mi tumchya javal rahun tumchyakadun shiku shakat nahi. tumchyasarkha shikshak ani guru mala upalabdh nahi, parantu tyachveli mi mala bhagyavaan samjato ki ya blogchya madhyamatun mala tumchyakadun shikayala bhetate.
  Anekda ase hote ki jyotishachi pustake ghene mala aarthik karnatun jamat nahi. Parantu tumcha ek lekh evd kahi samjavun jato ki je ek sampurn pustak samjavu shakat nahi.
  Sir mi tumcha Arjun jari banu shakt naslo tari Eklavya bananyacha prayatn manapasun karat ahe.
  Sir krupa karun ase darjedar likhan karat raha ani blaog var lihit raha hi manapasun namr vinanti. Naaraj houn lekhan band karu nye athava lekhahi kami karu nayet hi vinanti.
  Apla Vachak ani Vidyarthi ——— Abhijit Mane , Satara

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अभिजीतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. अहो मी फार काही केलेले नाही. मी ही असाच पुस्तके वाचूनच शिकलो आहे, माझ्या गुरुंचे श्री. श्रीधरशास्त्री मुळ्ये यांचे मार्गदर्शन मला फार थोडे दिवस लाभले पण त्या थोड्या काळात त्यांनी मला ज्योतिष शिकवण्या पेक्षा ज्योतिष शिकायचे कसे हेच जास्त शिकवले. प्रत्येक गोष्ट तर्काला घासून मगच मान्य करायची , प्रत्येक गोष्टी मागे काही तरी सुसुत्र विचार पाहीजेच, अशी विचार सरणी ठेऊन अभ्यास केलात तर नक्की यश लाभेल असा माझा विश्वास आहे.

   असेच अभिप्राय देत राहा , आपल्या काही सुचना / अपेक्षा असल्यास नि:संकोच पणे कळवा , आगामी लिखाणात त्यांचा जरुर विचार करेन.

   शुभेच्छा

   आपला

   सुहास गोखले

   0
 5. प्राणेश

  केस स्टडीज् अत्यंत सुंदर आहेत. कृपया लिहिणे चालू ठेवा.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.